April 2013 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

27 April 2013

पंधरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: 'उद्योगक्रमणा सहा दशकांची'

नमस्कार!
मित्रांनो बॉर्न टू विनच्या परिवारासाठी २०१३ वर्ष दणक्यात सुरु झालं. १९ जानेवारीला बॉर्न टू विनने यशस्वी ५ वर्षे पूर्ण केली. सहाव्या 'द सक्सेस ब्लू प्रिंट'  या कार्यक्रमाने या वर्षाची सुरुवात झाली. तसेच १४ वा लक्ष्यसिद्धी सोहळा पहिल्यांदाच यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा इथे साजरा झाला. आणि या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होत 'ध्येयनिश्चीती ते ध्येयपूर्ती' या आपल्या त्रैमासिकाच प्रकाशन!!
एप्रिल २०१३ ला सगळ्यांचा लाडका विषय म्हणजेच फ्युचर पाठशाला…. याच्यादेखील ५ बॅचेस पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादाने वसई, सँडहर्स्ट रोडपुणे आणि अलिबाग येथे यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. व आता बोरीवलीडोंबिवलीमाटुंगा इथे बॅचेस सुरु आहेत. तसेच लवकरच विले पार्लेकांदिवलीअंधेरीकर्जतवरळीबेलापूरकल्याणविक्रोळी, वाई (सातारा)ठाणे येथे सुरु होणार आहेत.
लक्ष्यवेधच्या पंधराव्या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी जबरदस्त झाली आहे. बॅच खुपच छान पार पडली आणि आता सगळ्या आजी-माजी प्रशिक्षाणार्थ्यांना ओढ लागली आहे  ती पंधराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची. मित्रांनो आगामी  लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडणार आहे, ३० एप्रिल २०१३ रोजीयशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (प.) येथे संध्याकाळी ६:०० वाजता.
आपल्याला नेहमीच उत्सुकता असते की लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोणमित्रांनो नेहमी प्रमाणेच लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक! लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या या प्रवासातलं अजून एक सोनेरी पान म्हणजे या वेळी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत विकोचे अध्यक्ष श्री. गजानन पेंढारकर सर. 'उद्योगक्रमणा सहा दशकांची' या त्यांच्या भाषणातून सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी शून्यातून इतकं विशाल साम्राज्य कसं प्रस्थापित केलं याचा सविस्तर  उलगडा ते करणार आहेत. 
श्री. गजानन पेंढारकर सर व विको लेबॉरेटरीज विषयी थोडेसे:

श्री. गजानन पेंढारकर हे विकोचे अध्यक्ष आहेत. यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. अहमदाबाद मध्ये ते फार्मसीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९५७ साली ते वडिलांच्या व्यवसायात सामील झाले आणि लवकरच त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या २० दुर्मिळ जडीबुटीवनस्पती आणि इतर औषधे वापरून संपूर्ण स्वदेशी आयुर्वेदिक टूथपेस्ट तयार करण्यात यश मिळविले. सरांनी आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता प्राप्त करुन देण्यासाठी अतिशय परिश्रम केले आणि कमालीचे यश मिळविले.
परळ येथे १२०० चौरस फुटाच्या जागेत "विको" ची उत्पादने होत असत. नंतर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे ८० हजार चौरस फुट जागा घेऊन तेथे अत्याधुनिक कारखाना उभारण्यात आला. १९८० साली "विको" ची वार्षिक उलाढाल फक्त ३ कोटींची होती. आज २०११ साली ती ३५० कोटीवर गेली आहे. श्री. गजाननराव पेंढारकर यांच्या दूरदृष्टीचे, परिश्रमाचे हे फलित असून येत्या ५ वर्षात वार्षिक उलाढाल १००० कोटी रुपयांवर नेण्याचा त्यांचा निश्चय आहे. भारतीय उत्पादने आणि आयुर्वेद परदेशात लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या निर्धारामुळेच सध्या ४० देशात त्यांची उत्पादने खपत आहेत. १९५५ पासून "विको" ची उत्पादने आईसलँड येथेही निर्यात होऊ लागली. आणि प्रथमच भारतीय माल तेथे पोहोचला. विकोला "International Trade Trophy Phonecia" हा मानाचा आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक करंडक १९८० साली "माल्टा" चे माननीय राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते मिळाला. ९२-९३, ९३-९४ व ९८-९९ साली देखील विकोला निर्यात प्रोत्साहनातील पारितोषिके मिळाली. विकोला आतापर्यंत उत्तम जाहिरात, निर्यात, दर्जा, आंतरराष्ट्रीय व्यापार, याबाबत देशी विदेशी अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. "२००२" हे वर्ष म्हणजे, विकोचे सुवर्ण महोत्सवी वर्ष. त्यावर्षी विको उद्योगसमुहाला ५० वर्षे पूर्ण झालीत.
अशा ह्या स्फुर्तीदायक कार्यक्रमात आवर्जुन उपस्थित रहावे... 
पंधरावा लक्ष्यसिध्दी सोहळा
विषय: 'उद्योगक्रमणा सहा दशकांची'
दिनांक: ३० एप्रिल २०१३
वेळः संध्याकाळी ६ वाजता
स्थळः यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८७६६६४२६६५४९६१९४६५६८९



10 April 2013

अतुल राजोळी यांची लाईव्ह मुलाखत झी २४ तास वर


नमस्कार मित्रांनो
आपणा सर्वांना कळविण्यात खूप आनंद होतोय कि दिनांक २ एप्रिल रोजी बॉर्न टू विन चे संचालक श्री अतुल राजोळी यांची लाईव्ह मुलाखत झी २४ तास या वाहिनीवरील हितगुज या कार्यक्रमात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षी १ मे २०१२ रोजी देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलाखतीचा विषय होता 'फ्युचर पाठशाला'. या मुलाखतीमध्ये अतुल राजोळी यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांवर तसेच सर्वांगीण विकासावर आधारित प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच फ्युचर पाठशाला हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कश्याप्रकारे अमुलाग्र बदल घडवीत आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली. स्वतःचा सर्वांगीण विकास करणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे याबद्दल देखील ते बोलले. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील या लाईव्ह मुलाखतीला महाराष्ट्रभरातून श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपणास हि मुलाखत पाहण्याची संधी मिळाली नसेल, अथवा आपणास हि मुलाखत पुन्हा पहायची असेल तर ती संधी इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फक्त क्लिक करा व पहा. आणि आपले अभिप्राय नक्की पोस्ट करा.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites