नमस्कार!
गेल्या रविवारी दिनांक १३ जुन २०१० रोजी लक्ष्यवेधचा प्रास्ताविक कार्यक्रमाचा सेमिनार रविंद्रनाट्य मंदिरच्या मिनी ऑडीटोरीयम मध्ये पार पडला. हॉल हाउसफुल होता, नव्हे तर लोकांनी अक्षरशः ओथंबून वाहत होता. काही लोकं हॉलच्या पायर्यांवर बसुन कार्यक्रम पहात होते. लक्ष्यवेध कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता एवढं तर मी नक्कीच सांगु शकतो कि आज लोकांना लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमासारख्या कार्यक्रमांची खरोखरचं खुप गरज आहे. गेल्या वर्षभरामध्ये ३५० पेक्षा जास्त मराठी व अमराठी प्रोफेशनल लोकांनी (नोकरदार, स्वयंरोजगार व उद्योजक) लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचा लाभ घेतला आहे व सेमिनार बद्दल सांगायचे झाले तर २००० पेक्षा जास्त लोकांनी गेल्या वर्षभरामध्ये लक्ष्यवेध अंतर्गत राबवण्यात येणार्या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.
प्रशिक्षण क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्यापुर्वी पासुनच मी सतत स्वतःला प्रश्न विचारला कि, "काही माणसे इतर बर्याच माणसांपेक्षा जास्त यशस्वी का होतात? ते असे काय करतात जे इतर बरीच माणसे करत नाहीत?" या एका प्रश्नाभोवतीच माझा अभ्यास व प्रशिक्षणक्षेत्रातील प्रवास सुरु झाला. भरपुर पुस्तके, यशस्वी माणसांबाबतचे संशोधन, निरनिराळे प्रशिक्षण या सर्व माध्यमांच्या सहाय्याने मला हे लक्षात आले कि आयुष्यात यश मिळविणे ही एक कला व त्याच बरोबर ते एक शास्त्र सुद्धा आहे. ह्या शास्त्राला मी एका सोप्या व सरळ यंत्रणेमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न केला जेणे करुन हे शास्त्र अथवा कला सर्वसामान्य माणसांसमोर मांडता येईल व सर्वसामान्य माणुस त्या यंत्रणेचा वापर करुन असामान्य यश मिळवू शकेल. या यंत्रणेला मी यशस्वी माणसांची ब्लु प्रिंट किंवा नकाशा मानतो व मी ठामपणे सांगु शकतो कोणताही यशस्वी माणुस कळत नकळतपणे या नकाश्याचा वापर करतोच करतो. या नकाश्याला मी "लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्त्वाच्या पायर्या" असे नाव दिले आहे.
लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्त्वच्या पायर्या या खालिल प्रमाणे आहेतः
१) ध्येय निश्चिती:- आपल्या भावी आयुष्याचे नेमकं व स्पष्ट ध्येय ठरविणे.
२) रिसर्च:- ध्येयाला अनुसरुन उपलब्ध सर्व माहिती विशिष्ट पध्दतीने गोळा करणे.
३) आरखडा:- ध्येय साध्य करण्यासाठी कोणती कृती व ती कोणत्या क्रमाने कराल याची मांडणी करणे.
४) अॅक्शन प्लॅन:- तुमच्या रिसर्च व आराखड्याला अनुसरून सविस्तर अॅक्शन प्लॅन तयार करणे.
५) कृती:- तुमच्या क्षमतांचे केंद्रिकरण करुन कृती करणे.
६) लक्ष्यसिध्दी:- लक्ष्य साध्य करणे.
लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्त्वाच्या पायर्यांबद्दल आणखी जाणून घ्यायचे असल्यास व या पायर्यांचा वापर करुन तुम्ही पाहीजे ते साध्य कसे करायचे हे समजुन घेण्यासाठी लक्ष्यवेधच्या आगामी सेमिनारला नक्की उपस्थित रहा!
लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्त्वाच्या पायर्यांचा वापर करुन आज पर्यंत कित्येक लोकांनी त्यांचे ध्येय साध्य केलेले आहे. तुम्ही सुध्दा तुम्हाला हवे ते नक्कीच साध्य करू शकता.
तर मग भेटुया लक्ष्यवेध सेमिनारमध्ये...