'तुम्ही तुमच्या सोळा वर्षाच्या मुलाला कारची चावी देऊन त्याला रस्त्यावर कार चालवण्यासाठी एकटं मोकळं सोडत नाही, तसंच आपण आपल्या मुलांच्या आयुष्यात त्यांना एकटं सोडू नये'
आज जग बदलत आहे, आपण सुद्धा बदललं पाहीजे. भावी तरुण पिढीने सुद्धा या नवीन जगाच्या गरजांना स्वीकारुन स्वतः जास्तीत जास्त प्रयत्न करुन आव्हान दिले पाहिजे. दुर्देवाने आपली शिक्षणपद्धती खूपच गोंधळात टाकणारी आहे. कारण ती कौशल्य (Skills) आणि प्रवृत्ती (Attitude) यांना प्राधान्य न देता फक्त पुस्तकी ज्ञानाला (Theory) महत्व देते. जर आपल्या भावी पिढीला मानसिक व बौधिकरित्या सक्षम बनवून यशस्वी वाटचाल करायची असेल तर आपल्याला त्यांच्या शिक्षणाच्या मुलभूत बाबींवर लक्ष केंद्रित केले पाहीजे.
फ्युचर पाठशालाTMचा उद्देशः
दहा सत्रांच्या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नेतॄत्वगुण विकसित करण्यास प्रशिक्षण देणे, ज्यामुळे त्यांना त्याच्यांतील विशेष गुण ओळखण्यास व सुप्त शक्तींची जाणीव होण्यास मदत होईल तसेच आवश्यक तत्त्वांची जोड देऊन कृतीप्रधान कौशल्ये विकसित करणे.
फ्युचर पाठशालाTM प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना होणारे फायदे:
- स्वतःचे शैक्षणिक ध्येय निश्चित करणे
- परिक्षेत चांगले गुण मिळविणे
- शिस्तबद्ध व जबाबदारीने वागणे
- संभाषण कौशल्य सुधारणे
- आत्मविश्वासात प्रचंड वाढ
- मानवी स्नेहसंबंध सुधारणे व नीट जोपासणे
- स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला शिकणे
- स्वतःचे वजन कमी करायला किंवा वाढवायला शिकणे
- स्वतःमधील नेतृत्वगुण विकसित करणे
- स्मरणशक्तीमध्ये अमूलाग्र सुधारणा
- एकाग्रता व इच्छाशक्तीमध्ये वाढ
- कल्पनाशक्ती व बुद्धीमत्तेमध्ये वाढ
- कार्यक्रमादरम्यान स्वतःचे गोलबुक बनविणे
फ्युचर पाठशालाTM काय आहे?
हा एक दहा सत्रांचा अविस्मरणिय असा प्रवास आहे. ज्यामध्ये एकूण चार Follow-up सत्रांचा समावेश असतो. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना काही शक्तीशाली कौशल्ये व तत्त्वे अत्यंत खेळकर व विचार परिवर्तीत करणार्या माध्यमांद्वारे शिकवली जातात. आम्ही विद्यार्थ्यांना Follow-up पुरवतो, ज्याच्या मदतीने सत्रांनंतर सुद्धा शिकवलेली तत्त्वे व कौशल्ये विद्यार्थी आपल्या आचरणात आणू शकतात. कार्यक्रमादरम्यान प्रभावशाली प्रदर्शन करणार्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन पुरस्कृत करण्यात येते.
फ्युचर पाठशालाTMच का?
- आधुनिक तंत्रज्ञान व पद्धत
- मनोरंजन आणि वैचारिकता यांचा मेळ
- शिक्षण नव्हे प्रशिक्षण
- मर्यादित विद्यार्थी व वयोगट
- कार्यक्रमादरम्यान व कार्यक्रमानंतर सुद्धा Follow-up
- फ्रेंडली त्याचबरोबर शिस्तबद्ध वातावरण
- व्हॅल्यू फॉर मनी
प्रशिक्षणक्रमातील विषयः
- ध्येयनिश्चिती (Goal Setting)
- गो गेटर प्रवृत्ती (Go-Getter Attitude)
- संभाषण कौशल्य (Communication Skill)
- मानवी स्नेहसंबंध (Interpersonal Relationship)
- आरोग्य (Health)
- संघ बांधणी (Team Building)
- मेंदूचा विकास (Brain Stimulation)
- आत्मविश्वास जागवा (Be Confident)
- भावनांवर ताबा (Mental Diet)