October 2014 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

14 October 2014

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती!

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती!
स्वतःची उच्च विश्वसनियता निर्माण करा...
विचार व वागणुक परिवर्तित करणारी बॉर्न टू विन प्रस्तुत एक दिवसीय मार्गदर्शक कार्यशाळा
विश्वास हा आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांचा आधारस्तंभ असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी स्नेहसंबंधांमध्ये, संघामध्ये, कुटुंबामध्ये, संस्थेमध्ये, राष्ट्रामध्ये व जगामध्ये विश्वास खुप महत्त्वाची भुमिका बजावतो. जर विश्वास नसेल तर शक्तीशाली राजकीय सरकार पडू शकते, यशस्वी व्यवसाय उध्वस्त होऊ शकतो, अर्थव्यवस्था कोलमडू शकते, प्रभावी नेतृत्व संपुष्टात येऊ शकते, उत्तम मैत्रीचा अंत होऊ शकतो, स्नेहसंबंधांमध्ये तफावत निर्माण होऊ शकते.
उच्च विश्वास प्रस्थापित केल्याने उत्तुंग यशप्राप्ती होऊ शकते. विश्वास निर्मितीमुळे कोणत्याही क्षेत्रात व आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत वेगवान प्रगती होऊ शकते. परंतु विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रीयेला बर्‍याच अंशी दुर्लक्षित केले जाते व जेवढे महत्त्व दिले पाहिजे, तेवढे दिले जात नाही. विश्वास दिवसातले २४ तास, आठवड्यातील ७ दिवस व वर्षातील १२ महिने आपल्याला प्रभावीत करत असतो. आपल्या विचारांचा, आयुष्याचा, स्नेहसंबंधांचा, संभाषणाचा व प्रत्येक वागणुकीचा दर्जा विश्वासावर अवलंबुन असतो.
जर वेगात चालायचं असेल तर एकटं चाला; परंतु बरंच अंतर चालायचं असेल तर इतरांना सोबत घेऊन चाला. 
 
पहा जबरदस्त प्रेरणादायी व्हिडी

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती! या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी आपल्या प्रभावी शैलीद्वारे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात स्नेहसंबंधांमध्ये उच्च विश्वास कसे निर्माण करु शकाल याबाबत मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेच्या मदतीने आपण आपली उच्च विश्वसनीयता निर्माण करु शकाल व आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांच्या सहाय्याने यशस्वी होण्याच्या दिशेने वेगवान प्रगती कराल.
विश्वास निर्मिती वेगवान प्रगती! या कार्यशाळेमध्ये खालील गोष्टींचा खुलासा होईल? 
. स्वतःची विश्वसनियता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या?
. वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी कसे वागावे?
. परस्पर व्यवहार कौशल्यात सुधारणा कशी करावी?
. आपल्या वागणुकीत कोणते सकारात्मक बदल करावे व ते करण्यासाठी मार्गदर्शन
. स्नेहसंबंधामधील अडचणी कल्पकतेने सोडवण्यासाठी आवश्यक दृष्टीकोन
. व्यावसायिक स्नेहसंबंध कसे सुधारावे व जोपासावे?

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती! या कार्यशाळेमधील विषय:
. विश्वास आणि कार्य व्यवस्था
. विश्वास म्हणजे नक्की काय?
. विश्वासाच्या ५ लहरी
. स्वतःची उच्च विश्वसनियता निर्माण करणे
. विश्वास निर्मितीचे ४ महत्त्वाचे गुणधर्म
. विश्वसनिय स्नेहसंबंध निर्माण करणे
. विश्वास निर्मितीच्या १३ वागणुकी
. कुशल विश्वास - इतरांवर विश्वास ठेवण्याचे तंत्र
  
हि कार्यशाळा कोणासाठी? 
. सामाजिक अथवा व्यावसायिक संस्थांचे कर्मचारी
. मॅनेजर, लिडर व एक्सेक्युटिव्ह
. स्वयंरोजगारकर्ते व प्रोफेशनल्स
. उद्योजक
. गृहिणी

दिनांकः रविवार, २ नोव्हेंबर २०१४
वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
गुंतवणुकः रुपये १०००/- (बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व मी उद्योजक मेंबर यांसाठी रु. ८००/- फक्त)
प्रवेशिका मिळवण्यासाठी संपर्कः
022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites