October 2018 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

26 October 2018

उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे


उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे

उद्योजकाचे जीवन ही एक अडथळ्यांची शर्यत आहे. पुढे जाण्यासाठी आपल्याला सतत तयार असणे आवश्यक असते. एक चुकीची हालचाल आपल्याला पडण्यासाठी पुरेशी असू शकते. आपण सुपरहिरो नाहीत, म्हणून आपण अनेकदा चुका करतो किंवा चुकीचे वळण घेतो ज्यामुळे आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागते. परंतु अपयश खरोखरच आपल्या स्वप्नांपासुन आपल्याला परावृत्त करते का? जर याचे उत्तर होकारार्थी असेल तर, आपण चुकीचे आहोत.
उद्योजकाच्या जीवनात यशाइतकेच अपयश देखील तितकेच महत्वाचे आहे हे आपण ०७ कारणांद्वारे जाणून घेऊया.
. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
" अपयश हे आपल्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे " - ओप्रा विनफ्रे
अपयश प्राप्त होणे ही घटना सुखद नसते, तरीसुद्धा आपण यशाच्या आणखी एक चरण जवळ जात असतो. कारण अपयशानंतर आपण अधिक जोमाने प्रयत्न करू लागतो. आपण अयशस्वी होतो याचा अर्थ आपण आपल्या ध्येयपूर्तीसाठी नक्कीच काहीतरी हालचाल करतो. या छोट्या गोष्टीही आपल्या उद्योजकीय अनुभवाला अंतर्बाह्य समृद्ध करत असतात, आणि सरतेशेवटी आपल्याला साहाय्यभूत ठरतात. ज्याप्रमाणे आपण धडपडता सायकल शिकू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण अडखळता यशाच्या शिखरावर पोहोचू शकत नाही ठामपणे उभे राहू शकत नाही. म्हणून भव्य यशप्राप्तीसाठी अपयशाची पायरी ओलांडणे महत्वाचे आहे

. जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण काहीतरी शिकतो.

" यश साजरे करणे चांगले आहे, परंतु अपयशाच्या धड्याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे." - बिल गेट्स
अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जाते. कदाचित पहिल्या प्रयत्नात आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत, दुसऱ्या प्रयत्नात देखील आपले उद्दिष्ट सध्या होणार नाही. परंतु जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा नक्कीच आपण त्यातून काहीतरी धडा घेतो. जीवनात अपयशामुळे आपण सहजपणे निराश होतो. बर्याचदा आपण अपयशातून काय शिकलो यापेक्षा काय गमावले यावर लक्ष केंद्रित करून स्वतःला निराशेच्या गर्तेत ढकलतो. त्यापेक्षा आपण "मी अयशस्वी का झालो? " या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्याला निश्चितपणे काही ठोस उत्तरे मिळतील. ज्यामुळे आपल्याला पुढील वेळी अधिक तयारी करता येईल. म्हणजेच,अपयश ही काहीतरी नवीन शिकण्याची दुसरी संधी आहे.

. अपयश आपल्याला निडर बनविते.

"फक्त एकच गोष्ट आहे जी आपले स्वप्न साध्य करणे अशक्य करते ती म्हणजे अयशस्वी होण्याची भीती." पाउलो कोएलो
यश मिळवण्याची सर्वात मोठी अडचण ही अपयशाची भीती आहे. आपण कृती करण्याआधी बराच विचार करतो आणि अपयशाच्या भितीने कृती करण्याचे टाळतो. परंतु, अपयश खरोखर आपल्याला  निडर बनवू शकते. आपल्याला वाटेल हे कसे शक्य आहे? आपण बऱ्याच गोष्टींमध्ये ऐकतो कि आपण नेहमी सकारात्मक विचार करावा. उद्योजक म्हणून आपण आपल्या ध्येयाचा विचार करावा, नकारात्मक विचार करू नयेत. जगप्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रान्सन यांना देखील त्यांच्या जीवनात सात वेळा अपयशाला सामोरे जावे लागले, पण ते आपल्या उद्योजकीय ध्येयापासून बधले नाहीत. त्याऐवजी त्यांनी आपल्या कौशल्यांचे पुनर्वालोकन केले आणि "Where did I miss the X factor? असा विचार करून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपल्या योजना अंमलात आणल्या. एकदा आपण अपयशाची कडू चव चाखल्यावर भिती बाळगता कृती करण्यावर भर दिला पाहिजे.

. अपयश आपल्या अनुभवात मोलाची भर घालतात.

"अपयश अशी गोष्टच अस्तित्वात नाही - ते आहे फक्त अनुभव आणि त्यांचे प्रतिसाद." - टॉम क्रूझ
जेव्हा आपण प्रयत्न करताना अयशस्वी होतो तेव्हा आपण बऱ्याच कटू-गोड अनुभवातून जातो. उद्योजक म्हणून, आपण अपयशाच्या सकारात्मक बाजूकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा आपण अयशस्वी होतो, तेव्हा नेमके काय घडले हे कमीतकमी जाणून घेणे आवश्यक आहे. हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्यावहारिक अनुभव असतो, जो आपण एखाद्या उच्च बिझिनेस स्कुलमधून देखील मिळवू शकत नाही. आपण अयशस्वी होण्याचा अनुभव ही एक मौल्यवान संपत्ती आहे जी भविष्यात आपल्या उद्योजकीय जीवनात मदत करेल. कारण अयशस्वी झाल्यानंतर, नव्याने सुरूवात करताना आपण नेहमीच दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करतो. शिवाय, प्रत्येक समस्येचे निराकरण कसे करावे हे आपण शिकतो. अडथळे आपण संधींच्या दृष्टीकोनातून पाहू लागतो, म्हणून जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा निराश होऊ नका त्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या व्यवसायाच्या योजनेचा चांगली आखणी करा! या मार्गांनी, आपण आपल्या अपयशांना अनुभवाच्या संसाधन स्त्रोतामध्ये बदलू शकतो.

. अपयश आपल्या उद्योजकीय गुणवैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करते.

आपण आपल्या जीवनात प्रत्येक अपयशानंतर अनुभवसमृद्ध होऊन एक चांगला उद्योजक बनतो. आपण अधिकतम उत्पादनक्षमता मिळविण्यासाठी आपल्याकडील उपलब्ध साधनांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करतो. आपण वेळ आणि पैसा यांची ध्येयानुरूप योजनाबद्धरीत्या आखणी करतो. आपण व्यवसायासाठी स्मार्ट मार्गांबद्दल विचार करतो. अशा प्रकारे आपण आपल्या उद्योजकीय मानसिकतेचा क्षमतांचा विकास करतो आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावर आपला प्रवास अव्याहतपणे सुरु राहतो.

. जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण अधिक द्रुढनिश्चयी होतो.


"प्रयत्न केलात. अयशस्वी झालात. काही फरक पडत नाही. पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा आणखी चांगल्या प्रकारे अपयशी व्हा."- सॅम्युएल बेकेट
व्यवसायात अयशस्वी होणे दुःखद आहे. परंतु प्रत्येक वेळी जेव्हा आपलयाला अपयश येते तेव्हा आपण आपल्या व्यावसायिक उद्दिष्टांबद्दल अधिक उत्साही होतो. कारण आपल्याला व्यवसायात अपयश देणाऱ्या विविध बाबींचा वा घटकांचा आपण विचार करून पुढच्या वेळी अधिक जोमाने सज्ज होतो. तुम्हांला माहित आहे का? बिल गेट्स यांनी खूप आधी ट्रॅफ--डेटा नावाची एक कंपनी सुरू केली जी दुर्दैवी ठरली. पण त्यातून शिकून त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केलीआणि संगणक क्षेत्रात इतिहास घडवला! म्हणून जेव्हा अपयश येते तेव्हा काळजी करू नका, फक्त कृती करत रहा. कारण कोण जाणे, आपण आपल्या स्वप्नापासून केवळ एकच चरण दूर असू शकतो.

. अपयश आपल्या यशाचा आनंद द्विगुणीत करते.

मी तुम्हांला एक गोष्ट सांगतो ज्यामध्ये कडू अपयश हे भव्य यशाची नांदी ठरले. १९८५ मध्ये उच्चस्तरीय व्यवस्थापन समस्यांमुळे स्टीव्ह जॉब्स यांना आपणच स्थापन केलेल्या कंपनीचा राजीनामा द्यावा लागला. आपणच स्थापन केलेल्या कंपनीपासून दूर राहणे हा त्यांच्यासाठी कठीण निर्णय होता. या कालखंडात त्यांनी बरेच संघर्ष केले आणि Next Computers कंपनीची स्थापना केली, जी अत्यंत यशस्वी झाली. १९९६ साली Next Computers विकत घेतल्यानंतर स्टीव्ह जॉब्स Apple मध्ये परतले. स्टीव्ह जॉब्स जेव्हा पुन्हा रुजू झाले तेव्हा Apple ची वाटचाल दिवाळखोरीच्या दिशेने सुरु होती. परंतु त्यांनी Apple ला त्यांच्या नाविन्यपूर्ण निर्णयांसह पुनरुज्जीवित केले आणि जगातील सर्वात फायदेशीर कंपनीमध्ये रूपांतरित केले. कधी काळी Apple साठी नावडते ठरलेले स्टीव्ह जॉब्स तारणहार ठरले. स्टीव्ह जॉब्स यांचा प्रवास प्रेरणादायी आहे कारण त्यांनी अपयशाचा सामना केला.म्हणूनच यश मिळवण्याच्या आवडीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही प्रथम कडू अपयशाचा सामना जरूर करावा.

  • सुहैल
( अनुवादित )

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites