2012 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

30 December 2012

Thank You 2012... Welcome 2013...

नमस्कार!
मित्रांनो, २०१२ वर्षाचा आज शेवटचा दिवस, आज मी जेव्हा २०१२ या वर्षाकडे मागे वळून पाहिले तेव्हा मला जाणवले की हे वर्ष बॉर्न टू विनसाठी जबरदस्त अनुभव देणारे होते. बॉर्न टू विनच्या टिममधील प्रत्येक सदस्याला वर्ष २०१२ ने भरपूर काही शिकवले. वर्ष २०१२ जरी आज संपत असले तरी या वर्षाने बॉर्न टू विनच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले.


मित्रांनो वर्ष २०१२ ची सुरुवात बॉर्न टू विनने (B2W) धमाकेदार पध्दतीने केली. आमचा THE SUCCESS BLUEPRINT Workshop, दिनांक ३ जानेवारी २०१२ रोजी आयोजीत करण्यात आला आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात कार्यशाळा पार पडली. THE SUCCESS BLUEPRINT Workshop चे नवे रुप उपस्थितांच्या आयुष्यात अभूतपूर्व अनुभव देऊन २०१२ ची सुरूवात दमदार पध्दतीने झाली.


लक्ष्यवेधच्या १० व्या बॅचच्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या डबेवाल्यांनी धमाल उडवून टाकली.


मे २०१२ मध्ये लक्ष्यवेध ADVANCE ची तिसरी बॅच सुरू झाली.
१० मे २०१२ रोजी प्रसिध्द अ‍ॅड गुरू गोपी कुकडे यांनी अकराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये अ‍ॅडव्हर्टायसिंग व ब्रँडींगचे फंडे सांगितले.


१३ मे २०१२ रोजी लक्ष्यवेध ADVANCE च्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ एकदम दणक्यात पार पडला. कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. लक्ष्यवेध ADVANCE च्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या यशोगाथा आणि श्री. मधुकर तळवलकर यांचे खास मार्गदर्शन. It was a highly inspiring event.


२७ मे २०१२ हा दिवस बॉर्न टू विनच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला. Future Paathshala JOSH २०१२ हा फ्युचर पाठशालाचा स्वप्नपुर्ती सोहळा, भारतातील सर्वात मोठे सभागृह षणमुखानंद हॉलमध्ये २,५०० लोकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. डॉ. उदय निरगुडकर व कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते. त्यांच्या हस्ते अतुल राजोळीयांचे 'माझा मोटिव्हेटर मित्र' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.


४ जुलै रोजी पुन्हा एकदा THE SUCCESS BLUEPRINT Workshop जबरदस्त प्रतिसादात पार पडला. धुंवाधार पाऊस, ट्रॅफीक जाम, असे अडथळे पार करुन हाऊसफुल कार्यक्रम करण्याचा पराक्रम B2W ने केला.


२०१२ या वर्षी B2W चे ३ नवीन कार्यक्रम झाले ९ सप्टेंबर रोजी विश्वास निर्मिती, वेगवान प्रगती, १ ऑक्टोबर रोजी MAXIMUM ACHIEVEMENT व २८ नोव्हेंबर रोजी सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा! असे प्रेरणादायी व मार्गदर्शक कार्यक्रम B2W ने लोकांसमोर आणले. उपस्थित प्रेक्षकांनी या कार्यक्रमांबद्दल उत्तम प्रतिक्रीया दिल्या.!




९ ऑगस्ट रोजी बाराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याम्ध्ये श्री. दिपक घैसास सरांनी खचाखच भरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये भविष्याचा वेध घेण्याबाबत विचार परिवर्तित करणारे मार्गदर्शन केले.


१ नोव्हेंबर रोजी तेराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये डॉ. सुहास अवचट व दिपा अवचट यांनी त्यांच्या यशस्वी रेस्टॉरंट व्यवसायाबाबतची रहस्य सादर केली. याच कार्यक्रमात 'माझा मोटिव्हेटर मित्र' पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.

लक्ष्यवेध ADVANCE च्या दुसर्‍या बॅचचा पद्वीदान समारंभ दिनांक १४ डिसेंबर रोजी पार पडला. लक्ष्यवेध ADVANCE च्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या यशोगाथांनी उपस्थितांना भारावून टाकले व श्री. नितीन पोतदार सरांच्या प्रोत्साहसात्मक व्याख्यानाने सर्वांची मने जिंकली.


बॉर्न टू विनच्या NLP च्या २०१२ वर्षाचे एकूण चार बॅच झाल्या. आता B2W ने एकूण १५० NLP Practitioners घडवले आहेत. Graphology च्या या वर्षी ३ बॅच झाल्या व Graphology Advance ची एक बॅच झाली. फ्युचर पाठशालाच्या एकूण १० प्रशिक्षणकेंद्राद्वारे यावर्षी ३२५ फ्युचर स्टार्स घडवले गेले.


एकूणच २०१२ हे वर्ष B2W साठी आगळावेगळा अनुभव देणारे व नवीन उद्दीष्ट प्राप्त करुन देणारे ठरले. या वर्षाने B2W वरील जबाबदार्‍या वाढवल्या आहेत. B2W कडे आता महाराष्ट्रीयन माणसे आशेच्या नजरेने पाहत आहेत. आमच्या कडून आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आमचे मनोधैर्य देखिल आत उंचावले आहे.
मित्रांनो वर्ष २०१२ ने आमची एक समजुत आणखी दृढ केली आणि ती म्हणजे " If you can dream it, then you can achieve it" - "जर आपण स्वप्न पाहू शकतो तर ते साध्य देखिल करु शकतो." ही दृढ समजुत २०१२ आम्हाला देऊन आज अलविदा करत आहे... आणि नवीन स्वप्ने व नवीन महत्त्वकांक्षा घेऊन आम्ही वर्ष २०१३ चे स्वागत करत आहोत.

Thank You 2012.... Welcome 2013...!

मित्रांनो, २०१२ प्रमाणेच २०१३ ची सुरुवात आम्ही THE SUCCESS BLUEPRINT Workshop ने करत आहोत. आपण देखिल २०१३ वर्षाची सुरुवात धमाकेदारपणे करण्यासाठी या कार्यक्रमात सामिल व्हा...

कृपया खालिल व्हिडीवो पहा..



15 December 2012

फेसबुकचा कर्ता मार्क झकरबर्ग


फेसबुकचा कर्ता मार्क झकरबर्ग
अनघा दिघे, सोमवार, २६ मार्च  २०१२
वय, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक स्थान या कशाचीही बाधा न येता आजकाल सुविख्यात तसेच अतिवापरात आहे ती फेसबुकची सोशल नेटवर्क वेबसाइट. खरं सांगायचं तर वरील घटकांना एक निराळे परिमाण देण्यापर्यंत अमोघ ताकद या वेबसाइटनं हस्तेपरहस्ते मिळवली आहे. अतुलनीय प्रोग्रामिंग आणि सर्वशक्तिमान तंत्रज्ञान पणाला लावणारा या संपर्क क्रांतीचा प्रणेता आहे मार्क झकरबर्ग! तरुण पिढीच्या गळ्यातला ताईत, प्रतिकूलता, वाद-विवाद यांच्या भोवऱ्यातील एक विवाद्य व्यक्ती, टाइम मॅगेझिनने ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून ज्याला २०१० मध्ये गौरविले, अमेरिकेच्या एकूण आर्थिक उलाढालीमध्ये वयाच्या केवळ सतराव्या वर्षी ज्याचा तीन टक्क्य़ांचा हिस्सा होता, असा सोशल नेटवर्कचा हिरो..
खेळता-खेळता वयाच्या बाराव्या वर्षी Atari Basic कोड वापरून घरातल्या घरात वापरण्यासाठी Zucknet    नावाचा मेसेजिंग प्रोग्राम तयार करणारा मार्क झकरबर्ग हा आज २७ वर्षांचा आहे. त्याची कारकीर्द जवळून पाहणे हाच एक व्यापक अनुभव ठरतो. 
फेसबुकला प्रायव्हसी नाही. आपली माहिती कुठेही जाऊ शकते. तरीदेखील मार्क झकरबर्गची बिझनेस टेक्निक्स, व्यवसाय धोरणं खूप चांगली आहेत, अशी मतमतांतरं पाण्याच्या लाटेप्रमाणे कापत कापत फेसबुकचे शाही जहाज मार्गक्रमण करते आहे.
मार्क झकरबर्ग यांचे विचार त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊयात :


‘मला वाटतं की, बिझनेसचा एक साधा-सोपा नियम आहे. करायला सोप्या गोष्टींपासून जर तुम्ही सुरुवात केलीत तर तुम्ही खरोखरच खूप लांबचा पल्ला गाठू शकता. आपण कोण आहोत, ते अभिव्यक्त करण्याची एक मुख्य आणि प्रबळ इच्छा लोकांना असते आणि माझ्या मते, ती खूप हलचल उडवणारी असते.
१९ वर्षांचा असताना मी ही वेबसाइट सुरू केली. तेव्हा मला बिझनेसबद्दल फारसं काही ठाऊक नव्हतं. गेली सहा वर्षे अथकपणे एकच एक लक्ष्य ठेवून केलेल्या कोडिंग आणि प्रोग्रामिंगकडे आज केवळ एक पार्टी आणि क्रेझी ड्रामासारखे पाहण्यात मजा आहे.
इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये प्रगती करताना खंड न पडू देता अथकपणे इनोव्हेटिव्ह राहणे, तसेच आपली सिस्टीम काय वळणं घेत आहे याबाबत सतत अपडेटस् देत राहणे ही अटल कृती आहे. तसेच आजकालच्या अलिखित सामाजिक संकेतांचे ते प्रतिबिंब आहे.
एकच गोष्ट मी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतो आणि सांभाळतो आणि ती म्हणजे माझे ध्येय, माझे मिशन आहे- जगाचा कप्पान्कप्पा खुला करणे- मेकिंग द वल्र्ड ओपन! एकदा मी स्टीव्ह जॉब्स यांची मुलाखत पाहात होतो. त्यामध्ये ते म्हणाले की, ‘अशा प्रकारचं काहीतरी करण्यासाठी तुम्हाला अगदी खरोखरच आणि मनापासून तुम्ही जे करता ते आवडणं फार फार महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर मग अशा उद्यमाला काही अर्थच उरत नाही..’ फेसबुकसारखी काहीतरी गोष्ट प्रत्यक्षात साकारण्यासाठी जे काम करावं लागतं, त्याची शिकस्त असते. ते काम इतकं अवाढव्य आणि प्रचंड आहे की, तुम्ही जर संपूर्णपणे त्याच्यात स्वत:ला झोकून दिलं नाहीत आणि ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे असं जर तुम्हाला वाटलं नाही तर इतका वेळ आणि शक्ती त्यावर खर्च करणे हे असयुक्तिक ठरेल.
एक व्यासपीठ निर्माण करणं हे आमचं ध्येय नाही तर अशा सर्व व्यासपीठांच्या पार जाणं, हे आमचं ध्येय आहे. निरनिराळ्या प्रकारच्या माहितीची देवघेव करूनच केवळ लोक सुखावतात, असे नाही तर ते ही माहिती जर खुलेआम तसेच उघडपणे जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करू शकले तर ते सुखावतात आणि हा सामाजिक संकेत गेल्या काही वर्षांतच निर्माण झाला, रुजला तसेच अलीकडच्या काळात पूर्ण विकसित झाला आहे. जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्यासाठी आम्ही कंपनी चालवत आहोत.
आताच्या घडीला सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तसेच इतर उपलब्ध असलेल्या मार्गाच्या वापराने या ५० कोटी लोकांना त्यांना काय वाटतं, ते मांडायचा मार्ग सापडला आहे. या लोकांचा आवाज नोंदला जात आहे, तसेच त्यांची दखल घेतली जात आहे.

आम्हाला लोकांबद्दल काय माहीत करून घ्यायचंय, हा सवालच नाहीये. सवाल असा आहे की, लोकांना त्यांच्या स्वत:बद्दल काय सांगावंसं वाटतं?  फेसबुकच्या तंत्राच्या आधाराने आम्ही फक्त एवढंच साधण्याचा प्रयत्न करतो आहोत की, एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करून जास्त प्रभावीरीत्या संवाद साधणे आम्ही त्यांना शक्य करून देत आहोत.
स्वत:बद्दल अथवा कुठलेही कौशल्य शिकण्यासंदर्भात बोलायचं तर जेव्हा तुम्हाला जास्त लोकांचा दृष्टिकोन कळतो, त्यांची एखाद्या बाबीकडे पाहण्याची पद्धत समजते तेव्हा तुमचा प्रगल्भतेकडे प्रवास होत असतो. काही व्यक्ती खरोखरच उत्तम व्यवस्थापक असतात. संस्थांचं व्यवस्थापन करणे आणि कामाची उभारणी, हाताळणी ते उत्तमरीत्या करतात तर काहीजण उत्तम विश्लेषक असून ते व्यापार धोरणावर लक्ष केंद्रित करतात. अनेकदा एकाच व्यक्तीमध्ये हे दोन्ही गुण सापडत नाहीत. हे दोन भिन्न प्रकारचे लोक असण्याच्याच शक्यता दाट असतात. मी माझी वर्गवारी दुसऱ्या प्रकारच्या लोकांच्या कंपूत करेन.
प्रत्येकाचाच आवाज जेव्हा ऐकला जात आहे आणि प्रत्येकाला अधिकारशक्ती लाभते तेव्हा ती खरोखरच एक चांगली व्यवस्था बनते. लोकांना ती शक्ती प्राप्त करून देणे ही आमची भूमिका आहे, असं याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आहे. आतापर्यंतचा इंटरनेटचा ढाचा असा होता की, तिथल्या अनेक गोष्टी या सोशल नव्हत्या, तसेच तुमच्या खऱ्याखुऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख तिथं जाहीर होत नव्हती. मात्र, सरतेशेवटी लोकांपर्यंत आम्ही पोहचत आहोत. आमचे ठेवीदार, गुंतवणूकदार तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना हाच तर वायदा आम्ही केला आहे.
एखाद्या कंपनीनं जे रचलं, जे बांधलं, त्याचा वारसा, त्याची परंपरा त्या कंपनीला लाभते. पारंपरिकतेच्या या जोखडामध्ये अनेक कंपन्या अडकतात. आम्ही जेव्हा ‘प्रायव्हसी चेंज’- गोपनीयतेबद्दलचा आमच्या धोरणात बदल केला तेव्हा ३५० दशलक्ष वापरकर्त्यांचा विचार करून तो केला. अनेक कंपन्या अशा प्रकारे पुढचं पाऊल टाकत नाहीत. परंतु नुकतीच सुरुवात केलेल्या नवागतासारखी मनोवृत्ती ठेवणे ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. आज आता आपण जर ही कंपनी सुरू केली असती तर आपण ‘प्रायव्हसी चेंज’बाबत काय केलं असतं, असा प्रश्न आम्ही स्वत:ला विचारला. मग आम्ही निर्णय घेतला की, आजघडीला हा विवक्षित सामाजिक प्रघात असा असला पाहिजे आणि मग पुढे मार्गक्रमणा करणे हे फार सहजसुलभ होऊन गेले.’

03 December 2012

सकारात्मक दृष्टीकोन

महाराष्ट्र टाइम्स - ऑगस्ट २०१
संतोष कस्तुरे 

तुमच्या वैयक्तिक आणि कार्पोरेट जीवनात तुमचे अंगभूत गुण आणि कौशल्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अगदी सोपे उदाहरण द्यायचे, तर सारखीच शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या दोन व्यक्तींच्या वैयक्तिक आणि कार्पोरेट आयुष्यात मात्र फार मोठी तफावत असू शकते. असे का होत असावे, या प्रश्नाचे उत्तर खरेतर फार सोपे नाही. 

त्यामुळे अनेकजण यासाठी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, नशीब याला दोष देतात आणि आहे त्यात 'समाधान' मानतात; पण वैयक्तिक कौशल्यांवर विचारपूर्वक काम केले, तर त्यांचा विकास नक्की होऊ शकतो. वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांचा विचार करताना मला नेहमी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूतीर् यांच्या जीवनातून प्रेरणा मिळते. ज्या काळात इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी ही संकल्पना फारशी माहितही नव्हती, तेव्हा त्यांनी केवळ स्व-विश्वासावर इन्फोसिसची स्थापना केली. तत्त्वांशी कोणतीही प्रतारणा न करता त्यांनी या क्षेत्रात जे योगदान दिले, ते केवळ अतुलनीय आहे. त्यांचा वेगळेपणा त्यांच्या प्रामाणिकपणा, सातत्य आणि तत्त्वनिष्ठा या गुणांमध्ये आहे. आता तुम्ही विचार करत असाल, की असे कोणते गुण आहेत जे वैयक्तिक आणि कापोर्रेट आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकामध्ये असायला हवेत? तर, असे अनेक गुण आहेत आणि त्याबद्दलच आपण या लेखात सविस्तरपणे बोलणार आहोत. 

सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय? 
अर्ल नाइंटिगेलचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. तो म्हणतो, 'आपला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन आयुष्याचा आपल्याबद्दलचा दृष्टीकोन ठरवत असतो.' एखाद्या वस्तूबद्दलची आवड अथवा नावड म्हणजे दृष्टीकोन, असे शद्बकोश सांगतो. मग ती विचार करण्याची पद्धत असू शकते किंवा देहबोलीही. दृष्टीकोन हे तुमची मन:स्थिती आणि त्यावर अवलंबून असलेला तुमचा तुमच्या भोवतालच्या जगाबद्दलचे मत याचे एक मिश्रण असते. तुम्ही तुमचा भवताल कसा बघता आणि त्यावर भविष्य कसे ठरवता यावर तुमचा दृष्टीकोन ठरत असतो. हा दृष्टीकोन म्हणजे तुम्ही ठरवत असलेला तुमच्या आयुष्याचा फोकस असतो. आपला दृष्टीकोन कसा आहे, यावर आपणे खरे बोलतो की खोटे, कृती करतो की निष्क्रिय राहतो हे ठरत असते. 



हा दृष्टीकोनच ठरवतो की आपण यशस्वी होणार की अयशस्वी! दृष्टीकोन सकारात्मक, नकारात्मक किंवा मध्यममागीर्ही असू शकतो. मात्र, केवळ चांगले विचार असणे म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन नव्हे, हेही लक्षात ठेवायला हवे. कोणत्याही परिस्थितीत होकारात्मक मन:स्थिती ठेवण्याची क्षमता म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. पण सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे केवळ आनंदी असणे किंवा बरे वाटणे नव्हे, तर आपल्या मन:स्थितीवर नियंत्रण आणून त्याची आपण ज् या वेगवेगळ्या सामाजिक, आथिर्क, पर्यावरणीय आणि राजकीय सिस्टिम्समध्ये राहतो, त्याच्याशी योग्य सांगड घालणेही आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर चुकीच्या ठिकाणी नोकरी करणे किंवा आपले भवितव्य काही चांगले नाही, असा विचार करत घरात बसून राहणे म्हणजे आहे ती परिस्थितीही आणखी वाईट करणे ठरेल. नकारात्मक विचार करत आणि जगाला दोष देत बसलात, तर काहीच घडणार नाही. तुमच्या मनाची स्थिती तुमच्या शरीरालाही सांगेल, की तुम्ही अयशस्वी होणार आहात. पण मला यशस्वी व्हायचे तर मग काय करावे लागेल? सर्व विसरा, सकारात्मक विचार करा आणि नवी सुरुवात करा. सेल्स विभागातील एखाद्या कर्मचाऱ्याचा आपल्या कंपनीबाबत किंवा ब्रँडबाबतच नकारात्मक दृष्टीकोन असेल, तर कितीही उत्तम शैक्षणिक पात्रता असेल, तरी तो कर्मचारी आपले उत्पादन विकू शकणार नाही. तीच गोष्ट पचेर्स विभागातील कर्मचाऱ्याबाबत. त्याचा दृष्टीकोन नकारात्मक असेल, तर तो सप्लायरशी किमतीबाबत चांगली तडजोड करू शकणारच नाही. तुमची पार्श्वभूमी, ज्ञान, शिक्षण, कौशल्ये यापेक्षाही तुमचा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा असतो. आपण आपली पार्श्वभूमी, नाती, कुटुंब बदलू शकत नाही; पण आपण आपला दृष्टीकोन नक्कीच बदलू शकतो. ज्यांना आपल्या स्वप्नांवर विश्वास आहे आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टी ठेवायची तयारी आहे, त्यांच्यासाठी सर्व काही उत्तमच होणार आहे. सकारात्मक दृष्टीकोनाशिवाय कोणतीही मोठी गोष्ट घडलेली नाही, घडत नाही, हे लक्षात ठेवा! 



सकारात्मक होण्यासाठी टिप्स्... 
  • तुमच्याबद्दल योग्य विश्वास बाळगा आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक ठेवा.
  • सकाळी उठल्यावर म्हणा की आजचा दिवस माझ्यासाठी उत्तम असणार आहे.
  • नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
  • तुमच्या आधीच्या यशांचा विचार करा; ते तुम्हाला नव्याने यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देईल.
  • लक्षात ठेवा, तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे ज्युनिअर एक्झिक्युटिव्हसाठी तुमची कंपनी, तुमचे काम, कामाची जागा आणि तुमचा बॉस यांच्याबद्दल सकारात्मक विचार करा.
  • सकारात्मक दृष्टी असलेल्या लोकांबरोबर राहा.
  • समवयस्कांचा एक छोटा ग्रुप तयार करा आणि त्यामध्ये सकारात्मक विचार रुजवा.
  • करिअरची पहिली पायरी असल्याने शिकून घ्या, दुसऱ्यांच्या पगाराचा विचार करू नका.
  • जीवनाबाबत सकारात्मक राहा आणि तुमच्या सिनीअरचा विश्वास संपादन करा मिड मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हसाठी.
  • नकारात्मक मन:स्थितीत असाल, तरीही तुमच्या कंपनीबाबत नकारात्मक बोलू नका.
  • तुमच्या टीमबरोबर कंपनीच्या सर्व सकारात्मक गोष्टी शेअर करा.
  • तुमच्या टीमला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करा वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 
  • तुम्ही कंपनीचा प्रेरणेचा मोठा स्त्रोत आहात, तेव्हा स्वत:ला सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करा 
  • सकारात्मक संवाद संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करा 
  • कंपनीमध्ये सकारात्मक दृष्टीकोनावर कार्यशाळा आयोजित करा 
  • कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन हे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करते 

Source: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9568463.cms

23 November 2012

सुसज्ज व्हा यशस्वी व्हा! - Get Ready to Get Success


बॉर्न टू विन प्रस्तुत चार तासांची जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळा



यशस्वी माणसांमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात जे त्यांनी मिळवलेल्या यशासाठी कारणीभुत असतात? जाणुन घ्या आणि उत्तुंग यश मिळवण्यासाठी स्वत:ला घडवा... सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!



 
मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच व्यक्तींना यशस्वी माणसांबद्दल प्रश्न पडतात....
  • यशस्वी माणसांमध्ये असे नेमके काय असते, ज्यामुळे ते यश संपादन करतात?
  • सर्व यशस्वी माणसांमध्ये कोणत्या गोष्टी समान असतात?
  • इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात येते कूठून?
  • इतरांपेक्षा काय वेगळेपण त्यांच्यात असते?
  • आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने कॄती करण्यास त्यांना कूठून प्रेरणा मिळते?
  • आपल्या क्षमतांचा पुरेपुर वापर ते कोणत्या गुणांमुळे करतात?


वरील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात देणे अशक्य आहे. यशस्वी होण्यासाठी नक्कीच भरपुर गुण आपण स्वतःमध्ये अंगिकारले पाहीजेत. परंतु यशस्वी माणसांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की यशस्वी माणसांच्या व्यक्तीमत्वामध्ये सात मुलभुत गुणधर्म असतात . ह्या सात मुलभुत गुणधर्मांना कळतनकळतपणे यशस्वी व्यक्तींव्दारे जोपासले गेल्यामुळे त्यांनी जगात आपले अव्दीतीय स्थान निर्माण केले. ह्या सात मुलभुत गुणधर्मांना सतत खतपाणी घातल्याने ते पेटून उठतात व उत्तरोत्तर यशस्वी होतात.

हे सात मुलभुत गुणधर्म आपणही स्वतःमध्ये अंगिकारुन जोपासु शकतो आणि त्यांचा विकास करु शकतो. 'सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!' या बॉर्न टू विनच्या जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळेत आपण हेच जाणुन घ्याल व यशस्वी होण्यासाठी सज्ज व्हाल!

 
हि कार्यशाळा कोणासाठी?
  • उद्योजक किंवा प्रोफेशनल्स
  • स्वयंरोजगारकर्ते किंवा नोकरदार
  • गृहीणी किंवा विद्यार्थी
  • लिडर किंवा मॅनेजर

दिनांक: बुधवार, २८ नोव्हेंबर २०१२

वेळ: सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत

स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क दादर (प)

गुंतवणुक रु.: १०००/-

प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ९६१९४६५६८९, ७६६६४२६६५४


10 November 2012

लक्ष्य


महाराष्ट्र टाइम्स  - १ ऑगस्ट २०१२
- मेधा ताडपत्रीकर
आपलं ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा ज्यांना आहे असे लोक स्वप्नांनी भारलेले असतात. जेव्हा तुम्हाला १०० टक्के तुमचं ध्येय गाठायचं असतं तेव्हा ती गोष्ट मध्येच सोडून देणं हा पर्यायच तुमच्यासमोर नसतो. आलेल्या संकटातून तुम्ही कशीही वाट काढता किंवा नवीन मार्ग शोधताच.

जगप्रसिद्ध बॉडी बिल्डर म्हणून नाव कमावत असतानाच हॉलिवुडमध्ये स्टारपदही कसं मिळवलंया प्रश्नाचं उत्तर देताना हॉलिवुडस्टार अर्नाल्ड श्वार्झ्नेगर म्हणाला की, 'या यशाचं कारण आहे ध्येय गाठायचा ध्यास. सगळ्या यशाची सुरुवात ही एखाद्या कल्पनेतून जन्म घेते पण त्या कल्पनेला जोडा तीव्र इच्छा आणि आपली कल्पना अमलात आणायचा ध्यास - अबर्निंग डिझायर.'

तुमच्यासमोर जी ध्येयं आहेतत्यांचा जरा विचार करा. ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे वचनबद्ध आहातकोणत्या परिस्थितीत तुम्ही त्यांचा नाद सोडून द्यालतुम्हाला ध्येय कोणत्याही परिस्थितीत गाठायचं असेल तर तुमची खात्री असते कीआपण तो ध्यास मध्येच सोडून देणार नाही. जेव्हा तुम्हाला १०० टक्के तुमचं ध्येय गाठायचं असतं तेव्हा ती गोष्ट मध्येच सोडून देणं हा पर्यायच तुमच्यासमोर नसतो. तुम्ही आलेल्या संकटातून वाट काढता किंवा नवीन मार्ग शोधताच.


आपल्या सर्वांना आयुष्यात अनेक गोष्टी हव्या असतात. अनेक गोष्टींची गरजही असतेपण इच्छा आणि ध्यास यात फरक आहे. तुम्हाला खूप पैसे कमावण्याची इच्छा असेलपण ते पैसे कशासाठी मिळवायचे आहेतजास्त वेळ ,समाजात नावऐषोराम असं काही असेल. म्हणजे पैसे कमावणं हे इतर गोष्टी मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की कशासाठी काय हवं आहे हे एकदा समजलं की त्यावर लक्ष केंद्रित करून यश मिळवणं सोपं जातं. 
आपले ध्येय गाठण्याची ज्यांना तीव्र इच्छा आहे असे लोक आपल्या स्वप्नांनी भारलेले असतात. पण हे काहीजणांपुरतंच मर्यादित आहे कातरनाही. थोड्याशा प्रयत्नांनीमानसिकता बदलून यशाचा ध्यास घेणं कुणालाही शक्य आहे. कारण मग त्यांच्यासाठी यश हे सूर्योदयाइतकंच हमखास असतं. ध्येयाच्या ध्यासाने भारून जाण्यासाठी आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापासून सुरुवात करायला हवी. 


योग्य ध्येय निवडा 

तुम्ही जर चुकीच्या ध्येयाकडे डोळे लावून बसलात तर ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणं शक्य नाही. आपलं ध्येय योग्य आहे का हे पाहण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारा. 
पैसे न मिळण्याची शक्यता असेल तरीही आपलं ध्येय तेच राहिल का 
ज्यासाठी कष्ट करता आहात ते तुमच्या आयुष्यात अगोदरच आहे का 
समजा उद्या कोणी तुम्हाला दहा कोटी रुपये दिले तरीही तुम्ही ध्येयाकडेच जाणार का 
बहुतेकांची विकेट शेवटच्या प्रश्नात उडते. कारण पैसा कमावणं हेच अनेकांचं ध्येय असतं. पण पैसा सुख देत नाही ,तर ते कमावण्याकरीता करावे लागणारे कष्ट आनंद देऊ शकतात. तेव्हा वरीलपैकी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक असेल तर तुमच्या ध्येयाबाबत परत विचार करा. 


स्वत:वर विश्वास ठेवा 


वारीमध्ये म्हातारे-कोतारे अपंग वारकरी होते पण ते केवळ विठ्ठलाच्या ध्यासापोटी चालत होते आणि मनात आत्मविश्वास होता की ते पंढरपूर गाठणारच. अनेकांना त्यांच्या ध्येयाबद्दल विचारलं असता , ' त्यानंतर आपलं आयुष्य किती मस्त होईल आणि त्यासाठी अमुक एक ध्येय महत्त्वाचं आहे ', असं उत्तर येतं साध्या वारकऱ्यांची जर ही कथा असेल तर मग आपल्यापैकी अनेकजण प्रत्यक्षात का काही करत नाहीत याचं कारण आहे त्यांना आपण अमुक ती गोष्ट करू शकू असा विश्वास नसतो. 






परतीचे मार्ग बंद करा 


जर तुमचं ध्येय तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं असेल तर परतीचे मार्ग बंद करून टाका. उदाहरणार्थ तुम्हाला स्वत:चा व्यवसाय करायचा असेल तर नोकरीच्या राजीनाम्याचं पत्र लिहून ते एका पाकिटात बंद करून मित्राकडे द्या आणि त्याला सांगा की तुम्ही ठराविक तारखेपर्यंत नोकरीचा राजीनामा दिला नाही तर ते पत्र बॉसकडे नेऊन दे. याचं कारण देताना आर्ट ऑफ वॉर या पुस्तकात सून त्झू असं म्हणतो की ज्या तरुणांना यशाची खात्री नसते तेच जिवावर उदार होऊन लढतात. कारण जिव सांभाळूनही पराक्रम गाजवू आणि विजयी होऊ हा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. 

26 October 2012

तेरावा लक्ष्यसिध्दी सोहळा: ' दिवा महाराष्ट्राचा'

नमस्कार!!
मित्रांनो, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की दिनांक ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आमच्या 'विश्वास निर्मिती, वेगवान प्रगती', व १ ऑक्टोबर रोजी झालेल्या 'MAXIMUM ACHIEVEMENT' या आमच्या सेमिनारना नेहमी प्रमाणेच तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार.

लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची तेरावी बॅच आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. ही बॅच अतिशय उत्साहात पार पडत आहे. आणि आता सर्व आजी-माजी प्रशिक्षणर्थ्यांना व तेराव्या बॅचच्या लक्ष्यवेधींना वेध लागले आहेत ते म्हणजे तेराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे!! लक्ष्यसिद्धी सोहळा म्हणजे लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचा पदवीदान समारंभ! तेराव्या बॅचच्या सर्व लक्ष्यवेधींचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि मिळविलेल्या उत्तुंग यशासठी होणारा त्यांचा कौतुक समारंभ.

मित्रांनो, लक्ष्यवेधच्या या स्नेहमेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व त्यांचे मार्गदर्शन. या वेळेस आपल्याला लाभलेले मार्गदर्शक एक नसुन दोघे आहेत. विशेष म्हणजे ते Business Partners तर आहेतच, शिवाय Life Partners देखिल आहेत आणि खर्‍या अर्थाने एकमेकांना पुरक आहेत. त्यांची यशाची घोडदौड अतिशय वेगात सुरु आहे.

तेराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत, जगातलं पहिलं महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट, 'दिवा महाराष्ट्राचा' याचे संस्थापक व संचालक, डॉ. सुहास अवचट आणि सौ. दिपा अवचट.

त्यांच्या खास मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत की यशाचा हा डोलारा त्यांनी कसा काय रचला, उभारला व घडवला... Food Industry मधील त्यांच्या गेल्या २० वर्षांच्या प्रवासाबद्दल ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. जागतीकरित्या पुरस्कृत आपल्या ३ रेस्टॉरंटच्या यशोगाथेबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत...

डॉ. सुहास अवचट (M.D.) यांच्या बद्दल थोडेसे:
  • Special Police Officer व Commanding Officer म्हणून 'Presidents Medal' विजेते.
  • 'Udyogshree' Businessman of the Year Award  विजेते.
  • Indo Swiss Society व IMC द्वारे 'The Best Restaurateur' म्हणून विजेते.
  • Police Public Liason Committee Greater Mumbai चे member
  • बर्‍याच वृत्तपत्र व मॅगझिन मध्ये त्यांनी लिहीले लेख छापुन आले आहेत व प्रसिद्ध झाले आहेत.
  • मराठी व हिंदी चित्रपट व टि.वी. मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे, शिवाय मॉडेलींग देखील केले आहे.

सौ. दिपा अवचट (C.E.O.) यांच्या बद्दल थोडेसे: 
  • टेबल-टेनिस मध्ये All India Civil Services, Revenue Department आणि राष्ट्रीय पातळीवर Gold Medal विजेत्या.
  • भारतीय पहिल्या डिझायनर रेस्टॉरंट पाककला-पुस्तक, 'The Goa Portuguesa Cookbook' व 'The Authentic Goa Cookbook' या पुस्तकांच्या लेखिका.
  • महाराष्ट्र कला निकेतन द्वारे 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार विजेत्या.
  • टॉप्स ग्रुपद्वारे Brand Building, Business Development साठी 'The Best C.E.O.' Award पुरस्कृत.
  • स्टार टि.वी. वर 'अली खान्स किचन' या पाककला स्पर्धेच्या विजेत्या.
  • त्यांनी स्वतः बरेच पाककला स्पर्धांमधे परीक्षकाची भुमिका देखिल बजावली आहे.
काही खास पुरस्कारः
  • 'Goa Portuguesa' या रेस्टॉरंटला H & FS या संस्थे तर्फे 'Best Indian Restaurant' 
  • पुरस्कार आणि International Tourism Council तर्फे 'Outstanding Gourmet Restaurant' हा पुरस्कार
  • 'दिवा महाराष्ट्राचा' या रेस्टॉरंटला Times Of India चा २००७ व २००८ मधे 'Best Restaurant' चा पुरस्कार व Miele Guide तर्फे २००९ मधे 'Asia's Finest Restaurant' पुरस्कार मिळाला.
  • 'Culture Curry' ला NHK Japan Broadcasting Corporation मार्फत 'Authentic Gourmet Restaurant' म्हणून पुरस्कृत.
अश्या जबरदस्त व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी व 'दिवा महाराष्ट्राचा' वर प्रकाश पाडणार्‍या त्यांच्या खास गप्पा ऐकण्यासाठी आपण आवर्जुन उपस्थित रहालच, त्या शिवाय आपल्या मित्र-परिवाराला देखिल या संधीचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित कराल यात काहीच शंका नाही, कारण या सोहळ्याचे आणखीन एक खास आकर्षण आहे... ते म्हणजे आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या श्री. अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तिचे प्रकाशन!!
 
तर मित्रांनो, भेटूया १ नोव्हेंबर रोजी.....

तेरावा लक्ष्यसिध्दी सोहळा:

विषय: 'दिवा महाराष्ट्राचा'
दिनांक: ०१ नोव्हेंबर २०१२


वेळः संध्याकाळी ठिक ६:० वाजता
स्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर (प.)
प्रवेश विनामुल्य

संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


13 October 2012

वेळेचे व्यवस्थापन कसे कराल?

वेळेचे व्यवस्थापन कसे कराल?
गौरी खेर - सोमवार, २० ऑगस्ट २०१२
उद्याउमलणारी सर्व फुलं आजच्या बियांमधून जन्म घेतात..
 एक चिनी म्हण
आजच्या अत्यंत व्यग्र जीवनशैलीत वेळेचं व्यवस्थापन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. वेळेच्या व्यवस्थापनामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करता येतो आणि त्यानुसार कामे उरकता येतात. अत्यंत घाईगर्दीच्या वेळेस अचानक उद्भवलेली महत्त्वपूर्ण कामे वेळेत पूर्ण करता येतात आणि परिस्थितीवर ताबा मिळवणे शक्य होते.
     उत्पादनक्षमता वाढवता येते.
    मनावरच्या ताणाची पातळी कमी करता येते.
    कार्यालयीन कामे आणि व्यक्तिगत आयुष्यात पार पाडायच्या गोष्टी यांचा समतोल साधता येणे शक्य होते.
वेळेचे व्यवस्थापन कसे करता येईल, हे पाहूयात:
१. योजना आणि आखणी-
विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन जर तुम्ही जी कामे उरकायची आहेत, ती योजनाबद्ध रीतीने पार पाडलीत, तर तुमच्या वेळेचा निश्चितच सदुपयोग होतो. विचार न करता आखलेला प्लान फिस्कटण्याची शक्यताच अधिक असते. कोणत्याही गोष्टीची आखणी करताना विविध शक्यता लक्षात घेऊन ती केली तर गोंधळ उडण्याची शक्यता कमी असते.  


२. उद्दिष्ट महत्त्वाचे-
तुमच्यासमोर नेहमीच एखादं उद्दिष्ट अथवा ध्येय असावं. त्यामुळे तुमच्या कामाला आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही जो वेळ देता त्याला एक दिशा प्राप्त होते. मात्र हे उद्दिष्ट सुरुवातीलाच निश्चित करावे. ते कसे, कधी आणि कितपत पूर्ण करता येईल, याचा आडाखाही आखलेला असावा. ते उद्दिष्ट तुम्हाला झेपेल, असे असावे.


३. अग्रक्रम ठरवणे-
जेव्हा ध्येय गाठण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता, त्यावेळी इटालियन अर्थतज्ज्ञ परेटो यांचा ८०-२०हा नियम वापरा. परेटो यांनी असं म्हटलंय की, ८० टक्के पुरस्कार तुम्हाला २० टक्के प्रयत्नांतून मिळू शकतात. हे अतिशय मौल्यवान २० टक्के प्रयत्न कोणते, ते समजून घेतल्यानंतर तुमचे अग्रक्रम तुम्ही ठरवू शकता. अशा तऱ्हेने तुम्हाला लाभदायक ठरतील अशा गोष्टींना आधी वेळ देणं, हे महत्त्वपूर्ण ठरतं.

४. कामांची यादी बनवणं-
दिवसभरात कोणकोणती कामं करायची, याची आखणी मनाशी करायला हवी. कामाची यादी आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी करता येईल. त्यामुळे कॅलेंडर किंवा कामाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेता येतं किंवा कामांची यादी करून आवश्यकतेनुसार त्यात बदलही करता येईल. या दोन्ही पद्धतींचा उपयोग गरज भासेल त्याप्रमाणेही करता येणं शक्य आहे. त्यामुळे कामाचं प्राधान्य लक्षात घेऊन एकापाठोपाठ एक काम उरकणं शक्य होतं.  


५. लवचिकता-
कामात अनेकदा अडथळे येण्याची, बिघाड होण्याची किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधलं जाण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टी गृहीत धरून कामाची आखणी करायला हवी आणि कामाची पद्धत ठरवायला हवी. वेळेचं नियोजन करणारी तज्ज्ञ मंडळी नेहमी असं सुचवतात की, प्रत्येकानं आपल्याजवळ असलेल्या वेळापकी ५० % वेळाचंच नियोजन करावं, तशा प्रकारेच कामाची आखणी करावी. फक्त निम्म्या वेळाचंच तुम्ही वेळापत्रक बनवल्यानं तुमच्या उरलेल्या निम्म्या वेळात तुम्हाला कामात येणारे अडथळे किंवा अचानक समोर आलेली आणीबाणीची परिस्थिती यांच्याशी सामना करता येतो. 

६. शारीरिक व मानसिक दृष्टीनं प्राइम टाइम लक्षात घ्या-
तुम्ही दिवसातल्या ज्या वेळात कामाच्या दृष्टीनं उत्साही, क्रियाशील असता, त्या वेळेत काम पूर्ण करणं उत्तम. तुम्ही पहाटेच्या वेळी काम करताना अधिक तरतरीत असता. रात्री काम करायला तुम्हाला अधिक आवडतं की, दुपारच्या वेळी तुम्हांला कामासाठी उत्साह अधिक असतो, हे जाणून घेऊन त्यावेळी काम केलं तर ते अधिक दर्जेदार आणि लवकर पूर्ण होतं. तुमच्यासाठी महत्त्वाची आणि प्रथम करायला हवीत अशी कामं करण्यासाठी वेळ देणं हा वेळेचं नियोजन करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे.

७. योग्य गोष्टी योग्य तऱ्हेने करा-
सुप्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञ पीटर ड्रकर म्हणतात, ‘‘योग्य ती गोष्ट करणं हे गोष्टी योग्य रीतीनं करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. योग्य त्या गोष्टी केल्यानं अपेक्षित परिणाम साधला जातो. योग्य रीतीनं गोष्टी करणं म्हणजे तुमच्यातली कार्यक्षमतेनुसार कोणती गोष्ट योग्य आहे, यावर लक्ष केंद्रित करून नंतर ती योग्य रीतीने करण्यावर भर द्यायला हवा.’’


८. कामे तातडीने वा घाईत करू नका-
तातडीने केलेल्या कामाचे परिणाम अल्पकालीन असतात तर महत्त्वाच्या कामांमधून साध्य झालेले परिणाम दीर्घकालीन असतात. अशा महत्त्वपूर्ण कामाचा थेट संबंध तुमच्या अंतिम ध्येयाशी असतो. त्यामुळे तातडीने करावयाच्या कामांची संख्या कमीत कमी राखण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला तुमची महत्त्वाची आणि प्राधान्याने पूर्ण करावयाची कामं करायला पुरेसा वेळ मिळेल. 

९. अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची कला शिका-
क्षुल्लक गोष्टींना टाळण्याची आणि ज्या कामांचा तुम्हाला भावी आयुष्यावर फारसा उपयोग होणार नाही, अशा गोष्टींपासून दूर राहायला शिका. कामांच्या यादीत महत्त्वाची कामं कोणती आणि बाजूला सारता येण्यासारखी कोणती, हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता आणि शक्यतो जी कामं तुम्ही एकटय़ाने करू शकता, ती कामं करण्यावर अधिक भर देणं योग्य ठरतं.


१०. कामातली चालढकल टाळा-
अनेकदा पुढय़ातलं काम पुढे ढकलण्याची किंवा टाळण्याची वृत्ती बाळगलीत, तर तुमचं काम कंटाळवाणं होतं. अशा वेळी त्या कामाचे छोटे छोटे भाग करावेत आणि एक एक भाग पूर्ण करावा किंवा मग मोठं काम करताना कंटाळा टाळण्यासाठी त्या कामाला ठराविक वेळ द्यावा. कामाचा सगळा भार एकदम पेलण्यापेक्षा एका वेळी थोडं थोडं काम पूर्ण केलंत, तर तुम्ही अशा टप्यावर पोचाल, जिथे तुम्हालाच ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची निकड भासेल.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites