January 2017 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

06 January 2017

स्वतःला बदला, जग बदलेल! - अतुल राजोळी

मित्रांनो नमस्कार,
जगातील एकमेव गोष्ट जी सदैव कायम असते ती म्हणजे 'बदल'. उदाहरणार्थ, आत्ता या क्षणी आपल्या शरीरात व पेशींमध्ये बदल होत आहेत. पृथ्वीच्या भौतिक अवस्थेत बदल होत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. आपण ज्या पध्दतीने काम करतो, संभाषण करतो त्यांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. दळणवळणांच्या साधनसामग्रीमध्ये बर्‍याच प्रमाणात बदल होत आहेत. आज जगात प्रचंड प्रमाणात मोठे बदल होत आहेत. परंतु या बदलाला काही लोक विरोध करतात. त्यांना त्यांच्या सभोवताली होत असलेले बदल मान्य नसतात, त्यांचा ते स्वीकार करत नाहीत. बदल न स्वीकारल्यामुळे अशा व्यक्तींना कालांतराने एवढा मोठा फटका बसतो की, त्यांचं अस्तित्वच नष्ट होतं. काही लोक बदलाचा विरोध जरी करत नसले तरी बदल आनंदाने स्वीकारतही नाहीत. ही माणसं सहनशील माणसं असतात. त्यांना त्यांच्यावर अत्याचार झाल्यासारखं वाटतं; परंतु त्यांना हेदेखील माहीत असतं की, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही व अनिवार्य असल्याकारणाने ते बदलाशी तडजोड करतात. बदल ते मनापासून स्वीकारत नाहीत. 'आलिया भोगासी असावे सादर' असं त्यांचं घोषवाक्य असतं.

फार थोडी माणसं झालेला बदल मोकळ्या मनाने स्वीकारतात. (कदाचित म्हणूनच यशस्वी माणसांची जगातील संख्यादेखील कमीच आहे!) जगात होत असलेल्या बदलाकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहतात. या बदलांकडे भविष्यातील संधी या नजरेतून ते पाहतात. त्यांना हे कळून चुकलं असतं की, जगात होत असलेले बदल हे फक्त त्यांच्या बाबतीतच होत नाही आहेत, तर सर्वांबाबत होत आहेत; त्यामुळे या बदलांमध्ये नवीन संधीदेखील नक्कीच निर्माण होणार आहेत. या नविन संधींचा ते शोध घेतात व होत असलेला बदल आनंदाने साजरा करतात.

जगात होत असलेल्या बदलांना आपण मोकळ्या मनाने सामोरं गेलं पाहीजे, नाहीतर आपल्याला त्याची झळ लागल्याशिवाय राहणार नाही. काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून न आणल्यामुळे कित्येक जुन्या कंपन्या कर्जबाजारी झाल्याची उदाहरणं आपल्याला माहिती असतीलच. काही वर्षांपूर्वी ज्या कंपन्या यशस्वी कंपन्या म्हणून जगाला माहिती होत्या त्यांतील काही कंपन्यांचं आज अस्तित्वच नष्ट झालं आहे. आपल्यासमोर अशाही बर्‍याच कंपन्यांची उदाहरणं आहेत, ज्यांनी माहिती-तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांच्या मदतीने अल्पावधीत उत्तुंग यश प्राप्त केलं.

आपल्या सभोवताली बदल तर नेहमीच होत राहणार आहेत. ते आपण रोखू शकत नाही. त्यांना विरोध करणं किंवा बदल होणारच नाहीत अशी अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा आहे. जगात होत असलेल्या बदलांशी आपण जुळवून न घेता, स्वतःमध्ये योग्य ते बदल केले नाहीत, तर भविष्यात अशी वेळ येईल जेव्हा आपल्याला बदलण्याशिवाय पर्यायच उरला नसेल व तेव्हा तडजोड करावी लागेल. जर आपणास आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होणार्‍या संभाव्य बदलांची जाणीव असेल, तर आत्ताच त्याचा सकारात्मक पध्दतीने विचार करा, त्यातून मिळणार्‍या नवीन संधीचा शोध घ्या व होणारा बदल आनंदाने साजरा करा.

जगातील होणार्‍या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आपण स्वतःमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या विचारांमध्ये, मनस्थितीमध्ये, वागणुकीमुळे, समजुतींमध्ये, सवयींमध्ये व कृतीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत नाही तो पर्यंत आपण या बदलत्या युगात नवीन काही साध्य करु शकत नाही. आजच्या गतिक व सतत बदलणार्‍या युगात यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे हवी THE SUCCESS BLUEPRINT.

THE SUCCESS BLUEPRINT म्हणजे काय?
  • आपल्या मानसिक शक्तीला जागृत करण्याची क्षमता.
  • आपल्या कडील अगाध सामर्थ्याची जाणिव असणे व वापरण्याची कुवत असणे.
  • आपल्या समजुती, प्रवृत्ती व कृतीव्दारे असाधारण उद्दीष्टे साध्य करण्याची गुरुकिल्ली.
  • आपल्या संपुर्ण आयुष्याचा ताबा घेणे आपल्यातील सर्वोत्कृष्ट क्षमतेचा ठाव घेणे.


आपणही स्वतः ला बदलू शकतो आणि आजच्या  बदलत्या  युगात यशस्वी होऊ शकतो. 
THE SUCCESS BLUEPRINT - एक अद्वितीय कार्यशाळा


प्रशिक्षक: अतुल राजोळी

दिनांक: १ फेब्रुवारी २०१७

वेळः सकाळी ९:३० ते संध्याकाळी  ६

स्थळः मैसुर असोसिएशन हॉल, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)

प्रवेशिका मिळवण्यासाठी संपर्कः 7666426654, 9619465689

नाव नोंदवण्यासाठी खालिल Form भरा:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites