May 2013 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

05 May 2013

फ्युचर पाठशाला जोश २०१३

नमस्कार!
मित्रांनो, दर वर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम अगदी दणदणीतरित्या पार पाडत आहे. यंदा एप्रिल व मे २०१३ दरम्यान मुंबई व मुंबईबाहेर २० पेक्षा जास्त ठिकाणी फ्युचर पाठशाला कार्यशाळा राबवण्यात येत आहेत.


फ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ व आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे 'फ्युचर पाठशाला जोश २०१३', दिनांक २६ मे २०१३ या दिवशी, षण्मुखानंद सभागृह, सायन येथे आयोजित करण्यात आला आहे. ह्या अदभुत कार्यक्रमामध्ये फ्युचर पाठशालाचे ५०० पेक्षा अधिक फ्युचर स्टार्स जगण्याची दिशा देणारे निरनिराळे परफॉर्मन्स आत्मविश्वासाने सादर करतील. फ्युचर पाठशालाचा जोश अनुभवण्याची सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.यंदाचा जोश २०१३ कार्यक्रम भव्यदिव्य तर असणारच आहे परंतु त्याच बरोबर बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटिव्हेटर मित्र' या सुप्रसिध्द पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार असुन, वाचकांच्या विशेष आग्रहाखातर ह्याच पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती 'My Motivator Mitra' ह्याच कार्यक्रमामध्ये प्रकाशित होणार आहे.


फ्युचर पाठशाला जोश २०१३ चे वारे सध्या सगळीकडे वाहत आहेत. झी २४ तास वाहिनी या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर असणार आहे! बॉर्न टू विनचे सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाची आधीपासुनच वाट पाहत आहेत, गेल्या पाच वर्षाचे फ्युचर पाठशालाचे विद्यार्थी आमचे फ्युचर स्टार्स या कार्यक्रमाची आस लावून बसले आहेत. मित्रांनो, आता फक्त काही दिवस उरले आहेत. आपल्या बॉर्न टू विनच्या संपुर्ण परिवारासाठी हा कार्यक्रम एक विशेष अनुभव असणार आहे.मित्रांनो, बॉर्न टू विनच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याला उपस्थित असाल अशी नम्र विनंती!

- टिम बॉर्न टू विन

फ्युचर पाठशाला जोश २०१३

दिनांक: रविवार, २६ मे २०१३

वेळ: सकाळी ठिक १०:०० वाजता

स्थळः षण्मुखानंद सभागृह, सायन (पु.)

प्रवेश विनामुल्य

संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


फ्युचर पाठशाला जोश २०१२ ची काही क्षणचित्रे:


Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites