LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE: Future PaathShala
Showing posts with label Future PaathShala. Show all posts
Showing posts with label Future PaathShala. Show all posts

31 May 2014

फ्युचर पाठशाला जोश २०१४ व ५वा उद्योगस्फुर्ती सोहळा


नमस्कार!

मित्रांनो टिम बॉन टू विनला आपल्याला कळवण्यास आत्यंत आनंद होत आहे की दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखिल उन्हाळी सुट्टी दरम्यान फ्युचर पाठशाला हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरळीतपणे पार पाडला. त्याच बरोबर फ्युचर पाठशालाचा समारोप नेहमी प्रमाणे फ्युचर पाठशाला जोश २०१४ या धमाकेदार कार्यक्रमाने झाला. दिनांक २५ मे २०१४ रोजी, यशवंत नाट्यमंदिर मध्ये अतिशय उत्साहवर्धक व भारावून टाकणार्‍या वातावरणात फ्युचर पाठशाला जोश कार्यक्रम पार पडला. फ्युचर पाठशालाचे वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थींनी आपल्या प्रेरणादायी परफॉर्मन्सव्दारे हा कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांना मोहीत करुन टाकलं. कर्यक्रमातील ऊर्जा व तरुणाईचा जल्लोष खरोखरच जबरदस्त असा होता. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनी देखिल तेवढंच एंजोय केलं. 

कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...






 




खास तुमच्यासाठी झी २४ तास ने घेतलेला फ्युचर पाठशाला जोश २०१४ चा आढावा



मित्रांनो, बॉन टू विनचा फक्त उद्योजकांसाठी असणारा एक अत्यंत परिणामकारक प्रशिणक्रम म्हणजे लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांस. हा एक वर्षाचा जबरदस्त असा प्रवास आहे ज्याच्या मदतीने कोणताही लघुउद्योजक त्याच्या उद्योगाचे यशस्वी व्यवसायामध्ये रुपांतर करु शकतो. लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसची पाचवी बॅच सध्या अंतीम टप्प्यात आलेली असुन, याच बॅचचा पदवीदान समारंभ म्हणजेच पाचवा 'उद्योगस्फुर्ती सोहळा' दिनांक ७ जुन २०१४ रोजी, शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसच्या पाचव्या बॅचच्या सर्व प्रशिक्षणार्थींचा पदविका देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्यांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कृत देखिल करण्यात येणार आहे.

उद्योगस्फुर्ती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे, लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसच्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या Business Case Study Presentations. लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसच्या पाचव्या बॅचचे १० यशस्वी प्रशिक्षणार्थी लक्ष्यवेध व लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांस दरम्यान व्यावसायिक प्रवास आपल्या प्रेझेंटेशनद्वारे उलघडणार आहेत. हे १० Presentations प्रचंड प्रेरणादायी असे असतील व प्रत्येक लघुउद्योजकाला मार्गदर्शक असे असतील. म्हणुनच प्रत्येक लघुउद्योजकाने ह्या कार्यक्रमाचा अनुभव घ्यावा असा हा अद्वीतीय कार्यक्रम असणार आहे. 
पाचव्या उद्योगस्फुर्ती सोहळ्याचे प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक असणार आहेत, सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर, मॅक्सेल फाउंडेशनचे संचालक व 'प्रगतीचा एक्सप्रेस वे' या पुस्तकाचे लेखक श्री. नितीन पोतदार सर. त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात येईल व एका उद्योजक प्रशिक्षणार्थीला 'सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार' प्रदान करण्यात येईल. नितीन पोतदार सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन देखिल उपस्थितांना लाभणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम प्रत्येक उद्योजकाला स्फुर्ती देणारा असणार आहे.



तर मग ७ जुन ला नक्की या!
दिनांकः शनिवार, ७ जुन २०१४
वेळः सकाळी ठिक १० वाजता
स्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
प्रवेश विनामुल्य
धन्यवाद!

05 May 2013

फ्युचर पाठशाला जोश २०१३

नमस्कार!
मित्रांनो, दर वर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम अगदी दणदणीतरित्या पार पाडत आहे. यंदा एप्रिल व मे २०१३ दरम्यान मुंबई व मुंबईबाहेर २० पेक्षा जास्त ठिकाणी फ्युचर पाठशाला कार्यशाळा राबवण्यात येत आहेत.


फ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ व आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे 'फ्युचर पाठशाला जोश २०१३', दिनांक २६ मे २०१३ या दिवशी, षण्मुखानंद सभागृह, सायन येथे आयोजित करण्यात आला आहे. ह्या अदभुत कार्यक्रमामध्ये फ्युचर पाठशालाचे ५०० पेक्षा अधिक फ्युचर स्टार्स जगण्याची दिशा देणारे निरनिराळे परफॉर्मन्स आत्मविश्वासाने सादर करतील. फ्युचर पाठशालाचा जोश अनुभवण्याची सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.



यंदाचा जोश २०१३ कार्यक्रम भव्यदिव्य तर असणारच आहे परंतु त्याच बरोबर बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटिव्हेटर मित्र' या सुप्रसिध्द पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार असुन, वाचकांच्या विशेष आग्रहाखातर ह्याच पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती 'My Motivator Mitra' ह्याच कार्यक्रमामध्ये प्रकाशित होणार आहे.


फ्युचर पाठशाला जोश २०१३ चे वारे सध्या सगळीकडे वाहत आहेत. झी २४ तास वाहिनी या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर असणार आहे! बॉर्न टू विनचे सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाची आधीपासुनच वाट पाहत आहेत, गेल्या पाच वर्षाचे फ्युचर पाठशालाचे विद्यार्थी आमचे फ्युचर स्टार्स या कार्यक्रमाची आस लावून बसले आहेत. मित्रांनो, आता फक्त काही दिवस उरले आहेत. आपल्या बॉर्न टू विनच्या संपुर्ण परिवारासाठी हा कार्यक्रम एक विशेष अनुभव असणार आहे.



मित्रांनो, बॉर्न टू विनच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याला उपस्थित असाल अशी नम्र विनंती!

- टिम बॉर्न टू विन

फ्युचर पाठशाला जोश २०१३

दिनांक: रविवार, २६ मे २०१३

वेळ: सकाळी ठिक १०:०० वाजता

स्थळः षण्मुखानंद सभागृह, सायन (पु.)

प्रवेश विनामुल्य

संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


फ्युचर पाठशाला जोश २०१२ ची काही क्षणचित्रे:






10 April 2013

अतुल राजोळी यांची लाईव्ह मुलाखत झी २४ तास वर


नमस्कार मित्रांनो
आपणा सर्वांना कळविण्यात खूप आनंद होतोय कि दिनांक २ एप्रिल रोजी बॉर्न टू विन चे संचालक श्री अतुल राजोळी यांची लाईव्ह मुलाखत झी २४ तास या वाहिनीवरील हितगुज या कार्यक्रमात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षी १ मे २०१२ रोजी देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलाखतीचा विषय होता 'फ्युचर पाठशाला'. या मुलाखतीमध्ये अतुल राजोळी यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांवर तसेच सर्वांगीण विकासावर आधारित प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच फ्युचर पाठशाला हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कश्याप्रकारे अमुलाग्र बदल घडवीत आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली. स्वतःचा सर्वांगीण विकास करणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे याबद्दल देखील ते बोलले. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील या लाईव्ह मुलाखतीला महाराष्ट्रभरातून श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपणास हि मुलाखत पाहण्याची संधी मिळाली नसेल, अथवा आपणास हि मुलाखत पुन्हा पहायची असेल तर ती संधी इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फक्त क्लिक करा व पहा. आणि आपले अभिप्राय नक्की पोस्ट करा.

14 March 2012

चार रस्त्यावर पाचवा फाटा - करीअरचा कोपरा

वाटतं, मोठं झाल्यावर कंडक्टर होऊ.
किंवा मग, मस्त कडक इस्त्रीतला पोलीस इन्सपेक्टर.
वाटतं होऊ नेता, आणि मस्त फिरू लाल दिव्याच्या गाडीतून.
पण ते वाटणं लहान असतानाच.
आपण का मोठे होतो?
लहानपणी लोक विचारतात तू मोठ्ठं झाल्यावर कोण होणार, आणि आपण उत्तर दिलंच की पाण्याची टाकी होणार तरी खूप कौतूक करतात.
पण मोठं झाल्यावर मात्र लागतात मागे.
विचारतात सतत, सांग काम काय करणार.? किती पैसे मिळवणार.? अमक्याला बघ एवढा पगार. तुला का मिळत नाही?
किती प्रश्न... केवढा वैताग..?
काही म्हणता काही कळत नाही.
की करावं काय...?
आधी कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा हा तिढा. मग कुठे घ्यायचा.? कोणती साईड.? कुठलं करिअर भविष्यात चालेल.? अमकातमका काय करतो.?


आपल्याला भेटतच नाही आपला बाबा रॅन्चो...
जो सांगतो पैसे के पिछे मत भाग. काबील बन. काबील...!!
पण हे काबील बनायचं कसं.? आणि बनलंच तर आपल्या भवितव्यासाठी जिवाचं पाणी करणार्‍या आई-बाबांना सांगायचं कसं.?

यंदा तुम्ही उभेच असाल या करिअरच्या चार रस्त्यावर आणि तिथून फुटत असेल एखादी पाचवीही वाट.

तर जरा ही १२ सूत्रं लक्षात ठेवा....

बघा.... कदाचित तुमचा निर्णय सोप्पा होईल आणि तुम्हाला सापडेल तुमची स्वत:ची हक्काची वाट.!

१) आधी एका प्रश्नाचं उत्तर स्वत:ला द्या की मला काय करायला आवडेल.?

२) जग गेलं खड्ड्यात! पैसे मिळतील किंवा नाही मिळणार, आईबाबा "हो" म्हणणारही नाहीत कदाचित पण तुम्ही ठरवाच की तुम्हाला काय करायला आवडेल.

३) काही जण म्हणतात की, "असं काहीच नाही", "मला नाही कळत", हे साफ चूक! आपल्याला भूक लागली आहे हे जसं फक्त आपल्यालाच कळतं तसं आपल्याला काय करायला आवडेल हेही फक्त आपल्यालाच कळतं. लोक ठरवतात का आपल्याला किती भूक लागलीये ते? तसंच हे... इतकं सोपं! त्यामुळे एकदा ठरवाच की काय करायला आवडेल...?

४) एकदा ठरलं की शोधा ते कसं करायचं.... कुठं करायचं...?

५) आपल्याला जे आवडतं ते करण्याची पात्रता आपली आहे का? हे ठरवा. म्हणजे आपल्याला आवडतं म्हणून आपण सचिन तेंडूलकर होऊ शकतो का? एकदा विचार करा...

६) तो विचार प्रॅक्टिकल असलेला बरा. अनेक लोकांना आवड आणि प्रॅक्टिकल गोष्टी याची सांगड नाही घालता येत.


७) नुसतं वाटतं होऊ डॉक्टर... पण जीवशास्त्रच आवडत नाही, असं होतं का आपलं...?

८) मित्र म्हणतात म्हणून काही करायचं. हे तर साफ चूक. मित्र काय म्हणायचं ते म्हणो. तुम्हाला वाटलं ना की लावायची बटाटेवड्याची गाडी तर लावा बिनधास्त...! पण ती एकदा लावली की लोक माझ्याकडे पाहतात. रस्त्यावर वडे तळतो म्हणून हसतात, असा फालतू विचार करायचा नाही.

९) आईवडील ऐकतात आपलं. पण त्यांना नीट समजावलं तर.? आपण त्यांच्याशी भांडलो आणि 'तुम्हाला काहीच कळत नाही' असं म्हटलं तर का ते आपल्याला मदत करतील.

१0) आई-वडिलांना कमी लेखू नका. तुम्हाला काय कळतं करिअरमधलं असं म्हणून त्यांना व्हिलन करू नका. त्यापेक्षा त्यांच्या आर्थिक क्षमतांचाही विचार करा.

११) जे काम तुम्हाला आवडेल तेच आपण करायचं. मग त्यात पैसे नाही मिळाले आणि इतर लोकांना त्यांच्या कामात खूप पैसे मिळाले तरी आपण स्वत:ला दोष देणार नाही, याची खात्री असेल तर स्वतच्या जबाबदारीवर निर्णय घ्या.

१२) घेतला निर्णय. आता पुरे खयाली पुलाव... लागा झडझडून कामाला.!
लोकमत - शुक्र, ६ जानेवारी २०१२
Please Click on Following Link: http://born2win.in/future.aspx
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites