April 2010 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

28 April 2010

'मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय.. -मुकेश अंबानी

नमस्कार!

२६ एप्रिल महाराष्ट्र टाईम्समध्ये महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समुहाचे मालक श्री मुकेश अंबानी यांचा 'होय, मी महारष्ट्राचा' हा लेख आला होता. जर आपण तो लेख वाचला नसेल तर आपण तो जरुर वाचावा. मी असं म्हणेन प्रत्येक मराठी माणसाने वाचावा असा हा लेख आहे. या लेखात श्री. मुकेश अंबानी यांनी स्पष्टपणे म्हंटले आहे की 'मराठी माणसाला धंदा करता येत नाही, हा आता इतिहास झालाय.' या लेखाद्वारे त्यांनी मराठी माणसाचे कामामध्ये झोकून देणे, मुल्यांबाबतचा आग्रह, शिक्षणाला दिलेले महत्त्व व सतत शिकत रहाण्याची प्रवृत्तीबद्दल कौतुक केले आहे. एकंदरीतच हा लेख म्हणजे संपुर्ण मराठी समाजाचा एक प्रकाराचा सन्मान आहे असे मला वाटते व तो ज्या व्यक्तीद्वारे झाला आहे ते याहून ही महत्त्वाचे.

आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे श्री. मुकेश अंबानी यांनी लिहीलेल्या लेखामधील जे मुद्दे आहेत त्याला अनुसरूनच श्री. नितीन पोतदार यांनी आपले सविस्तर विचार गेल्या दोन वर्षांपासुन सातत्याने आपल्या लेखाद्वारे मांडले आहेत. लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये गेल्या दोन वर्षांपासुन श्री. नितीन पोतदार मराठी समाज व उद्योजकता या विषयावर आपले ज्वलंत विचार त्यांच्या लेखांद्वारे मांडत आहेत. त्यांचे महाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा, जय महाराष्ट्र! , मराठी मिल्लिओनैरे व ........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे!  हे लेख जर आपण वाचलेत तर आपणास लक्षात येईल श्री. मुकेश अंबानी यांनी जे विचार संक्षिप्त स्वरुपात मांडले आहेत तेच विचार श्री. नितीन पोतदार यांनी सविस्तरपणे आपल्या लेखांमध्ये मांडले आहेत.

आपणास श्री. नितीन पोतदार यांचे मराठी समाज व उद्योजकाविषयीचे लेख वाचायचे असल्यास त्यांचा ब्लॉग (www.nitinpotdar.com)  नक्कीच वाचा. त्यांच्या ब्लॉगवर आपणास त्यांचे आतापर्यंतचे सर्व लेख वाचावयास मिळतील.

मी आपणास विनंती करतो श्री. नितीन पोतदार यांचा ब्लॉगचा आपल्या मराठी बांधवांमध्ये प्रचार करावा. किमान दहा मराठी माणसांना त्यांच्या ब्लॉगची लिंक आपण इ-मेल अथवा एस्. एम्. एस्. द्वारे पाठवावी. जेणे करून मराठी उद्योजकांबद्दलचे त्यांचे प्रभावी विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील.

धन्यवाद!

आपला विश्वासु

अतुल राजोळी
बॉर्न टू विन

16 April 2010

FUTURE PAATHSHALA IS BACK....!

"सारी उम्र हम, मरमरके जी लिये; एक पल तो अब हमें जीने दो.. जीने दो! Give me some sunshine, give me some rain! Give me another chance wanna grow up once again!"

'थ्री इडीयटस्' चित्रपटातील हे गाणं पाहताना आजच्या युवा पिढीच्या दयनीय अवस्थेला अनूभवून जीव कासाविस होतो. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर असलेले प्रचंड दडपण, पालकांच्या अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा, गोंधळात टाकणारी अ‍ॅडमिशन पध्दत, शैक्षणिक संस्थांचे व्यावसायिकीकरण व भविष्याबाबतची अनिश्चितता असे आजचे विदारक चित्र युवा पिढीसमोर खुप मोठे प्रश्नचिंन्ह निर्माण करते. कोवळ्या वयामध्ये ह्या सर्व बाबींना तोंड देण्यासाठी आजची युवा पिढी खरोखरच मानसिक व बौधिकरित्या तेवढी सक्षम आहे का? बहूतेक नाही. गेल्या वर्षभरातील विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता हे आपण मान्य केलेच पाहीजे. खास करुन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व परीक्षेचे एवढे जबरदस्त दडपण निर्माण होते कि ह्या मुलांचे संपुर्ण भविष्य त्यांनी परिक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबुन असते हे गृहीतच धरण्यात येते. ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी भविष्यामध्ये आपले करियर करणार आहे त्याचा निर्णय हा सर्वस्वी त्याने परीक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबून असतो. विद्यार्थ्याची कोणत्या क्षेत्रात आवड आहे? विद्यार्थ्याकडे कोणत्या विषयात योग्यता व कौशल्ये आहेत? त्याची भविष्याबद्दलची संकल्पना काय आहे? विद्यार्थ्याला काय बनायला आवडेल? ह्या प्रश्नांचा बहूतांशपणे विचार केला जात नाही. आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर अथवा इंजिनीयर झालं पाहीजे असा बहूतांश पालकांचा आग्रह असतो. हे कितपत योग्य आहे? खरेतर विद्यार्थ्याला सुध्दा त्याचा स्वतःचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे कोवळ्या वयात सांगणे कठीणच असते, त्याचे कारण म्हणजे माहीतीचा व कौशल्य प्रदान शिक्षणाचा अभाव. रट्टा मारुन कोणत्या क्षेत्रात आपल्याला रस आहे हे कसे कळणार?


हे सगळं आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत, आणि दुर्दैव हे कि आपण सगळे कळत-नकळत या चुकिच्या यंत्रणेचे भाग झालेलो आहोत. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आक्रमक व आमुलाग्र अश्या बदलांची गरज आहे. आपल्याला आपल्या भावी पिढीला मानसिक व बौधिकरित्या सबळ बनवायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाला व मार्कांना महत्त्व न देता त्यांची कौशल्ये व प्रवृत्ती या दोन महत्त्वाच्या अंगांवर काम करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने ७५% पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान शिक्षण जाणिवपुर्वकरित्या पुरवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड्-निवड कळणे कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात करियर निवडण्याबाबतचा गोंधळ नेहमीच जाणवतो.

आजच्या युवा पिढीची ही गरज लक्षात घेता बॉर्न टू विन ने दोन वर्षापुर्वीच फ्युचर पाठशाला ही कार्यशाळा राबवायला सुरुवात केली. उन्हाळी सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना फ्युचर पाठशालाच्या कार्यशाळेद्वारे त्यांचे ध्येय ठरविण्यास मदत करणे, त्यांच्यातील सुप्त शक्तिचा ठाव घेण्यास मदत करणे, त्यांच्यात प्रवृत्तीमय बदल घडवून आणणे व आवश्यक तत्त्वांचे व कौशल्यांचे परिणामकारक प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतु. फ्युचर पाठशाला प्रशिक्षणक्रमाद्वारे आत्तापर्यंत मुंबईभरातुन ९०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षित झाले असुन ह्या उन्हाळी सुट्टीमध्ये देखिल ही कार्यशाळा मुंबईमध्ये माटूंगा व ठाणे येथे राबवण्यात येणार आहेत. बॉर्न टू विन चे संस्थापक व संचालक अतुल राजोळी स्वतः ह्या प्रशिक्षणक्रमाचे प्रशिक्षक असणार आहेत.

अधिक माहीतीकरिता संपर्कः २२९३९३७५/७६/७७/७८, ९८२१८९८१७१.

वेब साईटः http://www.futurepaathshala.com/

08 April 2010

ते आले... त्यांनी पाहीलं... ते बोलले आणि त्यांनी जिंकल...!

४ एप्रिल २०१० हा दिवस संपुर्ण बॉर्न टू विन टिम व लक्ष्यवेधचे सर्व प्रशिक्षणार्थी कधीच विसरु शकणार नाहीत. लक्षवेधच्या तिसर्‍या बॅचचा लक्ष्यसिध्दी सोहळा (लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचे शेवटचे सत्र) व लक्ष्यवेधचा पहीला स्नेहळमेळावा ४ एप्रिल २०१० रोजी पार पडला आणि त्यावर दुग्धशर्करा योग म्हणजे प्रसिध्द Corporate Lawyer नितीन पोतदार सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून आम्हाला लाभले. एवढेच नव्हे तर त्यांनी "...तरच मराठी उदयोजकाची पाऊलं पडतील पुढे!" या विषयावर लक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम अतिशय दणदणीतरित्या पार पडला. नितीन पोतदार सर येणार म्हणजे लोकांची तुडूंब गर्दी होणार एवढं तर नक्कीच होतं आणि तसच झालेही माटूंग्याचा कर्नाटक संघ हॉल लोकांनी खचाखच भरला होता. सर्व जण आतुर होते ते पोतदार सरांकडून मोलाचे मार्गदर्शन घेण्यासाठी व लक्ष्यवेधच्या प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी.

कार्यक्रमाच्या पुर्वार्धात लक्ष्यवेधच्या सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचे नितीन पोतदार सरांच्या हस्ते सर्टीफिकेट व पुरस्कार देऊन सत्कार समारंभ अतिशय जोशात पार पडला. एकूण २७ प्रशिक्षणार्थी लक्ष्यसिध्दी पुरस्काराचे मानकरी ठरले. आतापर्यंतच्या सर्व बॅचमधील हा उच्चांक होय.

त्याच बरोबर SPIN SELLING ह्या व्यावसायिक कौशल्य सेमिनारची विडीयो DVD व Career Guide CD चे उदघाटन पोतदार सरांच्या ह्स्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे BORN2WIN च्या नवीन Office चे देखिल उदघाटन यावेळी पोतदार सरांच्या ह्स्ते स्र्किनवर अगदी Hi-Tech पध्द्तीने करण्यात आले.

राष्ट्रपती शौर्य पदक विजेते व स्टॉपवॉच पुस्तकाचे लेखक, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. संजय गोविलकर, ब्रँड गुरु श्री. विकास गायतोंडे, अर्थ क्षेत्रातील मराठी तारे या पुस्तकाचे लेखक श्री. उदय कुलकर्णी, स्प्रिंटमेल कुरीयरचे संचालक श्री. मीनार परब व प्रसिद्ध गुंतवणुक सल्लागार श्री. अरुण सिंघ कार्यक्रमाला उपस्थित होते.

मध्यांतरानंतर कार्यक्रमाचा महत्वाचा भाग झाला तो म्हणजे "...तरच मराठी उद्योजकाची पाऊलं पडतील पुढे!" या पोतदार सरांच्या मार्गदर्शनाचा. सरांच्या मार्गदर्शनासाठी आसुसलेले लक्ष्यवेधचे सर्व प्रशिक्षणार्थी सरांच्या संभाषण शैलीने अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. सर जवळ जवळ सव्वा तास बोलले, परंतु कार्यक्रम संपुच नये असे प्रत्येकाला वाटत होते, सरांनी मराठी उद्योजकाने यशस्वी होण्यासाठी कोणती पाऊलं ऊचलली पाहीजेत? व आपल्या दृष्टीकोनात कोणते योग्य बदल केले पाहीजेत या बद्दल तर सांगितलेच पण महत्वाचे म्हणजे हे सर्व त्यांनी अगदी सोप्यासरळ, ह्रदयाला भिडेल अश्या शब्दात मांडले. उपस्थित श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद सरांच्या मार्गदर्शनाला मिळाला. शब्दात हे सर्व व्यक्त करणे खरोखरच कठीण आहे, एवढेच म्हणेन... 'सर आले...त्यांनी पाहील... ते बोलले...व त्यांनी सर्वांची मनं जिंकली...!'

कार्यक्रमाची काही क्षणचित्रे :-


कार्यक्रमाच्या सुत्रसंचालिका अस्मिता मॅडम

खचाखच भरलेला कर्नाटक संघ हॉ

अतुल राजोळी उपस्थित प्रेक्षकांना संबोधताना

नितीन पोतदार सरांचे स्टेजवर आगमन झाल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले.

"...तरच मराठी उद्योजकाची पाऊलं पडतील पुढे!" या विषयावर सरांचे मार्गदर्शन


सरांचे भाषण चांगलेच रंगात आले होते

बॉर्न टू विन च्या ऑफिसचे उदघाटन

स्पिन सेलिंग व करियर सिडीचे उदघाटन

राष्ट्रपती शौर्य पदक विजेते व स्टॉपवॉच पुस्तकाचे लेखक, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. संजय गोविलकर व सुप्रसिध्द ब्रँड गुरु श्री. विकास गायतोंडे 

सर खरच... तुम्ही आम्हाला जिंकलत...!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites