December 2014 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

31 December 2014

२०१४ चे खूप धन्यवाद आणि सुस्वागतम २०१५!

नमस्कार मित्रांनो!
काही तासात आपण २०१५ मध्ये पदार्पण करत आहोत. आज मागे वळून पाहता २०१४ हे वर्ष संपुर्ण बॉर्न टू विन परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचे व यशस्वी ठरले. आपल्या सर्वांच सहकार्य व सदिच्छेमुळेच आमच्यासाठी हे वर्ष अविस्मरणीय होतं. या वर्षभरात बॉर्न टू विनचे मिशन, "लोकांना अर्थपूर्ण आणि समृध्द जीवन जगण्यास मदत करणे." हे जगण्यासाठी बॉर्न टू विनने नवनविन कार्यशाळा व प्रशिक्षणक्रम आयोजित केले.
२०१४ मध्ये बॉर्न टू विनने आपल्या अस्तित्वाची यशस्वी ६ वर्षे पूर्ण केली व आता ७वे वर्ष २०१५ जानेवारी मध्ये पूर्ण करणार.

दरवर्षी प्रमाणे या वर्षाची सुरुवात देखील धमाकेदार पद्धतीने झाली. दिनांक ७ जानेवारी २०१४ रोजी THE SUCCESS BLUEPRINT या कार्यशाळेने हि सुरुवात झालीयशवंत नाट्यमंदिर मध्ये प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हि कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भावणारी हि कार्यशाळा त्यांच्या नववर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना एक नवीन उभारी देणारी ठरली.
'THE SUCCESS BLUEPRINT' कार्यशाळा

२०१४ या वर्षी 'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा' ही कार्यशाळा प्रथमच मुंबई उपनगरांमध्ये राबविण्यात आली. ३१ जानेवारी रोजी बोरिवली प. येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, २५ एप्रिल रोजी नेहरु सेंटर, वरळी, २५ जुलै रोजी ठाणे प. येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तसेच ९ ऑक्टोबर रोजी विले पार्ले येथील केशवराव घैसास सभागृह येथे या कार्यशाळेचे आयोजन केले होते. आम्ही मुंबईकरांचे खुप खुप आभारी आहोत की त्यांनी या कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद दिला.
'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा' नेहरु सेंटर

'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा' ठाणे

'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा' विले पार्ले 

त्याच बरोबर या वर्षी पहिल्यांदाच ९ एप्रिल रोजी 'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती' ही खास कार्यशाळा आयोजीत केली गेली. ही सहा तासांची प्रेरणादायी कार्यशाळा उपस्थितांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व मोटिव्हेशन देणारी होती. या कार्यशाळेमध्ये आपल्याला 'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती' करण्यासाठी काही प्रभावी मंत्र अतिशय विचार परिवर्तित करणार्‍या शैलीत मांडल्या होत्या.
'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती'

याच वर्षी पहिल्यांदा बॉर्न टू विनने एक दिवसीय कार्यशाळेचे देखिल आयोजन केले. 'सुसज्ज व्हा यशस्वी व्हा!' ही कार्यशाळा ९ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर (प.) येथे पार पडली. तसेच २ नोव्हेंबर रोजी तिसर्‍यांदा 'विश्वास निर्मिती वेगवान प्रगती' ही कार्यशाळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर (प.) येथे झाली.
'सुसज्ज व्हा यशस्वी व्हा!'

'विश्वास निर्मिती वेगवान प्रगती'
बॉर्न टू विनने या वर्षी उद्योजकांसाठी खास "मैत्री बॅलन्सशीट संगे" व "सेल्स चॅम्पीयन" या दोन-दोन दिवसांच्या कार्यशाळा मार्च महिन्यात व जुलै महिन्यात बॉर्न टू विनच्या ट्रेनिंग हॉलमध्ये राबविल्या. २१ व २२ मार्च रोजी झालेल्या "मैत्री बॅलन्सशीट संगे" या कार्यशाळेमध्ये फायनांशियल मॅनेजमेंटच्या मूलभूत संकल्पना, फायनांशियल स्टेट्मेंट्सची ओळख करून दिली गेली. तसेच २७ व २८ जून रोजी झालेल्या "सेल्स चॅम्पीयन" ही दोन दिवसांची जबरदस्त प्रभावशाली विक्री कौशल्य व कृती योजनांवर आधारीत कार्यशाळा होती.
"मैत्री बॅलन्सशीट संगे"

"सेल्स चॅम्पीयन"

नवोदित उद्योजक, प्रोफेशनल्स व स्वयंरोजगारकर्ते यांच्यासाठी खास "लक्ष्यवेध Intermediate" या प्रशिक्षणक्रमाची पहिली बॅच १९ जुलै रोजी सुरु झाली. १६ आठवड्यांच्या या प्रवासास २८ नवोदित उद्योजकांनी सुरुवात केली. त्यांनी या दरम्यान स्वतःवर व आपल्या उद्योगावर स्वतःला झोकून देऊन काम केले व यश मिळवले.
"लक्ष्यवेध Intermediate"

दरवर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम एप्रिल पासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठीकाणी विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात दणदणीतरित्या पार पडला. यंदा मुंबईमध्ये आठ वेगवेगळ्या ठीकाणी फ्युचर पाठशालाच्या कार्यशाळा राबविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे फ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम फ्युचर पाठशाला जोश २०१४ दिनांक २५ मे २०१४ रोजी, यशवंत नाट्यमंदिर मध्ये अतिशय उत्साहवर्धक व भारावून टाकणार्‍या वातावरणात पार पडला. फ्युचर पाठशालाचे वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थींनी आपल्या प्रेरणादायी परफॉर्मन्सव्दारे हा कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांना मोहीत करुन टाकलं. कर्यक्रमातील ऊर्जा व तरुणाईचा जल्लोष खरोखरच जबरदस्त असा होता. 
फ्युचर पाठशाला जोश २०१४

या वर्षी लक्ष्यवेध जो स्वप्नांना वास्तवात बदलणारा एक परिणामकारक प्रशिक्षणक्रम आहे, त्याच्या १८वी, १९वी, २०वी व २१वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्या व आता २२वी बॅच उत्साहात सुरु आहे.

झालेल्या बॅचचा पदवीदान समारंभ ज्या सोहळ्याची आजी-माजी प्रशिक्षणार्थी आतुरतेने वाट पाहत असतात, म्हणजेच लक्ष्यसिद्धी सोहळा देखील दिमाखात पार पडला. १८ व्या लक्ष्यसिद्धी सोहळा १३ फेब्रुवारीला यशवंत नाट्यमंदिर येथे पार पडला. "सामाजिक उद्योजकता, जागतिकीकरण आणि भारत" या विषयावर श्री अ‍ॅग्नेलोराजेश अथायडे यांनी उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन दिले व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
 वा लक्ष्यसिद्धी सोहळा

९ मे रोजी १९ वा लक्ष्यसिद्धी सोहळा कर्नाटक संघ हॉल, माटुंगा (प.) येथे झाला. कामत ग्रुप ऑफ हॉटेल्सचे चेअरमन डॉ. विठ्ठल कामत, "इडली, ऑर्किड आणि मी" या विषयावर सरांनी उद्योजकते बाबतचे उद्भवणार्‍या प्रश्नांवर मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमाला लोकांच्या उदंड प्रतिसादासाठी आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत.
१९ वा लक्ष्यसिद्धी सोहळा

१४ ऑगस्ट रोजी २० वा लक्ष्यसिद्धी सोहळा "Romancing the Balance Sheet" या विषयावर डॉ. अनिल लांबा यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ज्या विषयापासून सर्व लांब पळतात, तो म्हणजे Finance, आपल्यासाठी जितका गरजेचा आहे तितकाच सोप्पा करुन सरांनी मांडला. या कार्यक्रमाच्या दरम्यान सरांच्या "बॅलन्सशीट व फायनान्स समजून घेताना" या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन झाले.
२० वा लक्ष्यसिद्धी सोहळा

२३ नोव्हेंबर रोजी २१ वा लक्ष्यसिद्धी सोहळा प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, दादर (पू.) येथे पार पडला. प्रमुख पाहूणे अ‍ॅड. नितीन पोतदार सर यांनी "प्रगतीचा एक्सप्रेस वे" या विषयावर खास मार्गदर्शन केले व उद्योजकांच्या प्रश्नांना उत्तरे देखिल दिली.
२१ वा लक्ष्यसिद्धी सोहळा

या कार्यक्रमादरम्यान बॉर्न टू विनने अजून एक मजल गाठली. "माझा मोटिव्हेटर मित्र" या सुपरहिट पुस्तकाचे मोबाईल Android App, हे जगातील पहिले मराठी Audio Book App चे प्रकाशन झाले. आता सर्व मंडळी आपल्या मोबाईलचा वापर फक्त फोन घेण्यास किंवा करण्यास तर करतीलच शिवाय यशप्राप्तीचे मैत्रीचे कानमंत्र नित्य ऐकून स्वतःला उत्तेजित करण्यास देखील करत आहेत. त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय.
Audio Book App चे प्रकाशन

लक्ष्यवेध ADVANCE या उद्योजकीय विकास १ वर्षीय प्रशिक्षणक्रमाच्या या वर्षी ५ वी व ६ वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. याच वर्षी लक्ष्यवेध ADVANCE च्या मे मध्ये ७ व्या बॅचची सुरुवात झाली व हल्लीच २६ डिसेंबर रोजी ८ वी बॅच देखील उत्साहात सुरु झाली.
उद्योजकांना प्रेरणा देणारा कार्यक्रम म्हणजेच उद्योगस्फुर्ती सोहळा लक्ष्यवेध ADVANCE च्या प्रशिक्षणार्थींचा पदवीदान समारंभ व गौरव करणारा असा कार्यक्रम होय. ५ वा उद्योगस्फुर्ती सोहळा ७ जून रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर (प.) येथे झाला. यशस्वी उद्योजकांच अ‍ॅड. नितीन पोतदार सरांनी कौतुक केल. त्याच बरोबर ६ वा उद्योगस्फुर्ती सोहळा १३ डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. DAS Offshore Engineering Pvt. Ltd. चे Managing Director श्री. अशोक खाडे सर जे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते. त्यांच्या हस्ते यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात आला.
५ वा उद्योगस्फुर्ती सोहळा

६ वा उद्योगस्फुर्ती सोहळा

याच वर्षी लक्ष्यवेध Advance च्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी बॉर्न टू विन "उद्योग योध्दा" हा खास outbound training २ दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्या मध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी नवीन निरनिराळे साहसी Activities केल्या व अदभूत अनुभव अनुभवले.

या वर्षी २६ सप्टेंबर रोजी आपली एन. एल. पी. ची १०वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळ जवळ २०० प्रॅक्टीशनर घडवले आहेत. दहाव्या बॅचच्या प्रशिक्षणर्थ्यांची कामगिरी देखिल जबरदस्त होती.
एन. एल. पी. ची दहावी बॅच
आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जी चळवळ सुरु केली आहे, "स्वच्छ भारत अभियान" या अंतर्गत बॉर्न टू विन व मी उद्योजक तर्फे स्वच्छता मोहीम दादर चौपाटी परिसरात २८ डिसेंबर रोजी राबवण्यात आली.
"स्वच्छ भारत अभियान"

हे वर्ष संपता संपता अजुन एक आनंदाची व आमच्यासाठी अभिमानाची बातमी घेऊन आलं. बॉर्न टू विन चे Director अतुल राजोळी यांना ArthaSanket Magazine व Maharashtra Chamber Of Commerce, Industries & Agriculture (MCCIA) तर्फे "सर्वोत्कृष्ट व्यवसाय प्रशिक्षक" पुरस्काराने गौरविण्यात आले.
अतुल राजोळी यांना "सर्वोत्कृष्ट व्यवसाय प्रशिक्षक"

एकूणच २०१४ वर्ष बॉर्न टू विन साठी अतिशय अभिमानाचे, अविस्मरणीय व आनंद देणारे ठरले. पूर्वीपेक्षा या वर्षी जबाबदाऱ्या ह्या अजून वाढल्या आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत. त्यांच प्रेम व पाठींबा हा आमच्यासोबत नेहमीच असतो आणि हेच आमचं मनोधैर्य नेहमीच वाढवत असते.
२०१४ या वर्षाने खूप काही दिले नव्या चांगल्या समजुतीनवी आशानवे बळनवीन स्वप्न  नवीन संध्या. आता नवीन महत्वाकांक्षा घेऊन बॉर्न टू विन २०१५ च स्वागत करत आहे.
२०१४ चे खूप धन्यवाद आणि सुस्वागतम २०१५!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites