December 2013 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

27 December 2013

२०१३ ची सांगता आणि २०१४ चे स्वागत!

नमस्कार!
मित्रांनो २०१३ हे वर्ष संपायला आता काहीच दिवस उरले आहेत. २०१३ या वर्षाकडे वळून पाहिले तेव्हा जाणवले कि बॉर्न टू विन च्या परिवारात २०१३ हे वर्ष खूप मोठ्या, अविस्मरणीय आणि नव-नवीन घडामोडी घेऊन आलं. संपूर्ण टीम साठी हे वर्ष अत्यंत महत्वाचं आणि खूप काही शिकवून जाणारं ठरलं. खूप सारे आनंदाचे व अविस्मरणीय असे क्षण या २०१३ ने आम्हास तुमच्या समवेत अनुभवायला दिले. २०१३ मध्ये बॉर्न टू विन ने आपल्या अस्तित्वाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केली व आता ६ वे वर्ष पूर्ण करत आहोत.
बॉर्न टू विन च्या परिवारास २०१३ च्या सुरुवातीलाच एक अत्यंत आनंदाची बातमी मिळाली आणि ती म्हणजे बॉर्न टू विन चे संस्थापक आणि संचालक श्री. अतुल राजोळी यांना ५ जानेवारी २०१३ रोजी (MBC) Marathi Business Club तर्फे उद्योग तारा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि हा पुरस्कार विको चे अध्यक्ष श्री. गजानन पेंढारकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अतुल राजोळी यांना उद्योग तारा पुरस्कार

दरवर्षी प्रमाणे या वर्षाची सुरुवात देखील धमाकेदार पद्धतीने झाली. दिनांक ९ जानेवारी २०१३ रोजी THE SUCCESS BLUEPRINT या कार्यशाळेने हि सुरुवात झाली. दादर येथील वीर सावरकर सभागृहामध्ये प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हि कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भावणारी हि कार्यशाळा त्यांच्या नववर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना एक नवीन उभारी देणारी ठरली.
'THE SUCCESS BLUEPRINT' कार्यशाळा

७ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रथमच १४ वा लक्ष्यसिद्धी सोहळा यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे दणक्यात व जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाचे स्वरूप खूपच भव्य होते. त्याला कारणही खास होते…. हा लक्ष्यसिद्धी सोहळा म्हणजे बॉर्न टू विन च्या यशस्वी ५ वर्षांचे सेलीब्रेशन!!
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले ते केसरी टूर्स चे संस्थापक, श्री. केसरी पाटील सर व त्यांनी न संपणारा प्रवास या विषयावर मार्गदर्शनपर भाषण केले.
या कार्यक्रमात आपल्याला नेहमीच सहाय्य करणाऱ्या आपल्या सगळ्या वेंडर्स व असोसिएटस यांना आपण फेलिसीटेट केले.
इथे आपण आपल्या 'ध्येय  निश्चिती ते ध्येयपूर्ती' या त्रैमासिकाचे प्रकाशन देखील केले. त्याचसोबत 'माझा मोटिव्हेटर मित्र' या कॅलेंडर चे प्रकाशनही केले.
या कार्यक्रमाच्या दिवशी एक असा प्रसंग अचानक घडला कि जो पूर्णतः अनपेक्षित होता…. ते म्हणजे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना फेलीसिटेट करण्याच्या दरम्यान अचानक जवळपास २५ मिनिटांसाठी लाईट गेलीपण आश्चर्य म्हणजे एकही प्रेक्षक जागेवरून हलला नाही व मोबाईलच्या लाईट्स मध्ये प्रशिक्षणार्थ्याच स्वागत केलं व जोश, जल्लोष हा तसाच होताअशाप्रकारे हा कार्यक्रम रंगतदार झाला.
१४ वा लक्ष्यसिद्धी सोहळा

१८ फेब्रुवारी २०१३ रोजी आपण प्रथमच चिपळूण येथे लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार घेतला. संपूर्ण चिपळूणकरांनी या कार्यक्रमास उचलून घेतल व २५ मार्च २०१३ ला आपली लक्ष्यवेधची मुंबई बाहेर चिपळूण येथे पहिली बॅच यशस्वीरित्या सुरु झाली.
चिपळूण येथे लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार

तसेच या वर्षी २५ एप्रिल २०१३ ला चिपळूण येथेच प्रथम व्यावसायीकांसाठीचा स्वतःमधील उद्योजकाला जागे करा हा कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आलाव लक्ष्यवेध प्रमाणे या कार्यक्रमास देखील चिपळूणकरांनी उदंड असा प्रतिसाद दिला.
चिपळूण येथे 'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा' कार्यक्रम

मित्रांनो एप्रिल २०१३ मध्ये संपूर्ण वर्षभर आमचे विद्यार्थी व पालक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात तो कार्यक्रम, म्हणजेच फ्युचर पाठशाला याचं २०१३ च वेंचर मुंबई आणि मुंबई बाहेर दणक्यात सुरु झालं. या कार्यक्रमास नेहमीच संपूर्ण विद्यार्थिवर्गाच व पालकांचं प्रेम लाभतच असत…. तसेच ते यावर्षी देखील अनुभवायला मिळालं.
३० एप्रिल २०१३ रोजी पंधरावा लक्ष्यसिद्धी सोहळा विको चे अध्यक्ष, श्री. गजानन पेंढारकर सर यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला…. सरांच्या दोन तासांच्या मार्गदर्शनपर भाषणाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. उद्योगक्रमणा सहा दशकांची या विषयावर त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या सहा दशकांचा यशस्वी प्रवास सगळ्या प्रेक्षकांसमोर उलगडला. या दिवशी मराठी व्यापार परिषदेचे सर्वेसर्वा श्री. अनंत भालेकर सर यांनी देखील विशेष उपस्थिती दाखवली.
१५वा लक्ष्यसिद्धी सोहळा

मित्रांनो संपूर्ण बॉर्न टू विन च्या परिवाराचा लाडका विषय म्हणजे फ्युचर पाठशाला जोश २०१३ हा कार्यक्रम खूपच दिमाखात २६ में २०१३ रोजी भारतातील सर्वात मोठे सभागृह षण्मुखानंद येथे दुसऱ्यांदा २७०० लोकांच्या उपस्थितीत जोशात - जल्लोषात साजरा झाला. या वर्षी मुंबई व मुंबई बाहेर १८ सेन्टर्स च्या माध्यमातून २० बॅच झाल्या व याच्या माध्यमातून या वर्षी आपण ५४० नवीन फ्युचर स्टार्स घडविले. त्या दिवशी तब्बल ४०० पेक्षा जास्त फ्युचर स्टार्सनी स्टेज वर आयुष्याला नवीन दिशा देणारे सामाजिक विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितीत सर्व प्रेक्षक ते पाहून खुपच भारावून गेले व सगळ्या फ्युचर स्टार्स च्या पाठीवर टाळ्यांनी कौतुकाची थाप दिली.
फ्युचर पाठशाला 'जोश २०१३'

तसेच या कार्यक्रमाचं अजून एक खास आकर्षण म्हणजे या कार्यक्रमामध्ये अतुल राजोळी यांच्या माझा मोटीव्हेटर मित्र या मराठी पुस्तकाच्या तिसर्‍या व My Motivator Mitra या इंग्रजी पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन श्री. मधुकर तळवलकर सर (Executive Chairman, Talwalkars Better Value Fitness  Ltd. )  यांच्या हस्ते पार पडले. मराठी पुस्तकाप्रमाणेच इंग्रजीच्या आवृत्तीला देखील खूपच चांगला प्रतीसाद मिळाला आहे. खास म्हणजे श्री. मधुकर तळवलकर सर यांनी उपस्थित प्रेक्षकांना व विद्यार्थी मित्रांना खूपच सुंदर मार्गदर्शन केले. असा हा जोश २०१३ जल्लोषात साजरा झाला. 
अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटीव्हेटर मित्र' या पुस्तकाच्या प्रकाशन

१४ जून २०१३ रोजी बॉर्न टू विन चा व्यवसायीकांसाठीचा महत्वकांक्षी उपक्रम लक्ष्यवेध ADVANCE याच्या तिसर्‍या बॅचचा पदवीदान सोहळा श्री. वाय. एम. देवस्थळी सर (Chairman, L & T ) यांच्या हस्ते पार पडला. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी हि खरचं भारावून टाकणारी होती. प्रमुख पाहुण्यांचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन उपस्थितांना व तिसर्‍या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्याना मिळाले.
लक्ष्यवेध ADVANCE याच्या तिसर्‍या बॅचचा पदवीदान सोहळा

मित्रांनो आनंदाची बाब म्हणजे ३ जुलै २०१३ रोजी खास लोकाग्रहास्तव आपण दुसऱ्यांदा 'सुसज्ज व्हा यशस्वी व्हा' हि सहा तासांची कार्यशाळा यशस्वीरित्या घेतली. पहिल्या कार्यशाळेप्रमाणेच या वेळी देखील प्रेक्षकांचा या कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला.
'सुसज्ज व्हा यशस्वी व्हा'

चिपळूणकरांच्या प्रेमामुळे व पाठींब्यामुळे १५ जुलै २०१३ ला आपण चिपळूण येथे लक्ष्यवेधची दुसरी बॅच दिमाखात सुरु केली.
मित्रांनो बॉर्न टू विन च्या परिवारासाठी २०१३ मध्ये अत्यंत आनंदाची घडलेली घटना म्हणजे २८ जुलै २०१३ ला आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादामुळे आपण आपल्या नवीन ऑफीस मध्ये प्रवेश केला. संपूर्ण परिवारासाठी हे नवीन ऑफीस खूपच लाभदायी ठरले. या ऑफीस मध्ये आल्यापासून खूपच चांगल्या घडामोडी बॉर्न टू विन च्या परिवाराने अनुभवल्या. आनंदाची बाब म्हणजे नवीन ऑफीसचे उद्घाटन श्री. अनंत भालेकर सर यांच्या हस्ते झाले.
 बॉर्न टू विन च्या  नवीन ऑफीसचे उद्घाटन श्री. अनंत भालेकर सर यांच्या हस्ते

१३ ऑगस्ट २०१३ ला १६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा बी. एन. वैद्य सभागृह येथे दणक्यात पार पडला. याचं खास आकर्षण म्हणजे सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री. प्रदीप लोखंडे सर. (Founder, Rural Relation) त्यांची रुरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची या विषयावर श्री. अतुल राजोळी यांनी घेतलेली खास मुलखत. या मुलाखतीतून उपस्थित प्रेक्षकांना अभूतपूर्व असा अनुभव व शिकवण मिळाली.
१६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा

बॉर्न टू विन च्या उपक्रमांना महाराष्ट्रीय उद्योजकांचा उदंड प्रतिसाद हा नेहमीच लाभत असतो आणि म्हणूनच आपण या वर्षी दुसऱ्यांदा १६ ऑगस्ट २०१३ रोजी उद्योजकांसाठी स्वतःमधील उद्योजकाला जागे करा हि कार्यशाळा घेतली.
'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा'

मित्रांनो अतिशय आनंदाची बाब म्हणजे २७ ऑगस्ट २०१३ रोजी पहिल्यांदाच चिपळूण येथे THE SUCCESS BLUEPRINT हि कार्यशाळा घेतली. ६ तासांच्या या कार्यशाळेतून उपस्थितांना एक अभूतपुर्व अशी अनुभूती श्री. अतुल राजोळी यांनी दिली.
मित्रांनो २४ सप्टेंबर २०१३ ला चिपळूण नंतर मुंबई बाहेर कराड येथे आपण लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार घेतला. चिपळूण प्रमाणेच कराड येथील मंडळीनी लक्ष्यवेध ला भरभरून प्रेम दिलं.
कराड येथे आपण लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार 

२४ ऑक्टोबर २०१३ रोजी आपण दुसर्‍यांदा लोकाग्रहस्तव विश्वास निर्मिती वेगवान प्रगती ही कार्यशाळा कर्नाटक संघ सभागृह माटुंगा येथे हाउसफुल प्रतिसादात घेतली. उपस्थित सर्व या कार्यक्रमामुळे खूप खुश होते व एका वेगळ्या विषयाला त्यांनी इतकं उचलून धरलं हि खरच खूप आनंदाची बाब होय.
विश्वास निर्मिती वेगवान प्रगती

२७ ऑक्टोबर २०१३ ला आपली एन. एल. पी. ची नववी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण १७५ हून अधिक प्रक्टीशनर घडवलेत. तसेच या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी देखील जबरदस्त होती.
एन. एल. पी. ची नववी बॅच

११ नोव्हेंबर २०१३ ला सतरावा लक्ष्यसिद्धी सोहळा एकदम दिमाखात कर्नाटक संघ सभागृह, माटुंगा येथे संपन्न झाला. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांनी धमाकेदार कामगिरी केली व यशस्वीरित्या त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण केले. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध हेडहंटर श्री. गिरीश टिळक सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांनी 'बिझनेस नेटवर्किग' या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
सतरावा लक्ष्यसिद्धी सोहळा

२०१३ मध्ये घडलेली अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे चिपळूण नंतर मुंबई बाहेर आपण १२ नोव्हेंबर २०१३ ला कराडची पहिली बॅच सुरु केली. मुंबई आणि चिपळूण प्रमाणेच कराड येथील प्रशिक्षणार्थ्यांनी लक्ष्यवेध या उपक्रमास उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
१९ डिसेंबर २०१३ रोजी लक्ष्यवेध ADVANCE च्या चौथ्या बॅचचा उद्योगस्फुर्ती सोहळा अगदी ग्रॅन्ड स्वरुपण दिमाखदार पद्धतीने बी. एन. वैद्य सभागृह, दादर पूर्व येथे साजरा झाला. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी हि खरोखरच थक्क करणारी होती. फक्त दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी त्यांच्या व्यवसायात उत्तुंग अशी झेप घेतली. तसेच तब्बल १२ उद्योजक प्रशिक्षणार्थ्यांनी त्या दिवशी ५०० हून अधिक उपस्थित प्रेक्षकांसमोर आपल्या व्यवसायाचे प्रेझेनटेशन सादर केले. आनंदाची बाब म्हणजे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून तीन जबरदस्त असे व्यक्तिमत्व लाभले. ते म्हणजे निर्माण ग्रुप चे श्री. राजेंद्र सावंत सर आणि श्री. अजित मराठे सर व मराठी व्यापार परिषदेचे श्री. अनंत भालेकर सर. हा उद्योगस्फुर्ती सोहळा म्हणजे याची देही याची डोळा स्वरुपात साजरा झाला. प्रमुख पाहुण्याच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाने हा कार्यक्रम परिपूर्ण झाला.
चौथा उद्योगस्फुर्ती सोहळा

२० डिसेंबर २०१३ ला BAM ( Businessman Association of Maharashtra ) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास श्री. अतुल राजोळी ह्यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात श्री. अतुल राजोळी यांनी माणसे जोडुया, जग जिंकूया या विषयावर उत्कृष्ट अस मार्गदर्शन केलं. उपस्थित उद्योजकांना व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने उपयुक्त असं मार्गदर्शन यातून मिळाले.
२२ डिसेंबर २०१३ ला ग्राफोलोजीची ७ वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. या बॅचचे प्रशिक्षणार्थी खूपच उत्साही व खुश होते. एका वेगळ्या विषयाला इतक उचलून घेणे आणि प्रेम करणे याने समस्त बॉर्न टू विन चा परिवार नेहमीच भारावून जतो.
ग्राफोलोजीची ७ वी बॅच

एकूणच २०१३ हे वर्ष बॉर्न टू विन साठी आगळा वेगळा अविस्मरणीय व आनंद देणारे ठरले. पूर्वीपेक्षा या वर्षी जबाबदाऱ्या ह्या अजून वाढल्या आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत. त्यांच प्रेम व पाठींबा हा आमच्यासोबत नेहमीच असतो आणि हेच आमचं मनोधैर्य नेहमीच वाढवत असते.
२०१३ या वर्षाने खूप काही दिले नव्या चांगल्या समजुती, नवी आशा, नवे बळ, नवीन स्वप्न  नवीन संध्या. आता नवीन महत्वाकांक्षा घेऊन बॉर्न टू विन २०१४ च स्वागत करत आहे.

२०१३ चे खूप धन्यवाद आणि सुस्वागतम २०१४!

मित्रांनो, २०१३ प्रमाणेच २०१४ ची सुरुवात देखील आपण एका धमाक्याने करीत आहोत. या वर्षाची सुरुवात देखील THE SUCCESS BLUEPRINT या कार्यशाळेने करत आहोत. तर तुमच्या या नववर्षाची सुरुवात तुम्ही ह्या धमाकेदार पद्धतीने करण्यासाठी या कार्यक्रमात सामिल व्हा.

धन्यवाद!

कृपया खालिल व्हिडिओ पहा...

12 December 2013

उद्योगस्फुर्ती सोहळा

उद्योगस्फुर्ती सोहळा
नमस्कार!
मित्रांनो संपुर्ण बॉर्न टू विनच्या परिवारास आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि आपली लक्ष्यवेध ADVANCE ची ४ थी बॅच नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात सकारात्मक परिवर्तन अनुभवल्यानंतर व निश्चित केलेल्या दुरगामी ध्येयाच्या दिशेने वाटचाल आक्रमक पध्दतीने कायम ठेवण्यासाठी उद्योजकाचा एक नवीन प्रवास सुरु होतो आणि तो म्हणजे आपल्या व्यवसायावर काम करण्याचा त्यांचं पुढच पाउल असतं लक्ष्यवेध ADVANCE!
कोणत्याही उद्योजकाला त्याचा उद्योग हा व्यवसाय विकास प्रक्रीयेद्वारे व काही परिणामकारक उद्योजकीय कृतीयोजनांद्वारे उत्कृष्ट व आदर्श व्यवसायात रुपांतरीत करण्यास मदत करणे व त्याला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त करुन देणे, हा लक्ष्यवेध ADVANCE या प्रशिक्षणक्रमाचा उद्देश होय.
आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की लक्ष्यवेध ADVANCE च्या ४ थ्या बॅचच्या यशोगाथा  गेल्या ३ बॅच प्रमाणे खरोखरच थक्क करणार्‍या आहेत. फक्त दिड वर्षांच्या कालावधी दरम्यान या प्रशिक्षणार्थ्यांच्या व्यवसायात झालेला अमुलाग्र बदल अगदी थक्क करणारा आहे.

४ थ्या बॅचचा पदवीदान समारंभ होत आहे १९ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी ६ वाजता, बी. एन. वैद्य सभागृह, दादर (पू.) येथे.
या संधीचा लाभ प्रत्येक लघु-उद्योजकाने घेतलाच पाहिजे. १९ डिसेंबर रोजी आपण, या प्रशिक्षणार्थ्यांच्या धमाकेदार कामगिरीबद्दल त्यांच्याच कडून ऐकू शकाल. तिथे आपण या जबरदस्त Case-Studies पाहणार आहोत व त्यांच्या दणदणीत कामगिरीबद्दल जाणून घेणार आहोत.
या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक, 'मराठी व्यावसायिक उद्योग व्यापारी मित्रमंडळाचे' श्री अनंत भालेकर सर व  'निर्माण ग्रुप' चे चेअरमन श्री. राजेंद्र सावंत सर. आपल्याला त्यांचं जबरदस्त मार्गदर्शन देखील लाभणार आहे.
कोणत्याही उद्योजकाला अतिशय प्रेरणादायी व स्फुर्ती देणारा हा कार्यक्रम अगदी MUST ATTEND आहे!
अश्या या अदभुत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपणा सर्वाना आग्रहाचे आमंत्रण

तर भेटूया १९ डिसेंबर रोजी ६ वाजता बी. एन. वैद्य सभागृह येथे.

उद्योगस्फुर्ती सोहळा
दिनांक: गुरुवार १९ डिसेंबर २०१३
वेळः सायंकाळी ठिक ६:०० वाजता
स्थळः प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, एल. एन. रोड, दादर (पू.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः 022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689.


01 December 2013

एका जिद्दीची गोष्ट

एका जिद्दीची गोष्ट
प्रसाद लाड, लोकसत्ता, शुक्रवार, २७ सप्टेंबर २०१३
वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतच्या जिद्दीनं स्थान मिळवणाऱ्या, यश मिळवणाऱ्या काहीजणी असतात.  त्यांची धडाडी इतरांना प्रेरणादायी असते. अशाच एकीची गोष्ट सांगायचा इथे प्रयत्न आहे. जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकसारख्या खेळात स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या पूजा सुर्वेची ही गोष्ट.
माणसाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचे वेडअसायला हवे. त्याला एखाद्या गोष्टीचे वेड असले तरच तो त्या गोष्टीमध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत आणि विजिगीषूवृत्तीच्या जोरावर बदल किंवा क्रांती घडवू शकतो. २००७ साली एका स्पर्धेत तिच्या गुडघ्याला दुखापत झाली, तरीही तिला त्या स्पर्धेत खेळायचं होतं, दोन पायांवर नीट उभं राहता येत नसतानाही. पण डॉक्टरांनी तिला थांबवलं.. या स्पर्धेनंतर तू यापुढे जिम्नॅस्टिक करूच शकणार नाही, असं काही जणांनी तिला सांगितलंही. पण ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो, इतिहास घडवण्याची धमक असते अशा व्यक्ती सारं काही जुगारून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि ते गाठतातही. ध्येय गाठल्यावरही त्या व्यक्ती शांत बसत नाहीत, तर आपल्यापुढेही आपल्या देशातले खेळाडू कसे पोहोचतील आणि देशाचं नाव उंचावतील यासाठी प्रयत्न करतात, अशीच एक छोटय़ाशा डोंगराएवढी गोष्ट आहे, ती ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये स्वत:बरोबरच देशाचे नाव उंचावणाऱ्या पूजा सुर्वेची.
लहानपणी आजारपण असल्याने तिला घरच्यांनी बाहेर पाठवायचं टाळलं. शरीरातील ताकद वाढवण्यासाठी तिला कोणत्या तरी एका खेळाला पाठवा, असा सल्ला देण्यात आला आणि दादरमधील श्री समर्थ व्यायाम मंदिरामध्ये जिम्नॅस्टिकचे धडे गिरवायला तिने सुरुवात केली. फक्त काही महिन्यांतच तिच्यातली चुणूक दिसली आणि बऱ्याच स्पर्धामध्ये विजयाची पताका फडकवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या दिशेने तिचा प्रवास सुरू झाला, पण या पटकथेत ट्विस्टआलाच. कारण ज्या मार्गात अडचणी नाहीत तो मार्ग अचूक नसतो, असं म्हणतात.

२००७ साली राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान एन्ट्री केल्यावर काही वेळातच माझा गुडघा दुखावला गेला. त्यावेळी स्ट्रेचरवरून मला बाहेर नेण्यात आलं. दुखापतीचे स्वरूप मला माहिती नव्हतं, त्यामुळे माझं नाव पुकारलं जातंय, मला स्पर्धा खेळायची आहे, असं मी डॉक्टरांना सांगत होती. माझा हट्ट शिगेला पोहोचल्यावर त्यांनी सांगितलं की, मी तुला स्पर्धा खेळायला देतो, पण दोन्ही पायावर नीट उभी राहून दाखव. मी प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. ही दुखापत एवढी गंभीर होती की, बरीच जणं मला म्हणाली की, तू यापुढे जिम्नॅस्टिक खेळू शकत नाही..हे सर्व सांगत असताना पूजाच्या अंगावर शहारे आले होते. कदाचित तो प्रसंग तिच्या डोळ्यापुढे उभा राहिला असावा.
त्यावेळी आई-बाबा माझ्या पाठीशी होते. महेंद्र चेंबूरकर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय संघटनांही पाठीशी होत्या. त्यामुळे लोकं काय बोलतात, याचा मला विसर पडला. ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायचं, हे मनाशी पक्क केलं होतं. डॉक्टरांकडून उपचार घेतले. त्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत २००९ साली विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठीही माझी निवड झाली’,असं पूजा सांगत होती.
पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेबद्दल विचारल्यावर ती म्हणाली की, ‘जपानला स्पर्धेच्या ठिकाणावर गेल्यावर मी भारावूनच गेले. आपण कुठे आलो आहोत, इथले खेळाडू कोणत्या उंचीवर आहेत आणि आपण कुठे आहोत हे कळून चुकले. जिंकणार नाही, हे तर जवळपास माहितीच होते. कारण तिकडचे स्पोर्ट्स कल्चरच वेगळे आहे. तिथे खेळाडूंना आपल्या इथल्या हीरो-हीरॉइन्सपेक्षाही जास्त सन्मान मिळतो आणि आपल्याकडे असे काहीच नाही. त्यावेळी एक ठरवलं, या वर्षी जिंकलो नाही तरी पुढच्या वर्षी काही ना काही तरी मिळवायचेच. सारं काही विसरून फक्त आणि फक्त जिम्नॅस्टिकच्याच मागे लागले. श्वासही तोच आणि ध्यासही, अशी माझी अवस्था होती आणि मला या मेहनतीचे गोड फळ मिळालेही. २०१० साली बेलारूसला झालेल्या विश्वचषकात मला मिस एक्सोटिकाया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तो माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण होता. याच वर्षी नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळामध्ये माझा देशातून पहिला आणि विश्व क्रमवारीत १६वा क्रमांक आला.आतापर्यंत जिम्नॅस्टिकमध्ये एवढे घवघवीत यश कुणीही संपादन केले नव्हते.
२००४ साली पूजाला बालश्रीया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता तिच्याकडे जवळपास शंभरहून अधिक मेडल्स आहेत. त्याचबरोबर ती कथक विशारद असून जिम्नॅस्टिक आणि कथक यांचा मिलाप सादर करत तिने बऱ्याच जणांची मनेही जिंकली आहेत.
सध्या तू काय करतेस, असं विचारल्यावर पूजाच्या डोळ्यात आशेचा किरण दिसतो. 'जे आमच्या वाटय़ाला आलं ते नंतरच्या पिढीतल्या मुलांच्या वाटय़ाला येऊ नये, असं वाटतं. आम्ही मैदानावर मातीत किंवा इमारतीच्या गच्चीवर प्रॅक्टिस करायचो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना फार समस्या व्हायची. पण आता मी ठाण्यामध्ये तीन ठिकाणी युवा खेळाडूंना शिकवते आणि तेही मॅटवर. आतापासून त्यांना मॅटची सवय झाली तर त्यांना पुढे याचा नक्कीच फायदा होईल. माझ्या मते आपल्याकडे फार टॅलेंट आहे, पण ते पुढे येत नाही. त्यामुळे गरीब, होतकरू खेळाडूंना मी मोफतही शिकवते. त्यांचा सर्व खर्च करते, कारण टॅलेंट कुठेही मरायला नको असं वाटतं. यासाठी आम्ही 'पूजा ट्रस्ट' नावाची संस्था काढली आहे. ती सध्या जिम्नॅस्टिकसाठी कार्यरत असली तरी यापुढे या संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचे काम करणार आहे.'
खेळाडूपासून तू आता अवघ्या २३ वर्षांमध्ये प्रशिक्षकही झाली आहेस. आता यापुढे तुला काय मिळावं, असं वाटतं, असं विचारल्यावर पूजा सांगते की, माझ्याकडे सध्या दीडशेहून अधिक युवा खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, पण एकही स्टेडियम त्यांच्यासाठी नाही. त्यामुळे माझी सरकारला विनंती असेल की, जिम्नॅस्टिक स्टेडियमसाठी एक जागा द्यावी, जेणेकरून या युवा पिढीला चांगले प्रशिक्षण देता येईल. कारण ६-७ वर्षांतल्या खेळाडूंमध्ये जबरदस्त टॅलेंट असून त्यांना जर चांगले प्रशिक्षण आणि सुविधा मिळाल्या तर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच काही वर्षांत पदके मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे एवढी चमकदार कामगिरी करूनही मला राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला नाही. गेली काही वर्षे मी त्यासाठी प्रयत्नशील आहे.
देदीप्यमान कामगिरी करूनही राज्य सरकार पूजासारख्या खेळाडूंची दखल घेताना दिसत नाही. पण पूजाला मात्र, आपल्या शिष्यांकडून देशाला भेट द्यायची आहे ती ऑलिम्पिक पदकाची. ती आणि तिच्या शिष्या तयारीलाही लागल्या आहेत. गेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या राज्याने जेवढी पदके पटकावली, त्याच्या अर्धी म्हणजे २५ पदके ठाण्यातील पूजाच्या शिष्यांनी पटकावलेली आहेत. या राष्ट्रीय पदकांचे रूपांतर आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदकांत व्हायला हवे, अशीच साऱ्यांची इच्छा असेल. पूजाने लावलेला हा कल्पवृक्ष अधिकाधिक बहरावा आणि त्याला पदकांची गोड फळं लागावीत, हीच आशा आहे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites