March 2016 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

18 March 2016

आपल्या व्यवसायाचा ब्रॅंड बनवण्याचे ५ फायदे - अतुल राजोळी

मित्रांनो, प्रचंड स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपल्या व्यवसायाचा 'ब्रॅंड' निर्माण होणं गरजेचं आहे. ब्रॅंड म्हणजे प्रतिमा! आपल्या व्यवसायाबद्दल, किंवा प्रॉडक्ट व सर्विसबद्दल लोकांच्या मनात काय प्रतिमा आहे? जर ही प्रतिमा सकारात्मक असेल, ग्राहकांच्या गरजांना लक्षात घेऊन जाणिवपूर्वकपणे तयार केली असेल तर, आपल्या प्रॉडक्टच्या व सर्विसेसच्या प्रति ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. या विश्वासामुळे ग्राहक आपोआपच आपल्या प्रॉडक्ट व सर्विसच्या प्रति एकनिष्ठ बनतो.

आपल्या व्यवसायाचा ब्रॅंड असण्याचे ५ फायदे खालिल प्रमाणे आहेत:

१) विक्री करणे सोपे:
जर आपल्या प्रॉडक्टबद्दल बाजारपेठेत आधीपासून उच्च विश्वसनियता प्रस्थापित झाली असेल तर आपलं प्रॉडक्ट विकणं कठीण नसतं. कारण ग्राहकाला माहीत असतं की त्याला काय मिळणार आहे. त्याला पटवण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागत नाहीत.

२) जास्त प्रमाणात विक्री:
'ब्रॅंडेड' प्रॉडक्ट व सर्विसेस इतर प्रॉडक्ट सर्विसेसपेक्षा जास्त प्रमाणात विकले जातात. ब्रॅंडमुळे कंपनीच्या उत्पन्नावर सुध्दा सकारात्मक परिणाम होतो.

३) वेगात विक्री:
बऱ्याच प्रॉडक्टच्या विक्री प्रक्रीयेला फार वेळ लागतो. ग्राहक खरेदी बाबतचा निर्णय घेण्यासाठी वेळ लावतो. इतर प्रॉडक्टचा सुध्दा विचार करतो त्यामुळे विक्री प्रक्रियेत फार विलंब होतो. ब्रॅंडच्या विश्वसनियतेमुळे ही अडचण दुर होते.

४) आपल्या प्रॉडक्टची योग्य किंमत मिळते:
स्पर्धेमध्ये टिकून रहाण्यासाठी उद्योजक आपल्या प्रॉडक्टची किंमत कमी करतात. परंतु 'ब्रॅंड' ला नेहमी हवी ती किंमत प्राप्त होते. ब्रॅंडेड प्रॉडक्ट महाग जरी असले तरी ग्राहक जास्त किंमत देण्यास कोणतीही शंका घेतल्याशिवाय तयार होतो.

५) व्यवसायाचे मुल्यांकन वाढते: 
'ब्रॅंड' हा कंपनीचा Intangible Asset असतो. कंपनीच्या Balance Sheet वर जरी त्याचं मुल्य दिसत नसलं तरी बाजारातील कंपनीच्या मुल्यांकनामधे 'ब्रॅंड' मुळे कितीतरी पट जास्त किंमत असते. 

आपल्या व्यवसायाचा 'ब्रॅंड' बनवण्यासाठी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांची एक दिवसीय कार्यशाळा... 'A-Tool For BRANDING'.दिनांक: २६ मार्च २०१६
वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळ: बॉर्न टू विन ट्रेनिंग हॉल, ४२-४३, काकड इंडस्ट्री, एस. कीर रोड, माटुंगा (प.)
अधिक माहीतीसाठी संपर्क साधा... 7666426654

15 March 2016

ब्रॅंडींग बद्दलच्या ३ गैरसमजुती - अतुल राजोळी

नमस्कार! 'ब्रॅंड' हा शब्द जेव्हा एखादा लघुउद्योजक ऐकतो, तेव्हा ती संकल्पना त्याच्या व्यवसायाला लागु पडत नाही असचं त्याला वाटतं. बहूतांशपणे लघुउद्योजकांना 'ब्रॅंडीग' बद्दल आकर्षण वाटत नाही. आम्हाला ब्रॅंड वगैरे बनवण्याची गरज नाही अशी त्यांची समजुत असते. लघुउद्योजकांच्या 'ब्रॅंड' बद्दलच्या काही गैरसमजुती त्यांना त्यांच्या व्यवसायाचा ब्रॅंड बनवण्यापासुन रोखुन ठेवतात, त्या पुढील प्रमाणे आहेत.
गैरसमजुत क्रमांक १: ब्रॅंड निर्मिती प्रक्रिया फार खर्चिक असते. 
ब्रॅंड निर्माण करण्यासाठी भरपुर पैसा खर्च करावा लागतो असं मुळीच नाही. 'शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ' हे आपण लहान पणापासुन ऐकत आलो आहोत. तसेच 'ब्रॅंड'चे आहे. कोणत्या 'आयडीया' वापरुन आपण आपल्या ब्रॅंडचा प्रसार करता ते निर्णायक ठरते.

गैरसमजुत क्रमांक २ : लोगो, टॅग लाइन व वेबसाईट म्हणजे 'ब्रॅंड'.
लोगो आपल्या ब्रॅंडची 'ओळख' असते. आपल्या प्रॉडक्टची 'पोझिशन' टॅग लाइनमुळे निर्माण होते. वेबसाईटमुळे लोकांना आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण होते परंतु याचा अर्थ ब्रॅंडींग नव्हे. 'ब्रॅंड' निर्माण करण्यासाठी आपल्या प्रॉडक्ट बद्दल एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करावी लागते. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन, काही कॄतीयोजना आखाव्या लागतात.

गैरसमजुत क्रमांक ३ : फक्त मोठ्या कंपन्यांचाच ब्रॅंड बनु शकतो.

ब्रॅंड च्या बाबतीत मोठा किंवा छोटा विचार करणे मुळात अयोग्य आहे. ब्रॅंड निर्माण करणे हे व्यवसायाच्या दुरगामी व्यवसायिक ध्येयावर अवलंबून असते त्यामुळे व्यवसायाच्या बाजारपेठेच्या आकाराचा विचार करुन ब्रॅंड निर्मितीचा विचार केला पाहीजे. व्यवसाय क्षेत्र जेवढं पसरलेलं असेल तेवढ्या प्रमाणात व तेवढ्या भागात प्रॉडक्टच्या‍ प्रतिमेचा प्रचार होणं गरजेचं असतं.

लघु उद्योजक आपल्या व्यवसाय क्षेत्राचा विचार करुन बाजारपेठेत आपल्या प्रॉडक्ट व सर्विसचा ब्रँड निर्माण करु शकतात.

आपल्या व्यवसायाचा 'ब्रॅंड' बनवण्यासाठी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांची एक दिवसीय कार्यशाळा... 'A-Tool For BRANDING'.


दिनांक: २६ मार्च २०१६
वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळ: बॉर्न टू विन ट्रेनिंग हॉल, ४२-४३, काकड इंडस्ट्री, एस. कीर रोड, माटुंगा (प.)
अधिक माहीतीसाठी संपर्क साधा... 7666426654

05 March 2016

बिझनेस करा धडाकेबाज!- महेश कोठारे

“आयुष्यात कितीही संकटं आली, तरी घाबरायचं नाही. फिनिक्स पक्ष्यासारखं राखेतून पुन्हापुन्हा झेप घेत राहायची. बिझनेस करायचा तर धडाकेबाज! ज्याने प्रतिस्पर्ध्याचा उडाला पाहिजे थरथराट!! अशा खुमासदार शैलीत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता महेश कोठारे यांनी नव उद्योजकांना प्रोत्साहित केले. प्रभादेवीतील टेक्सटाइल कमिटी हॉलमध्ये मी उद्योजक नेटवर्किंग फोरमने शनिवारी आयोजित केलेल्या डेट विथ द ग्रेट कार्यक्रमात महेश कोठारे (एम. डी. कोठारे व्हिजन प्रा.लि.) यशस्वी उद्योजक या भूमिकेतून मार्गदर्शन करत होते. मी मराठी LIVE या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
आपल्या कारकिर्दीतील चढ-उताराचा आलेख मांडताना कोठारे म्हणाले, “माझे आईवडील दोघेही कलाक्षेत्रातील असल्याने आपसूकच मी सिनेमाकडे वळलो. छोटा जवान , राजा और रंक मधून लहानपणीच अभिनयाला यशस्वी सुरुवात केली; परंतु मोठेपणी हिरो म्हणून माझे चित्रपट एकापाठोपाठ आपटत गेले. अशा काळात वकिलीचे शिक्षण झाले असल्याने मी काही काळ वकिलीही केली; पण अपयशाने हार मानायची नाही, असा माझा स्वभावच होता. दिग्दर्शन आधीपासूनच माझे पॅशन होतेच. त्यातून मी स्वत: चित्रपट बनवायचे ठरवले. तेही अशा बिकट परिस्थितीत, जेव्हा माझ्या खिशात दमडीही नव्हती. मित्राकडून २० हजार रुपये उसने घेऊन मी एका निर्मात्याकडून प्यार किये जा या चित्रपटाचे हक्क विकत घेतले. हा चित्रपट साकारल्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एकच धूमधडाका उडाला. पुढची २० वर्षे दे दणादण , थरथराट , धडाकेबाज , झपाटलेला , पछाडलेला , खबरदार ते झपाटलेला २ असे एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे दिले. या चित्रपटांनी मला नाव, प्रसिद्धी, पैसा असे सर्वकाही दिले.”
पण यश कधीही सर्वकाळ तुमची साथसोबत करत नाही, हे समजावून सांगताना कोठारे म्हणाले, “मी हिंदीत मासूम नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला. त्याला चांगले यश मिळाले. तेव्हा आपणच हिंदी सिनेमाची निर्मिती का करू नये? या विचाराने मी लो मैं आ गया चित्रपट बनवला. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या; पण तो सणकून आपटला. या चित्रपटाच्या अपयशाने मी आर्थिकदृष्ट्या २० वर्षे मागे गेलो. कर्जाची परतफेड, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागली. एकवेळ अशी आली होती की, कोल्हापूरवरून चित्रपटाच्या शूटिंगवरून मुंबईला परतताना माझ्याजवळ स्वत:चे घरही उरले नव्हते; पण अपयशाची भीती मी कधीही बाळगली नाही. 


कुटुंबाचाही माझ्यामागे भक्कम पाठिंबा होता.” पछाडलेला , खबरदार च्या यशानंतर हळूहळू गाडी रुळावर आली. त्यानंतर छोटा पडदा गाजवण्यासाठी मी जय मल्हार चा प्रोजेक्ट हाती घेतला. त्यालाही तुफान यश मिळाले. मात्र, हे यशही सहजासहजी मिळाले नाही. तब्बल एक वर्ष कुठलेही उत्पन्न नसताना या मालिकेच्या रिसर्चचे काम सुरू होते. दीड वर्षाने मालिकेचे प्रत्यक्ष शूटिंग सुरू झाले आणि मिळकतही. त्याअगोदर शुभमंगल सावधान मालिकेचे कॉस्च्युम डिझायनिंग, सेट दर्जेदार करण्याच्या नादात नुकसान सोसले. त्याचे काम माझी पत्नी नीलिमा आणि नीता खांडके या कुटुंबातील सदस्यांनीच केल्याने मी तरून निघालो.
मी नेहमीच योग्य माणसे निवडण्यावर भर दिला, त्यांना कामात मोकळीक दिली. कामाच्या दर्जाला प्रथम प्राधान्य दिले. नफा-तोट्याचा विचार केला नाही. फक्त ओळखल्या प्रेक्षकांच्या गरजा. व्हिज्युअल इफेक्ट्स, डिजिटल साउंड, नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कल्पकतेने सिनेनिर्मिती केली. बिझनेस कुठलाही असो, तो करताना तुमच्यात पॅशन असली पाहिजे. तुम्हाला समोरच्याच्या गरजा ओळखता आल्या पाहिजेत, त्या दर्जेदारपणे पूर्ण करता आल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे अपयशात खंबीर उभे राहता आले पाहिजे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी उद्योजकांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी उद्योजक चे विनय वाघ यांनी केले. तर फोरमचे संस्थापक स्वप्निल दलाल यांनी गेल्या तीन वर्षांत सदस्यांनी नऊ कोटी रुपयांहून जास्त रुपयांचे बिझनेस शेअर केल्याची माहिती दिली.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites