अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

अतुल राजोळी


अतुल राजोळी - लक्ष्यवेध, संस्थापक व संचालक

अतुल राजोळी लक्ष्यवेध संस्थेचे संस्थापक व संचालक असुन ते स्वतः कंप्युटर इंजिनिअर आहेत. परंतु त्यांना कंप्युटर इंजिनिअरींगपेक्षा मानवी इंजिनिअरींगमध्ये अधिक रस होता आणि म्हणुनच वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अतुल अतिशय उत्साही प्रशिक्षक असुन त्यांचे प्रभावी वक्तृत्व व व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची त्यांची असाधारण क्षमता ही त्यांची विशेषता आहे. व्यक्तिचा आत्मविश्वास व्दिगुणित करणे, त्यांना त्यांच्या खर्‍या क्षमतांची जाणिव करुन देणे व त्यांची कामगिरी उच्च पातळीवर नेणे हाच त्यांचा ध्यास बनलेला आहे. आपल्याकडील ज्ञान अतिशय सोप्या व परिणामकारक कृतीमय साधनांच्या स्वरुपात मांडण्यावर त्यांचा भर असतो म्हणुनच आश्चर्य वाटायला नको की त्यांना म्हंटले जाते, 'Atul... A-Tool to empower your life!'

अतुल स्वतः एन. एल. पी. (ANLP, UK) आहेत व तसेच प्रमाणित मन व स्मरणशक्ती विकास प्रशिक्षक व संमोहन (Hypno-Therapist) आहेत. गेल्या  वर्षांपासुन अतुल प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत व त्यांनी Design केलेल्या फ्युचर पाठशाला (विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम) व लक्ष्यवेध (प्रोफेशनल व्यक्तिंसाठी ध्येयप्राप्ती प्रशिक्षणक्रम) यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अतुल राजोळी यांच्या उत्साहवर्धक व प्रेरणादायी कार्यक्रमांचा लाभ आतापर्यंत हजारो लोकांना झालेला आहे. बर्‍याच कंपन्यांच्या कर्मचार्‍यांसाठी विविध स्तरांवर त्यांना उपयुक्त असलेल्या प्रशिक्षण उपायांवर काम करण्यात ते सक्रिय आहेत.

अतुल राजोळी यांचे वैयक्तिक MISSION आहे, 'To Inspire & Empower People & Organizations To Achieve What They Deserve & Desire'. लक्ष्यवेध ADVANCE प्रशिक्षणक्रम हा अतुल यांचा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्यांचे VISION आहे कि 'वर्ष २०२० पर्यंत एकूण दहा हजार स्वतंत्र उद्योजक घडविणे'. हे VISION वास्तवामध्ये साकार करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे व लक्ष्यवेध ADVANCE प्रशिक्षणक्रम त्या दिशेने घेतलेले एक महत्वपुर्ण असे पाऊल आहे.  वर्षे प्रशिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केल्यानंतर, शेकडो उद्योजकांशी व्यक्तिगत संवाद साधल्यानंतर, तसेच व्यवसाय विकास व व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर Research केल्यानंतर लक्ष्यवेध ADVANCE प्रशिक्षणक्रम त्यांनी Design केला आहे. या अव्दितीय प्रशिक्षणक्रमाचा उद्देश म्हणजे, 'कोणत्याही उद्योजकाला त्याचा उद्योग, व्यवसाय विकास प्रक्रीयेव्दारे व काही परिणामकारक उद्योजकीय कृतीयोजनांव्दारे उत्कृष्ट व आदर्श व्यवसायात रुपांतर करण्यास मदत करणे व त्याला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त करुन देणे'.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites