November 2014 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

30 November 2014

मराठीतून मोटिव्हेट करणारे पहिले मोबाईल अ‍ॅप

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी आपण नवनवीन आव्हानांना तोंड देत असतो. अश्या परिस्थितीत स्वतःला नेहमी सकारात्मक मनस्थितीत ठेवणे फार कठिण होऊन बसते. परंतु स्वतःला प्रत्येक दिवशी मोटिव्हेट करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण जसे रोज सकाळी आंघोळ करतो, नाश्ता करतो, त्याच प्रमाणे रोज स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी सकारात्मक वाचन करणे अत्यावश्यक आहे. नेमक्या याच गरजेला लक्षात घेऊन वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांनी २०१२ मध्ये आपले पहिले पुस्तक 'माझा मोटिव्हेटर मित्र' प्रकाशित केले. आतापर्यंत या पुस्तकाच्या पाच मराठी आवृत्या व एक इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. अतुल मुंबईतील बॉर्न टू विन या प्रख्यात संस्थेचे संचालक आहेत.
बर्‍याच व्यक्ती दैनंदिन कामकाजात इतक्या व्यस्त असतात की त्यांना वाचन करण्याची इच्छा असुन देखिल पुरेसा वेळ मिळत नाही. या अडचणीला लक्षात घेऊन बॉर्न टू विनने 'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाचे ऑडियो बूक नुकतेच प्रकशित केले. त्यामुळे वाचन करणे ज्यांना शक्य होत नसेल त्यांच्यासाठी हे ऑडियो बूक स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी जणू वरदानच ठरणार आहे.

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच्या ऑडियो बूक अ‍ॅपच्या प्रकाशनाचा व्हिडीओ: 


आता 'माझा मोटिव्हेटर मित्र' हे सुपरहिट पुस्तक आपल्याला दर दिवशी मोटिव्हेट करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ऑडियो अ‍ॅप च्या स्वरुपात उपलब्ध आहे. अतुल यांनी स्वतः आपल्या आवाजात रेकॉर्डींग केलेले मोबाईल अ‍ॅप मराठीतील अश्या प्रकारचे पहिलेच 'ऑडियो अ‍ॅप' आहे. या अ‍ॅप मध्ये यशप्राप्तीचे एकूण ५० कानमंत्र अतुल यांनी अगदी साध्या व सोप्या भाषेत मांडले आहेत. प्रत्येक व्यक्तिजवळ मोबाईल फोन हा असतोच त्यामुळे मोबाईलचा वापर आपण आता स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी करु शकणार आहात. विषेश म्हणजे दिनांक ७ डिसेंबर २०१४ पर्यंत हे अ‍ॅप व यातील सर्व प्रकरणे मोफत उपलब्ध आहेत. अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारक प्ले स्टोअर मधून विनामुल्य हे अ‍ॅप डाउनलोड करु शकतात.
अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा येथे क्लिक करा.

"Maza Motivator Mitra" हे अ‍ॅप कसे डाउनलोड करावे  वापरावे:

1. Go to Play Store

2. In search box type "Maza Motivator Mitra"

3. Click on "Maza Motivator Mitra" in the search result

4. Click on "Install" button to download "Maza Motivator Mitra" in Audio App

5. Open the app by clicking on "Maza Motivator Mitra" Icon

6. Here comes the first screen of the App. Click on the screen to enter the app

7. Click on track you want to download & Listen

8. Play the downloaded tracks & stay Motivated

13 November 2014

एकवीसावा लक्ष्यसिध्दी सोहळा - "प्रगतीचा एक्सप्रेस वे"

नमस्कार मित्रांनो!
आपल्याला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की बॉर्न टू विनचा एकवीसावा लक्ष्यसिध्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे दिनांक २३ नोव्हेंबर २०१४ रोजी. एकवीसावा लक्ष्यसिध्दी सोहळा हा खरोखरच एक विशेष सोहळा असणार आहे. कारण एकवीसावा लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये लक्ष्यवेधच्या एकवीसाव्या बॅचच्या प्रशिक्षणार्थींचा पदवीदान समारंभ तर पार पडणारच आहे, परंतु त्याच बरोबर लक्ष्यवेध Achiever चा देखिल पदवीदान समारंभ संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे नवोदीत उद्योजक, प्रोफेशनल्स व स्वयंरोजगारकर्ते यांसाठी विशेष सुरु करण्यात आलेला लक्ष्यवेध Intermediate च्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ देखिल पार पडणार आहे. लक्ष्यवेध Intermediate हा बॉर्न टू विनने खास नवोदीत उद्योजक, प्रोफेशनल्स व स्वयंरोजगारकर्ते यांच्या साठी सुरु केला आणि या पहिल्या बॅचच्या प्रशिक्षणार्थींची कामगिरी एकदम दणदणीत झालेली आहे. एकवीसाव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये या सर्व नवोदीत उद्योजकांचा गुणगौरव आपण करणार आहोत.

एकवीसावा लक्ष्यसिध्दी सोहळा २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजीत करण्यात आला आहे दादर पूर्व येथील प्रा. बी. एन. वैद्य सभागृह येथे! कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे आणि मार्गदर्शक असणार आहेत, सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर, मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक आणि 'प्रगतीचा एक्सप्रेस वे' या पुस्तकाचे लेखक श्री. नितीन पोतदार सर! नितीन पोतदार सरांचे महाराष्ट्रीय उद्योजकांना नेहमीच अमुल्य मार्गदर्शन मिळत असते. एकवीसाव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये 'प्रगतीचा एक्सप्रेस वे' या विषयावर त्यांच्याकडून खास मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमामध्ये नितीन पोतदार सर त्यांच्या खास शैलीत उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधतील, व त्यामध्ये प्रश्नोत्तरांचा देखिल सहभाग असेल.


आपल्या व्यवसायाला 'प्रगतीच्या एक्सप्रेस वे' वर नेण्याच्या वाटेत उद्योजकांना बरेच प्रश्न भेडसावत असतात. दाहरणार्थ... माझे प्रॉडक्ट उत्तम आहे पण त्याचा ब्रँड निर्माण कसा करू? माझ्या सध्याच्या व्यवसायाचा देशभर किंवा जगभर विस्तार कसा करू? उद्योगात वेळोवेळी आर्थिक सहाय्य आपण कसे उभारु शकतो? वाढलेल्या व्यवसायाचे मॅनेजमेंट व्यवस्थित प्रकारे कसे केले पाहिजे? ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांपलीकडे जाण्यासाठी नेमके काय केले पाहिजे? तंत्रज्ञानाचा वापर करुन व्यवसायाला आणखी कार्यक्षम बनवण्यासाठी काय उपाय योजना आखली पाहिजे? हे आणि असे बरेच प्रश्न उद्योजकांना पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला नितीन पोतदार सर एकवीसाव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये देणार आहेत. त्याच बरोबर येत्या काही वर्षात महाराष्ट्रतील उद्योजक जागतीक पातळीवर आपले स्थान कसे निर्माण करेल हे देखिल सर सांगणार आहेत. एकंदरीत एकवीसावा लक्ष्यसिध्दी सोहळा आपणा सर्वांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याचा मार्ग मिळण्यासाठी...!

तर मित्रांनो २३ नोव्हेंबर ला भेटूया...

श्री. नितीन पोतदार सरांविषयी थोडसं:
श्री. नितीन पोतदार सर हे व्यवसायाने कॉर्पोरेट लॉयर आहेत. जे सागर असोशिएटस् या भारतातील दुसर्‍या क्रमांकाच्या लॉ फर्म मध्ये ते सिनियर पार्टनर म्हणून कार्यरत आहेत. भारतामध्ये येणार्‍या परकीय गुंतवणुकीचे तज्ञ म्हणून त्यांची देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील विलीनीकरण व परदेशी कंपन्यांबरोबरचे सहकार्याचे करार करण्याच्या कामात त्यांनी मोठे नाव मिळविले आहे. दक्षिण एशिया पॅसिफिक लिगल ५०० या आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉर्पोरेट लॉयर्सच्या यादीमध्ये श्री. नितीन पोतदार यांना भारताचे परकीय गुंतवणुक तज्ञ म्हंटले जाते.

एकवीसावा लक्ष्यसिध्दी सोहळा
विषय: 'प्रगतीचा एक्सप्रेस वे' 
दिनांक: २३ नोव्हेंबर २०१४
वेळः संध्याकाळी ठिक ६ वाजता
स्थळः प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, राजा शिवाजी विद्यालय जवळ, दादर (पू.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५///७६६६४२६६५४९६१९४६५६८९05 November 2014

शिकण्यासारखं बरंच काही.. डॉ. प्रकाश बाबा आमटे... या प्रेरणादायी जीवनपटातून... - अतुल राजोळी (बॉर्न टू विन)

नमस्कार मित्रांनो...

डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट पाहिला, आणि न राहवून लिहायला बसलो. असे फार कमी चित्रपट असतात जे पाहिल्यानंतर मन सुन्न होतं आणि जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनाने पाहण्यासाठी प्रेरणा मिळते.
डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपटापेक्षा जास्त डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनातील काही रोमहर्षक प्रसंगांवर आधारीत एक स्फुर्तीदायक जीवनपट आहे. हा चित्रपट पाहत असताना मला बर्‍याच गोष्टी डॉ. आमटे यांच्या कडून शिकायला मिळल्या त्या मी थोडक्यात मांडत आहे.
१. ज्याला 'का' जगायचं कळलं... त्याला 'कसं' जगायचं? हा प्रश्न कधीच पडत नाही.
डॉ. प्रकाश आमटे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे 'हेमलकसा' या आदीवासी भागात जाऊन स्थायिक होऊन तिथल्या आदीवासी समाजाची वैद्यकीय सेवा करायची. आपल्या पत्नीबरोबर त्यांनी तिकडे स्थलांतर केल. आपलं सर्वस्व त्यांनी या एका उद्देशासाठी समर्पित केलं. जवळजवळ कोणत्याच प्रकारची मदत व साधन सामुग्री उपलब्ध नसताना त्यांनी हेमलकसा भागातील आदीवासी लोकांसाठी वर्षानुवर्षे सेवा केली. त्यांचा जगायचा उद्देश साध्य केला व खर्‍या अर्थाने ते अर्थपूर्ण जीवन जगले.
अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्या जगण्याचा उद्देश आपण ठरवला पाहीजे व दृढनिश्चय करुन त्या मार्गावर कार्यरत राहीले पाहीजे.

२. अडचणी म्हणजे अडथळे नाहीत, अडचणींमध्येच लपलेल्या असतात संधी!
मित्रांनो 'हेमलकसा' ला गेल्यानंतर डॉ. आमटे यांच्या टीमने लगेच तयारी सुरु केली. परंतु आदीवासी लोकांना वैद्यकीय शास्त्र म्हणजे काय माहीत नव्हतं त्यामुळे त्यांच्याकडे उपचारासाठी आदीवासी लोक येतच नसत. जवळ जवळ दोन वर्ष कोणीही आदीवासी उपचारांसाठी आला नाही. ही दोन वर्षे बर्‍याच अडचणींना त्यांना तोंड द्यावी लागत होती. आदीवासी लोकांना पटवून देण्याचे निरनिराळे प्रयत्न सुरु होते. या अडचणीमध्येच आदीवासी लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्याच्या संधीचा डॉ. आमटे शोध घेत राहीले व दोन वर्षानंतर त्यांना पहीला पेशंट सापडला! तो बरा झाला आणि मग आदीवासी लोक उपचारासाठी त्यांच्याकडे येऊ लागले.
Every Obstacle is an Opportunity!

३. प्रेम ही एक अशी भाषा आहे जी जगातील प्रत्येक माणसाला व प्राण्याला देखिल काळते.
मित्रांनो, डॉ. आमटे व त्यांच्या टीमला आदीवासी लोकांचा इलाज करत असताना भेडसावणारा मोठा प्रश्न असायचा 'भाषा'. दोघांनाही एकमेकांची भाषा कळायचीच नाही. परंतु प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या भावना त्यांच्या पर्यंत पोहोचत असत आणि त्यामुळे त्यांचा इलाज होणं सोइस्कर झालं. बरेच आदीवासी डॉक्टरांकडे त्यांना सापडलेल्या जनावरांची पिल्ल भेट म्हणून आणून देत असत. खरेतर ही पिल्ल अनाथ पिल्ल असायची. ह्यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, हरण असे वन्य प्राणी असायचे परंतु ह्या सर्व प्राण्यांना डॉक्टरांनी आपले कुटुंबातील सदस्य असल्यासारखे लहानाचे मोठे केले.
माणसे आणि प्राणी... पैसा, अन्न व ऐश्वर्य पेक्षा प्रेमाची जास्त भुकेली आहेत.

४. ताबा क्षेत्राबाहेरील आपत्तीचा अथवा अडचणींचा विरोध करु नका.. त्यांचा आनंदाने स्विकार करा...
डॉ. आमटे व त्यांच्या तीम समोर काही असे प्रसंग अले तेव्हा ते अक्षरशः हतबल झाले. त्यांच्याकडे काही करण्यासारखचं नव्हते. सर्व सामान्य माणूस अश्या परिस्थितीमध्ये विचलीत होतो आणि खचून जातो. परंतु डॉक्टर आमटे अश्या परिस्थितीत आपल्या टीमला धीर द्यायचे व बर्‍याच वेळा अश्या परिस्थितीत असताना देखिल ते छोटा विनोद करायचे, ज्यामुळे वातावरण हलकं होऊन सगळे काम करण्यासाठी सकारात्मक मनस्थितीमध्ये यायचे. 
माझ्यामते कठीण प्रसंगांना हसतपणे सामोरे जाणे हा डॉ. आमटे यांचा गुणधर्म खरोखर आपण आत्मसात करण्यासारखा आहे.

५. खरा आनंदाचा क्षण जेव्हा आपल्याला एखादा मोठा पुरस्कार मिळतो तो नसून जेव्हा आपल्या प्रयत्नांमुळे दुसर्‍यांच्या चेहर्‍यावर हास्य येते तो असतो.
डॉ. आमटे यांना कित्येक मोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात मॅगेसेसे पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. परंतु डॉ. आमटे व त्यांच्या टीमसाठी सर्वात आनंद देणारा क्षण असायचा. जेव्हा एखादा रोगी त्यांच्या दवाखान्यातून बरा होऊन जाताना हसत-हसत जायचा. असे काही क्षण चित्रपटात आहेत जे एक प्रेक्षक म्हणून आपल्याला भावूक करतात व आपले आनंदाश्रू अनावर होतात. 

६. महान व्यक्तींच्या चारित्र्याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'विनम्रता'
डॉ. आमटे यांच्यातील एक प्रकर्षाने जाणवणारा गुणधर्म म्हणजे त्यांची विनम्रता व साधेपण. हेमलकसा येथील लोकांना घालायला कपडे नाहीत त्यामुळे आपल्याला पँट शर्ट घालून त्यांची सेवा करण्याचा हक्क नाही असे त्यांचे विचार असल्यामुळे त्यांनी पँटशर्टचा त्याग केला. उच्च आणि स्वतंत्र्य विचार सरणी परंतु साधं राहणीमान त्यामुळे ते लोकांच्या मनात घर करुन बसले. हेमलकसाच्या लोकांसाठी डॉ. प्रकाश आमटे हे जणू देवच आहेत.

७. आपल्या कामावर संपूर्ण श्रध्दा 
इतक्या बिकट परिस्थितीमध्ये काम करण्याची शक्ती एखाद्या माणसामध्ये तेव्हाच येऊ शकते. त्या माणसाची आपण करत असलेल्या कामावर प्रचंड श्रध्दा आहे. डॉ. आमटे देवाला मानत नाहीत. त्यांची श्रध्दा निसर्गावर आहे. त्यांची श्रध्दा माणसामधल्या आणि प्राण्यांमधल्या देवावर आहे. डॉ. प्रकाश आमटे यांची नितांत श्रध्दा त्यांच्या कामावर आहे. जिथे श्रध्दा आहे तिथेच आपण स्वतःला समर्पित करु शकतो. आणि जिकडे आपण स्वतःला समर्पित करतो तिकडेच आपण असाध्य किंवा अलौकीक गोष्टी साध्य करु शकतो. काही असाध्य... अलौकीक गोष्टी डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी साध्य केल्या. माझ्यामते त्या ते करु शकले कारण त्यांच ते करत असलेल्या कामावर नितांत श्रध्दा आहे त्यामुळेच!

मित्रांनो, मी आपणा सर्वांना मनापासून सल्ला देऊ इच्छितो की नक्कीच हा चित्रपट पहा... थिएटरमध्ये जाऊन पहा... एक थरारक... प्रेरणादयी... अविस्मरणीय... अविश्वसनीय अनुभव तुम्ही घ्याल याची मी नक्कीच गॅरेंटी देतो.
(लेख आवडल्यास शेअर करा)

अतुल राजोळी (बॉर्न टू विन)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites