December 2010 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

27 December 2010

WELCOME 2011

मित्रांनो, २०१० चा शेवटचा महीन्याचा शेवटचा आठवडा आता उजाडला! बॉर्न टू विनच्या टिमसाठी हे वर्ष इतके गतिक होते कि हे वर्ष कधी सुरू झाले व आता संपत आले हे कळलेच नाही! २०१० हे वर्ष एकंदरीच बॉर्न टू विन साठी अतिशय Eventful असे होते. बर्‍याच चांगल्या घडामोडी या वर्षभरात बॉर्न टू विन मध्ये घडल्या. २०१० मध्ये बॉर्न टू विन च्या विविध उपक्रमांचा फायदा जवळ जवळ १५ ते २० ह्जार लोकांना झाला. २०१० मध्ये बॉर्न टू विन ने बरेच Milestones साध्य केले. त्यातील काही महत्वाच्या Milestones ची माहीती आपल्या बरोबर Share करावीशी वाटली..
  • २०१० मध्ये बॉर्न टू विन नवीन व मोठ्या ऑफीसमध्ये पदार्पण झाले.
  • २०१० मध्येच बॉर्न टू विन चे निरनिराळे Audio Visual CDs लाँच झाल्या.
  • २०१० मध्ये बॉर्न टू विनने निरनिराळे सेमिनार राबवले व प्रत्येक सेमिनारला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

- SPIN SELLING SEMINAR - १९ फेब्रुवारी २०१०

  
- THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR - ६ ऑगस्ट २०१० व २७ ऑक्टोबर २०१०


- THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR - २४ नोव्हेंबर २०१० व २३ डिसेंबर २०१०
  • २०१० मध्ये बॉर्न टू विन बरोबर नवीन व उत्तम दर्जाचे प्रशिक्षक जोडले गेले: http://www.born2win.in/trainer.aspx
  • २०१० मध्ये काही दिग्गज व्यक्तींनी बॉर्न टु विनच्या कार्यक्रमामध्ये येऊन मार्गदर्शन केले.
- १० जानेवारी लक्ष्यसिध्दी सोहळा - प्रमुख पाहूणे - श्री.संजय गोविलकर (पोलिस इंन्स्पेक्टर, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते तसेच 'स्टॉपवॉच' व 'मित्राची गुंतवणुक' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक)

 - ४ एप्रिल २०१० - प्रमुख वक्ते - श्री. नितीन पोतदार (सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर)
- १० सप्टेंबर - प्रमुख पाहूणे व मुलाखत :- श्री. रविंद्र प्रभुदेसाई (एम.डी., पितांबरी प्रॉडक्टस प्रा.लि.)
 - २ डिसेंबर २०१० - प्रमुख पाहूणे व मुलाखत - श्री. वाय.एम.देवस्थळी (CFO, Whole-Time Director, L&T Limited)
 बॉर्न टू विन २०११ मध्ये म्हणजेच आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या तीन वर्षातील बॉर्न टू विनचा प्रवास व प्रगती आपण सर्वांनीच पाहीलेली आहे. व आपल्या सदीच्छांमुळेच आम्ही आजपर्यंत जी काही थोडीफार प्रगती केली आहे ती करू शकलो आहोत व २०११ मध्ये देखील आपले स्नेह व सहकार्य आम्हास लाभेल अशी आशा आम्ही बाळगतो.

मित्रांनो, गेल्या तीन वर्षांमध्ये बॉर्न टू विनच्या लक्ष्यवेध या प्रशिक्षणक्रमामध्ये महाराष्ट्रीय उद्योजकांचा सहभाग जास्त प्रमाणात होता व लक्ष्यवेधला महाराष्ट्रीय उद्योजकांमध्ये आपली विश्वसनियता निर्माण करण्यात नक्कीच यश मिळाले आहे. महाराष्ट्रीय उद्योजकांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समजुती व त्यांना सततचे हवे असणारे मार्गदर्शन या गोष्टींना लक्षात घेता,  बॉर्न टू विन २०११ ची सुरवात एका अश्या कार्यक्रमाने करणार आहे, जो  महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी अतिशय प्रेरणादायी व मार्गदर्शक असेल. या कार्यक्रमाचे नाव आहे THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR या कार्यक्रमाच्या मदतीने उद्योजकाला आपला उद्योग, यशस्वी व्यवसायात रुपांतर करण्याबाबतचे मार्गदर्शन लाभेल.

या प्रभावशाली कार्यक्रमामध्ये आपणास खालिल गोष्टींचे स्पष्टीकरण होईल:-
  • का बहूतांश व्यवसाय यशस्वी होत नाहीत व त्या बाबतीत काय केले पाहीजे?
  • यशस्वी उद्योजक काय असे जाणतो जे अयशस्वी उद्योजकाला माहीत नसते?
  • सर्वसामान्य उद्योजक असामान्य यश कसे मिळवू शकतो?
  • प्रत्येक यशस्वी उद्योजकाकडे कोणते स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे?
  • व्यावसायिक दृष्टीकोन म्हणजे काय?
  • सर्वसाधारण उद्योजकाची सर्वात मोठी गैरसमजुत कोणती असते?
  • उत्कृष्ट व्यवसाय उभारण्यासाठी व्यवसायाला कोणत्या टप्प्यांमधुन जावे लागते?
  • व्यवसायाच्या आत काम करण्यापेक्षा व्यवसाय उभारणी करण्यासाठी कश्या प्रकारे काम करावे?
  • व्यवसाय विकास प्रक्रियेचा वापर करुन, व्यवसायाचे आदर्श व्यवसायात रुपांतर कसे करावे?
  • परिणामकारक उद्योजकीय वृत्ती योजना म्हणजे काय?
  • बॉर्न टू विन चा २०११ मधील महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बद्दल देखिल आपणास या कार्यक्रमामध्ये माहीती मिळेल.
THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR

वक्ते: अतुल राजोळी
दिनांक: ९ जानेवारी २०११
वेळः सायंकाळी ६ ते ९
स्थळः हॉल ऑफ कल्चर, नेहरु सेंटर, वरळी
गुंतवणुकः रुपये ५००/- फक्त (लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थ्यांसाठी विनामुल्य)
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


सुरु होणारे नवीन वर्ष २०११ आणि त्यातला प्रत्येक दिवस आपणा सर्वांना अमाप समृध्दी व भरभराटीचा जावो!
नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!

- टिम बॉर्न टू विन

13 December 2010

देवस्थळी स॑रांचे मौल्यवान मर्गदर्शन - Thank You So Much Sir!

 देवस्थळी स॑रांचे मौल्यवान मर्गदर्शन - Thank You So Much Sir!

 २ डिसेंबर रोजी लक्ष्यसिध्दी सोहळा माटूंगा येथील कर्नाटक संघ हॉल मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते लार्सन अ‍ॅंड टुर्बोचे सी. एफ. ओ. व संचालक श्री. वाय. एम. देवस्थळी सर व त्यांची प्रकट मुलाखत. अतिशय उच्च पदावर कार्यरत असलेले देवस्थळी सर तेवढेच Down to Earth आहेत हे प्रकर्षाने जाणवले. सरांनी उपस्थित प्रेक्षकांबरोबर मनमोकळे पणाने संवाद साधला. उपस्थित प्रेक्षकांसाठी ही एक प्रकारची सुवर्णसंधीच होती, आजपर्यंत ज्या व्यक्तीला CNBC, NDTV, ETV NOW अश्या TV Channels वर पाहीले होते व वर्तमानत्रातुन वाचले होते अश्या व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात डोकावण्याची व त्यांच्या यशाचे रहस्य जाणुन घेण्याची एक उत्तम संधी सगळ्यांना लाभली होती.

सरांनी बरच काही सांगितलं व त्यातुन बरच काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्या मुलाखती दरम्यान मला जाणवलेले काही महत्वाचे मुद्दे मी खाली मांडत आहे.

१. एखाद्या संस्थेला जर विकसित करायचे असेल तर त्या संस्थेचे कार्य काही मुल्यांवर (Values) अवलंबुन असणे गरजेचे आहे. हि मुल्ये (Values) संस्थेच्या प्रत्येक सदस्यामध्ये मुरली गेली पाहीजेत. मुल्ये जपण्यासाठी जाणिवपुर्वकरित्या व सातत्याने प्रयत्न केले पाहीजेत.

२. आपण स्वतःला एक महत्वाची सवय लावून घेतली पाहीजे, ती म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय! आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर प्रामाणिकपणे कबुल करणे कि आपल्याला माहीत नाही आहे व ते माहीती करुन घेण्यासाठी ज्या व्यक्तीला माहीती आहे त्या व्यक्तीला प्रश्न विचारणे. यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. परंतु बहुतांश माणसे प्रश्न विचारण्यास धजावत नाहीत कारण त्यांना असे वाटते कि आपण जर प्रश्न विचारला तर इतरांना असे वाटेल कि, आपण मुर्ख आहोत. जर आपणास कोणी, "काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोस?" असे जरी म्हंटले तरी त्याचा अर्थ असा होतो कि, ज्याला आपण प्रश्न विचारला आहे, त्याला त्याच्या ज्ञानाबाबत गर्व आहे. आपण मात्र जो पर्यंत उत्तर मिळत नाही तो पर्यंत आपण प्रश्न विचारणे थांबवायचे नाही.

३. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काही चांगलं बोलायचं असेल तर आपण त्याबद्दल दहा वाक्यं बोलली पाहीजेत आणि जर वाईट बोलायचं असेल तर एक वाक्य बोलुन थांबलं पाहिजे.
बोरीवली पश्चिम येथिल गोडवा या मराठमोळ्या फुड सेंटरचे राजेश व गितांजली शिंदे त्यांच्या उल्लेखनिय कामगिरी बद्द्ल पुरस्कार स्विकारताना


४. यशस्वी होण्यासाठी माणसाकडे बरेच गुणधर्म असणे गरजेचे आहे, परंतु त्यातल्या त्या तीन सर्वात महत्वाचे गुणधर्म...

- सकारात्मक विचारः नेहमी चांगला विचार करणे. नकारात्मक विचार व भावना आपल्याला कृती करण्यापासुन दुर ठेवतात. आपण सदैव प्रयत्न केला पाहीजे कि आपण चांगला व सकारात्मक विचार करत आहोत.

- ध्येय: आपल्याकडे एक ध्येय असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला अनुसरुन नेहमी काही ना काही कृती करत राहीले पाहीजे. निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न करत राहीले पाहीजे. प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेलचं असं नाही! परंतु सातत्याने (Consistency) व कल्पना शक्तिचा (Innovation) वापर करुन आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास कायम ठेवला पाहीजे.

- 'आय कॅन' म्हणजेच मी हे करु शकतो: आपल्याकडे कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. जगात अशक्य असे काहीच नाही. आत्मविश्वासाशिवाय यशस्वी होणे मात्र अशक्य आहे!

५. आपण आपल्या आयुष्यभरामध्ये जर काही कमवतो तर ती म्हणजे माणसं. माणसं जोडायला आपण शिकलं पाहीजे. उत्तुंग यश मिळविणे हे काही एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी भरपुर माणसांची साथ आपल्याला मिळणे आवश्यक आहे.

६. कोणत्याही उद्योजकाकडे रिस्क टेकिंग अ‍ॅबिलीटी (Risk Taking Ability) असणे अत्यंत गरजेचे आहे. जर उद्योजकाने रिस्क घेणे थांबविले तर, त्याची प्रगती होणे कठीण होउन बसते.

७. उद्योजकाच्या औद्योगिक विकासासाठी त्याने त्याच्या संस्थेमध्ये यंत्रणा (System) निर्माण करण्यावर भर दिला पाहीजे व ऑर्गनाझेशनल डेव्हलपमेंट (Organizational Development) करण्यावर भर दिला पाहीजे. व्यवसायाचे भव्य स्वप्न (Vision) पाहीले पाहीजे.

८. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्यांना आपला प्रवास यशस्वी करायाचा आहे त्यांनी सुध्दा आधी ठरवले पाहीजे कि आपल्याला कोणत्या पातळी पर्यंत पोहोचायचे आहे. वाट्टेल तेवढे कष्ट करुन तिकडे पोहोचण्याचा अतोनात प्रयत्न केला पाहीजे. मग यश हमखास मिळेलच.


मित्रांनो, माझ्यासाठी श्री. देवस्थळी सरांची मुलाखत घेणे, अतिशय Challenging होते. माझ्यामते माझ्या प्रयत्नांना थोड्याफार प्रमाणात का होईना, नक्कीच यश मिळाले. त्याचे संपूर्ण श्रेय बॉर्न टू विन ची टिम व आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जाते!

आपणा सर्वांचे मनापासुन आभार.

धन्यवाद!

आपला विश्वासु
अतुल राजोळी
बॉर्न टू विन

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites