लक्ष्यवेध FOUNDATION ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

लक्ष्यवेध FOUNDATION


आपली संपूर्ण शारीरिक आणि मानसिक शक्ती एकाच गोष्टीवर केंद्रीत करणे ही यशासाठी लागणारी पहिली अट आहे.

आपल्याला अर्जुनाची ती गोष्ट माहितच आहे. गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विद्या शिकवित होते. त्यांनी 'लक्ष्य' म्हणून एक लाकडी पक्षी झाडाच्या फांदीवर ठेवला आणि शिष्यांना पक्ष्याला बाण मारायला सांगितलं. त्यांनी पहिल्या शिष्याला विचारलं,"तुला काय दिसतंय?" तो म्हणाला, "मला झाड, फांद्या, पानं, आकाश व पक्षी दिसतोय. "द्रोणाचार्यांनी त्या शिष्याला थांबायला सांगितलं. नंतर त्यांनी अर्जुनाला तोच प्रश्न विचारला. अर्जुन म्हणाला, "मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतोय." द्रोणाचार्य म्हणाले, "फार छान, मार बाण!" बाण सरळ गेला आणि पक्ष्याच्या डोळ्यात रुतला.
आपले संपूर्ण बळ आपल्या लक्ष्यावर केंद्रित केल्याशिवाय आपल्याला आपले लक्ष्य गाठता येणार नाही. जेव्हा आपल्याकडे एक आव्हानात्मक 'लक्ष्य' असते तेव्हाच आपल्या संपूर्ण क्षमतेची आपल्याला जाणीव होते. प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे, पण प्रत्येकाला ते कसे मिळवायचे हे माहिती आहेच असे नाही.

"तुम्ही जे आत्तापर्यंत करत होतात तेच पुन्हा कराल, तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत होतं!
आधी कधीच न मिळालेले मिळवण्यासाठी, आधी कधीच न केलेली कृती करावी लागेल!!"

लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचा उद्देशः
अकरा सत्रांच्या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचे लक्ष्य ठरविण्यास मदत करणे व ते साध्य करण्यास उपयोगी असणार्‍या तत्वांचे व कौशल्यांचे परिणामकारक प्रशिक्षण देणे.

लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमातील विषयः

गो - गेटर प्रवृत्ती:
अत्यंत प्रभावशाली तत्व जे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांमध्ये एक जोश निर्माण करते व आपल्या आयुष्याची, भावनांची व वागणूकीची जबाबदारी घेण्यास शिकवते.
___________________________________________________________________

ध्येय निश्चिती:
धनुर्धार्‍याला बाण सोडण्याकरिता एक लक्ष्य लागते. त्याच प्रमाणे आपल्या मानसिक व शारीरिक क्षमतांचा प्रभावी वापर करण्यासाठी सुध्दा एका स्पष्ट व आव्हानात्मक ध्येयाची गरज असते. या तत्वाचा वापर करुन प्रशिक्षणार्थ्याला आपले ध्येय ठरविता येते.
___________________________________________________________________

ध्येय सिध्दीचा सिध्दांत:
नुसते ध्येय ठरवून काही होत नाही, ते साध्य करण्यासाठी विशिष्ट पध्दतीने कृती करणे आवश्यक आहे. परंतु प्रत्येकाला ते कौशल्य अवगत असतेच असे नाही. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान ही पध्दत प्रशिक्षणार्थी आकलन करतो व ध्येय सिध्दीच्या दिशेने पाउलं उचलतो.
___________________________________________________________________

टाईम मॅनेजमेंट:
जगात सर्व लोकांकडे समान असणारे अतिशय महत्वाचे साधन म्हणजे वेळ. प्रत्येकाकडे दिवसाचे २४ तास आहेत व दिवसाच्या २४ तासांचा प्रभावीपणे वापर करणे हिच खरी कसोटी असते. लक्ष्यवेध मध्ये प्रशिक्षणार्थी "लक्ष्यवेध  मॅनेजमेंट टूल" चा वापर करुन वेळेचे नियोजन करायला शिकतो.__________________________________________________________________

कॉल फॉर चेंज:
जगात एकमेव गोष्ट जी सदैव कायम राहते ती म्हणजे बदल. आपले लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत. या तत्वाच्या मदतीने प्रशिक्षणार्थी आपल्या विचारांमध्ये, कामामध्ये, सवयींमध्ये व बाह्यरुपामध्ये आवश्यक बदल घडवून आणतो.
_________________________________________________________________
 

फोकस:
फोकस म्हणजेच आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व साधनं एकच स्पष्ट ध्येय साध्य करण्यासाठी केंद्रित करणे. फोकस शिवाय आपली क्षमता विखुरली जाते. या तत्वाचा व काही आधुनिक टूल्सचा वापर करून प्रशिक्षणार्थी आपल्या लक्ष्यावर आपल्याकडील सर्व साधने केंद्रित करतो.
_________________________________________________________________

मानवी स्नेहसंबंध:
आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा परिणामकारक घटक म्हणजे मानवी स्नेहसंबंध. आपणा सर्वांनाच आपल्या वैयक्तीक व प्रोफेशनल जीवनातील व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पाडायला आवडेल. या तत्वाचा वापर करून प्रशिक्षणार्थी आपल्या मानवी स्नेहसंबंधाना जोपासण्यास शिकतो.________________________________________________________________

गो-गीवर प्रवृत्ती:
उत्तुंग यशाचं रहस्य सांगणारी ही अत्यंत प्रभावशाली प्रवृती. जी आपल्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये अमर्याद यश मिळविण्यासाठी प्रशिक्षणार्थ्याला यशाचे पाच नियम शिकविते.

_______________________________________________________________

लक बाय चांस:
आपण आपले स्वतःचे भाग्य स्वतः लिहू शकतो का? आपण यशस्वी माणसांना भाग्यवान म्हणतो, पण त्यांच्या यशामागील कारणे त्यांचे भाग्य असते की काही वेगळे? हेच या तत्वाचे मर्म आहे.

_______________________________________________________________

लक्ष्यसिद्धी सोहळा:
प्रशिक्षणक्रमाचे शेवटचे सत्र, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना सर्टीफिकेट दिले जाते व यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना लक्ष्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
_______________________________________________________________लक्ष्यवेध कार्यक्रम नक्की काय आहे ?

लक्ष्यवेध, अकरा आठवड्यांचा एक असा प्रवास आहे, जो तुम्हाला तुमचे लक्ष्य ठरविण्यासच नव्हे, तर ते साध्य देखिल करण्यास प्रभावशाली मार्गदर्शन करेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे लक्ष्य साध्य करण्यास उपयोगी असणार्‍या तत्वांचे व कौशल्यांचे परिणामकारक प्रशिक्षण दिले जाते. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचे दर आठवड्याला दोन तासाचे एक सत्र, अशी एकूण ११ सत्रे घेण्यात येतात. प्रत्येक सत्रात शिकवलेली तत्वे व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना कृतीमय गृहपाठ दिला जातो, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रांचा समावेश असतो. गृहपाठ पूर्ण करण्यासाठी  Follow-up दिला जातो.
लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रम हा दोन भागांमध्ये विभागलेला असून, प्रशिक्षणक्रमातील पुर्वार्धात प्रशिक्षणार्थी त्याचं लक्ष्य ठरवतो व ते साध्य करण्यासाठी आराखडा तयार करतो, व प्रशिक्षणक्रमातील उत्तरार्धात प्रशिक्षणार्थी त्याच्या दूरगामी लक्ष्याशी निगडीत एक आव्हानात्मक लक्ष्य एका महिन्यात साध्य करण्यास पेटून उठतो. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाच्या ११ आठवड्यांच्या प्रवासात प्रशिक्षणार्थी लक्ष सिध्दीच्या सहा महत्त्वाच्या पायर्‍या चढत जातो.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites