November 2013 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

22 November 2013

उद्योगक्षेत्र व साहित्यक्षेत्र यांचे नेटवर्किंग

मित्रांनो आपणास कळविण्यात अत्यंत आंनंद होतोय की १० नोव्हेंबर २०१३ ला लक्ष्यवेध ची १७ वी बॅच यशस्वीपणे पार पडली व १७ वा लक्ष्यसिद्धी सोहळा ११ नोव्हेंबर २०१३ ला कर्नाटक संघ हॉल, माटुंगा (प.) येथे दणक्यात संपन्न झाला.
या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते, सुप्रसिद्ध हेडहंटर श्री. गिरीश टिळक. ते रेझ्युमे मॅनेजमेंट कन्सलटंचे संचालक असून एच. आर. म्हणजे ह्युमन रिसोअर्सेस या क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे.
लक्ष्यसिद्धी सोहळ्यात सुरवातीला यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली. काही प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत यावेळेस व्यक्त केले. या प्रशिक्षणक्रमामुळे किती फायदा झाला ते सांगितले.
यावेळेस बॉर्न टू विनच्या मंचावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बॉर्न टू विनच्या 'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती' या त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक व संस्थेच्या कार्यक्रमांना नेहमीच उपस्थित राहणारे लेखक उदय कुलकर्णी यांच्या टाकसाळ निर्माणपुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक अनिल गवस, ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते जयंत पवार यांच्या उपस्थितीत झोकात पार पडले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना उदय कुलकर्णी म्हणाले, बॉर्न टू विनचे लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी हा जल्लोषाचा दिवस आहे, त्यात पुस्तकाचे प्रकाशन करावे का हा माझ्यासमोर पहिला प्रश्न होता. पण एक तर अतुल राजोळी यांनी त्यांच्या विशाल ह्रदयाचा परिचय देत लगेच हो म्हटले. दुसरे जल्लोषाचा दिवस असला तरी अतुल एका मान्यवर तज्ज्ञांना बोलावून दिवस सार्थकी लागेल याची दक्षता घेतात आणि या प्रकाशन कार्यक्रमातूनही तुम्हाला काही उपयुक्त नक्कीच मिळेल. पण तुमचा थोडा वेळ घेत असल्याने तुमचे आणि प्रमुख पाहुणे गिरीश टिळक यांचे आधी आभार मानतो. पुस्तकाविषयी जे बोलायचे आहे, ते मागे पडद्यावर आहेच. ही माझी स्वत:ची कथा आहे आणि केवळ इतका छोटा मजकूर वाचून ही त्यांची कहाणी सांगणारे अनेकजण मला मिळाले. ही खडबडून जागे करणारी कहाणी आहे. तसेच वसंत नरहर फेणे यांच्या साहित्याचा मी चाहता आहे व हे पुस्तक मी त्यांना कृतज्ञतापूर्वक व आदरपूर्वक अर्पण करत आहे. यानंतर अनिल गवस व वसंत नरहर फेणे यांचेही छोटे भाषण झाले. यानंतर अतुल राजोळींनी या सत्राचा समारोप केला.
दुसर्‍या सत्रात प्रमुख पाहुणे श्री. गिरीश टिळक यांचे 'बिझनेस नेटवर्किंग' या विषयावर मार्गदर्शनपर भाषण झाले. निरिक्षण, ऐकणे (ऑबझर्व्ह, लिसन) हे नेटवर्किंगसाठी आवश्यक गुण आहेत. बहुश्रुत असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळातील हळदी-कुंकू म्हणजे स्त्रियांसाठी नेटवर्किंगचाच प्रकार होता. पुढे जातानाही आपल्या मुळांचे भान हवे असे अनेक मुद्दे टिळकांनी सांगितले. कोणत्याही व्यवसायाच्या वृद्धीसाठी व यशासाठी नेट्वर्किंग हे अत्यंत महत्वाचेअसते. उपस्थितांना या विषयावर खूप गहन व उत्कृष्ठ मार्गदर्शन सरांकडून मिळले.
साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांमुळे हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. खुद्द या मान्यवरांसाठी हा सोहळा अनोखा होता याची पावती म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक अनिल गवस याप्रसंगी म्हणाले, या कार्यक्रमात येऊन बॉर्न टू विन या संस्थेचा आणि एका नव्या क्षेत्राचा त्यांना परिचय झाला ही आनंदाची बाब आहे.
अश्या प्रकारे हा सोहळा अत्यंत जोशात आणि जल्लोषात साजरा झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण बॉर्न टू विन परिवार आपला मन:पूर्वक आभारी आहे.
धन्यवाद.

02 November 2013

सतरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: 'बिझनेस नेटवर्किंग'

सतरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: ‘बिझनेस नेटवर्किंग’
नमस्कार!
मित्रांनो बॉर्न टू विन च्या संपूर्ण परिवारातर्फे आपल्या सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष बॉर्न टू विन च्या परिवारासाठी आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादाने खूपच छान व चांगल्या बातम्या देणारं ठरलं. येणाऱ्या वर्षासाठी तुमचे आशिर्वाद असेच आमच्या पाठीशी असुदेत हीच इच्छा. हे वर्ष सुरु झाल्यापासून बऱ्याच घडामोडी बॉर्न टू विन च्या परिवारात झाल्या. आज आपण आपल्या नवीन ऑफिस मध्ये गेले ३ महिने काम करतोय व नवीन ऑफिस जणू नवीन उत्साह आणि नवचैतन्यच घेऊन आलय. नवीन ऑफिस मध्ये येण हे खरच खूप भाग्याच ठरलय.

मित्रांनो २४ ऑक्टोबर २०१३ ला आपणा सर्वांच्या आग्रहास्तव आपण दुसऱ्यांदा 'विश्वास निर्मिती वेगवान प्रगती' हि कार्यशाळा कर्नाटक संघ हॉल, माटुंगा (प.) येथे घेतली. आपल्या हाउसफुल प्रतिसादात ती यशस्वीपणे पार पडली. तसेच २७ ऑक्टोबर २०१३ ला एन. एल. पी. ची ९ वी बॅच देखील यशस्वीपणे पूर्ण झाली व त्यांचा पदवीदान सोहळा रचना संसद कॉलेज, प्रभादेवी येथे यशस्वीपणे पार पडला.

सध्या लक्ष्यवेधची १७ वी बॅच शेवटच्या टप्प्यात आहे व १० नोव्हेंबर २०१३ ला यशस्वीपणे पूर्ण होत आहे. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी जबरदस्त सुरु आहे व आता सर्वांना ओढ लागलीय ती १७ व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची. मित्रांनो आपला आगामी लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडणार आहे ११ नोव्हेंबर २०१३ रोजी, कर्नाटक संघ हॉल, माटुंगा (प.) येथे संध्याकाळी ६ वाजता.
मित्रांनो नेहमीप्रमाणेच या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक! लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या आपल्या या प्रवासात अजून एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे आणि तो म्हणजे या वेळी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे! या वेळचे आपले प्रमुख पाहुणे असणार आहेत सुप्रसिद्ध हेडहंटर श्री. गिरीष टिळक सर. Director, Resume Management Consultants Pvt. Ltd.

श्री. गिरीष टिळक सरांविषयी थोडसं:
श्री. गिरीष टिळक सर हे Materials Management (साधन व्यवस्थापन) विषयातील तज्ञ आहेत. व्यापारी क्षेत्रातील हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Centaur Hotel), UTV  Ltd  बोहरींगर म्यानहेम लिमिटेड, Sigma Laboratories या सारख्या विविध कंपन्यांमधील १५ वर्षांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कार्यानुभव संपादन केला आहे.
काहीतरी वेगळ करण्याच्या आंतरिक ओढीमुळे १९९५ साली सर Resume Management Consultants Pvt. Ltd. या कंपनी मध्ये एक भागीदार म्हणून सामील झाले.
आज रेझ्युमे हि एक एच. आर. कन्सलटन्सीफर्म म्हणून प्रस्थापित आणि प्रसिद्ध असून ठाणे येथे  मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीच्या सहयोगी संस्थेचे जाळे संपूर्ण देशभर पसरलेले आहे. अधिकार पदासाठी पात्र व्यक्तींचा शोध घेणे, स्वतंत्र काम करणारे मनुष्यबळ उपलब्ध करणे, प्रशिक्षण आणि कार्य कौशल्य-विकास संबंधित क्षेत्रातील योग्य मोबद्ल्याविषयीचे सर्वेक्षण करणे, व्यवसाय क्षेत्राचे सर्वेक्षण करणे या सारख्या सेवा या संस्थेतर्फे पुरविल्या जातात. त्याचबरोबर श्री. गिरीष टिळक सर यांनी संपूर्ण देशभर प्रवास करून अधिकारपदासाठीच्या पात्र व्यक्तींचा शोध घेतला आहे.
Saturday Club Global Trust च्या सचिव पदाची जबाबदारी सरांनी दोन वर्षे समर्थपणे सांभाळली. Saturday Club तर्फे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषद- २००६ व २००७, Saturday  Club, डोंबिवली विभाग परिषद- फेब्रुवारी २००९ तसेच एस. एम. इ. कन्व्हर्ज २००९, आणि "उद्योग बोध" या जानेवारी २०१० मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यवस्थापन समितीचे ते एक सक्रिय कार्यकर्ते  होते.
सध्या हेडहंटर ह्या त्यांच्या सुपर हिट पुस्तकाची तिसरी आवृत्ती बाजारात आहे. या पुस्तकाला संगमनेर इतिहास संशोधन मंडळ, संगमनेर कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
सप्टेंबर २०१२ मध्ये श्री. गिरीष टिळक यांना चित्तपावन उद्योगमंच, मुंबई यांचे उद्योगश्री पुरस्कार २०१२ मिळाले आहे.
ते स्वतः एक उत्तम वक्ता आहेत. 'बिझनेस नेटवर्किंग' या विषयावर सरांच आपल्याला अमुल्य असं मार्गदर्शन मिळणार आहे.

अशा या स्फुर्तीदायक कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहा

सतरावा लक्ष्यसिद्धी सोहळा
विषय: 'बिझनेस नेटवर्किंग'
दिनांक: ११ नोव्हेंबर २०१३
वेळः ठिक संध्याकाळी ६ वाजता
स्थळः कर्नाटक संघ हॉलऑफ टीएचकटारीया मार्गमाटुंगा (.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५///७६६६४२६६५४९६१९४६५६८९

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites