नमस्कार!
६ ऑगस्ट २०१० हा दिवस बॉर्न टू विन साठी अभुतपुर्व असा ठरला. बॉर्न टू विनचा महत्वाकांक्षी कार्यक्रम THE SUCCESS BLUEPRINT प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिर (मोठे सभागृह) येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची वेळ सकाळी दहा वाजताची जरी असली, तरी सकाळी साडे आठ वाजल्यापासुन लोकांची वर्दळ सुरु झालेली होती. आम्ही Expect करत होतो की ४५० ते ५०० लोकं ह्या कार्यक्रमाला उपस्थित रहातील. कारण बॉर्न टू विनचा अशा पध्दतीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा हा पहीलाच प्रयत्न होता. त्यात ६ ऑगस्ट हा दिवस Odd Working Day होता व कार्यक्रमाची वेळ सकाळची होती. नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत रविंद्र नाट्य मंदिरच्या सभागॄहा बाहेर भली मोठी रांग लागलेली होती. एवढी माणसे Odd Working Day च्या सकाळी पाहुन रविंद्र नाट्य मंदिरचे कर्मचारी देखील चकीत झालेले होते. त्यांच्या मते "शनिवार व रविवार शिवाय इतर दिवशी सकाळच्या वेळेला फक्त 'मराठी बाणा' व 'सही रे सही' या कार्यक्रमांनाच होते!" हे विधान आम्हाला सर्वांनाच प्रोत्साहित करणारे होते. THE SUCCESS BLUEPRINT कार्यक्रम ७५० ते ८०० लोकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. त्या बद्दल सर्व प्रेक्षकांचे बॉर्न टू विनची संपुर्ण टिम मनापासून आभरी आहे.
परंतु इकडे मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगु इच्छितो कि, हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्हाला फ्युचर पाठशाला व लक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची प्रचंड मदत झाली वर्तमानपत्रांमध्ये पहील्या पानांवर मोठ्या - मोठ्या जाहीराती न देता अश्या प्रकारचा असाधारण प्रतिसाद म्हणजे बॉर्न टू विनच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रेमाची पोच पावतीच म्हणावी लागेल. बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांचे निस्वार्थ हेतूने आम्हाला मदत करणे हे त्यांचे प्रेम नाही तर आणखी काय आहे? मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार.
त्याच प्रमाणे मला खास कौतुक करावेसे वाटते, ते म्हणजे बॉर्न टू विनच्या टिमचे! हो मित्रांनो THE SUCCESS BLUEPRINT कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यामागे जर सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो माझ्या टिमचा! त्यांच्या अहोरात्र मेहनतीचे फळ आम्हाला ६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसादाच्या रुपात मिळाले. मी स्वतःला अतिभाग्यशाली समजतो कि मला अश्या उत्कृष्ट संघाचा एक भाग म्हणुन काम करण्यास संधी मिळत आहे व हा अनुभव सुंदर आहे.
विशेष आभारः THE SUCCESS BLUEPRINT कार्यक्रमाचे सहप्रायोजक NAVNEET PUBLICATIONS.
जाता जाता एवढच म्हणेण ...
काम करो ऐसा कि, पेहचान बन जाए...
हर कदम ऐसा चलो कि, एक निशान बन जाए!
यहा जिंदगी तो सभी काट लेते है...
जिंदगी ऐसे जियो कि, एक मिसाल बन जाए!
धन्यवाद ...
अतुल रजोळी
बॉर्न टू विन
Note:- आपण आपल्या प्रतिक्रीया, या पानावर आपल्या डाव्या हाताला असलेल्या Comments सेक्शन मध्ये Type करुन कळवू शकता.