June 2012 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

22 June 2012

एक स्वप्नपूर्ती सोहळा

नमस्कार! मित्रांनो आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की, २७ मे रोजीचा फ्युचर पाठशाला जोश २०१२ कार्यक्रम अतिशय जोशात पार पडला. एकूण अडीच हजार पेक्षा जास्त उपस्थितांच्या उस्फुर्त प्रतिसाद जवळ जवळ २०० विद्यार्थ्यांनी आपले धमाकेदार कार्यक्रम सादर केले. 
फ्युचर पाठशाला जोश २०१२ कार्यक्रमात बॉर्न टू विन चे संचालक अतुल राजोळी यांचे  पहिले  पुस्तक 'माझा मोटिव्हेटर मित्र' हे पुस्तक प्रकाशित झाले. ह्या पुस्तकाला देखील वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे व पुस्तक प्रकाशन झाल्या पासून १००० पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत . पुस्तक प्रकाशनाचे झी २४ तास वाहिनी ने केलेले प्रक्षेपण आपण खाली पाहू शकता.


फ्युचर पाठशाला जोश २०१२ ची काही क्षणचित्रे:












मित्रांनो बॉर्न टू विनच्या फ्युचर पाठशाला २०१२ या धमाकेदार कार्यक्रमानंतर बॉर्न टू विन आपल्या समोर घेऊन येत आहे THE SUCCESS BLUEPRINT WORKSHOP. 
हो मित्रांनो, दिनांक  ४ जुलै २०१२ रोजी दादर, प्रभादेवी येथील  रवींद्र नाट्य मंदिर येथे दुपारी ३ ते रात्री ९:३० वाजे पर्यंत हा जबरदस्त, प्रेरणादायी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असणार आहेत,  बॉर्न टू विन संचालक  तुल राजोळी.

या कार्यक्रमाचा प्रेरणादायी विडीयो पहा:


या कार्यशाळेची माहीती खालिल प्रमाणे आहे:

आपल्याला आयुष्यात जे हवे आहे ते मिळवा!

एक अद्वितीय कार्यशाळा

आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद प्राप्तीसाठी... 


यशस्वी होण्यासाठी आवश्यक सूत्रे सहा तासांच्या कार्यशाळेमध्ये जाणून घ्या व आपल्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणा!

सहा तासांचा प्रेरणादायी कार्यक्रम जो आपल्याला कमीतकमी परिश्रमांमध्ये व कालावधीमध्ये जास्तीतजास्त्त यश मिळविण्यास मदत करेल.

या कार्यशाळेमध्ये अतुल राजोळी त्यांच्या खास शैलीत आपल्या आयुष्यात अमुलाग्र असे बदल घडवून आणण्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी तंत्र व मंत्र शिकवतील. ज्यांच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यात सर्व उद्दिष्टे साध्य करुन, उत्तुंग यशप्राप्ती करु शकाल व परिणाम स्वरुपी आपल्या आयुष्याचा दर्जा निश्र्चितच उंचावेल.

अतुल राजोळी यांनी खास या कार्यशाळेसाठी अतिशय चोखंदळपणे काही शक्तिशाली तत्वे निवडलेली आहेत जी आपल्याला आपल्या भावी जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, परिणामकारक निर्णय क्षमता व प्रखर उर्जा निर्माण करेल. या तत्त्वांच्या मदतीने आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने वेगवान प्रगती कराल.

ही सर्व पायाभूत तत्त्वे असून कोणत्याही वयाच्या व्यक्तिला आपले वैयक्तिक, व्यावसायिक अथवा शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. तसेच, ही सर्व तत्त्वे नैसर्गिक आहेत व कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तिसाठी अतिमहत्त्वाची अशी आहेत.

वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, व्यावसायिक उद्दिष्टे किंवा शैक्षणिक प्रगती... तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी व तुम्हाला जे हवे ते साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच मदत करेल.

या कार्यशाळेमध्ये आपण काय शिकाल?
-----------------------------------------------------------------------------------------
हमखास यशाचा फॉर्म्युला
-----------------------------------------------------------------------------------------
आपल्याला जे हवे आहे ते कसे मिळवावे?
-----------------------------------------------------------------------------------------
आपल्याकडील अगाध सामर्थ्य
-----------------------------------------------------------------------------------------
यश आकर्षित करण्याचे अदभुत रहस्य
-----------------------------------------------------------------------------------------
आपल्या कृतीवर ताबा ठेवणारी अविश्वसनिय ताकद
-----------------------------------------------------------------------------------------
यशाची गुरुकिल्ली
-----------------------------------------------------------------------------------------

दिनांक : बुधवार, ४ जुलै २०१२

वेळ : दुपारी ठिक ३:०० वाजता

स्थळ : रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर (प.)

गुंतवणुक : रुपये १२००/-, १०००/- , ८००/- व ५००/-


प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्क : ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites