April 2014 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

29 April 2014

एकोणीसावा लक्ष्यसिद्धी सोहळा: 'इडली, ऑर्किड आणि मी'

नमस्कार!
मित्रांनो २०१४ वर्ष सुरु झाल्यापासून बॉर्न टू विनच्या परिवारात नवनविन घडामोडी होत आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासूनच अतिशय समाधानकारक घटना घडल्या. आणि हे सर्व काही शक्य झाले ते तुमच्या सहकार्यामुळे.

मित्रांनो १० एप्रिल २०१४ पासून आपल्या सर्वांचा लाडका विषय 'फ्युचर पाठशाला' सुरु झाला. कर्जत व सँडहर्स्ट रोड येथे यशस्वीरित्या ही कार्यशाळा पूर्ण झाली. सध्या माटुंगा, बोरिवली व नेरुळ येथे बॅचेस सुरु आहेत व मे मध्ये विरार, अंधेरी व कल्याण या ठिकाणी नविन बॅचेस सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा भरभरुन प्रतिसाद या कार्यशाळांना मिळत आहे.

आता लक्ष्यवेधच्या आजी माजी प्रशिक्षणार्थ्यांना वेध लागलेत ते १९ व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे. लक्ष्यवेधची १९ वी बॅच ४ मे ला पूर्ण होत आहे व ९ मे २०१४ ला संध्याकाळी ठीक ६ वाजता कर्नाटक संघ हॉल, माटुंगा (प.) येथे १९ वा लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडत आहे.

१९ व्या बॅचच्या प्रशिक्षणर्थ्यांची कामगिरी तर जबरदस्त आहे त्यांना त्याचे रिझल्ट्स देखिल खुप छान मिळत अहेत. सर्वांच्या उत्साहाचा विषय म्हणजे लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक कोण?

मित्रांनो संपूर्ण बॉर्न टू विन च्या परिवारास आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे की १९ व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक असणार आहेत. The One And Only कामत ग्रुप ऑफ हॉटेल्सचे चेअरमन डॉ. विठ्ठल कामत सर. लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या प्रवासातला हा एक मानाचा तुरा आहे.

त्यांच्या खास शैलीत ते त्यांच्या अतिशय प्रेरणादायी असा जीवनप्रवास आपल्या समोर उलगडणार आहेत. हे एक खुपच प्रेरणादायी, प्रचंड उत्साही, प्रचंड हुषार असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून प्रचंड ज्ञान मिळेल. अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतुन मोठ्या अडचणीतुन जाऊन त्यांनी आशियातील पहिले व जगातील बेस्ट इकोटेल हॉटेल THE ORCHID ची निर्मिती केली. त्यांचा संपुर्ण जीवन प्रवास हा थरारक असा अनुभव देणारा आहे. असा हा याची देही याची डोळा कार्यक्रम आपल्याला पहायला मिळणार आहे. 'इडली, ऑर्किड आणि मी' या विषयावर ते त्यांचा थरारक असा जीवनपट त्यांच्या भाषणातुन उलगडणार आहेत.

डॉ. विठ्ठल कामत सरांविषयी थोडेसे:
. डॉ. विठ्ठल कामत सरांनी जाधवगड या पहिल्या म्युझियम हॉटेलची निर्मिती केली.
. सरांना ग्रीन होटेलीयर म्हणुन ओळखले जातात, तसेच ते पर्यावरणवादी, पुरातनवादी, शिक्षणतज्ञ व पक्षीवैज्ञानिक आहेत.
. पर्यावरणवादी असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत ६० लाख झाडांच वनरोपण केलं आहे. तसेचं त्यांनी पहिलं फुलपाखरु बगीचा निर्माण केला.
सरांनी 'इडली, ऑर्किड आणि मी' व 'उद्योजक होणारच मी' ही दोन सुपरहिट पुस्तके लिहीली आहेत. ही पुस्तके आतापर्यंत ९ भाषांमध्ये प्रकाशीत झाली.
. सरांचा मंत्र एकच Reduce, Reuse व Recycle
. सरांना आत्तापर्यंत १९३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झालाच तर, इंडियन एक्सप्रेस तर्फे Best CEO of Industry Award, दलाई लामा यांच्या हस्ते Golden Peacock Award आणि जर्मनी, बर्लिन येथे Life Time Achievement Award मिळालेत.
. सर हे Maharashtra Economic Development Council चे अध्यक्ष आहेत. तसेच Hotel व Restaurant Association of Western India चे Vice President आहेत.

'इडली, ऑर्किड आणि मी' या विषयावर सरांच आपल्याला अमुल्य असं मार्गदर्शन मिळणार आहे.

अशा या स्फुर्तीदायक कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहा

एकोणीसावा लक्ष्यसिद्धी सोहळा
विषयः 'इडली, ऑर्किड आणि मी'
दिनांकः ९ मे २०१४
वेळः ठिक संध्याकाळी ६ वाजता
स्थळः कर्नाटक संघ हॉलऑफ टीएचकटारीया मार्गमाटुंगा (.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५///७६६६४२६६५४९६१९४६५६८९

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites