April 2016 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

21 April 2016

पुस्तका बाहेरील जग दाखवणारी शाळा

जन्माला आलेलं प्रत्येक मुल हे लिओनार्दो दा विंची अथवा आईनस्टाईन यांच्या इतकेच प्रभावशाली असते. आपणास कदाचीत अविश्वसनिय वाटेल परंतु ही गोष्ट संशोधनाअंती सिद्ध झाली आहे. आपली चुकिची शिक्षणपद्धती, चाकोरीबद्ध विचारशैली त्याच्या वाढीच्या प्राथमिक वर्षात त्याचे केवळ खच्चीकरण करीत असते.




"सारी उम्र हम, मरमरके जी लिये;

एक पल तो अब हमें जीने दो.. जीने दो!

Give me some sunshine, give me some rain!

Give me another chance wanna grow up once again!"

गाजलेल्या 'थ्री इडीयटस्' चित्रपटातील हे गाणं पाहताना आजच्या युवा पिढीच्या दयनीय अवस्थेला अनूभवून जीव कासाविस होतो. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर असलेले प्रचंड दडपण, पालकांच्या अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा, गोंधळात टाकणारी अ‍ॅडमिशन पध्दत, शैक्षणिक संस्थांचे व्यावसायिकीकरण व भविष्याबाबतची अनिश्चितता असे आजचे विदारक चित्र युवा पिढीसमोर खुप मोठे प्रश्नचिंन्ह निर्माण करते. कोवळ्या वयामध्ये ह्या सर्व बाबींना तोंड देण्यासाठी आजची युवा पिढी खरोखरच मानसिक व बौधिकरित्या तेवढी सक्षम आहे का? बहूतेक नाही. गेल्या वर्षभरातील विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता हे आपण मान्य केलेच पाहीजे. खास करुन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व परीक्षेचे एवढे जबरदस्त दडपण निर्माण होते कि ह्या मुलांचे संपुर्ण भविष्य त्यांनी परिक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबुन असते हे गृहीतच धरण्यात येते. ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी भविष्यामध्ये आपले करियर करणार आहे त्याचा निर्णय हा सर्वस्वी त्याने परीक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबून असतो. विद्यार्थ्याची कोणत्या क्षेत्रात आवड आहे? विद्यार्थ्याकडे कोणत्या विषयात योग्यता व कौशल्ये आहेत? त्याची भविष्याबद्दलची संकल्पना काय आहे? विद्यार्थ्याला काय बनायला आवडेल? ह्या प्रश्नांचा बहूतांशपणे विचार केला जात नाही. आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर अथवा इंजिनीयर झालं पाहीजे असा बहूतांश पालकांचा आग्रह असतो. हे कितपत योग्य आहे? खरेतर विद्यार्थ्याला सुध्दा त्याचा स्वतःचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे कोवळ्या वयात सांगणे कठीणच असते, त्याचे कारण म्हणजे माहीतीचा व कौशल्य प्रदान शिक्षणाचा अभाव. रट्टा मारुन कोणत्या क्षेत्रात आपल्याला रस आहे हे कसे कळणार?
हे सगळं आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत, आणि दुर्दैव हे कि आपण सगळे कळत-नकळत या चुकिच्या यंत्रणेचे भाग झालेलो आहोत. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आक्रमक व आमुलाग्र अश्या बदलांची गरज आहे. आपल्याला आपल्या भावी पिढीला मानसिक व बौधिकरित्या सबळ बनवायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाला व मार्कांना महत्त्व न देता त्यांची कौशल्ये व प्रवृत्ती या दोन महत्त्वाच्या अंगांवर काम करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने ७५% पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान शिक्षण जाणिवपुर्वकरित्या पुरवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड्-निवड कळणे कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात करियर निवडण्याबाबतचा गोंधळ नेहमीच जाणवतो.
आजच्या युवा पिढीची ही गरज लक्षात घेता बॉर्न टू विन ने आठ वर्षापुर्वीच 'फ्युचर पाठशाला' ही कार्यशाळा राबवायला सुरुवात केली. उन्हाळी सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना फ्युचर पाठशालाच्या कार्यशाळेद्वारे त्यांचे ध्येय ठरविण्यास मदत करणे, त्यांच्यातील सुप्त शक्तिचा ठाव घेण्यास मदत करणे, त्यांच्यात प्रवृत्तीमय बदल घडवून आणणे व आवश्यक तत्वांचे व कौशल्यांचे परिणामकारक प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतु. फ्युचर पाठशाला प्रशिक्षणक्रमाद्वारे आत्तापर्यंत महाराष्ट्रातून ३५०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षित झाले असुन ह्या उन्हाळी सुट्टीमध्ये देखिल ही कार्यशाळा मुंबईमध्ये दादरमध्ये राबवण्यात येणार आहे.

प्रशिक्षक: अतुल दादा
अधिक माहीतीकरिता संपर्कः 9619465689, 7666426654
About Future Paathshala:





Future PaathShala Testimonials:



Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites