नमस्कार उद्योजक मित्रांनो! आजकाल मार्केटींगचा जमाना आहे. जो दिखता है, वह बिकता है! जो व्यवसाय आपल्या प्रॉडक्टचे जबरदस्त मार्केटींग सातत्याने करत असतो, तो व्यवसाय बाजारपेठेत राज्य करतो. आपण पेप्सी किंवा कोकाकोला नाही जरी प्यायलो तर काही मरणार नाही आहोत तरीही या शितपेयांच्या कंपन्या आज अब्जावधी रुपयांमध्ये उलाढाल करत आहेत. का? कारण आक्रमक व सातत्याने केलेलं मार्केटींग! जगात कोणताही व्यवसाय यशस्वी तेव्हा बनतो जेव्हा त्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक असतात. मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळवण्यासाठी कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक असते परिणामकारक मार्केटींग कृतीयोजना. आपलं प्रॉडक्ट कितीही उत्कृष्ट दर्जाचं जरी असलं तरी जोपर्यंत आपल्या ग्राहक वर्गाला त्याबद्दल सातत्याने व परिणामकारक पध्दतीने आपण सांगत नाही तो पर्यंत त्यांना कसं कळणार? आणि ग्राहक प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी पुढे तरी कसा सरसावेल?
मित्रांनो, बर्याच लघुउद्योजकांशी माझा संबंध येतो. बरेच लघुउद्योजक आपल्या व्यवसायाचे मार्केटींग जाणिवपूर्वकपणे करत नाहीत. त्यांना बहुतांश 'धंदा' हा 'Word of Mouth' व्दारेच मिळत असतो. बर्याच लघुउद्योजकांचा व्यवसाय एकाच कक्षेत फिरत असतो. बर्याच लघुउद्योजकांना मार्केटींग करणे खर्चिक वाटते. मार्केटींग वगैरेच्या ते फंदातच पडत नाहीत. काही प्रमाणात लघुउद्योजक मार्केटींग करतात सुध्दा परंतु त्यांना त्याचा हवा तसा परिणाम साधता येत नाही. कारण मार्केटींग करण्यासाठी ते 'टॅक्टीकली' (Tactically) विचार करतात. उदाहरणार्थ, त्यांचा भर जाहीराती, सेल्स कॉल, वेबसाईट, इ-मेल मार्केटींग, नेटवर्किंग, सोशल मिडीया, व्हीझीटिंग कार्ड, ब्रॉशर इत्यादी वर जास्त असतो. ही सर्व माध्यमे महत्त्वाची जरी असली तरी त्यांचा ' स्ट्रॅटेजिकली' (Strategically) विचार केला जात नाही.
मार्केटींग करताना लघुउद्योजक खालिल ३ गोष्टींचा विचार करायला नकळत विसरतात.
जो व्यवसाय ग्राहकांचा विश्वास संपादन करतो, तो व्यवसाय दुरगामी यश मिळवतो. मार्केटींग करत असताना या बाबीचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे.
प्रत्येक बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा आहे. आपले प्रॉडक्ट व सर्विस मध्ये काहीतरी वेगळेपण असणं अत्यावश्यक आहे आणि ते वेगळेपण आपल्या ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे 'कम्युनिकेट' झालं पाहीजे.
३) आपल्या व्यवसायाबद्दल, प्रॉडक्ट व सर्विसबद्दल ग्राहकांच्या मनात उत्सुकता निर्माण करुन आपण त्यांना संपर्क करण्यापेक्षा तेच आपल्याकडे कसे आकर्षित होतील?
हा एक प्रश्न आपल्या व्यवसायाच्या मार्केटींगची पध्दत बदलु शकतो, आणि आपल्याला हवे तेवढे ग्राहक आपण आकर्षित करु शकतो.
आपल्याला हवे तेवढे ग्राहक आकर्षित करण्यासाठी व प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी, अतुल राजोळी यांची एक दिवसिय कार्यशाळा... 'THE MAGIC OF MAGNETIC MARKETING'.
प्रशिक्षक: अतुल राजोळी
दिनांक: शनिवार, २४ सप्टेंबर २०१६
वेळ: सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६
स्थळ: चाणक्य इन्स्टीट्युट, सेमिनार सभागृह, पहिला मजला, सी. डी. बर्फीवाला मार्ग, अंधेरी (प.)
प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्क: 7666426654, 9619465689