LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

26 October 2018

उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे


उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे

उद्योजकाचे जीवन ही एक अडथळ्यांची शर्यत आहे. पुढे जाण्यासाठी आपल्याला सतत तयार असणे आवश्यक असते. एक चुकीची हालचाल आपल्याला पडण्यासाठी पुरेशी असू शकते. आपण सुपरहिरो नाहीत, म्हणून आपण अनेकदा चुका करतो किंवा चुकीचे वळण घेतो ज्यामुळे आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागते. परंतु अपयश खरोखरच आपल्या स्वप्नांपासुन आपल्याला परावृत्त करते का? जर याचे उत्तर होकारार्थी असेल तर, आपण चुकीचे आहोत.
उद्योजकाच्या जीवनात यशाइतकेच अपयश देखील तितकेच महत्वाचे आहे हे आपण ०७ कारणांद्वारे जाणून घेऊया.
. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
" अपयश हे आपल्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे " - ओप्रा विनफ्रे
अपयश प्राप्त होणे ही घटना सुखद नसते, तरीसुद्धा आपण यशाच्या आणखी एक चरण जवळ जात असतो. कारण अपयशानंतर आपण अधिक जोमाने प्रयत्न करू लागतो. आपण अयशस्वी होतो याचा अर्थ आपण आपल्या ध्येयपूर्तीसाठी नक्कीच काहीतरी हालचाल करतो. या छोट्या गोष्टीही आपल्या उद्योजकीय अनुभवाला अंतर्बाह्य समृद्ध करत असतात, आणि सरतेशेवटी आपल्याला साहाय्यभूत ठरतात. ज्याप्रमाणे आपण धडपडता सायकल शिकू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण अडखळता यशाच्या शिखरावर पोहोचू शकत नाही ठामपणे उभे राहू शकत नाही. म्हणून भव्य यशप्राप्तीसाठी अपयशाची पायरी ओलांडणे महत्वाचे आहे

. जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण काहीतरी शिकतो.

" यश साजरे करणे चांगले आहे, परंतु अपयशाच्या धड्याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे." - बिल गेट्स
अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जाते. कदाचित पहिल्या प्रयत्नात आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत, दुसऱ्या प्रयत्नात देखील आपले उद्दिष्ट सध्या होणार नाही. परंतु जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा नक्कीच आपण त्यातून काहीतरी धडा घेतो. जीवनात अपयशामुळे आपण सहजपणे निराश होतो. बर्याचदा आपण अपयशातून काय शिकलो यापेक्षा काय गमावले यावर लक्ष केंद्रित करून स्वतःला निराशेच्या गर्तेत ढकलतो. त्यापेक्षा आपण "मी अयशस्वी का झालो? " या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्याला निश्चितपणे काही ठोस उत्तरे मिळतील. ज्यामुळे आपल्याला पुढील वेळी अधिक तयारी करता येईल. म्हणजेच,अपयश ही काहीतरी नवीन शिकण्याची दुसरी संधी आहे.

. अपयश आपल्याला निडर बनविते.

"फक्त एकच गोष्ट आहे जी आपले स्वप्न साध्य करणे अशक्य करते ती म्हणजे अयशस्वी होण्याची भीती." पाउलो कोएलो
यश मिळवण्याची सर्वात मोठी अडचण ही अपयशाची भीती आहे. आपण कृती करण्याआधी बराच विचार करतो आणि अपयशाच्या भितीने कृती करण्याचे टाळतो. परंतु, अपयश खरोखर आपल्याला  निडर बनवू शकते. आपल्याला वाटेल हे कसे शक्य आहे? आपण बऱ्याच गोष्टींमध्ये ऐकतो कि आपण नेहमी सकारात्मक विचार करावा. उद्योजक म्हणून आपण आपल्या ध्येयाचा विचार करावा, नकारात्मक विचार करू नयेत. जगप्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रान्सन यांना देखील त्यांच्या जीवनात सात वेळा अपयशाला सामोरे जावे लागले, पण ते आपल्या उद्योजकीय ध्येयापासून बधले नाहीत. त्याऐवजी त्यांनी आपल्या कौशल्यांचे पुनर्वालोकन केले आणि "Where did I miss the X factor? असा विचार करून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपल्या योजना अंमलात आणल्या. एकदा आपण अपयशाची कडू चव चाखल्यावर भिती बाळगता कृती करण्यावर भर दिला पाहिजे.

. अपयश आपल्या अनुभवात मोलाची भर घालतात.

"अपयश अशी गोष्टच अस्तित्वात नाही - ते आहे फक्त अनुभव आणि त्यांचे प्रतिसाद." - टॉम क्रूझ
जेव्हा आपण प्रयत्न करताना अयशस्वी होतो तेव्हा आपण बऱ्याच कटू-गोड अनुभवातून जातो. उद्योजक म्हणून, आपण अपयशाच्या सकारात्मक बाजूकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा आपण अयशस्वी होतो, तेव्हा नेमके काय घडले हे कमीतकमी जाणून घेणे आवश्यक आहे. हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्यावहारिक अनुभव असतो, जो आपण एखाद्या उच्च बिझिनेस स्कुलमधून देखील मिळवू शकत नाही. आपण अयशस्वी होण्याचा अनुभव ही एक मौल्यवान संपत्ती आहे जी भविष्यात आपल्या उद्योजकीय जीवनात मदत करेल. कारण अयशस्वी झाल्यानंतर, नव्याने सुरूवात करताना आपण नेहमीच दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करतो. शिवाय, प्रत्येक समस्येचे निराकरण कसे करावे हे आपण शिकतो. अडथळे आपण संधींच्या दृष्टीकोनातून पाहू लागतो, म्हणून जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा निराश होऊ नका त्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या व्यवसायाच्या योजनेचा चांगली आखणी करा! या मार्गांनी, आपण आपल्या अपयशांना अनुभवाच्या संसाधन स्त्रोतामध्ये बदलू शकतो.

. अपयश आपल्या उद्योजकीय गुणवैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करते.

आपण आपल्या जीवनात प्रत्येक अपयशानंतर अनुभवसमृद्ध होऊन एक चांगला उद्योजक बनतो. आपण अधिकतम उत्पादनक्षमता मिळविण्यासाठी आपल्याकडील उपलब्ध साधनांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करतो. आपण वेळ आणि पैसा यांची ध्येयानुरूप योजनाबद्धरीत्या आखणी करतो. आपण व्यवसायासाठी स्मार्ट मार्गांबद्दल विचार करतो. अशा प्रकारे आपण आपल्या उद्योजकीय मानसिकतेचा क्षमतांचा विकास करतो आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावर आपला प्रवास अव्याहतपणे सुरु राहतो.

. जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण अधिक द्रुढनिश्चयी होतो.


"प्रयत्न केलात. अयशस्वी झालात. काही फरक पडत नाही. पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा आणखी चांगल्या प्रकारे अपयशी व्हा."- सॅम्युएल बेकेट
व्यवसायात अयशस्वी होणे दुःखद आहे. परंतु प्रत्येक वेळी जेव्हा आपलयाला अपयश येते तेव्हा आपण आपल्या व्यावसायिक उद्दिष्टांबद्दल अधिक उत्साही होतो. कारण आपल्याला व्यवसायात अपयश देणाऱ्या विविध बाबींचा वा घटकांचा आपण विचार करून पुढच्या वेळी अधिक जोमाने सज्ज होतो. तुम्हांला माहित आहे का? बिल गेट्स यांनी खूप आधी ट्रॅफ--डेटा नावाची एक कंपनी सुरू केली जी दुर्दैवी ठरली. पण त्यातून शिकून त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केलीआणि संगणक क्षेत्रात इतिहास घडवला! म्हणून जेव्हा अपयश येते तेव्हा काळजी करू नका, फक्त कृती करत रहा. कारण कोण जाणे, आपण आपल्या स्वप्नापासून केवळ एकच चरण दूर असू शकतो.

. अपयश आपल्या यशाचा आनंद द्विगुणीत करते.

मी तुम्हांला एक गोष्ट सांगतो ज्यामध्ये कडू अपयश हे भव्य यशाची नांदी ठरले. १९८५ मध्ये उच्चस्तरीय व्यवस्थापन समस्यांमुळे स्टीव्ह जॉब्स यांना आपणच स्थापन केलेल्या कंपनीचा राजीनामा द्यावा लागला. आपणच स्थापन केलेल्या कंपनीपासून दूर राहणे हा त्यांच्यासाठी कठीण निर्णय होता. या कालखंडात त्यांनी बरेच संघर्ष केले आणि Next Computers कंपनीची स्थापना केली, जी अत्यंत यशस्वी झाली. १९९६ साली Next Computers विकत घेतल्यानंतर स्टीव्ह जॉब्स Apple मध्ये परतले. स्टीव्ह जॉब्स जेव्हा पुन्हा रुजू झाले तेव्हा Apple ची वाटचाल दिवाळखोरीच्या दिशेने सुरु होती. परंतु त्यांनी Apple ला त्यांच्या नाविन्यपूर्ण निर्णयांसह पुनरुज्जीवित केले आणि जगातील सर्वात फायदेशीर कंपनीमध्ये रूपांतरित केले. कधी काळी Apple साठी नावडते ठरलेले स्टीव्ह जॉब्स तारणहार ठरले. स्टीव्ह जॉब्स यांचा प्रवास प्रेरणादायी आहे कारण त्यांनी अपयशाचा सामना केला.म्हणूनच यश मिळवण्याच्या आवडीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही प्रथम कडू अपयशाचा सामना जरूर करावा.

  • सुहैल
( अनुवादित )

12 October 2018

देवी दुर्गा आणि उद्योजकीय नेतृत्व !


देवी दुर्गा  आणि उद्योजकीय नेतृत्व !

नमस्कार मित्रांनो,
नवरात्रौत्सवहा आपला सर्वात उत्साही सण आहेदेवी दुर्गा ही आपल्या देशाला एकसंध बांधणारा महत्वाचा दुवा आहे असे आपण म्हणू शकतो कारण नवरात्रोत्सव भारतभर मोठ्या उत्साहात साजराकेला जातोजसेउत्तरेला व्रतउपवास  जागरण केले जातेपश्चिमेकडे गरबा आणि दांडियादक्षिणेला वैविध्यपूर्ण आरास तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उत्सवाच्या स्वरूपात हा सणसाजरा केला जातोदेवी आपल्यामध्ये भक्ती रूपाने चैतन्य निर्माण करतेदेवीची आभाप्रतिमापौराणिक कथा आपल्याला दैनंदिन जीवनात प्रेरित करतात.

देवी दुर्गेचा सर्व शक्तिमान अवतार आपल्याला प्रामुख्याने व्यवस्थपनाचे  धडे देतो.

निडरपणा आणि आंतरिक सामर्थ्य -
दुर्गामूळ शब्द दुर्गमनिर्भयता दर्शवतोसमस्या लहान असो  मोठीप्रतिकूल परिस्थितींमध्ये आपल्याला अतुलनीय आंतरिक शक्ती प्रदान करतेजितके आपण अंतःकरणापासून स्थिर असू तितकेचआपल्याला बाह्यरूपाने खंबीरपणे संकटाना सामोरे जाणे शक्य होतेदेवी दुर्गा वाघावर आरूढ आहेजे निडरतेचे रूपक दर्शवितेम्हणजेच निडर व्यक्ती वाघाप्रमाणे भयंकर समस्यांचा सामना करूशकते  त्यांच्यावर मात करू शकतेव्यवसायात देखील प्रगती साधण्यासाठी आपल्याला अनेक समस्यांना कणखरपणे तोंड द्यावे लागते.




अखंड अष्टावधान -
दुर्गा मातेचे आठ हात हे अष्टावधानतेचे प्रतीक आहेउद्योजकलाही व्यवसायात एकाच वेळी अनेक मे करावी लागतातव्यवसायात अखंड सावधान असल्यामुळे उद्योजक मानसिकरीत्या सक्रियराहतोजेणेकरून वेळ  साधनांचा इष्टतम वापर होऊन उदयोजक स्वावलंबी  स्वयंपूर्ण बनतो.






दृष्टी आणि समता -
दुर्गा देवीची कोणतीही मूर्ती पहाआपले लक्ष वेधून घेणारे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देवीचे सुंदरशांत आणि दक्ष डोळेदेवीचे हे डोळे दुरद्रुष्टी चे प्रतिक आहेकेवळ आपले ध्येय निश्चित असूनभागत नाहीतर आपल्याला ध्येयपूर्तीच्या संपूर्ण प्रवासात सदैव सतर्क असणे आवश्यक आहेत्याचप्रमाणे देवीचे शांतचित्त आपल्याला जीवनात समतोल साधण्याचे कसब शिकवतोज्याप्रमाणे भव्य ध्येयसाधण्यासाठी अतिउत्साही नेतृत्वापेक्षा एक रचनात्मक  सर्वांना सोबत घेऊन जाणारे संयत नेतृत्व अधिक श्रेयस्कर ठरते.

अनुकूलता -
नवरात्रीच्या  दिवसांत देवी दुर्गा  वेगवेगळे अवतार धारण करतेत्याचप्रमाणे व्यवसायात शाश्वत यश मिळवण्यासाठी उद्योजकाला परिस्थितीनुरूप आपला स्वभावशैलीआचरण  वर्तन यांत सुयोग्यबदल घडवून सिध्द व्हावे लागते.


स्वत:चा मजबूत दुवा बना -
ज्याप्रमाणे दुर्गा देवीची उपासना  विश्वास लाखोंना एकत्र आणतोत्याचप्रमाणे उद्योजकाचे वर्तन गोंद प्रमाणे असावे जोसर्वांना एकसंध ठेवण्याचे काम करतोकारण गमावणे हे कमावण्यापेक्षा खूपचसुलभ असते.

नेतृत्व हे स्वतंत्र आहे
     कोणाची मक्तेदारी नव्हे -
 सर्वात महत्वाचे म्हणजेलक्षात ठेवा - जेव्हा इतर सर्व शक्तिशाली देव महिषासुराला रोखण्यास असमर्थ ठरले तेव्हा सर्वोच्च शक्तीला विजय मिळविण्यासाठी देवी दुर्गाचा अवतार धारण करण्याची गरजभासलीत्याचप्रमाणे आज २१ व्या शतकात व्यावसायिक नेतृत्व ही पुरुषांची वा विशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी राहिली नसूनप्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार नेतृत्व सिध्द करण्याच्या समान संधी उपलब्धआहेतहे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचे लक्षण आहे.

नवरात्रोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा ! जय दुर्गा माता !

(अनुवादीत )
मधुकर कुमार,
सौजन्य - इकॉनॉमिक टाइम्स

03 August 2018

मूर्ती लहान पण कीर्ति महान

मूर्ती लहान पण कीर्ति महान

नमस्कार मित्रांनो,
साधारणपणे 13 वर्षाच्या मुलाचे आयुष्य कसे असते? शाळेत जाणे, अभ्यास करणे, उपक्रमांमध्ये सहभागी होणे, खेळ खेळणे, व्हिडिओ गेम खेळणे, टीव्ही पाहणे बरोबर ना, आपण असे म्हणू शकतो. परंतु जर तुम्हांला हे सांगितले तर मुंबईतील एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थाने स्वतःची कंपनी स्थापन केली असून वर्ष २०२० पर्यंत त्याला कंपनीचे उत्पन्न १ अब्ज रुपये इतके करायचे आहे. विश्वास बसत नाहीये ना.. तर आपण जाणून घेऊया तिलक मेहता विषयी.
तिलक ने Paper n Parcel नामक कुरिअर सुविधा पुरवणारी कंपनी स्थापन केली आहे. या कुरिअर सर्विस चे वैशिष्ट्य म्हणजे त्याच दिवशी पार्सल इप्सित स्थळी पोहोचवण्यात येईल. या कामात मुंबईचे सुप्रसिद्ध डब्बेवाले यांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
याची सुरुवात कशी झाली?
तिलक सांगतो, गेल्या वर्षी त्याला काही पुस्तके शहराच्या एका टोकापासून मागवायची होती. परंतु कामावरून थकून आल्यानंतर वडिलांना त्याला ती पुस्तके आणण्यासाठी त्रास द्यायचा नव्हता, तेव्हा या कंपनीच्या कल्पनेचा जन्म झाला. ही कल्पना तिलक ने आपल्या वडिलांना सांगितली. तेव्हा ही कल्पना तिलक च्या वडिलांनी उचलून धरली. ऋषभ सीलिंक या लॉजिस्टक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे त्याचे वडील यांनी या कामात त्याला मदत केली असती, परंतु तिलक ने सोपा मार्ग न निवडता चार महिने या संकल्पनेवर अभ्यास केला व Paper n Parcel ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. घनश्याम पारेख यांची मदत घेतली, श्री. पारेख हे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
Paper n Parcel हे एक अॅप्लिकेशन आहे, सध्या २०० कर्मचारी आणि ३०० डब्बेवाले यांच्या मदतीने दररोज सुमारे १२०० कुरिअर पोहोचवले जातात. साधारणपणे ३ किलोग्रॅम पर्यंत वजनाच्या पार्सल साठी ४० रुपये आकारण्यात येतात. हे अॅप्लिकेशन रिअल-टाइम ट्रॅकिंग फीचरसह येते जे डिलीव्हरी ट्रॅक करण्यासाठी वापरले जाऊ शकते. सध्या ही सुविधा मुंबई ते खारघर, मुंबई ते ठाणे व चर्चगेट ते बोरिवली पर्यंत मर्यादित आहे. सुरवातीच्या काळात कंपनी पॅथॉलॉजी लॅब, शिपिंग एजन्सी, कॉस्मेटिक प्लेअर्स, बुटीक स्टोअर्स आणि डिलिव्हरीसाठी वैयक्तिक ग्राहक यांना सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आगामी काळात हि सुविधा दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये विस्तरण्याचा कंपनीचा मानस आहे. २०१९ पर्यंत कंपनीचे २००० लोकांना रोजगार देऊन सुमारे १ लाख पार्सल दर दिवशी डिलिव्हर करण्याचे लक्ष्य आहे.
या युवा उद्योजकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील कौतुक केले आहे. India Maritime Awards ने देखील त्याला सन्मानित करण्यात आले आहे. तिलक ला २०२० मध्ये म्हणजेच आपल्या १५ व्या वाढदिवसाआधी Paper n Parcel कंपनीच्या १ अब्ज उत्पनाचे लक्ष्य गाठायचे आहे.

13 July 2018

नेत्रहीन असूनही 'श्रीकांत बोल्ला' ने स्थापन केली ५० कोटींची कंपनी


२३ वर्षांचा श्रीकांत बोल्ला जेव्हा जन्मले तेंव्हा काही नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या मातापित्यांना सल्ला दिला की, त्यांनी गळा दाबून त्यांना मारावे. कारण होते श्रीकांतचे नेत्रहीन होणे. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत श्रीकांत ने लोकांच्या अशा बोलण्याचा सामना केला. पण अशा नकारात्मक गोष्टींनी प्रभावित होण्याऐवजी ते आपल्या लक्ष्याच्या दिशेने पुढे जात राहिले.
आज ते केवळ हैदराबाद स्थित ५० करोडच्या कंपनीचे सीईओ आहेत असे नव्हे, तर आपल्याविषयी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांना त्यांनी चुकीचे ठरविले आहे. यशाच्या मुक्कामावर आपली वेगळी ओळख बनविणाऱ्या श्रीकांतने लहानपणीच मनात ठरविले होते कि जर लोकांना असे वाटत असेल की, एक नेत्रहीन व्यक्ती काही करू शकत नाही. तर ते जगाला दाखवून देतील जर मनात काही करण्याचा ठाम निश्चय असेल तर कोणासाठीही यश मिळविणे अवघड नाही. श्रीकांत स्वतःला खूप भाग्यवान मानतात की लोकांच्या नकारात्मक गोष्टी ऐकूनही त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या नेत्रहीन होण्याला शाप ना मानता आणि आर्थिक स्थिती विशेष चांगली नसतानासुद्धा त्यांना एका सर्वसामान्य मुलाप्रमाणे वाढवले आणि शिकवले.
श्रीकांत सांगतात की नेत्रहीन असल्यामुळे त्यांना शाळेतसुद्धा नेहमी मागच्या बेंचवर बसवले जात असे. मैदानातसुद्धा त्यांना खेळण्याची परवानगी दिली जात नसे. दहावीनंतर जेव्हा त्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेंव्हा त्यांना हे सांगून प्रवेश नाकारण्यात आला की ते विकलांग आहेत. त्यावेळी श्रीकांतने व्यवस्थेशी लढाई करून आपला हक्क मिळविला. बारावीमध्ये ९८ टक्के मार्क मिळवले. त्यानंतर त्यांनी आयआयटी, बिट्स पिलानी यांच्यासह देशातील सर्व टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये अर्ज केला, परंतु त्यांना परीक्षेसाठी हॉल तिकीट मिळाले नाही. त्याऐवजी त्यांना या संस्थांकडून पत्र मिळाले कि, ते नेत्रहीन आहेत म्हणून ते स्पर्धा परीक्षा देऊ शकत नाहीत. सगळीकडून नकार मिळाल्यानंतर श्रीकांतने इंटरनेटवर बेस्ट इंजिनिअरिंग प्रोग्राम विषयी सर्च करणे सुरु केले. जे विशेष करून नि:शक्तांसाठी तयार केलेले असतील. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील अनेक संस्थांमध्ये अर्ज केला, आणि एमआयटी मध्ये स्कॉलरशिप घेऊन शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण घेत असतानाच श्रीकांतने अशी कंपनी स्थापन करण्याचा विचार केला की, जी त्यांच्यासारख्याइतर लोकांना पुढे जाण्यासाठी संधी निर्माण करेल. यादरम्यान श्रीकांतने एका लहानश्या टिनचे छप्पर असलेल्या खोलीतून आपल्या कंपनीचे काम सुरु केले. त्यावेळेस त्यांच्याकडे तीन मशिन्स आणि ८ कामगार होते. याच दरम्यान श्रीकांतची ओळख रवी मंथा यांच्याशी झाली, रवी श्रीकांतच्या कंपनीचे मॉडेल आणि त्याच्या विचारांनी प्रभावित झाले, की त्यांनी मेंटॉरच्या रूपातच नाही तर, इन्व्हेस्टर म्हणूनही श्रीकांतच्या कंपनीत सहभागी होण्याचे ठरविले.
श्रीकांतची कंपनी बोलांट इंडस्ट्रीजअशिक्षित आणि नि:शक्त लोकांना रोजगार देते. हि कंपनी इको-फ्रेंडली आणि डिस्पोजबल कन्झ्युमर पॅकेजिंग सोल्युशन्स चे उत्पादन करते. आज श्रीकांतकडे हुबळी, निजामाबाद , हैदराबाद येथे चार प्लांट आहेत. हे प्लांट १०० टक्के सोलर ऑपरेटेड आहेत. लवकरच त्यांचा एक प्लांट आंध्रप्रदेशाच्या श्री सिटी मध्ये देखील सुरु होणार आहे. श्रीकांत आपल्या व्यवसायाचा आणखी विस्तार करण्याची तयारी करत आहे.
अशाप्रकारे श्रीकांत यांनी आपल्या नेत्रहीनतेला प्रगतीमध्ये अडसर होऊ दिले नाही.
सौजन्य - संध्यानंद
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites