2010 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

27 December 2010

WELCOME 2011

मित्रांनो, २०१० चा शेवटचा महीन्याचा शेवटचा आठवडा आता उजाडला! बॉर्न टू विनच्या टिमसाठी हे वर्ष इतके गतिक होते कि हे वर्ष कधी सुरू झाले व आता संपत आले हे कळलेच नाही! २०१० हे वर्ष एकंदरीच बॉर्न टू विन साठी अतिशय Eventful असे होते. बर्‍याच चांगल्या घडामोडी या वर्षभरात बॉर्न टू विन मध्ये घडल्या. २०१० मध्ये बॉर्न टू विन च्या विविध उपक्रमांचा फायदा जवळ जवळ १५ ते २० ह्जार लोकांना झाला. २०१० मध्ये बॉर्न टू विन ने बरेच Milestones साध्य केले. त्यातील काही महत्वाच्या Milestones ची माहीती आपल्या बरोबर Share करावीशी वाटली..
  • २०१० मध्ये बॉर्न टू विन नवीन व मोठ्या ऑफीसमध्ये पदार्पण झाले.
  • २०१० मध्येच बॉर्न टू विन चे निरनिराळे Audio Visual CDs लाँच झाल्या.
  • २०१० मध्ये बॉर्न टू विनने निरनिराळे सेमिनार राबवले व प्रत्येक सेमिनारला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

- SPIN SELLING SEMINAR - १९ फेब्रुवारी २०१०

  
- THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR - ६ ऑगस्ट २०१० व २७ ऑक्टोबर २०१०


- THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR - २४ नोव्हेंबर २०१० व २३ डिसेंबर २०१०
  • २०१० मध्ये बॉर्न टू विन बरोबर नवीन व उत्तम दर्जाचे प्रशिक्षक जोडले गेले: http://www.born2win.in/trainer.aspx
  • २०१० मध्ये काही दिग्गज व्यक्तींनी बॉर्न टु विनच्या कार्यक्रमामध्ये येऊन मार्गदर्शन केले.
- १० जानेवारी लक्ष्यसिध्दी सोहळा - प्रमुख पाहूणे - श्री.संजय गोविलकर (पोलिस इंन्स्पेक्टर, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते तसेच 'स्टॉपवॉच' व 'मित्राची गुंतवणुक' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक)

 - ४ एप्रिल २०१० - प्रमुख वक्ते - श्री. नितीन पोतदार (सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर)
- १० सप्टेंबर - प्रमुख पाहूणे व मुलाखत :- श्री. रविंद्र प्रभुदेसाई (एम.डी., पितांबरी प्रॉडक्टस प्रा.लि.)
 - २ डिसेंबर २०१० - प्रमुख पाहूणे व मुलाखत - श्री. वाय.एम.देवस्थळी (CFO, Whole-Time Director, L&T Limited)
 बॉर्न टू विन २०११ मध्ये म्हणजेच आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या तीन वर्षातील बॉर्न टू विनचा प्रवास व प्रगती आपण सर्वांनीच पाहीलेली आहे. व आपल्या सदीच्छांमुळेच आम्ही आजपर्यंत जी काही थोडीफार प्रगती केली आहे ती करू शकलो आहोत व २०११ मध्ये देखील आपले स्नेह व सहकार्य आम्हास लाभेल अशी आशा आम्ही बाळगतो.

मित्रांनो, गेल्या तीन वर्षांमध्ये बॉर्न टू विनच्या लक्ष्यवेध या प्रशिक्षणक्रमामध्ये महाराष्ट्रीय उद्योजकांचा सहभाग जास्त प्रमाणात होता व लक्ष्यवेधला महाराष्ट्रीय उद्योजकांमध्ये आपली विश्वसनियता निर्माण करण्यात नक्कीच यश मिळाले आहे. महाराष्ट्रीय उद्योजकांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समजुती व त्यांना सततचे हवे असणारे मार्गदर्शन या गोष्टींना लक्षात घेता,  बॉर्न टू विन २०११ ची सुरवात एका अश्या कार्यक्रमाने करणार आहे, जो  महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी अतिशय प्रेरणादायी व मार्गदर्शक असेल. या कार्यक्रमाचे नाव आहे THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR या कार्यक्रमाच्या मदतीने उद्योजकाला आपला उद्योग, यशस्वी व्यवसायात रुपांतर करण्याबाबतचे मार्गदर्शन लाभेल.

या प्रभावशाली कार्यक्रमामध्ये आपणास खालिल गोष्टींचे स्पष्टीकरण होईल:-
  • का बहूतांश व्यवसाय यशस्वी होत नाहीत व त्या बाबतीत काय केले पाहीजे?
  • यशस्वी उद्योजक काय असे जाणतो जे अयशस्वी उद्योजकाला माहीत नसते?
  • सर्वसामान्य उद्योजक असामान्य यश कसे मिळवू शकतो?
  • प्रत्येक यशस्वी उद्योजकाकडे कोणते स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे?
  • व्यावसायिक दृष्टीकोन म्हणजे काय?
  • सर्वसाधारण उद्योजकाची सर्वात मोठी गैरसमजुत कोणती असते?
  • उत्कृष्ट व्यवसाय उभारण्यासाठी व्यवसायाला कोणत्या टप्प्यांमधुन जावे लागते?
  • व्यवसायाच्या आत काम करण्यापेक्षा व्यवसाय उभारणी करण्यासाठी कश्या प्रकारे काम करावे?
  • व्यवसाय विकास प्रक्रियेचा वापर करुन, व्यवसायाचे आदर्श व्यवसायात रुपांतर कसे करावे?
  • परिणामकारक उद्योजकीय वृत्ती योजना म्हणजे काय?
  • बॉर्न टू विन चा २०११ मधील महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बद्दल देखिल आपणास या कार्यक्रमामध्ये माहीती मिळेल.
THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR

वक्ते: अतुल राजोळी
दिनांक: ९ जानेवारी २०११
वेळः सायंकाळी ६ ते ९
स्थळः हॉल ऑफ कल्चर, नेहरु सेंटर, वरळी
गुंतवणुकः रुपये ५००/- फक्त (लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थ्यांसाठी विनामुल्य)
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


सुरु होणारे नवीन वर्ष २०११ आणि त्यातला प्रत्येक दिवस आपणा सर्वांना अमाप समृध्दी व भरभराटीचा जावो!
नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!

- टिम बॉर्न टू विन

13 December 2010

देवस्थळी स॑रांचे मौल्यवान मर्गदर्शन - Thank You So Much Sir!

 देवस्थळी स॑रांचे मौल्यवान मर्गदर्शन - Thank You So Much Sir!

 २ डिसेंबर रोजी लक्ष्यसिध्दी सोहळा माटूंगा येथील कर्नाटक संघ हॉल मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते लार्सन अ‍ॅंड टुर्बोचे सी. एफ. ओ. व संचालक श्री. वाय. एम. देवस्थळी सर व त्यांची प्रकट मुलाखत. अतिशय उच्च पदावर कार्यरत असलेले देवस्थळी सर तेवढेच Down to Earth आहेत हे प्रकर्षाने जाणवले. सरांनी उपस्थित प्रेक्षकांबरोबर मनमोकळे पणाने संवाद साधला. उपस्थित प्रेक्षकांसाठी ही एक प्रकारची सुवर्णसंधीच होती, आजपर्यंत ज्या व्यक्तीला CNBC, NDTV, ETV NOW अश्या TV Channels वर पाहीले होते व वर्तमानत्रातुन वाचले होते अश्या व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात डोकावण्याची व त्यांच्या यशाचे रहस्य जाणुन घेण्याची एक उत्तम संधी सगळ्यांना लाभली होती.

सरांनी बरच काही सांगितलं व त्यातुन बरच काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्या मुलाखती दरम्यान मला जाणवलेले काही महत्वाचे मुद्दे मी खाली मांडत आहे.

१. एखाद्या संस्थेला जर विकसित करायचे असेल तर त्या संस्थेचे कार्य काही मुल्यांवर (Values) अवलंबुन असणे गरजेचे आहे. हि मुल्ये (Values) संस्थेच्या प्रत्येक सदस्यामध्ये मुरली गेली पाहीजेत. मुल्ये जपण्यासाठी जाणिवपुर्वकरित्या व सातत्याने प्रयत्न केले पाहीजेत.

२. आपण स्वतःला एक महत्वाची सवय लावून घेतली पाहीजे, ती म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय! आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर प्रामाणिकपणे कबुल करणे कि आपल्याला माहीत नाही आहे व ते माहीती करुन घेण्यासाठी ज्या व्यक्तीला माहीती आहे त्या व्यक्तीला प्रश्न विचारणे. यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. परंतु बहुतांश माणसे प्रश्न विचारण्यास धजावत नाहीत कारण त्यांना असे वाटते कि आपण जर प्रश्न विचारला तर इतरांना असे वाटेल कि, आपण मुर्ख आहोत. जर आपणास कोणी, "काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोस?" असे जरी म्हंटले तरी त्याचा अर्थ असा होतो कि, ज्याला आपण प्रश्न विचारला आहे, त्याला त्याच्या ज्ञानाबाबत गर्व आहे. आपण मात्र जो पर्यंत उत्तर मिळत नाही तो पर्यंत आपण प्रश्न विचारणे थांबवायचे नाही.

३. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काही चांगलं बोलायचं असेल तर आपण त्याबद्दल दहा वाक्यं बोलली पाहीजेत आणि जर वाईट बोलायचं असेल तर एक वाक्य बोलुन थांबलं पाहिजे.
बोरीवली पश्चिम येथिल गोडवा या मराठमोळ्या फुड सेंटरचे राजेश व गितांजली शिंदे त्यांच्या उल्लेखनिय कामगिरी बद्द्ल पुरस्कार स्विकारताना


४. यशस्वी होण्यासाठी माणसाकडे बरेच गुणधर्म असणे गरजेचे आहे, परंतु त्यातल्या त्या तीन सर्वात महत्वाचे गुणधर्म...

- सकारात्मक विचारः नेहमी चांगला विचार करणे. नकारात्मक विचार व भावना आपल्याला कृती करण्यापासुन दुर ठेवतात. आपण सदैव प्रयत्न केला पाहीजे कि आपण चांगला व सकारात्मक विचार करत आहोत.

- ध्येय: आपल्याकडे एक ध्येय असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला अनुसरुन नेहमी काही ना काही कृती करत राहीले पाहीजे. निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न करत राहीले पाहीजे. प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेलचं असं नाही! परंतु सातत्याने (Consistency) व कल्पना शक्तिचा (Innovation) वापर करुन आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास कायम ठेवला पाहीजे.

- 'आय कॅन' म्हणजेच मी हे करु शकतो: आपल्याकडे कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. जगात अशक्य असे काहीच नाही. आत्मविश्वासाशिवाय यशस्वी होणे मात्र अशक्य आहे!

५. आपण आपल्या आयुष्यभरामध्ये जर काही कमवतो तर ती म्हणजे माणसं. माणसं जोडायला आपण शिकलं पाहीजे. उत्तुंग यश मिळविणे हे काही एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी भरपुर माणसांची साथ आपल्याला मिळणे आवश्यक आहे.

६. कोणत्याही उद्योजकाकडे रिस्क टेकिंग अ‍ॅबिलीटी (Risk Taking Ability) असणे अत्यंत गरजेचे आहे. जर उद्योजकाने रिस्क घेणे थांबविले तर, त्याची प्रगती होणे कठीण होउन बसते.

७. उद्योजकाच्या औद्योगिक विकासासाठी त्याने त्याच्या संस्थेमध्ये यंत्रणा (System) निर्माण करण्यावर भर दिला पाहीजे व ऑर्गनाझेशनल डेव्हलपमेंट (Organizational Development) करण्यावर भर दिला पाहीजे. व्यवसायाचे भव्य स्वप्न (Vision) पाहीले पाहीजे.

८. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्यांना आपला प्रवास यशस्वी करायाचा आहे त्यांनी सुध्दा आधी ठरवले पाहीजे कि आपल्याला कोणत्या पातळी पर्यंत पोहोचायचे आहे. वाट्टेल तेवढे कष्ट करुन तिकडे पोहोचण्याचा अतोनात प्रयत्न केला पाहीजे. मग यश हमखास मिळेलच.


मित्रांनो, माझ्यासाठी श्री. देवस्थळी सरांची मुलाखत घेणे, अतिशय Challenging होते. माझ्यामते माझ्या प्रयत्नांना थोड्याफार प्रमाणात का होईना, नक्कीच यश मिळाले. त्याचे संपूर्ण श्रेय बॉर्न टू विन ची टिम व आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जाते!

आपणा सर्वांचे मनापासुन आभार.

धन्यवाद!

आपला विश्वासु
अतुल राजोळी
बॉर्न टू विन

30 November 2010

केल्याने होत आहे रे... - पाचवा लक्ष्यसिध्दी सोहळा

मित्रांनो, लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची पाचवी बॅच सध्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे. या लक्ष्यवेध बॅचमधील प्रशिक्षणार्थ्यांच्या यशोगाथा प्रशंसनीय अश्या आहेत. १० आठवड्यांपुर्वी जी माणसे आपल्या भविष्याबद्दल साशंक होती, तीच माणसे आता आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सुसज्ज झाली आहेत. जी व्यक्ती १० आठवड्यांपुर्वी प्रचंड आळशी होती व कामे न करण्यासाठी बहाणेबाजी करायची, तीच व्यक्ती आता सळसळीत उत्साहाने रोज आपल्या लक्ष्याच्या दिशेने आगेकुच करत आहेत. जी व्यक्ती १० आठवड्यांपुर्वी अतिशय लाजरी बुजरी होती, तीच व्यक्ती आता प्रचंड आत्मविश्वासाने वावरत आहेत. जी व्यक्ती १० आठवड्यांपुर्वी चार लोकांमध्ये बोलायला घाबरायची, तीच व्यक्ती आता लोकांसमोर बोलण्यासाठी सदैव उत्सुक असते. ज्या व्यक्तीचा १० आठवड्यापुर्वी व्यवसाय अक्षरश: बंद पडण्याच्या मार्गावर होता, त्याच व्यक्तीचा व्यवसाय आता यशाची उंच शिखरे गाठत आहे. ज्या व्यक्तीला लोकांना भेटून आपली उत्पादने व सेवा विकणे प्रचंड कठीण जात होते, तीच व्यक्ती आज विक्रीचे नवे उच्चांक गाठत आहे...

खोटं वाटत आहे... हो ना? मित्रांनो, हे जर आपणास खोटं वाटत असेल तर मी आपणास ह्या सर्व व्यक्तींना भेटण्याचे आत्ताच आमंत्रण देतो. हो मित्रांनो, या सर्वांना आपण भेटू शकता व त्यांच्या गेल्या १० आठवड्याच्या कामगिरीचा आढावा घेऊ शकता. बॉर्न टु विनच्या आगामी लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये...!

दिनांक २ डिसेंबर २०१० रोजी, संध्याकाळी ६:३० वाजता, माटुंगा (प) येथील, कर्नाटक संघ हॉलमध्ये लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचा पदवीदान समारंभ म्हणजेच लक्ष्यसिध्दी सोहळा पार पडणार आहे. मी आपणास नम्र विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित रहावे.. व लक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. एवढेच नव्हे, तर याच कार्यक्रमामध्ये आपणास एका दिग्गज व्यक्तीचे मार्गदर्शन देखील लाभणार आहे.
हो मित्रांनो, आगामी लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक आहेत, श्री. वाय. एम. देवस्थळी (CFO & Member of Board Larsen & Toubro Limited). श्री. देवस्थळींच्या हस्ते लक्ष्यवेधच्या गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांना लक्ष्यवेध दरम्यानच्या त्यांच्या कामगिरीबद्द्ल पुरस्कृत करण्यात येईल. २ डिसेंबरच्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे.. श्री. वाय. एम. देवस्थळी यांची 'केल्याने होत आहे रे...' या विषयावरची लाइव मुलाखत. मुलाखत घेणार आहेत बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी. या मुलाखतीमध्ये श्री. देवस्थळी लार्सन अँड टूब्रो कंपनीचा गेल्या ५० वर्षांमध्ये विकास कसा झाला याची तर माहीती देतीलच परंतु त्याच बरोबर ते कॉर्पोरेट जगतातील त्यांच्या प्रवासाबद्दल सुद्धा बोलतील. श्री. देवस्थळी यांच्याशी संवाद साधण्याची हि निश्चितच एक अतिशय दुर्मिळ अशी संधी असणार आहे.

श्री. वाय. एम. देवस्थळी यांच्या बद्दल थोडेसे...

Profile:
  • Chief Financial Officer & Member of Board, Larsen & Toubro Limited
  • Member on the Board of several Subsidiary & Associate Companies of the L&T Group
  • Academics -Chartered Accountant, Degree in Law
Awards: 
  • 2009 - Ranked 3rd best CFO by Finance Asia (Asia's Best Companies 2009 Awards)
  • 2009 - Named 'Best CFO of the Year' and also 'Best CFO in the Capital Goods Sector' at the CNBC TV 18 Business Leaders Awards
  • 2006 - CNBC Awards - Best Performing CFO: Engineering & Capital Goods'
  • 2003 - 'Executive of the Year'- Award instituted by Indian Association of Secretaries and Administrative Professionals (IASAP)
लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषयः 'केल्याने होत आहे रे...'
दिनांकः २ डिसेंबर २०१०
वेळः संध्याकाळी ६:३० वाजता

स्थळः कर्नाटक संघ हॉल, माटुंगा (प)
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

19 November 2010

THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR

माणुस आर्थिक गरजेपोटी आयुष्यभर धडपडत असतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे माणसाने शाळा व कॉलेजमध्ये बरीच वर्षे शिक्षण जरी घेतले असले तरी पैश्याबद्दल त्याला काहीच शिकवलं गेलेलं नसतं. परिणामस्वरुपी माणुस पैश्यासाठी काम करायला शिकतो परंतु स्वत:साठी पैश्याकडून काम करवून घ्यायला मात्र कधीच शिकत नाही. बॉर्न टू विन सादर करत आहे, THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR जो आपल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करुन आजच्या महागाईने ग्रासलेल्या युगात आपल्याला आर्थिकदृष्ट्या सबळ बनविण्यास मार्गदर्शन करेल.


योग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने सर्वसाधारण माणुस करोडपती बनु शकतो व योग्य आर्थिक नियोजनाच्या अभावी करोडपती माणुस कंगाळ होऊ शकतो! एकविसाव्या शतकात आपल्याला आज खरी गरज आहे ती आर्थिक साक्षरतेची. THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR आपल्याला अत्यंत सोप्या व सरळ पद्धतीने आर्थिकदॄष्ट्या साक्षर बनवेल.

या प्रभावशाली कार्यक्रमात आपणास खालिल गोष्टींचे स्पष्टीकरण होईल
  • देशातील आर्थिक व्यवस्थेबाबतची वस्तुस्थिती
  • कष्टाची कमाई गिळंकृत करणारे साप
  • महागाईवर मात
  • आर्थिक व्यवस्थापनाचा पिरॅमिड
  • कोणतीही तडजोड न करता, सन्मानाने व समृध्दीने निवृत्त कसे व्हावे?
  • योग्य आर्थिक नियोजन कसे करावे?
  • सुयोग्य गुंतवणुकीचे पर्याय व परिणाम




वक्ते: श्री. अरुण सिंह
श्री. अरुण सिंह, हे वेल्थ क्रिएटर या आर्थिक सल्लागार संस्थेचे संचालक आहेत व या क्षेत्रामध्ये ते गेले दहा वर्षे कार्यरत आहेत. आर्थिक साक्षरतेबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी या एकमेव ध्यासापोटी निरनिराळ्या कार्यक्रमांव्दारे आजपर्यंत हजारो लोकांपर्यंत अरुण सिंह पोहोचु शकले आहेत. आर्थिक व्यवस्थापनाविषयीचे प्रचंड ज्ञान असलेल्या अरुण यांना या क्षेत्रात वेल्थ विझर्ड असे संबोधले जाते!


दिनांकः २४ नोव्हेंबर २०१०
वेळः ठिक संध्याकाळी ६ वाजता
स्थळ: हू आर वी हॉल, नेहरु प्लॅनेटरीअम, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई.
गुंतवणूक: रुपये ५०० फक्त
अधिक माहितीसाठी संपर्कः  022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689


05 November 2010

HAPPY DIWALI 2010!

नमस्कार मित्रांनो!

बॉर्न टू विनच्या संपुर्ण टिमच्या वतीने आपल्याला व आपल्या कुटूंबियांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा....! ही दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

दिनांक २७ ऑक्टोबर २०१० रोजी THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिर येथे दणक्यात पार पडला. हा बॉर्न टू विन तर्फे आयोजित करण्यात आलेला दुसरा THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR होता व कार्यक्रमाला पहील्या कार्यक्रमाएवढाच भरभरुन प्रतिसाद मिळाला. दुसर्‍या THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR बद्दल विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाची सर्व सुत्रे बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सांभाळलेली होती. या कार्यक्रमाची संपुर्ण आखणी, नियोजन व अंमलबजावणी ही बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांमार्फतच करण्यात आली. त्यांचा उत्साह खरच वाखणण्यासारखा आहे. लक्ष्यवेध मध्ये घेतलेले व्यवस्थापनाचे धडे प्रत्यक्षात उतरवत कार्यक्रमाचे अतिशय प्रोफेशनल पध्दतीने Execution करण्यात आले. बॉर्न टू विनच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनो तुम्ही जिंकलत...!

कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...


बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांचे कार्यक्रमापुर्वीचे इव्हेंट प्लानिंग

रविंद्र नाट्यमंदिर बाहेरचे प्रवेशद्वार


कार्यक्रमापुर्वी तिकीट काउंटर बाहेर लागलेली लोकांची रांग


कार्यक्रम सुरू व्हायची लोक आतुरतेने वाट पाहत होते


रजिस्ट्रेशन काउंटर


कार्यक्रमाचे सुत्र संचालक श्री. दिनार म्हात्रे



अतुल राजोळी यांच्या व्याख्यानाची उत्साहवर्धक सुरुवात



कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांचा जल्लोष



प्रेक्षकांच्या उत्साहाला आलेले उधाण


THE SUCCESS BLUEPRINT - एक अद्वीतीय सेमिनार




कार्यक्रम रंगात आला असताना



कार्यक्रमाचे सह्-प्रायोजक Navneet Publication चा स्टॉल



सदैव आनंदी बॉर्न टू विनचे प्रशिक्षणार्थी



Navneet Publication च्या e-sence चे Vice- President श्री. महेश शहा




नवी- मुंबईचे महापौर श्री. सागर नाईक सुध्दा कार्यक्रमाद्वारे प्रेरीत झाले


गोडवा व Big- Idea Communications चा स्टॉल


"मी आनंदी, उत्साही, मी सदा प्रफुल्लीत आहे"


प्रेक्षकांनी केलेली धमाल


THE SUCCESS BLUEPRINT PROJECT ACCOMPLISHED - मिशन फतेह!




HAPPY DIWALI!!!

14 October 2010

दुसरा THE SUCCESS BLUEPRINT सेमिनार

 नमस्कार!
मित्रांनो आपण सर्वांना माहितीच आहे, बॉर्न टू विनचा पहिला THE SUCCESS BLUEPRINT हा सेमिनार ६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता व या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलात. THE SUCCESS BLUEPRINT सेमिनारला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

६ ऑगस्ट नंतर फोन कॉल्स, SMS व E-Mail द्वारे अनेक व्यक्तिंनी आम्हाला संपर्क केला व हा कार्यक्रम पुन्हा कधी आहे याची विचारपुस केली. खरेतर हा कार्यक्रम पुन्हा आयोजित कधी करायचा याची पुर्वयोजना आम्ही केलीच नव्हती, त्यामुळे "पुढचा THE SUCCESS BLUEPRINT सेमिनार जेव्हा असेल तेव्हा आपणास आम्ही कळवू." या उत्तराशिवाय आमच्याकडे वेगळे उत्तर नसायचे. परंतु कार्यक्रमाच्या एका महिन्यानंतरसुध्दा Phone calls येत आहेत हे बघितल्यानंतर लोकांच्या खास आग्रहामुळे THE SUCCESS BLUEPRINT सेमिनार पुन्हा एकदा बॉर्न टू विन घेउन येत आहे.

THE SUCCESS BLUEPRINT या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे हा चार तासांचा कार्यक्रम आहे, जो आपणास कमीत कमी परिश्रमांमध्ये जास्तीत जास्त यश मिळविण्यास मदत करेल. THE SUCCESS BLUEPRINT हा अतिशय उत्साहवर्धक व प्रेरणादायी कार्यक्रम आहे, ज्या मधुन आपणास आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद... आपल्याला जे हवे आहे ते मिळविण्यासाठी नक्कीच फायदेशिर ठरेल.
THE SUCCESS BLUEPRINT येत्या २७ ऑक्टोबर २०१० रोजी  संध्याकाळी ६:३० वाजता रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

ह्या कार्यक्रमाला देखिल आपणा सर्वांचा दणदणीत प्रतिसाद मिळणार यात काहीच दुमत नाही, कारण ज्या दिवशी ह्या कर्यक्रमाची औपचारीक घोषणा करण्यात आली, त्याच दिवसापासुन कार्यक्रमासाठी भरपुर प्रमाणामध्ये नोंदणी सुरु झाली.

आगामी THE SUCCESS BLUEPRINT कार्यक्रमामध्ये पहिल्या कार्यक्रमापेक्षा आणखी जोश, आणखी प्रेरणा, आणखी उत्साह आपणास अनुभवायला मिळेल...!

तर मग नक्कीच भेटूया... बुधवार, २७ ऑक्टोबर २०१० रोजी, संध्याकाळी ६:३० वाजता, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे!



- धन्यवाद!

टिम बॉर्न टू विन




वेळ : सायंकाळी ठिक ६:३० वाजता


स्थळ : रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर (प.)

गुंतवणुक : रुपये ५००/-, ४००/- व ३००/-

प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्क :

०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

06 October 2010

लोकसत्ता मुंबई वृत्तांतः उद्योगधंद्यातील छक्के पंजे उघड करणारी दिलखुलास मुलाखत

उद्योगधंद्यातील छक्के पंजे उघड करणारी दिलखुलास मुलाखत

उदय कुलकर्णी, बुधवार, ६ ऑक्टोबर २०१०

‘बॉर्न २ विन’ ही कॉर्पोरेट व रिटेल क्षेत्रात विविध प्रकारचे प्रशिक्षण व सल्ला देणारी संस्था. ‘लक्ष्यवेध’ हा त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यासाठी लक्ष्यसिद्धी सोहळा दादर इथे आयोजित केलेला होता. कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे पितांबरी प्रॉडक्टस्चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत. बॉर्न २ विनचे संस्थापक- संचालक अतुल राजोळी यांनी ही मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा हो गोषवारा..

बी.एस्सी. (केमिस्ट्री) केल्यानंतर रवींद्रनी मोझ्ॉक टाइल्स बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. पण टाइल्स सदोष बनल्याने तीन लाखांचा फटका बसला. एकूणच रवींद्र यांच्या लक्षात आले. आपल्याला अकाऊंटस्, टॅक्सेशनची माहिती नाही. माणसे, व्यवसाय मॅनेज करणे माहीत नाही. त्यांनी मॅनेजमेंटचे रीतसर शिक्षण घ्यायचे ठरवले. त्यांनी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स केला. आजही ते आग्रहाने सांगतात, मॅनेजमेंटचा निदान एक वर्षांचा कोर्स कराच. आजही ते स्वत: या विषयावरची पुस्तके वाचत असतात. काही उद्योजकांना आधुनिक व्यवस्थापन शास्त्र हे थोतांड वाटते किंवा त्यांचा त्यावर फारसा विश्वास नसतो. स्वत:च्या हुशारीवर त्यांचा अतोनात विश्वास असतो, पण त्यांनी या शास्त्रामुळे काय फायदा होतो हे एकदा आजमावून बघायला हवे.

डीबीएम केल्यानंतर रवींद्र यांनी डिर्टजट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. वडिलांची एक वापरात नसलेली जागा पडून होती. त्याचा त्यांना लाभ मिळाला. इथे ते सांगतात की, स्वत:ची जागा असण्याचे अनेक फायदे आहेत, ते खूप महत्त्वाचे आहे. यशस्वी उद्योजक आपण किती खस्ता खाल्ल्या ते सांगत असतात. पण आपल्याला ज्या अनुकूल बाबी होत्या त्याचाही रवींद्र उल्लेख करतात हे विशेष. आपले डिर्टजट ताजसारख्या मोठमोठय़ा हॉटेलांना विकतानाच त्यांनी ठरवले आपण कंझ्युमर प्रॉडक्ट बनवायचे, म्हणजे त्याची विक्री जास्त होईल. डिर्टजट ते हॉटेलला विकतात तेव्हा धोका हा असतो की त्यांच्यापेक्षा स्वस्त देणारा दुसरा कुणी भेटला तर हॉटेलवाला त्याच्याकडून माल घेईल. त्यामुळे मार्जिन कमी ठेवावे लागणार. कंझ्युमर प्रॉडक्ट म्हणजे थेट किरकोळ ग्राहक विकत घेतो असे उत्पादन करायचे, पण ते टी-३ प्रकारातील नको, युनिक हवे.

त्यांनी मग तांब्या-पितळेची भांडी घासण्यासाठी पावडर बनवण्याचे ठरवले. लोक म्हणाले, आता सर्वजण स्टीलची भांडी वापरतात ही पावडर कोण घेणार? पण रवींद्रना आपल्या निर्णयाबाबत व जो अभ्यास केला होता त्याबाबत खात्री होती. त्यांनी पितांबरीची एक रुपयाची पुडी बनवली व त्याची विक्री करण्यासाठी काही अभिनव कल्पना लढवल्या. जाहिरातीचा खर्च करण्याऐवजी हँडबिले छापली, मुलांना सॅम्पल्स दिली, त्यांना ५० टक्के कमिशन दिले. बरेचसे नोकरी करून विकणारे वितरक होते. त्यांच्यासाठी हे खूप आकर्षक लाभ होते ते उत्साहाने कामाला लागले. नंतर उद्योगाचा विस्तार झाल्यावर मात्र त्यांनी वितरण यंत्रणा उभारली, लोक नेमले, त्यांना टारगेट ठरवून देणे असे सगळे केले.

प्रॉडक्शन, मार्केटिंग व फायनान्स हे उद्योगाचे तीन आधारस्तंभ. तितकेच महत्त्वाचे आहे मनुष्यबळ. सुरुवातीच्या काळात कौशल्यवान, अनुभवी माणसे मिळत नाहीत, त्यांचा पगारही आवाक्याबाहेरचा असू शकेल. त्याऐवजी मग प्रामाणिक, मेहनती माणसे घ्या. त्यांना प्रेमाने व पैशाने जोडा असे ते सांगतात.

एकटा रवींद्र काही करू शकत नाही, असे ते म्हणतात. त्यांना हे भान आहे हे नोंद घेण्यासारखे. ते म्हणतात, एक कोअर टीम उभी करा. त्या टीममध्ये बॉण्डिंग हवे. नवीन कर्मचाऱ्यांचे कंपनीत इंडक्शन व्हायला हवे, म्हणजे त्याला कामाची माहिती द्या. त्याचबरोबर कंपनीची फिलॉसॉफी, व्हिजन, मूल्ये हेही शिकवा.

माणसावर हा नालायक आहे असा शिक्का मारण्याऐवजी, त्याच्याकडे काय गुण आहेत, तो कोणते काम करू शकतो, ते बघा. प्रत्येक व्यक्तीचा एक कोअर कॉम्पिटन्स असतो. त्याचे चारित्र्य, प्रामाणिकपणा ओळखा. माणसांना इन्सेटिव्ह द्या, सुधारणा कुठे हवी ते सांगा, दोष खासगीत सांगा. काही लोकांना मात्र लगेच काढून टाकणे आवश्यक असते. त्याबाबत मग तो मित्र, नातेवाईक असले तरी ते पर्वा करीत नाहीत. काही वेळा तो स्वत:च निघून जाईल अशी परिस्थिती निर्माण करा. राइट पीपल आर असेट, नॉट पीपल आर असेट.

१९९९-२००० साली त्यांची वार्षिक उलाढाल १० कोटींची होती. त्यावेळेस एकाच वेळी अनेक संकटे आली. एक्साइजची धाड पडली. मुलगा आजारी, कंपनीत पगारवाढीसाठी संप त्यामुळे ऑर्डर्स पुऱ्या करता येत नाहीत तेव्हा रवींद्र यांच्यावर खूप ताण होता. कुठून धंदा वाढवला असे वाटायला लागले. वय फक्त ३३ तरीही रक्तदाब वाढला. यावेळेस पूजाअर्चा, नामस्मरणातून शांतता मिळाली. त्यांनी युनियनला वश करून संप मिटवला. एक्साइजविरुद्ध उच्च न्यायालयातून आदेश आणला. धंदा म्हटल्यावर असे धोके येणार. ते पचवायची आर्थिक ताकद हवी. त्यासह मानसिक खंबीरताही हवी हे लक्षात येईल. रवींद्र महत्त्वाचा सल्ला देतात, निर्णय घेतलाच पाहिजे. त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करून तो घ्यायचा. प्रत्येक वेळी तो एकदम अचूक असेल असे नाही. ओघातच ते सांगतात, उद्योजकता म्हणजे स्वातंत्रचे युद्ध असते, सतत लढाई सुरू असते, ज्ञान कौशल्य-स्कील मिळवत राहणे, वाढवत राहणे आवश्यक असते. धूर्तपणा हवा, भोळेपणा नको, गनिमी कावा हवा.

रवींद्र म्हणतात, प्रेम, युद्ध व उद्योगात सर्व क्षम्य. एक उदाहरण त्यांनी दिले. गुजरातमधील एक उत्पादक पितांबरीची नक्कल करून तिथे विकायला लागला. विक्रीवर परिणाम होत होता. शिवाय लोक त्या नकली पावडरला असली समजत. कारण पॅकिंग, नाव वगैरे दिशाभूल करणारे. त्या मालाची गुणवत्ता अर्थातच खराब असल्याने नावही बदनाम होण्याचा धोका होता. त्या उत्पादकावर गुजरातमध्ये खटला भरला तर स्वत:लाच त्रास. महाराष्ट्रात खटला भरता येत नाही. कारण इथे त्याची विक्री नाही. त्यांनी मग ठाण्यात एक डमी एजंट उभा केला. त्या एजंटने नकली मालाची खरेदी-विक्री इथे सुरू केली. मग रवींद्र यांनी त्या उत्पादकावर ठाण्यात सिव्हिल व क्रिमिनल केस केली. त्याला ताळ्यावर आणला, नक्कल बंद करायला लागली. नुकसानभरपाई द्यायला लावली. शत्रूवर दयामाया नको, असे ते स्पष्ट सांगतात.

उद्योग म्हणजे नफा, विकास हवा, दरवर्षी कमीत कमी २५ टक्के वाढ हवी. रवींद्र यांची आता १०० कोटींपर्यंत उलाढाल नेण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांनी हेल्थ केअर क्षेत्रात प्रवेश केला आहे. फूड, अ‍ॅग्रो, निर्यात याद्वारे उलाढाल वाढवणार आहेत. नफा जास्त मिळावा यासाठी व्हॅल्यू अ‍ॅडिशन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणतात. कंपनी आपल्या हातातून निसटेल का वगैरे अनाठायी भीती न बाळगता रवींद्र यांनी संचालक मंडळाची नेमणूक केली, सीईओची नियुक्ती केली. कंपनी अजून १५० वर्षे टिकली पाहिजे हा उद्देश.


सौजन्यः लोकसत्ता - मुंबई वृत्तांत

स्त्रोतः http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105763:2010-10-05-15-58-05&catid=39:2009-07-09-06-54-27&Itemid=6
विशेष आभारः श्री. उदय कुलकर्णी www.charcha-kuluday.blogspot.com

30 September 2010

"उद्योजकाच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेशाची रूपे हवीत" - रवींद्र प्रभुदेसाई


सौजन्य : सकाळ
दिनांकः २६ सप्टेंबर २०१०

"उद्योजकाच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेशाची रूपे हवीत"
रवींद्र प्रभुदेसाई यांचे प्रतिपादन; लक्ष्यसिध्दी पुरस्कारांचे वितरण

"उद्योजकाच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही रुपे असली पाहीजेत. तरच यशस्वी होता येतं. सतत नवनवीन उत्पादनांची निर्मिती करणं - वाढवलेला उद्योग सुयोग्यरीत्या सांभाळणं, वाढवणं आणि उद्योग विकासाला बाधक ठरणार्‍या प्रतिस्पर्ध्यांना नेस्तनाबूत करणं अशा तिन्ही आघाडयांवर उद्योजकाला कार्यरत राहावं लागतं," असं प्रतिपादन 'पितांबरी' उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केलं.

'बॉर्न टू विन' या नेतृत्वगुणविकास करणार्‍या प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित 'लक्ष्यवेध' प्रशिक्षण शिबिराचा समारोप आणि या शिबिरातील यशस्वी प्रशिक्षणार्थींना 'लक्ष्यसिध्दी' पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातल्या प्रा. बी. एन. वैद्य सभागृहात नुकताच पार पडला. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झालं. या वेळी प्रभुदेसाई यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना हा यशाचा कानमंत्र दिला.

पितांबरीच्या उद्योग वाटचालीतले अनेक पैलू या वेळी त्यांनी 'बॉर्न टू विन'चे अतुल राजोळी यांनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडले. "उद्योजकाने उद्योग वाढवताना आपल्या हाताखालच्या सहकार्‍यांमध्येही नेतृत्वगुण विकसित केले पहिजेत. नवीन उदयोन्मुख उद्योजकांना उद्योगविस्ताराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्याबरोबरच समाज, राष्ट्र, देश आणि धर्म या सर्वांच्या संवर्धनात आपला महत्त्वपूर्ण सहभाग दिला पाहिजे." अशा शब्दात प्रभुदेसाई यांनी उद्योजकांची गुणवैशिष्ट्ये उपस्थितांसमोर मांडली.

बॉर्न टू विन संस्थेविषयी बोलताना प्रभुदेसाई म्हणाले, 'जन्माला येणार्‍या प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रात विजयी झालं पाहिजे हाच संदेश आपल्या नावातून 'बॉर्न टू विन' या संस्थेनं दिला आहे. बर्‍याचदा प्रत्येक व्यक्ती ही सहजसाध्य यशाचं लक्ष्य समोर ठेवून वाटचाल करत असते. परंतु विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींना, त्यांच्यातल्या क्षमता, गुणवत्ता यांचा विकास करत सहजसाध्य यशाच्या पुढे जाऊन कष्टसाध्य यश मिळवण्याकरिता सुयोग्य मार्गदर्शन करण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम अतुल राजोळी त्यांच्या संस्थेमार्फत करत आहेत.'

'लक्ष्यसिध्दी' या १० आठवडयांच्या प्रशिक्षण शिबिरात ३०० टक्क्यांचं उद्दिष्ट ठेवलं जातं आणि ते साध्य करण्याकरिता आवश्यक त्या सर्व क्षमंताचा विकास घडवून आणला जातो. अशा प्रकारचं लक्ष्य साध्य करणार्‍या २६ व्यक्तींना 'लक्ष्यसिध्दी' पुरस्कारानं यंदा सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतून आलेल्या प्रशिक्षणार्थींनी आणि उदयोन्मुख उद्योजकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.

'बॉर्न टू विन' प्रशिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या लक्ष्यसिध्दी शिबिरात 'पितांबरी' उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.

सौजन्य : सकाळ
दिनांकः २६ सप्टेंबर २०१०



कार्यक्रमाची काही क्षणचित्रे:
 
  'उद्योग साधना' - श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत

अतुल राजोळी उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना

पितांबरीचे एम्.डी. श्री. रवींद्र प्रभुदेसाई

लक्ष्यसिध्दी पुरस्कार वितरण समारंभ: श्री. तानसिंग लामा श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या ह्स्ते पुरस्कार स्विकारताना

कार्यक्रमाचे व्यासपीठ


उपस्थित प्रेक्षकवर्ग
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites