LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE: Inspirational
Showing posts with label Inspirational. Show all posts
Showing posts with label Inspirational. Show all posts

12 January 2018

भारतीय.. ८ वी नापास.. वय २१.. असा हा २००० कोटींचा मालक.!!

वयाच्या विशीत, साधारणतः तरुणाई आपले शिक्षण पूर्ण करत असते , आणि बहुतांशी तरुण आपल्या भविष्याबाबाबत साशंक असतात. याला अपवाद म्हणजे लुधियाना स्थित आंतरराष्ट्रीय पातळीवर Ethical Hacker म्हणुन नावाजलेला त्रिश्नीत अरोरा. व्यवसायाची व computer क्षेत्राची कोणतीही कौंटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्रिश्नीत चा मध्यमवर्गीय तरुण ते यशस्वी उद्योजक हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्रिश्नीत चा जन्म ०२ नोव्हेंबर १९९३ मध्ये झाला. त्रिश्नीत चे वडील एक खाजगी कंपनीतील वरिष्ठ अकाउंट्स अधिकारी आहेत आणि आई गृहिणी आहे.

वयाच्या ११ व्या वर्षी त्याला computer ची तोंड ओळख झाली. कालांतराने त्याला computer hardware मध्ये आवड निर्माण झाली. या computer च्या आकर्षणामुळे त्रिश्नीत च्या शालेय अभ्यासावर परिणाम झाला व तो ८ व्या इयत्तेत नापास झाला त्यामुळे नंतर त्याला दहावीची परीक्षा बाहेरून दयावी लागली.

२०१२ मध्ये त्रिश्नीत ने TAC Security Solutions ची  स्थापना केली. व्यवसायाने कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय स्वतःचा व्यवसाय स्थापन करणे हे एक अतिशय आव्हानात्मक काम होते. परंतु काही वेगळं करण्याची आणि आयटी सुरक्षेच्या वाढत्या समस्यांच्या संख्येने उत्स्फूर्तपणे त्रिश्नीत ला स्वतःचा व्यवसाय स्थापित करण्यास प्रेरित केले.  त्रिश्नीत च्या मते कोणत्याही कार्यात उत्कटता सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे आणि मी काही वेगळं करण्याच्या उत्कटतेमुळे, आयटी सुरक्षा क्षेत्रात मी एक प्रमुख खेळाडू म्हणून स्वतःला सिध्द करू शकलो.


TAC Security Solutions ही एक सायबर सुरक्षा कंपनी जी नेटवर्कच्या अभेद्यता आणि डेटा चोरीविरुद्ध कंपन्यांसाठी संरक्षण पुरवते. सध्या कंपनीचा टर्नओव्हर कोट्यवधींच्या घरात आहे. त्यांचे काही ग्राहक रिलायन्स उद्योग, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, पंजाब पोलिस (भारत) आणि गुजरात पोलिस आहेत. त्यांनी सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पंजाब आणि गुजरात पोलिसांना मदत केली आहे.

त्रिश्नीत अरोरा ने सायबर सुरक्षा, नैतिक हॅकिंग आणि वेब संरक्षण याविषयी पुस्तके लिहिली आहेत.
Hacking TALK with Trishneet Arora
The Hacking Era
Hacking With Smart Phones


त्रिश्नीत ला त्याच्या कार्याबद्दल विविध पुरसकरांनी गौरवण्यात आले आहे. 
२०१३ मध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
२०१४ मध्ये, पंजाबचे मुख्यमंत्री, प्रकाशसिंग बादल यांनी राज्य पुरस्कार देऊन गौरविले. तसेच पंजाब पोलिस अकादमीचा आयटी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले.
२०१५ मध्ये पंजाबी आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
२०१७- मॅन'स मॅगझीन तर्फे न्यूज मेकर अवॉर्ड


त्रिश्नीत च्या मते तुमच्या पॅशनपुढे शिक्षण महत्त्वाचे नाही.
अपयशाची पुढील पायरी यश आहे. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. पॅशनवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्लाही त्रिश्नीत ने दिला आहे.

- सौजन्य : दिव्यमराठी 

07 October 2016

सात उद्योजकीय स्वातंत्र्य!

नमस्कार उद्योजक मित्रांनो!
आपण उद्योजक होण्याचा निर्णय नक्की का घेतलात? उद्योजक बनून आपल्याला काय असं मिळणार होतं म्हणून आपण ही जोखिम घेतली? आपला स्वतःचा व्यवसाय सूरु करण्यामागचं नेमकं कारण काय? मित्रांनो, मी हा प्रश्न माझ्या उद्योजकीय विकास कार्यशाळांमध्ये नेहमीच विचारतो. माझ्या समोर बसलेल्या उद्योजकांची या प्रश्नावर निरनिराळी उत्तरे येतात. परंतु त्या सर्व उत्तरांना एकत्रित करुन जर एकाच शब्दात उत्तर द्यायचं झालं, तर मी ठामपणे सांगु शकतो की प्रत्येक उद्योजकाला स्वतःचा उद्योग सुरु करुन जे खरोखरचं हवं असतं ते म्हणजे 'स्वातंत्र्य'!
प्रत्येक उद्योजकाला आपल्या व्यवसायाव्दारे 'अर्थपुर्ण व समृध्द' जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. हो मित्रांनो! अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन! माझ्यामते यशस्वी उद्योजकांकडे अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन जगण्याचं स्वातंत्र्य असतं. मी बऱ्याच यशस्वी उद्योजकांचा मी अभ्यास केला, (त्यामधील काही उद्योजक आज हयात नाहीत.) माझ्या अभ्यासादरम्यान मला असं जाणवलं की प्रत्येक यशस्वी उद्योजक आपलं जीवन अर्थपुर्ण आणि समृध्दपणे जगतो.
अर्थपुर्ण जीवन जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मुल्यांनुसार जगण्याचं स्वातंत्र्य, आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्यांच्याशी तडजोड न करता जगण्याचं स्वातंत्र्य, आपलं जीवन एका उद्देशाशी निगडीत जगण्याचं स्वातंत्र्य, आपल्या जीवनाव्दारे इतरांना काहीतरी योगदान देण्याचं स्वातंत्र्य.

समृध्द जीवन जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आपलं ध्येय ठरवून ते साध्य करण्याचं स्वातंत्र्य, आपल्या विचारांनी, भावनांनी व कृतीनी वैभवशाली होण्याचं स्वातंत्र्य, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचं स्वातंत्र्य, आपले स्नेहसंबंध उत्कृष्ठपणे जोपासण्याचे स्वातंत्र्य, आपले आरोग्य ठणठणीत ठेवून उत्साही व प्रफुल्लीतपणे जगण्याचं स्वातंत्र्य, आर्थिकरित्या सोइस्कर व समधानकारकपणे जगण्याचे स्वातंत्र्य व खर्‍याअर्थाने यशस्वी जीवन जगण्याचं स्वातंत्र्य!

मित्रांनो, माझं असं ठाम मत आहे की आपण यशस्वी उद्योजक आहोत असं तेव्हाच म्हणू शकू जेव्हा आपण अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगु. प्रत्येक उद्योजकाकडे तसं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य उपलब्ध आहे. परंतु प्रत्येक उद्योजक स्वतंत्रपणे आपले जीवन जगतोच असे नाही. फार थोडे उद्योजक खर्‍या अर्थाने अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगत असतात. इतर उद्योजकांसाठी ते आदर्श असतात. इतर उद्योजकांना सुध्दा या यशस्वी उद्योजकाप्रणाने जीवन जगायची इच्छा असते. परंतु सर्वांना तसं जीवन जगता येत नाही. या लेखामध्ये आपण जाणुन घेऊया उद्योजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय?
मित्रांनो, उद्योजकतेबद्दलची एक व्याख्या जी मला प्रचंड आवडते , ती म्हणजे, "उद्योजकता म्हणजे काही वर्ष असं आयुष्य जगणं जे इतरं कोणी जगण्याचं धाडस करत नाहीत, जेणे करुन उर्वरीत आयुष्य अश्याप्रकारे जगणं जे इतर कोणी जगु शकत नाही!" किती खरं आहे यशस्वी उद्योजक स्वतंत्र्यपणे जीवन जगतात, जे इतरांसाठी स्वप्नंवत असतं. जे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला, त्या स्वातंत्र्याचा अगदी मनमुरादपणे आस्वाद घेत असतात. बरेच लघुउद्योजक व्यवसाय सुरु करण्याची जोखिम घेतात, परंतु त्यांना 'उद्योजकीय स्वातंत्र्य' मात्र साध्य होत नाही.

मित्रांनो माझ्यामते कोणत्याही उद्योजकाला व्यवसाय उभारणी करताना स्पष्टपणे ठाऊक असले पाहीजे की त्याला नेमकं कोणतं स्वातंत्र्य आपल्या व्यवसायामार्फत अनुभवायचं आहे. आपल्या व्यवसायाची जडण-घडण त्याने अश्या प्रकारे केली पाहीजे जेणे करुन त्याला हवे असलेले स्वातंत्र्य त्याला अनुभवता येईल. प्रत्येक उद्योजकाला आपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन इच्छित स्वातंत्र्य जरी अपेक्षित असले तरी प्रत्येक उद्योजकाला वेगळं स्वातंत्र्य हवं असतं. माझ्या मते उद्योजकीय स्वातंत्र्य सात प्रकारची असतात. सात उद्योजकीय स्वातंत्र्यापैकी काही महत्त्वाची स्वातंत्र्य उद्योजकाला हवी असतात.

सात उद्योजकीय स्वातंत्र्य :

१) आदर्श व्यक्ती बनण्याचं स्वातंत्र्य:
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची काही मुल्यं असतात. प्रत्येकाची इच्छा असते की आपण आपल्या मुल्यांप्रमाणे वागावे. परंतु प्रत्येकाला त्याच्या मुल्यांप्रमाणे जीवन जगता येतचं असे नाही. बर्‍याच वेळा उद्योजकांना नैतिकतेला धाब्यावर बसवून 'धंदा' करावा लागतो. त्यांना ठाऊक असतं की आपलं वागणं व निर्णय आदर्श नाहीत. जे उद्योजक आपल्या मुल्यांशी तडजोड न करता यशस्वी होतात ते इतरांसाठी आदर्श असतात. उदाहरणार्थ: इंम्फोसिस या जगविख्यात भारतीय कंपनीचे संस्थापक श्री. नारायण मुर्ती, सुरुवाती पासुनच आपल्या मुल्यांशी तडजोड करण्यास तयार नव्हते. सचोटी व स्वाभिमान या त्यांच्या वैयक्तिक मुल्यांना अनुसरुनच ते आपले जीवन जगत आहेत म्हणूनच त्यांना हवं असलेलं उद्योजकीय स्वातंत्र्य त्यांना नक्कीच प्राप्त झालं.

२) वेळेचं स्वातंत्र्य:
काही उद्योजकांना 'सकाळी ९ ते संध्याकाळी ६' या चाकोरीबध्द् जीवना पासुन स्वातंत्र्य हवे असते. त्यांना आपल्या व्यवसायापसुन आपला वेळ आपल्याला हव्या त्या पध्द्तीने व्यतीत करायचा असतो. पाहीजे तेव्हा काम, पाहीजे तेव्हा विश्रांती, पाहीजे तेव्हा मजा! उदारणार्थ: 'व्हर्जिन गृप' या आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी कंपनीचे सर्वेसर्वा सर रिचर्ड ब्रॅन्सन, हे स्वातंत्र्य प्रेमी म्हणुन प्रसिध्द आहेत. आज ते १०० पेक्षा जास्त व्यवसायांचे मालक आहेत परंतु आपला वेळ पाहीजे हवा तसा व्यतीत करतात. ९ ते ६ च्या कचाट्यापासुन ते मुक्त आहेत.

३) हवं ते काम करण्याचं स्वातंत्र्य: काही उद्योजकांना एखाद्या गोष्टीचा प्रचंड ध्यास असतो. त्यांना आपलं जीवन एका विशिष्ट कार्यासाठी समर्पित करण्याची इच्छा असते. त्यामुळे ते एखादा विशिष्ट व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. जीवन भर आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे, ज्या गोष्टीत क्षमता आहे व जे केल्याने त्यांना प्रचंड समाधान मिळतं अशी गोष्टचं सातत्यानं केल्याने त्यांना उद्योजकीय स्वातंत्र्य लाभते. उदाहरणार्थ: तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्यपुर्ण नवनिर्मिती हा एकमेव ध्यास असलेले 'अ‍ॅपल' चे जनक स्टीव्ह जॉब्स् आपल्या शेवटच्या श्वासा पर्यंत अविरतपणे आपला ध्यास असलेले कार्य करत होते. माझ्यामते 'उद्योजकीय स्वातंत्र्य' त्यांनी खर्‍या अर्थाने अनुभवले.

४) आर्थिक स्वातंत्र्य: कित्येक उद्योजक आपला व्यवसाय स्थापन करतात कारण त्यांना प्रचंड पैसा कमवायचा असतो. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर जर आपण एक दृष्टीक्षेप टाकला तर आपल्याला आढळून येईल की ही सर्व माणसे उद्योजक आहेत. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झालेल्या उद्योजकांकडे प्रचंड पैसा असतो. आर्थिक स्वातंत्र्य प्रात्प झालेली ही उद्योजकमंडळी एक सुखकर जीवन जगत असतात. जगातील सर्व भैतिक सुख त्यांना सहज परवडणारे असते. उदाहरणार्थ: 'रिलायन्स ग्रुपचे' जनक श्री. धीरुभाई अंबानी हे सुरुवातीपासुनच प्रचंड संपत्ती निर्माण करण्याचे स्वप्न पहायचे. आर्थिक स्वातंत्र्य त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे होते ते त्यांनी मिळवले. धीरुभाईंनी आपलं आणि इतरांचं जीवनही समृध्द केलं.

५) सामाजिक कार्याचं स्वातंत्र्य: बर्‍याच उद्योजकांना आपल्या समाजासाठी, राष्ट्रासाठी किंवा जगासाठी काहीतरी योगदान देण्याची प्रचंड इच्छा असते त्यामुळे ते उद्योजक होऊन आपल्या व्यवसायामार्फत सामाजिक गरजांना पुर्ण करण्याचे ठरवतात. काही उद्योजक आपल्या उत्पादन व सेवांव्दारे समाजाची गरज भागवतात, काही उद्योजक जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करुन सामाजिक गरज भागवतात, काही उद्योजक आपल्या व्यवसायातील नफा सामाजिक कार्यासाठी अर्पण करतात, काही उद्योजक राष्ट्राच्या प्रगतिला हातभार लावण्यासाठी धडपडत असतात, काही उद्योजक जगाच्या विकासासाठी अथकपणे कार्यरत असतात. आपण केलेल्या योगदानाव्दारे त्यांना उद्योजकीय स्वातंत्र्य प्राप्त होते. उदाहरणार्थ: मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेटस्, आज त्यांनी निर्माण केलेल्या संपत्तीव्दारे जगातील अडचणी दुरकरण्यासाठी कार्यरत आहेत. बी. व्ही. जी ग्रुपचे संस्थापक श्री. हणमंतराव गायकवाड भारताच्या विकासाला हातभार लावण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास उत्साहाने कृती करत आहेत. श्री. रामदेव बाबा यांनी पतंजली संस्थेव्दारे लोकांच्या उपयोगी, नाविन्यपुर्ण स्वदेशी उत्पादने स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे.

६) मानवी स्नेहसंबंधांचं स्वातंत्र्य: काही उद्योजक आपल्या महत्त्वाच्या नाते संबंधांच्या हीतासाठी व्यवसायात येतात. आपल्या कुटुंबियांच्या सर्व गरजा व इच्छा पुर्ण करण्यासाठी त्यांना व्यवसाय करणे योग्य वाटते. नोकरी करुन आपल्या स्नेहसंबंधांसाठी विशेष काही आपण करु शकणार नाही असं त्यांना जाणवतं आणि म्हणूनच ते उद्योजक बनण्याचा निर्णय घेतात. बरेच यशस्वी व्यवसाय हे 'फॅमिली मॅनेज्ड् व्यवसाय' असतात. पिढ्यान पिढ्या हे व्यवसाय सुरु असतात. उदाहरणार्थ: भारतातील फिटनेस इंडस्ट्रीजचे जनक श्री. मधुकर तळवलकर सर यांनी स्वतःच्या व्यायामशाळा सुरु करुन आपला ध्यास असलेल्या क्षेत्रात व्यवसाय सुरु केला परंतु त्यामागे आणखी एक महत्त्वाचा उद्देश आपल्या कुटुबियांना उज्ज्वल भविष्य देणे हा सुध्दा होता. आज तळवलकर सरांची चौथी पिढी त्यांच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यरत आहे. माझ्या मते मधुकर तळवलकर सर अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन जगण्याचे एक आदर्श उदाहरण आहेत.

७) यशस्वी होण्याचं स्वातंत्र्य: बर्‍याच उद्योजकांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची आंतरिक इच्छा असते. ही ओळख आपल्या व्यवसायाव्दारे होईल अशी आशा बाळगुन ते व्यवसाय सुरु करतात. व्यवसाय यशस्वी करुन आपण जगात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं असं त्यांना वाटत असतं. उदाहरणार्थ: श्री. दिपक सखाराम कुलकर्णी यांनी 'डी. एस. के.' अशी स्वतःची एक यशस्वी ओळख निर्माण केली. डी. एस. के. आज एक यशस्वी उद्योग समुह म्हणुन ओळखला जातो. निरनिराळ्या उद्योग क्षेत्रांमध्ये डी. एस. के. यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज डी. एस. के. उद्योजकीय स्वातंत्र्य अनुभवत आहेत.

मित्रांनो वरिल सात स्वातंत्र्यामधील सर्वच स्वातंत्र्य प्रत्येक उद्योजकाला हवी असतात असं मुळीचं नव्हे. या स्वातंत्र्यामधील काही स्वातंत्र्य आपल्याला महत्त्वाची वाटत असतील. मुद्दा हा आहे की आपण आपल्या व्यवसायाची जडणघडण अश्याप्रकारे केली पाहीजे की आपल्या व्यवसायामार्फत आपल्याला ही स्वातंत्र्य प्राप्त होईल. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन आपण अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगु शकू.
उद्योजक मित्रांनो, आपल्याला नेमंक कोणतं स्वातंत्र्य हवं आहे हे ओळखा. आपल्या व्यवसायाची उभारणी त्या नुसार करा. अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगण्याच्या दिशेने पाऊल उचला. लक्षात ठेवा, 'उद्योजकता' म्हणजे 'काही वर्ष असं आयुष्य जगणं हे इतर कोणी जगण्याचं धाडस करत नाहीत, जेणे करुन उर्वरित आयुष्य अश्याप्रकारे जगणं जे इतर कोणी जगु शकत नाही!' आशा करतो की आपण आपल्या उद्योजकीय प्रवासादरम्यान 'उद्योजकीय स्वातंत्र्य' अनुभवाल. शुभेच्छा!

'उद्योजकीय स्वातंत्र्य' अनुभवण्यासाठी पहीले पाउल उचला.
7666426654 या क्रमांकावर संपर्क करा किंवा 'FREEDOM' असे Whatsapp करा किंवा नाव नोंदवण्यासाठी खालील फॉर्म भरा. बॉर्न टु विनचे Growth Consultant आपल्याला संपर्क करतील. आजच मोफत one to one भेट घ्या. स्वतःमधील उद्योजकाला जागे करा!


26 August 2016

एक असामान्य यशोगाथा

संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम मिळालं आणि त्यानंतर ‘बीव्हीजी’चं नाव पसरतच गेलं. पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय. आज ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी. कितीतरी. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच.’’
“ माझ्या सभोवताली पैशावर
निजलेले उडय़ा मारणारे
गगनचुंबीत राहणारे
कोटय़धीश-अब्जाधीश
मीही माझ्या ध्रुवावर
सर्वापेक्षा उंचावर
जाण्यासाठी तप करणारा
जेथून कोणीच मला
पैशात तोलू शकणार नाही
भले मी निष्कांचन राहीन
पण ध्रुवावर जरूर जाईन !’’

हो. मी ध्रुवावर जायचं पक्कं केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, मार्गही माहीत नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित! त्यावेळची ही माझी कविता.
मी पुण्यात बिबवेवाडीतल्या व्हीआयटी कॉलेजात होतो. इंजिनीअरींगचे शिक्षण घेत होतो. वसतिगृहात राहायचो. त्याआधी फुगेवाडी ते बिबवेवाडी हे रोजचं ४२ किलोमीटरचं अंतर सायकलवरून कापायचो. वेळ खूप जात होता. म्हणून वसतिगृहात राहायचं ठरवलं. पण महिन्याचं ३०० रुपयांचं भाडं देण्याची ऐपत नव्हती. प्राचार्य खाडिलकर सरांना भेटलो. त्यांनी २५ रुपयांमध्ये राहायची परवानगी दिली. माझी इलेक्ट्रिकची शेगडी होती. तिच्यावर भात शिजवायचो. खालून करपायचा, वरून कच्चा. मधला काढून खायचो. इतर पोरं टिंगल करायची. ती कॅन्टीन, स्वीट मार्टमधून खायला आणायची. पाटर्य़ा करायची. मला रोजच्या भाकरीची भ्रांत होती.
दहापैकी दोन पोरं मदत करायची. शनिवार-रविवारी पार्टीला जायची, मग त्यांच्या जागी मला मेसला जेवायची संधी मिळायची. बाकी पोरं मजा पाहायची.. तेव्हा धडा शिकलो- तुमच्याकडं पैसा असेल तर हजारो लोक जवळ येतात, नसेल तर मजा पाहतात. लहानपणी प्रेरणा मिळावं असं वातावरण आजूबाजूला नव्हतं. पण नेहमीच मोठी स्वप्नं पाहायचो. हे कुठून आलं असेल? आता आठवतं, लहानपणी वडील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकायला न्यायचे. व्याख्यानांचे विषय असायचे- शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर. वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क. तोकडा पगार. ते सतत आजारी असायचे. आई-वडील, मी, धाकटा भाऊ भाडय़ाच्या खोलीत राहायचो. घरात लाइट नव्हती. चौथीत स्कॉलरशिप मिळाली. वर्गातल्या हुशार-श्रीमंत मुलांना मिळाली नव्हती, मला मिळाली. आत्मविश्वास वाढला. वडिलांनी शिक्षणासाठी पुण्यात आणलं. मुक्काम पोस्ट- फुगेवाडी. रामचंद्र फुगे चाळ. १० बाय १० ची खोली. वडिलांना जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. आजारपण सुरूच होतं. ते आजारी पडले की तीन-चार महिने बरे व्हायचे नाहीत. ससून, रुबी, बुधराणी, केईएम, िपपरीचं चव्हाण रुग्णालय फिरायचो. दरम्यान, आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तरीपण पैशाची चणचण असायचीच. पैशाची गरज पडली की आई कानातला दागिना, मंगळसूत्र सोनाराकडं तारण ठेवून व्याजानं ५००-१००० रुपये घ्यायची.
माझं नूमवि, मॉडर्न हायस्कूलला शिक्षण झालं. मी वर्गात हुशार. गणितात तर पैकीच्या पैकी मार्क पडायचे. मॉडर्नमध्ये गणिताच्या रासकर सरांचा मी आवडता विद्यार्थी. ते कधीच पैकीच्या पैकी मार्क द्यायचे नाहीत, पण माझा एक मार्क कुठं कापायचा, हा त्यांना प्रश्न पडायचा. या गणितानंच मला उभं केलं. कारण आयुष्यात गणितच तुमच्या कामी येतं.
दहावीत चांगले मार्क मिळाले. आईच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सुचवलं- डिप्लोमाला घाला. मग गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये गेलो. सायकलने जायचो. याच काळात वडील गेले. त्यांचं वय होतं- ४५ वष्रे नि माझं १८.
वडिलांना कपडय़ांची हौस होती. त्यांना थ्री-पीस सूट आवडायचा. त्यांनी जाण्यापूर्वी महिनाभर आधी सूट शिवायला टाकला होता. ते गेल्यावर मी तो घेऊन आलो. त्या प्रसंगानं सांगितलं- ‘माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही.’ काहीशी विरक्ती आली. त्याच वेळी ठरवलं, काहीतरी वेगळं, इतरांसाठी करायचं. ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बीव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूरांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणं, सॉस-जॅमच्या बाटल्या विकणं, घरं रंगवून देणं अशी कामं घेणं सुरू केलं.


इंजिनीअर बनायचं होतं. त्यासाठी औरंगाबादला प्रवेश मिळत होता, पण आईच्या आग्रहाखातर पुण्यातच राहिलो. व्हीआयटीला प्रवेश मिळाला, पण फीसाठी आईने मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेतून १५ हजारांचं कर्ज काढलं. माझा रोजचा ४२ किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात वडिलांच्या सेवेतील काही रक्कम मिळाली. इतर काही पैसे जुळवून गुरव-िपपळे येथे प्लॉट घेतला. त्यावर घर बांधलं. पैशाची गरज होती. कॉलेजला प्रॅक्टिकलपुरतं जायचो. बाकी कामाच्या मागे लागलो.
तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडं सिव्हिलची कामं होती. त्यांच्याकडं गेलो. माझं शिक्षण सुरू होतं इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं आणि हे काम होतं सिव्हिलचं- काँक्रीटचा रस्ता करण्याचं. तीन लाख रुपयांचं कंत्राट होतं. मलाही घर बांधण्याचा अनुभव होता. एजन्सीला सांगताना ‘नरोवा-कुंजरोवा’ केलं. ‘डिप्लोमा केलाय, इंजिनीअरींग करतोय’ असं सांगितलं. पण कुठल्या विषयाचा हे बोललोच नाही. काम मिळालं, ते सात दिवसांत पूर्ण करायचं होतं. खर्च जाऊन दीडेक लाख रुपये सुटणार होते. मजुरांची जुळवाजुळव केली. आपल्याला पैसे मिळणार म्हणून मजुरांनाही जास्त मजुरी दिली. महिला-पुरुष अशा एका जोडीला दीडशे रुपये मिळायचे. मी अडीचशे रुपये दिले. शिवाय सकाळी चहा-वडापाव आणि रात्री त्यांना लागणारं त्यांचं आवडतं पेय. मजूर मंडळी खूश होती. शंभर जोडय़ा, पन्नास गाढवं मिळून पाच दिवसांतच काम उरकलं.
त्याचदरम्यान लातूरचा भूकंप झाला, पैसे अडकले. मध्ये पाऊस झाला. त्यात आमचा रस्ता वाहून गेला. चूक समजली. लेव्हल केली नव्हती. डोक्याला हात लावला. रस्ता पुन्हा केल्याशिवाय पैसे मिळणार नव्हते. रस्ता करण्यासाठी हाती पैसे नव्हते. मजुरांना हे समजलं. ते मदतीला धावून आले. त्यांनी पैसे न घेता काम केलं. सिमेंट, वाळूसुद्धा त्यांनीच मिळवली. रस्ता उत्तम झाला. पैसे मिळाले. सर्वाचे पैसे भागवून वर फायदाही झाला. आयुष्यात असे प्रसंग येत गेले, तेव्हा निराश न होता स्वत:च स्वत:ला प्रेरणा देत राहतो. विवेकानंदांचे ते शब्द उपयोगी पडले. आजही पडतात..

‘जेव्हा दशदिशा अंधकाराने भरून गेल्या होत्या,
तेव्हा मी म्हणत होतो- झुंजा, झुंजत पुढे चला..

आज आशेच्या प्रकाशानं दशदिशा किंचित उजळल्या असतील, तरीदेखील तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला!’

पुढं इंजिनीअरींगसाठी वसतिगृहात गेलो. एक सत्य समजलं, ‘जग नेहमीच प्रचंड अपमान करतं. ते मनाला लावून घ्यायचं नाही. तुम्ही हिरे असाल, तरी ते तुम्हालाच सिद्ध करावं लागतं..’ १९९४ साली बी.टेक.ची पदवी मिळाली. ‘टेल्को’मध्ये (आताची ‘टाटा मोटर्स’) ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. पगार- महिना सात हजार रुपये. टेल्को म्हणजे प्रतिष्ठेची नोकरी. तिथं नोकरी करत असतानाही घरं रंगवून देण्याची वगरे कामं सुरूच होती. कंपनीत भंगारमध्ये तांब्याच्या वापरलेल्या तारा होत्या. त्यांचा कंपनीसाठी उपयोग केला आणि कंपनीचे अडीच कोटी रुपये वाचवले. त्यामुळे माझ्यावरचा विश्वासही वाढला.
दरम्यान, माझ्या गावाकडून कामाच्या आशेनं मुलं माझ्याकडे येत होती. मी कर्मचारी असल्याने कंपनीतल्या कामाची कंत्राटं घेऊ शकत नव्हतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवला- एखाद्या संस्थेतर्फे कामं घ्या. मग ‘भारत विकास प्रतिष्ठान’द्वारे हाऊसकिपींगचं काम घेतलं. ही गोष्ट १९९७ मधली. इंडिया गाडीचा प्रकल्प उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम घेतलं. आठ लोक होते. त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलंच नाही. वाट्टेल ते काम द्या, नाही म्हणायचं नाही. हे आमचं तत्त्व. तेच कामी आलं.
गावचा मित्र उमेश माने हा माझ्यावर विश्वास टाकणारा पहिला माणूस. त्यांनी प्रतिष्ठानच्या कामासाठी नोकरी सोडली. कंत्राटं मिळवणं, पैशाची जुळणी करणं हे माझं काम आणि काम करून घेणं ही उमेश माने यांची जबाबदारी. पहिल्या वर्षीची उलाढाल होती आठ लाख रुपये. पुढच्या वर्षी ती झाली ५६ लाख रुपये. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे आम्हाला काम देणारे लोकच आमची प्रसिद्धी करत होते. आपोआप कामं मिळत होती. १९९९ मध्ये लग्न झालं. पत्नी वैशालीने घरची जबाबदारी उचलली. मग नोकरी सोडून हे काम पूर्णवेळ करायला लागलो. पुढे जनरल इलेक्ट्रिकल्सच्या (जीई) प्लँटचं स्वच्छतेचं काम मिळालं. बंगळुरूला जावं लागणार होतं. विलंब न करता मी, उमेश आणि आठ कामगार तिथं धडकलो. आमचे प्रेरणास्रोत शिवाजी महाराज. त्यांनी दक्षिणेवर स्वारी केली होती. आम्हीसुद्धा त्यांच्याच मातीतले ना! कंपनीचं दोन दिवसांनी ओपनिंग होणार होतं. त्याआधी प्लँट चकाचक केला. कामाची गुणवत्ता पाहून लोक समाधानी होते. मग चेन्नई, हैदराबाद अशी इतर शहरांमधली कामं मिळाली. कामाला नाही म्हणत नव्हतोच. रेल्वे स्थानकं, विमानतळ, रुग्णालये यांच्या स्वच्छतेचं काम घेतलं.. विस्तार वाढत असताना कर्मचाऱ्यांबाबत एक सूत्र कायम ठेवलं. कामावर देखरेख करणारा सुपरवायझर गावातला, विश्वासाचा माणूस, ३० टक्के कर्मचारी पुण्याहून-गावाहून पाठवलेले आणि ७० टक्के स्थानिक कर्मचारी. त्यामुळे कुठंही कामात अडथळा आला नाही.. अजून सारं सुरळीत सुरू आहे.

आणि म्हणूनच असेल कदाचित, मी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झालीच. कधी तीन दिवसांतच, तर कधी १०-१५ वर्षांनी. १९९७ मध्ये पहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच स्वप्न पाहिलं- आपल्याला संसदेच्या हाऊसकिपींगचं काम मिळालं तर.? तेव्हा माहीतही नव्हतं, तिथं काय पद्धत असते. पण २००३ साली हे स्वप्न पूर्ण झालं. ‘बीव्हीजी’चं नाव वाढत होतं. ते आता दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. संसदेच्या ग्रंथालयाचं कंत्राट मिळालं. देखभालीचं काम. तिथं श्रीनिवासन नावाचा शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मुख्य अभियंता होता. त्याला भेटून विश्वास दिल्यावर काम मिळालं, पण ते सहा महिन्यांपुरतंच. चांगलं केलं तर पुढं सुरू ठेवणार, नाहीतर हाकलून देणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी ४० लाख रुपयांची दर्जेदार यंत्रणा विकत घ्यायला लागणार होती. काम सुरू राहिलं नाही तर ही यंत्रणा पांढरा हत्ती ठरणार होती. पण स्वत:वर विश्वास होताच. काम सुरू केलं. ते सुरूच राहिलं. श्रीनिवासन खूश झाले. त्यांनी पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं दिली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘बीव्हीजी’चे कर्मचारी बाहेरचीच स्वच्छता पाहत होते. बाहेरचा परिसर इतका स्वच्छ पाहून खासदारांनीच याबाबत विचारणा केली. मग थेट लोकसभेच्या सभापतींनी परवानगी दिली, तेव्हा ‘बीव्हीजी’चा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश झाला. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेत चालण्यासाठी लाल दगडांचा मार्ग होता. तो धूळ बसून काळा झाला होता. तो पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केल्यासारखं अनेकांचा विश्वास बसत गेला. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या वास्तूला ‘बीव्हीजी’ची सेवा मिळू लागली. आज एकटय़ा दिल्लीत ‘बीव्हीजी’चे नऊ हजार लोक काम करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी.. कितीतरी ग्राहक आहेत. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था, आस्थापना ग्राहक आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच. आता विविध क्षेत्रांमध्ये उतरलोय.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस रुग्णवाहिकेचे (डायल १०८) कंत्राट ‘बीव्हीजी’कडं आहे. त्यासाठी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. याशिवाय लँडस्केप-गार्डनिंग, टेक्निकल सर्व्हिसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलार पार्क, एलईडी लायटिंग, सोलार पंप, प्लास्टिकपासून इंधन, फूड पार्क अशा अनेक क्षेत्रांत जम बसवतो आहे. ‘नॅशनल इन्नोव्हेशन फाउंडेशन’शी भागीदारी केली आहे. त्याद्वारे विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनांमध्ये प्रवेश केला आहे.

मी इतके सारे उद्योग कसे करू शकतो? कारण माझ्या वाटचालीत विविध टप्प्यांवर भेटलेले असंख्य लोक आज माझ्यासोबत ‘बीव्हीजी’मध्ये आहेत. मी कार्यक्षम माणसं शोधतो आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो. बस्स.. हा संच वाढतो आहे, उत्तरोत्तर अधिकच वाढत जाईल. ‘बीव्हीजी’चं ब्रीदवाक्यच आहे- ‘ह्य़ुमॅनिटी अहेड!’

२०२० पर्यंतचे उद्दिष्ट आहे दोन लाख कर्मचारी आणि कंपनीची १० हजार कोटींची उलाढाल! हे सर्व करताना माझ्या कर्मचाऱ्यांचा, सामान्य माणसांचा विचार असतो. कर्मचाऱ्याला इतर कंपन्यांपेक्षा दोन पैसे जास्तच मिळतात. त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून इतर क्षेत्रांत प्रवेश करतोय. शासनाच्या विविध योजनांतून माझ्या ६०० कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात घरे देऊ शकलो. जे.आर.डी.टाटा हे उद्योगातील आदर्श आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो- सामाजिक बांधीलकी, कामाची पद्धत, एकजीनसीपणा. त्यामुळेच ‘बीव्हीजी’च्या मुख्यालयाला (चिंचवड, पुणे) नाव दिलंय- ‘बीव्हीजी हाऊस’! टाटांच्या ‘बॉम्बे हाऊस’चा हा प्रभाव!
लोकांचा विचार करत गेलो की आपोआप पैसा मिळतो. मी हेच करत आलो. त्यामुळे मीसुद्धा मोठा झालो. कधी गैर काम करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाला फॉलो करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, संधी मिळाली तरी अनैसर्गीक नफ्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे कधीही डोळे मिटले तरी शांत झोप लागते.
सर्व थरांत लहानमोठय़ा लोकांमध्ये वावरतो. राजकीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वाशी मैत्री आहे. त्यामुळे अनेकांचे गरसमज होतात, पण कोण काय म्हणतं याकडं लक्ष न देता पुढं जात राहतो. त्याच वेळी कामगाराशी खांद्यावर हात टाकून बोलतो. त्यात काही वेगळं- विशेष वाटत नाही. आता इतकी पत कमावली आहे की, शेकडो कोटींचं कर्ज द्यायला बँका तयार आहेत. पण पूर्वी आईसाठी फ्रीज, वाॅशिंग मशीन घ्यायला कोणी कर्ज देत नव्हतं, ही परिस्थितीही विसरलेलो नाही. म्हणून जमिनीवरूनच चालतो.
खरंतर आता थांबलो तरी वैयक्तिक काही बिघडणार नाही. पण लोकांना जोडणं हे माझं व्यसन आहे. शिवाय आजच्या जगातही सरळ मार्गाने मोठं होता येतं, इतरांनाही मोठं करता येतं, हे दाखवून द्यायचंय. त्यासाठी मला कार्यरत राहावंच लागेल. कारण माझा आजही तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला !

सौजन्य: लोकसत्ता वृत्तपत्र 

हणमंतराव गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळवा लक्ष्यासिद्धी सोहळ्यामध्ये

!! लक्ष्यसिद्धी सोहळा !!
विषय: एक असामान्य यशोगाथा
दिनांक: 31 ऑगस्ट 2016
वेळ: सायंकाळी 6 वाजता
स्थळ: मैसूर असोसिएशन सभागृह, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)
प्रवेश विनामुल्य... अनुभव अमुल्य!
नाव नोंदणीसाठी संपर्क: 7666426654, 9619465689
नाव नोंदवण्यासाठी खालिल Form भरा





26 June 2014

सुसज्ज व्हा यशस्वी व्हा! - Get Ready to Get Success

नमस्कार मित्रांनो
बॉर्न टू विन प्रस्तुत सहा तासांची जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळा

यशस्वी माणसांमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात जे त्यांनी मिळवलेल्या यशासाठी कारणीभुत असतात? जाणुन घ्या आणि उत्तुंग यश मिळवण्यासाठी स्वत:ला घडवा... सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!

पहा जबरदस्त प्रेरणादायी व्हिडी



मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच व्यक्तींना यशस्वी माणसांबद्दल प्रश्न पडतात....
  • यशस्वी माणसांमध्ये असे नेमके काय असते, ज्यामुळे ते यश संपादन करतात?
  • सर्व यशस्वी माणसांमध्ये कोणत्या गोष्टी समान असतात?
  • इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात येते कूठून?
  • इतरांपेक्षा काय वेगळेपण त्यांच्यात असते?
  • आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने कॄती करण्यास त्यांना कूठून प्रेरणा मिळते?
  • आपल्या क्षमतांचा पुरेपुर वापर ते कोणत्या गुणांमुळे करतात?

वरील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात देणे अशक्य आहे. यशस्वी होण्यासाठी नक्कीच भरपुर गुण आपण स्वतःमध्ये अंगिकारले पाहीजेत. परंतु यशस्वी माणसांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की यशस्वी माणसांच्या व्यक्तीमत्वामध्ये सात मुलभुत गुणधर्म असतात. ह्या सात मुलभुत गुणधर्मांना कळत- नकळतपणे यशस्वी व्यक्तींव्दारे जोपासले गेल्यामुळे त्यांनी जगात आपले अव्दीतीय स्थान निर्माण केले. ह्या सात मुलभुत गुणधर्मांना सतत खतपाणी घातल्याने ते पेटून उठतात व उत्तरोत्तर यशस्वी होतात.

हे सात मुलभुत गुणधर्म आपणही स्वतःमध्ये अंगिकारुन जोपासु शकतो आणि त्यांचा विकास करु शकतो. 'सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!' या बॉर्न टू विनच्या जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळेत आपण हेच जाणुन घ्याल व यशस्वी होण्यासाठी सज्ज व्हाल!



हि कार्यशाळा कोणासाठी?
  • उद्योजक किंवा प्रोफेशनल्स
  • स्वयंरोजगारकर्ते किंवा नोकरदार
  • गृहीणी किंवा विद्यार्थी
  • लिडर किंवा मॅनेजर


दिनांक: गुरुवार,१० जुलै २०१४

वेळ: दुपारी ३ वाजता

स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)

गुंतवणुक रु.: १२००/-, १०००/-, ८००/-

प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ९६१९४६५६८९, ७६६६४२६६५४

12 June 2014

जागवा आपल्यातील नेतृत्व

जागवा आपल्यातील नेतृत्व
सी. ई. पोतनीस, सकाळ, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
नेतृत्व ही नैसर्गिक देणगी आहेकी आत्मसात करता येणारं कौशल्ययाविषयी बहुतेकांचं दुमत आहे. तरीही साधारणपणे नेतृत्व ही नैसर्गिक देणगी आहेअसेच अनेकांचं मत असतं. खरं तर नेतृत्व आणि व्यवस्थापन हे गुण प्रत्येक व्यक्तीत उपजतच असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हे गुण म्हणण्यापेक्षा नैसर्गिक गरज म्हणणंच रास्त ठरेल. या भौतिक जगात जगण्याकरता व पुढं जाण्याकरता काही मूलभूत साधनांचीगुणांचीकौशल्यांची गरज असते. ही सर्व साधनं परमेश्‍वरानं आपल्याला उपलब्ध करून दिलेली असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हेही असंच मूलभूत साधन आपणा सर्वांकडं असतंच. आपल्यात नेतृत्वाचे व व्यवस्थापनाचे गुण आहेतही जाणीव अन्‌ विश्‍वास आपल्याला नसतो. त्यामुळंच नेतृत्व हे काही मोजक्‍या जणांसाठीच आहेही सर्वसाधारण धारणा असतेतसेच नेतृत्व अन्‌ व्यवस्थापन ही केवळ व्यवसाय/ सामाजिक क्षेत्रात अधिकारपदावर असलेल्या लोकांचीच गरज आहेअसाही समज आहे. या धारणेमुळं आपल्यातल्या नेतृत्वाविषयीच्या अन्‌ व्यवस्थापनाविषयीच्या गुणांकडं लक्षही दिलं जात नाही.


मानवानं अनेक शोध लावले. शोधच (Discovery) म्हणता येईलनवशोध (Invention) म्हणता येणार नाही. कारण निसर्ग म्हणजेच विपुलता व उपलब्धता. निसर्गात सर्वच आहे. मानवानं केवळ आहे त्या वस्तूंची जोडणी करूनमांडणी बदलून नवीन वस्तू शोधून काढल्या. हेच नेमकं आपल्याबाबतही लागू आहे. आपणही गुण-कौशल्यांची खाण आहोत. आपल्यातही विपुलता व उपलब्धता आहे. आपल्यात असलेले गुण आपल्याला शोधून काढायचे आहेत. त्या गुणांची जोडणीमांडणी करून नवीन कसबकौशल्य निर्माण करायचं आहे. नेतृत्वव्यवस्थापनाचं कसब हे अशातलंच एक आहे. आपण प्रत्येक जण ते वापरतही असतो. हे अर्थात नकळत,अजाणतेपणानंक्वचित व अपघातानं वापरलं जातं. तसंच ते बहुधा सुप्तावस्थेत असतं.

व्यवसायनोकरीसामाजिक क्षेत्रांत जेव्हा कामाचा व्याप मोठा व हाताखाली काम करणारे सहकारी असतातफक्त तेव्हाच नेतृत्व आणि व्यवस्थापन आवश्‍यक असतंअशीच बहुतेकांची समजूत असते. अशा वेळी नेतृत्वाची खरी कसोटी लागतेयाबाबत शंकाच नाहीपरंतु हे सर्व काही नसतानाही नेतृत्व आणि व्यवस्थापनाची गरज असतेचहे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण स्वतःपुरतंच मर्यादित काम करत असतोतेव्हाही या गुणांचा वापर होत असतो वा होणं अपेक्षित आहे. नेतृत्व काही केवळ हाताखाली किंवा समवेत सहकारी असतानाच होतंअसं नाही. स्वतःचं स्वतःकरता नेतृत्व आणि व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. याची खरी सुरवात तर वैयक्तिक पातळीवरच होत असतेतसेच स्वतःकरताचं व्यवस्थापनही गरजेचं आहे. प्रथम नेतृत्व अन्‌ व्यवस्थापनातला फरक समजून घेऊया. नेतृत्व म्हणजे ध्येय ठरवणंदूरदृष्टी असणंदिशा देणंप्रोत्साहित करणं,विश्‍वास संपादन करणं व उंचावणंइत्यादी. व्यवस्थापन म्हणजे ठरवलेल्या ध्येयाकडं आखलेल्या दिशेनं कूच करणं. यात योजनावेळेचं नियोजनकामाची आखणीअसलेल्या साधनांचा परिणामकारक वापर करणं इत्यादी गोष्टी येतात. विचार केल्यास लक्षात येईलकी हे सर्व स्वतःलाही लागू आहे. चांगल्या नेतृत्वाशिवाय आणि व्यवस्थापनाशिवाय चांगलं आयुष्य जगणं अशक्‍यच आहे. त्यामुळंच विद्यार्थीगृहिणीनोकरदारव्यावसायिक अशा सर्वांनाच आपल्यातलं नेतृत्व शोधणं आवश्‍यक आहे. आपल्या आयुष्याला ध्येय हवंदिशा हवीस्वतःला प्रोत्साहित ठेवता गरजेचं आहे. त्याशिवाय योजना व वेळेचं नियोजनइत्यादीही साधता आलं पाहिजेहेच तर स्वतःचं नेतृत्व व व्यवस्थापन.

आपण प्रत्येकजण हे गुण वापरत असतोच. त्यांचा आवाका कमी-जास्त असतो. त्यात सातत्य नसतं. बऱ्याचदा त्यांचा वापर नकळतच होतो. संकटातअतिमहत्त्वाच्या प्रसंगीअचानक जबाबदारी पडल्यावर हे सुप्त गुण जागृत झाल्याचं आढळतंअशी अनेक यशस्वी उदाहरणं आपल्या पाहण्यात असतील. असंच एक उदाहरण म्हणजे मदर तेरेसा यांचं. कॅथॉलिक शाळेत शिकवणारी ही संन्यासिनी. मुख्याध्यापिका होऊन शाळेचं नेतृत्व आपल्याला करता येईलयाचा विश्‍वासही नसलेली ही संन्यासिनीपरंतु गरिबातल्या गरिबांच्या दारिद्र्यानं आणि दुःखानं ती हेलावली. त्यातूनच नेतृत्व जागृत झालं. प्रेमाच्या झऱ्यानं आणि नेतृत्वाच्या आधारानं तिनं उभारलेली संस्था जगभरात सर्वत्र सेवा पोचवत आहे.

आपण प्रत्येक जण काही ना काही तरी निर्णय घेत असतोनिवड करत असतोएक दिशा ठरवत असतोत्या मार्गानं चालत असतो. समस्या एवढीच आहेकी हे सगळं आपण अजाणतेपणाच्या अवस्थेतून करत असतो. नेतृत्वासारख्या अन्‌ व्यवस्थापनासारख्या गुणांना आपण आकार दिलेला नसतो. जाणीवपूर्वक त्या गुणांना जोपासलेलं नसतं. त्यामुळं अपघातानंच व क्वचित या गुणांची चुणूकही आपल्याला जाणवते. सराव नसलेला खेळ खेळताना अचानक आपल्याकडून एखादी सुंदर खेळी होते! ती चुकूनम्हणजेच अपघातानंघडलेली असते. आपल्यातली ही खेळी वारंवार व आपल्याला हवी तेव्हा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या जाणीवपूर्वक व सततच्या प्रयत्नांतूनच हे कौशल्यकसब निर्माण होतं व कायमस्वरूपी साथ देतं. त्यानंतर अपघातानंच नव्हेतर ठरवून हवा तो परिणाम घडवून आणता येतोतसंच नेतृत्व अन्‌ व्यवस्थापन हे जाणिवेच्या पातळीवरच घडवणं आवश्‍यक असतं.

व्यावसायिकसामाजिक आदी क्षेत्रांतल्या नेतृत्वाची व्याप्ती जास्त असते. त्यात इतरांना दिशा देणंप्रोत्साहित ठेवणं आदींची जबाबदारीही आपल्यावर असते. या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी तशी आवड तर हवीचपण त्यासाठी मोठी तयारीही हवी. वैयक्तिक नेतृत्व व व्यवस्थापनावर पकड असल्याशिवाय इतरांचं नेतृत्व करणं व इतरांचं व्यवस्थापन सांभाळणं अशक्‍यच. दुर्दैवानं अनेक जण अशा नेतृत्वात तयारीविना पडलेले असतात. नोकरीमधल्या काही वर्षांचा अनुभव काहींना ओघानं त्यात नेतो. मागच्या काही वर्षांतलं यश हे नेतृत्वातही यश देईलहा अत्यंत चुकीचा समज. यात यश मिळवण्यासाठी बरीच तयारी लागते. खरं तर आपल्यातलं नेतृत्व आधी विकसित होऊन नंतरच तसं पद मिळावं. लोक पदाच्या मागं असतातपण नेतृत्व व व्यवस्थापन विकसित करण्यावर त्यांचं लक्ष नसतं. त्यामुळंच या पदांवर अनेकांची केविलवाणी अवस्था होते. हाताखाली सहकारी असतातपरंतु नेतृत्वाचा अभाव असतो. असं नेतृत्व संस्थेचंतसंच सहकाऱ्यांचंही नुकसान करतं.

व्यावसायिकसामाजिक इत्यादी क्षेत्रांत नेतृत्व करायचं की नाहीहा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा प्रश्‍न. प्रत्येकानं या दिशेला वळलं पाहिजे असंही नाहीपरंतु अशा नेतृत्वाची जर महत्त्वाकांक्षा असेलतर सर्वप्रथम स्वतःसंदर्भात काम करणं गरजेचं आहे. वैयक्तिक पातळीवर नेतृत्वावर आणि व्यवस्थापनावर पकड असलीच पाहिजे. स्वतःला दिशा नसेल तर दुसऱ्यांना काय दिशा देणारस्वतःला ध्येय नसेल तर इतरांच्या ध्येयपूर्तीला काय मदत करणारस्वतःचं नियोजन करता येत नसेलतर इतरांना व्यवस्थापन काय शिकवणारस्वतःला प्रोत्साहित ठेवता येत नसेल तर इतरांना काय प्रोत्साहन देणारअशा नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा नसली तरी केवळ आपल्यासाठीही हे गुण विकसित करणं गरजेचं आहे. स्वतःचं स्वतःवरचं नेतृत्व व व्यवस्थापन आपल्या जीवनाला हेतू देतं. सर्वांगीण विकास घडवतं. यातूनच आपलं जीवन खुलतं-फुलतं.

नेतृत्व विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. निर्णय घेण्यानंच निर्णयशक्ती वाढते. प्रत्येक निर्णयाच्या परिणामातून जाणीवपूर्वक शिकता येतं. त्यातूनच योग्य निर्णय घेण्याची तयारी होते. ध्येयनिश्‍चितीस्वतःवरचा विश्‍वासवेळेचं नियोजन यावर काम करावं. प्राधान्य कशाला द्यावं हे जाणीवपूर्वक ठरवणं गरजेचं आहे. सातत्यानं या गोष्टींचा जाणीवपूर्वक सराव केल्यास नेतृत्व व व्यवस्थापन विकसित झाल्याखेरीज राहणार नाही. इतरांबरोबरच्या नेतृत्वामध्ये प्रामाणिकपणा व विश्‍वासार्हता याला सर्वांत अधिक महत्त्व आहेहे जाणावं. स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं हित महत्त्वाचंहा नेतृत्वातला महत्त्वाचा गुण. याच्याशिवाय आपण खरं नेतृत्व देऊ शकणार नाहीहे ध्यानी ठेवावं. जबाबदारी घेणं हादेखील नेतृत्वातील एक महत्त्वाचा गुण. आपल्या आयुष्याची जबाबदारी ही केवळ आपलीच. आपल्यातलं नेतृत्व जागवाजीवनाला दिशा द्या. जीवन घडवा.


31 May 2014

फ्युचर पाठशाला जोश २०१४ व ५वा उद्योगस्फुर्ती सोहळा


नमस्कार!

मित्रांनो टिम बॉन टू विनला आपल्याला कळवण्यास आत्यंत आनंद होत आहे की दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखिल उन्हाळी सुट्टी दरम्यान फ्युचर पाठशाला हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरळीतपणे पार पाडला. त्याच बरोबर फ्युचर पाठशालाचा समारोप नेहमी प्रमाणे फ्युचर पाठशाला जोश २०१४ या धमाकेदार कार्यक्रमाने झाला. दिनांक २५ मे २०१४ रोजी, यशवंत नाट्यमंदिर मध्ये अतिशय उत्साहवर्धक व भारावून टाकणार्‍या वातावरणात फ्युचर पाठशाला जोश कार्यक्रम पार पडला. फ्युचर पाठशालाचे वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थींनी आपल्या प्रेरणादायी परफॉर्मन्सव्दारे हा कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांना मोहीत करुन टाकलं. कर्यक्रमातील ऊर्जा व तरुणाईचा जल्लोष खरोखरच जबरदस्त असा होता. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनी देखिल तेवढंच एंजोय केलं. 

कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...






 




खास तुमच्यासाठी झी २४ तास ने घेतलेला फ्युचर पाठशाला जोश २०१४ चा आढावा



मित्रांनो, बॉन टू विनचा फक्त उद्योजकांसाठी असणारा एक अत्यंत परिणामकारक प्रशिणक्रम म्हणजे लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांस. हा एक वर्षाचा जबरदस्त असा प्रवास आहे ज्याच्या मदतीने कोणताही लघुउद्योजक त्याच्या उद्योगाचे यशस्वी व्यवसायामध्ये रुपांतर करु शकतो. लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसची पाचवी बॅच सध्या अंतीम टप्प्यात आलेली असुन, याच बॅचचा पदवीदान समारंभ म्हणजेच पाचवा 'उद्योगस्फुर्ती सोहळा' दिनांक ७ जुन २०१४ रोजी, शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसच्या पाचव्या बॅचच्या सर्व प्रशिक्षणार्थींचा पदविका देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्यांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कृत देखिल करण्यात येणार आहे.

उद्योगस्फुर्ती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे, लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसच्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या Business Case Study Presentations. लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसच्या पाचव्या बॅचचे १० यशस्वी प्रशिक्षणार्थी लक्ष्यवेध व लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांस दरम्यान व्यावसायिक प्रवास आपल्या प्रेझेंटेशनद्वारे उलघडणार आहेत. हे १० Presentations प्रचंड प्रेरणादायी असे असतील व प्रत्येक लघुउद्योजकाला मार्गदर्शक असे असतील. म्हणुनच प्रत्येक लघुउद्योजकाने ह्या कार्यक्रमाचा अनुभव घ्यावा असा हा अद्वीतीय कार्यक्रम असणार आहे. 
पाचव्या उद्योगस्फुर्ती सोहळ्याचे प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक असणार आहेत, सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर, मॅक्सेल फाउंडेशनचे संचालक व 'प्रगतीचा एक्सप्रेस वे' या पुस्तकाचे लेखक श्री. नितीन पोतदार सर. त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात येईल व एका उद्योजक प्रशिक्षणार्थीला 'सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार' प्रदान करण्यात येईल. नितीन पोतदार सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन देखिल उपस्थितांना लाभणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम प्रत्येक उद्योजकाला स्फुर्ती देणारा असणार आहे.



तर मग ७ जुन ला नक्की या!
दिनांकः शनिवार, ७ जुन २०१४
वेळः सकाळी ठिक १० वाजता
स्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
प्रवेश विनामुल्य
धन्यवाद!
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites