नमस्कार!
२६ एप्रिल महाराष्ट्र टाईम्समध्ये महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समुहाचे मालक श्री मुकेश अंबानी यांचा 'होय, मी महारष्ट्राचा' हा लेख आला होता. जर आपण तो लेख वाचला नसेल तर आपण तो जरुर वाचावा. मी असं म्हणेन प्रत्येक मराठी माणसाने वाचावा असा हा लेख आहे. या लेखात श्री. मुकेश अंबानी यांनी स्पष्टपणे म्हंटले आहे की 'मराठी माणसाला धंदा करता येत नाही, हा आता इतिहास झालाय.' या लेखाद्वारे त्यांनी मराठी माणसाचे कामामध्ये झोकून देणे, मुल्यांबाबतचा आग्रह, शिक्षणाला दिलेले महत्त्व व सतत शिकत रहाण्याची प्रवृत्तीबद्दल कौतुक केले आहे. एकंदरीतच हा लेख म्हणजे संपुर्ण मराठी समाजाचा एक प्रकाराचा सन्मान आहे असे मला वाटते व तो ज्या व्यक्तीद्वारे झाला आहे ते याहून ही महत्त्वाचे.
आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे श्री. मुकेश अंबानी यांनी लिहीलेल्या लेखामधील जे मुद्दे आहेत त्याला अनुसरूनच श्री. नितीन पोतदार यांनी आपले सविस्तर विचार गेल्या दोन वर्षांपासुन सातत्याने आपल्या लेखाद्वारे मांडले आहेत. लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये गेल्या दोन वर्षांपासुन श्री. नितीन पोतदार मराठी समाज व उद्योजकता या विषयावर आपले ज्वलंत विचार त्यांच्या लेखांद्वारे मांडत आहेत. त्यांचे महाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा, जय महाराष्ट्र! , मराठी मिल्लिओनैरे व ........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे! हे लेख जर आपण वाचलेत तर आपणास लक्षात येईल श्री. मुकेश अंबानी यांनी जे विचार संक्षिप्त स्वरुपात मांडले आहेत तेच विचार श्री. नितीन पोतदार यांनी सविस्तरपणे आपल्या लेखांमध्ये मांडले आहेत.
आपणास श्री. नितीन पोतदार यांचे मराठी समाज व उद्योजकाविषयीचे लेख वाचायचे असल्यास त्यांचा ब्लॉग (www.nitinpotdar.com) नक्कीच वाचा. त्यांच्या ब्लॉगवर आपणास त्यांचे आतापर्यंतचे सर्व लेख वाचावयास मिळतील.
मी आपणास विनंती करतो श्री. नितीन पोतदार यांचा ब्लॉगचा आपल्या मराठी बांधवांमध्ये प्रचार करावा. किमान दहा मराठी माणसांना त्यांच्या ब्लॉगची लिंक आपण इ-मेल अथवा एस्. एम्. एस्. द्वारे पाठवावी. जेणे करून मराठी उद्योजकांबद्दलचे त्यांचे प्रभावी विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील.
धन्यवाद!
आपला विश्वासु
अतुल राजोळी
बॉर्न टू विन