४ एप्रिल २०१० हा दिवस संपुर्ण बॉर्न टू विन टिम व लक्ष्यवेधचे सर्व प्रशिक्षणार्थी कधीच विसरु शकणार नाहीत. लक्षवेधच्या तिसर्या बॅचचा लक्ष्यसिध्दी सोहळा (लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचे शेवटचे सत्र) व लक्ष्यवेधचा पहीला स्नेहळमेळावा ४ एप्रिल २०१० रोजी पार पडला आणि त्यावर दुग्धशर्करा योग म्हणजे प्रसिध्द Corporate Lawyer नितीन पोतदार सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून आम्हाला लाभले. एवढेच नव्हे तर त्यांनी "...तरच मराठी उदयोजकाची पाऊलं पडतील पुढे!" या विषयावर लक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम अतिशय दणदणीतरित्या पार पडला. नितीन पोतदार सर येणार म्हणजे लोकांची तुडूंब गर्दी होणार एवढं तर नक्कीच होतं आणि तसच झालेही माटूंग्याचा कर्नाटक संघ हॉल लोकांनी खचाखच भरला होता. सर्व जण आतुर होते ते पोतदार सरांकडून मोलाचे मार्गदर्शन घेण्यासाठी व लक्ष्यवेधच्या प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी.
कार्यक्रमाच्या पुर्वार्धात लक्ष्यवेधच्या सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचे नितीन पोतदार सरांच्या हस्ते सर्टीफिकेट व पुरस्कार देऊन सत्कार समारंभ अतिशय जोशात पार पडला. एकूण २७ प्रशिक्षणार्थी लक्ष्यसिध्दी पुरस्काराचे मानकरी ठरले. आतापर्यंतच्या सर्व बॅचमधील हा उच्चांक होय.
त्याच बरोबर SPIN SELLING ह्या व्यावसायिक कौशल्य सेमिनारची विडीयो DVD व Career Guide CD चे उदघाटन पोतदार सरांच्या ह्स्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे BORN2WIN च्या नवीन Office चे देखिल उदघाटन यावेळी पोतदार सरांच्या ह्स्ते स्र्किनवर अगदी Hi-Tech पध्द्तीने करण्यात आले.
राष्ट्रपती शौर्य पदक विजेते व स्टॉपवॉच पुस्तकाचे लेखक, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. संजय गोविलकर, ब्रँड गुरु श्री. विकास गायतोंडे, अर्थ क्षेत्रातील मराठी तारे या पुस्तकाचे लेखक श्री. उदय कुलकर्णी, स्प्रिंटमेल कुरीयरचे संचालक श्री. मीनार परब व प्रसिद्ध गुंतवणुक सल्लागार श्री. अरुण सिंघ कार्यक्रमाला उपस्थित होते.
मध्यांतरानंतर कार्यक्रमाचा महत्वाचा भाग झाला तो म्हणजे "...तरच मराठी उद्योजकाची पाऊलं पडतील पुढे!" या पोतदार सरांच्या मार्गदर्शनाचा. सरांच्या मार्गदर्शनासाठी आसुसलेले लक्ष्यवेधचे सर्व प्रशिक्षणार्थी सरांच्या संभाषण शैलीने अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. सर जवळ जवळ सव्वा तास बोलले, परंतु कार्यक्रम संपुच नये असे प्रत्येकाला वाटत होते, सरांनी मराठी उद्योजकाने यशस्वी होण्यासाठी कोणती पाऊलं ऊचलली पाहीजेत? व आपल्या दृष्टीकोनात कोणते योग्य बदल केले पाहीजेत या बद्दल तर सांगितलेच पण महत्वाचे म्हणजे हे सर्व त्यांनी अगदी सोप्यासरळ, ह्रदयाला भिडेल अश्या शब्दात मांडले. उपस्थित श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद सरांच्या मार्गदर्शनाला मिळाला. शब्दात हे सर्व व्यक्त करणे खरोखरच कठीण आहे, एवढेच म्हणेन... 'सर आले...त्यांनी पाहील... ते बोलले...व त्यांनी सर्वांची मनं जिंकली...!'
कार्यक्रमाच्या सुत्रसंचालिका अस्मिता मॅडम
खचाखच भरलेला कर्नाटक संघ हॉल
अतुल राजोळी उपस्थित प्रेक्षकांना संबोधताना
नितीन पोतदार सरांचे स्टेजवर आगमन झाल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले.
"...तरच मराठी उद्योजकाची पाऊलं पडतील पुढे!" या विषयावर सरांचे मार्गदर्शन
No comments:
Post a Comment