नमस्कार!
मित्रहो, लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान आपण आपले दुरगामी लक्ष्य ठरविलेत व आपल्या दुरगामी लक्ष्याला अनुसरुन एक आव्हानात्मक लक्ष्य साध्य करण्यासाठी उत्तुंग झेप घेतली. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान आपल्या वैयक्तिक व प्रोफेशनल जीवनात आपण एक सकारात्मक परिवर्तन अनुभवलेत. आपला आत्मविश्वास द्विगुणित झाला असुन आपण भविष्याकडे एका नवीन उमेदीने पाहत आहोत. आपल्या दुरगामी ध्येयाच्या दिशेने आपला प्रवास हा खरोखच आव्हानात्मक असणार आहे. या प्रवासादरम्यान मानसिकरीत्या सबळ रहाण्यासाठी बॉर्न टू विनची साथ नेहमीच आपल्या बरोबर असेल. आपल्या विचारांना चालना देण्यासाठी व कृतीलाप्रेरणा देण्यासाठी लक्ष्यवेधचा आगामी लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम नक्कीच लाभदायक ठरेल. हा कार्यक्रम म्हणजे लक्ष्यवेधच्या तुमच्या सह-प्रशिक्षणार्थींना भेटण्याचे एक उत्तम निमित्त असेल व या कार्यक्रमात तुम्ही पुन्हा एकदा लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान अनुभवलेले मोलाचे असे स्फुर्तीदायक क्षण अनुभवाल. विशेष म्हणजे आपल्याला लाभेल व्यावसायिक क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाचे महत्त्वपुर्ण असे मार्गदर्शन.
हो मित्रांनो! लक्ष्यवेध स्नेहमेळाव्यामध्ये सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार सर आपल्या सर्वांना '... तरच मराठी उद्योजकाची पाउलं पडतील पुढे!' या त्यांच्या व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
श्री. नितीन पोतदार यांच्याबद्दल थोडेसे:
श्री. नितीन पोतदार सर हे व्यवसायाने कॉर्पोरेट लॉयर आहेत. जे सागर असोशिएटस् या भारतातील दुसर्या क्रमांकाच्या लॉ फर्म मध्ये ते सिनियर पार्टनर म्हणून कार्यरत आहेत. भारतामध्ये येणार्या परकीय गुंतवणुकीचे तज्ञ म्हणून त्यांची देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील विलीनीकरण व परदेशी कंपन्यांबरोबरचे सहकार्याचे करार करण्याच्या कामात त्यांनी मोठे नाव मिळविले आहे. दक्षिण एशिया पॅसिफिक लिगल ५०० या आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉर्पोरेट लॉयर्सच्या यादीमध्ये श्री. नितीन पोतदार यांना भारताचे परकीय गुंतवणुक तज्ञ म्हंटले जाते.
श्री. नितीन पोतदार उद्दोग, व्यवसाय व करिअर संदर्भातच लिखाण करत असतात. त्यांचे विचार तुम्हाला त्यांच्या ब्लॉगवर वाचता येतीलः http://www.nitinpotdar.blogspot.com/
लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळावा
दिनांक: ४ एप्रिल २०१०
वेळः सायंकाळी ठीक ६:०० वाजता
स्थळः कर्नाटक संघ हॉल, वेस्टर्न माटूंगा स्टेशनच्या जवळ, माटूंगा (प.)
प्रवेश विनामुल्य
कार्यक्रमाचे पास हवे असल्यास कृपया संपर्क साधा: राजेंद्र 9967309018, 022939377/78.
No comments:
Post a Comment