१९ फेब्रुवारी २०१० हा दिवस बॉर्न टू विनच्या संपुर्ण टिमला नक्कीच लक्षात राहील. बॉर्न टू विन संस्था आपल्या दुसर्या वर्षात पदार्पण करीत असतानाचे निमित्त साधून एका नवीन उपक्रमाची सुरुवात आम्ही केली. 'बॉर्न टू विन प्रोफेशनल कौशल्य सेमिनार'. या उपक्रमामार्फत प्रोफेशनल व्यक्तींना आवश्यक कौशल्यांवर आधारीत परिणामकारक असे कार्यक्रम घेऊन येण्याचा आमचा मानस आहे.
१९ फेब्रुवारी २०१० रोजी याच उपक्रमातील पहीला कार्यक्रम SPIN SELLING SEMINAR अतिशय दणदणीतरित्या पार पडला. मागिल पोस्टमध्ये नमुद केल्या प्रमाणे रविंद्रनाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये हा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला. (बर्याच जणांना हॉल बाहेरुनच नाईलाजाने परत पाठवावे लागले. त्याला दुसरा काहीच मार्ग नव्हता. तरी क्षमस्व.) २०० मराठी प्रोफेशनल माणसांनी SPIN SELLING SEMINAR हा बॉर्न टू विनच्या प्रोफेशनल कौशल्य सेमिनार उपक्रमातील पहीलाच कार्यक्रम अटेंड केला व भरभरुन दाद दिली. आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल व उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सर्व उपस्थितांचे मनापासुन आभारी आहोत. भविष्यात देखिल बॉर्न टू विनच्या प्रोफेशनल कौशल्य सेमिनार उपक्रमातील इतर कार्यक्रमांना आपण असाच उदंड प्रतिसाद द्याल याबद्दल काहीच शंका नाही. Thank You Very Much.
याच कार्यक्रमाचे निमित्त साधून 'स्वतः मधील उद्योजकाला जागे करा' या व्हिडीओ डीव्हीडीचे उदघाटन करण्यात आले.
या व्हिडीओ डीव्हीडीची माहीती खालिल प्रमाणे आहे.
या डीव्हीडीत आपल्याला खालिल प्रश्नांची उत्तरे मिळतीलः
- का बहूतांश व्यवसाय यशस्वी होत नाहीत व त्या बाबतीत काय केले पाहीजे?
- यशस्वी उद्योजक काय असे जाणतो जे अयशस्वी उद्योजकाला माहीत नसते?
- सर्वसामान्य उद्योजक असामान्य यश कसे मिळवू शकतो?
- प्रत्येक यशस्वी उद्योजकाकडे कोणते स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे?
- व्यावसयिक दृष्टीकोन म्हणजे काय?
- सर्वसाधारण उद्योजकाची सर्वात मोठी गैरसमजुत कोणती असते?
- उत्कृष्ट व्यवसाय उभारण्यासाठी व्यवसायाला कोणत्या टप्प्यांमधुन जावे लागते?
डीव्हीडीची किंमत: रुपये ३००/- फक्त!
डीव्हीडी घरपोच मिळविण्यासाठी संपर्क साधा: सुनिल तावडे ९८२१८९८१७१
No comments:
Post a Comment