फ्युचर पाठशालाचे प्रास्ताविक सेमिनार दिनांक १४ एप्रिल २०१० व १८ एप्रिल २०१० रोजी अनुक्रमे मुलूंडच्या कालीदास हॉलमध्ये व प्रभादेवीच्या रविंद्रनाट्य मंदिरमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडले. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या दोन्ही कार्यक्रमांना भरभरून दाद दिली, त्याबद्दल बॉर्न टू विनची संपुर्ण टिम सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आभारी आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये सिंहाचा वाटा होता तो आमच्या 'फ्युचर स्टार्स'चा. फ्युचर स्टार्स म्हणजेच फ्युचर पाठशालाचे गुणवंत विद्यार्थी होय. दोन्ही कार्यक्रमाची संपुर्ण जबाबदारी, सुत्रसंचालनपासुन ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंतची सगळी कामे फ्युचर पाठशालाच्या फ्युचर स्टार्सनी अगदी मनापासुन व उत्साहाने केली व दोन्ही कार्यक्रम यशस्वी केले.
फ्युचर स्टार प्रिती मोरे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना
फ्युचर स्टार्स रुपेश सुर्वे व जयेश पाटील स्मरणशक्तीचे प्रात्यक्षिक देताना
अतुल राजोळी उपस्थित प्रेक्षकांना प्रे़झेंटेशन देताना
हाऊसफुल्ल रविंद्र नाट्यमंदीर सभागृह
कार्यक्रमांनंतर रजिस्ट्रेशन काउंटरवर झालेली गर्दी
कार्यक्रमांनंतर रजिस्ट्रेशन काउंटरवर झालेली गर्दी
फ्युचर पाठशाला हा बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम यंदाच्या उन्हाळी सुट्टीत माटूंगा, ठाणे, वसई व भिवंडी येथे अतिशय दणदणीतपणे पार पडला. आता फ्युचर पाठशाला हा प्रशिक्षणक्रम मुंबईतील एकुण १४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पुर्ण केला आहे. गेल्या दोन वर्षात फ्युचर पाठशालाची ही वाटचाल म्हणजे अविश्वसनिय अशीच म्हणावी लागेल. या प्रवासात फ्युचर पाठशालाच्या सर्व विद्यार्थ्यांची म्हणजेच आमच्या 'फ्युचर स्टार्स'ची साथ आम्हाला नेहमीच लाभली.
फ्युचर पाठशालाचा जोश अनुभवण्याची एक सुवर्णसंधी दिनांक ३० मे २०१० रोजी आपल्याला मिळणार आहे. फ्युचर पाठशालाचे Get Together व पदवीदान सोहळ्याचा कार्यक्रम म्हणजेच 'फ्युचर पाठशाला जोश २०१०' दिनांक ३० मे २०१० रोजी प्रभादेवीच्या रविंद्रनाट्य मंदिर येथे सकाळी १० वाजता आयोजीत करण्यात आला आहे. मी आपणा सर्वांस आग्रहाचे आमंत्रण देतो कि आपण आपल्या मित्र परिवाराबरोबर कार्यक्रमाला उपस्थित रहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे फ्युचर पाठशालाच्या विद्यार्थ्यांचे निरनिराळे व महत्त्वाची शिकवण देणारे असे खास कार्यक्रम. फ्युचर स्टार्सचे हे कार्यक्रम व त्यांचा उत्साह पाहून आपण निश्चितच थक्क व्हाल!
दिनांकः ३० मे २०१०,
वेळ: सकाळी १० वाजता,
स्थळ: रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी,
प्रवेश विनामुल्य!
आपला प्रतिसाद फ्युचर पाठशालाच्या सर्व तरुण विद्यार्थ्यांसाठी मोलाचा आहे.
- टिम बॉर्न टू विन
No comments:
Post a Comment