मित्राची गुंतवणूक - प्रत्येकाने जरुर वाचावे असे पुस्तक ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

07 July 2010

मित्राची गुंतवणूक - प्रत्येकाने जरुर वाचावे असे पुस्तक

नमस्कार!

मित्रांनो, 'मित्राची गुंतवणूक' या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच शिवाजी मंदीर येथे पार पडला. श्री. अरविंद इनामदार, श्री. नितीन पोतदार व श्री. लोढा या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या निमित्ताने...

गुंतवणूकदारांना सल्ला देणारी अनेक पुस्तकं बाजारात आहेत. या पुस्तकांमध्ये थोडं वेगळं ठरेल, असं 'मित्राची गुंतवणूक' हे पुस्तक संजय गोविलकर यांनी लिहिलं आहे.

या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदारांना व वाचकांना आपल्या उपक्रमात सामावून घेण्याचा प्रयत्न लेखकानं केला आहे. त्यासाठी पुस्तकात गुंतवणूकदारांना येणारे अनुभव, चांगल्या व वाईट योजना इत्यादी लिहून ठेवण्यासाठी रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना स्वत:साठी संदर्भ डायरी म्हणूनही जपून ठेवता येणार आहे.

लेखक स्वत: पोलिस खात्यात अधिकारी असल्यानं गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या कोणत्या योजना बाजारात आल्या होत्या, याची तपशीलवार माहितीही पुस्तकात आहे. सहा महिन्यांत पैसे डबल करणारी 'शेरेगर योजना', तीन महिन्यांत चौपट रक्कम करून देणारी 'वायूदूत डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल' आणि आविष्कार एंटरप्रायझेस यांच्या योजना, 'टूरला गेला नाहीत तर दुप्पट पैसे परत करणारी' राजकमल टूर्स अँड ट्रॅव्हल्सची योजना, गाड्या घ्या, शेळ्या मेंढ्या पाळा, झाडे लावा योजना, परदेशी चलनांत लाखो रकमेची बक्षिसांचे आमिष दाखाविणारे ई-मेल पाठवून लुटणारी आंतरराष्ट्रीय टोळी, नायजेरियन फ्रॉड अशा अनेक योजनांची माहिती देऊन भारतीय रिर्झव्ह बँकेची मान्यता असलेल्या योजनांशिवाय इतरत्र कोठेही पैसे गुंतविण्यात येऊ नयेत, असा सल्लाही लेखक देतो.

आथिर्क व्यसनात फसलेल्या तरुणांना पुन्हा मार्गावर आणण्याचा प्रयत्नही यात आहे. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत व्यसनावर केलेला खर्च कसा फुकट गेला आहे, हे साधीसोपी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. खरा मित्र कोण आणि उसने घेतलेले पैसे परत न करणारा दगाबाज मित्र कोण, यातील फरकही लेखकाने दाखवून दिला आहे.

पुस्तकात गुंतवणूकदारांच्या अनेक समस्यांचा विचार आहे. गुंतवणुकीवर भविष्यात उत्पन्न मिळावे, तसेच आजार व आथिर्क अडचणींत आधार कसा मिळवावा, यासाठी गुंतवणुकीची कोणती साधने आहेत, बँकांकडून कोणती कजेर् मिळू शकतात, याची माहितीही आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मिळणारी बँकिंगची सेवा व उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेऊन त्याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरक्षित व जोखमेची गुंतवणूक केव्हा व कोठे करता येईल, हे सहजपणे दाखविण्यासाठी आथिर्क नियोजनाचं उभारलेलं पिरॅमिड आणि कष्टाचे पैसे खाऊन गब्बर झालेला साप दाखविण्यासाठी मुखपृष्ठावरील सापशिडी खेळाचं चित्र परिणाम साधणारं आहे. पुस्तक छोटं असलं तरी गुंतवणूकदारांना उपयोगी आहे.

.........................................................

मित्राची गुंतवणूक
संजय गोविलकर
जीवनरंग प्रकाशन
पाने : १४८ किंमत : १५० रुपये

संपर्कः ९६६४३७५५०१

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites