नमस्कार!
मित्रांनो, लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची चौथी बॅच आता पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे कि या बॅचमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या एकापेक्षा एक यशोगाथा बॉर्न टू विनच्या संपुर्ण टिमला अनुभवायला मिळत आहे. लक्ष्यवेधच्या या चौथ्या बॅचचा लक्ष्यसिद्धी सोहळा व लक्ष्यवेध स्नेहमेळावा येत्या १० सप्टेंबर रोजी दादरच्या बी. एन. वैद्य हॉल येथे संध्याकाळी सहा वाजता अगदी दणक्यात पार पडणार आहे. लक्ष्यवेधच्या या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांचा, त्यांनी लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान म्हणजेच गेल्या दहा आठवड्या दरम्यान केलेल्या कामगिरी बद्दल गौरव करण्यात येणार आहे.
लक्ष्यवेधच्या चौथ्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याला लाभलेले प्रमुख पाहुणे हे एक असाधारण व्यक्तीमत्व आहेत. हो मित्रांनो, सांगायला अत्यंत आनंद वाटतो कि पितांबरी प्रॉडक्टस् प्रायवेट लिमीटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र प्रभुदेसाई सर या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत व एवढेच नव्हे तर श्री. रविंद्र प्रभुदेसाई सर उपस्थित लोकांना 'उद्योग साधना' या विषयावर एका मुलाखतीच्या माध्यमातुन मार्गदर्शन करणार आहेत.
घरातल्या घरात तांबे व पितळची भांडी धुण्याची पावडर तयार करुन विकण्याचा अत्यंत छोटा उद्योग ते देशविदेशभर व्याप असलेला व निरनिराळे दर्जेदार प्रॉडक्टस् चा आदर्श व्यवसाय हा गेल्या २० वर्षांचा पितांबरीचा प्रवास खरोखरच अविश्वसनिय आहे. हा प्रवास कसा होता? तो सुरु कसा झाला? त्या मागची प्रेरणा? प्रवासादरम्यान कोणत्या अडचणी आल्या? त्यांवर मात कशा प्रकारे करण्यात आली? पितांबरी कंपनीचा हा व्याप कसा वाढला? व पितांबरीचे ह्या पुढचे ध्येय व वाटचाल काय? ह्या सर्व गोष्टी प्रत्येक मराठी माणसाला स्फुर्तीदायक आहेत. ह्याच प्रामाणिक हेतुने बॉर्न टू विन घेऊन येत आहे पितांबरीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. रविंद्र प्रभुदेसाई सरांची खास मुलाखत 'उद्योग साधना'. मुलाखत घेतील बॉर्न टू विनचे संचालक श्री. अतुल राजोळी.
या कार्यक्रमाच्या माध्यमातुन लक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी 'उद्योग साधना' हा कार्यक्रम म्हणजे एक सुवर्ण संधीच असेल. त्याच प्रमाणे त्यांच्या आप्तेष्टांना सुद्धा ह्या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असेल. फक्त सोबत हवी आहे ती तुमच्या शुभेच्छांची!
श्री. रविंद्र प्रभुदेसाई सर यांच्या बद्दल थोडेसे:
- शिक्षण-विज्ञान शाखेतून पदवीधर, व्यवस्थापनाची पदवी ( डी. बी. एम.).
- पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक.
- पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि. अंतर्गत होमकेअर व हेल्थकेअर या दोन विभागांत मिळून एकूण १३ उत्पादने.
- भारतातील १९ राज्यांमध्ये सक्षम मार्केटिंग नेटवर्क. त्याच बरोबर मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड व आखाती देशांमध्ये उत्पादनांची निर्यात.
- भारतातील १९ राज्यांमध्ये सक्षम मार्केटिंग नेटवर्क. त्याच बरोबर मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड व आखाती देशांमध्ये उत्पादनांची निर्यात.
- गुणवत्तावाढीसाठी सतत प्रयत्नशील. आय. एस. ओ. ९००१ - २००० प्रमाणपत्र पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि. ला प्राप्त झाले आहे.
- यशस्वी उद्योजक पुरस्कार, उद्योगश्री पुरस्कार (२००३), मदर इंडिया अॅवॉर्ड, श्री फाउंडेशन चा उद्योगश्री पुरस्कार, कर्तृत्व गौरव पुरस्कार, ज्युवेल ऑफ टिसा, आदी पुरस्कारांनी सन्मानित.
लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळावा
दिनांक: १० सप्टेंबर २०१०
वेळः सायंकाळी ठीक ६:०० वाजता
स्थळः बी. एन. वैद्य सभागृह, किंग जॉर्ज हायस्कुल, दादर (पुर्व)
प्रवेश विनामुल्य
कार्यक्रमाचे पास हवे असल्यास कृपया संपर्क साधा: 022-22939375/6/7/8. 7666426654, 9619465689
No comments:
Post a Comment