१०वी-१२वी च्या परीक्षा साठी प्रत्येक जण आपापल्या परीने तयारी करतो. गेल्या काही वर्षात या परीक्षांच्या संदर्भातील ताण-तणावही अगदी शिगेला पोहचले आहेत.
तसेच १०वी-१२वी नापासांचा आकडाही वर्षागणिक वाढत चालला आहे. २००९ मध्ये ५.५ लाख, २०१० मध्ये ७ लाख आणि २०११ मध्ये ९ लाख... येणाऱ्या परीक्षात हा आकडा १० लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे...
यातून मार्ग निघावा याचसाठी व परीक्षेच्या ताण-तणावांपासून मुक्त राहून १०वी-१२वी च्या अभ्यासाची प्रेरणा देणारी "भारुकाकाची पत्रे" यांचं लिखाण व "भारुकाका.कॉम" हि १०वी-१२वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील पहिली वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
"भारुकाकाची पत्रे" व "भारुकाका.कॉम" या वेबसाईटचा प्रकाशन-लोकार्पण सोहळा सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व लेखक डॉ.राजेंद्र बर्वे यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी त्यांनी १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी अतिशय बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा दूरदर्शन वृत्तांत व डॉ.राजेंद्र बर्वे यांचे १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन रविवार दि.१२ फेब्रु.२०१२ रोजी दूरदर्शन सह्याद्री उपग्रह वाहिनीवरून सकाळी १०वा. प्रसारित करण्यात आले. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा हा यामागील उद्देश होता !
"भारुकाकाची पत्रे" व "भारुकाका.कॉम" प्रकाशन-लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सर्व व्हिडीओज व मान्यवरांचे १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी अतिशय बहुमोल मार्गदर्शन www.bharukaka.com
या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यांचा लाभ कोणालाही पाहिजे तेव्हा घेता येईल.
१०वी-१२वी म्हणजे शिक्षण व पुढील करीअरच्या दृष्टीने आपल्या आयुष्यातील "टर्निंग पॉईंट"च असतो यात शंका नाही! त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की १०वी-१२वीत आपण खूप अभ्यास करावा, चांगले मार्क्स मिळवावेत आणि हव्या त्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून मनासारखं उत्तम करीअर घडवावं.
*चांगलं करीअर घडवायचं म्हटलं कि एक बागुलबुवा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि तो म्हणजे स्पर्धा! नुसतीच स्पर्धा नाहीतर प्रचंड स्पर्धा... आणि मग या स्पर्धेत टिकून राहायचे तर अभ्यास एके अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवायचे याचाच ध्यास प्रत्येक विध्यार्थ्याला लागतो. या बाबतीत आपले पालकसुद्धा कधी वास्तव तर कधी अवास्तव अपेक्षांची भर घालून या स्पर्धेचे रुपांतर जीवघेण्या मार्कांच्या शर्यतीत कधी करून टाकतात ते त्यानाही उमजत नाही.
याविषयी योग्य ते मार्गदर्शन मिळावे या हेतूनेच “भारुकाकाची पत्रे" या पुस्तकाचे लिखाण व योजना करण्यात आली आहे. याचा लाभ नियमित व नापास विद्यार्थ्यांनाही व्हावा ही या मागची प्रेरणा आहे. खरं म्हणजे "भारुकाकाची पत्रे" हे पुस्तक एकदा वाचून ठेऊन देण्यासाठीचं पुस्तक नाही तर त्यातल्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी बनवलेला तो एक प्रशिक्षणक्रमच आहे! त्याने तुमच्या अभ्यासाच्या, विचार करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल घडून येऊ शकतो. अभ्यासाची, परीक्षेची तयारी तर करावीच पण तणावांपासून मुक्त राहून! "भारुकाकाचीपत्रे" व "भारुकाका.कॉम" ही वेबसाईट याकामी तुमच्या सतत सोबत राहील.
-भारतकुमार महेंद्र जी. बैसाणे.