चार रस्त्यावर पाचवा फाटा - करीअरचा कोपरा ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

14 March 2012

चार रस्त्यावर पाचवा फाटा - करीअरचा कोपरा

वाटतं, मोठं झाल्यावर कंडक्टर होऊ.
किंवा मग, मस्त कडक इस्त्रीतला पोलीस इन्सपेक्टर.
वाटतं होऊ नेता, आणि मस्त फिरू लाल दिव्याच्या गाडीतून.
पण ते वाटणं लहान असतानाच.
आपण का मोठे होतो?
लहानपणी लोक विचारतात तू मोठ्ठं झाल्यावर कोण होणार, आणि आपण उत्तर दिलंच की पाण्याची टाकी होणार तरी खूप कौतूक करतात.
पण मोठं झाल्यावर मात्र लागतात मागे.
विचारतात सतत, सांग काम काय करणार.? किती पैसे मिळवणार.? अमक्याला बघ एवढा पगार. तुला का मिळत नाही?
किती प्रश्न... केवढा वैताग..?
काही म्हणता काही कळत नाही.
की करावं काय...?
आधी कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा हा तिढा. मग कुठे घ्यायचा.? कोणती साईड.? कुठलं करिअर भविष्यात चालेल.? अमकातमका काय करतो.?


आपल्याला भेटतच नाही आपला बाबा रॅन्चो...
जो सांगतो पैसे के पिछे मत भाग. काबील बन. काबील...!!
पण हे काबील बनायचं कसं.? आणि बनलंच तर आपल्या भवितव्यासाठी जिवाचं पाणी करणार्‍या आई-बाबांना सांगायचं कसं.?

यंदा तुम्ही उभेच असाल या करिअरच्या चार रस्त्यावर आणि तिथून फुटत असेल एखादी पाचवीही वाट.

तर जरा ही १२ सूत्रं लक्षात ठेवा....

बघा.... कदाचित तुमचा निर्णय सोप्पा होईल आणि तुम्हाला सापडेल तुमची स्वत:ची हक्काची वाट.!

) आधी एका प्रश्नाचं उत्तर स्वत:ला द्या की मला काय करायला आवडेल.?

) जग गेलं खड्ड्यात! पैसे मिळतील किंवा नाही मिळणार, आईबाबा "हो" म्हणणारही नाहीत कदाचित पण तुम्ही ठरवाच की तुम्हाला काय करायला आवडेल.

) काही जण म्हणतात की, "असं काहीच नाही", "मला नाही कळत", हे साफ चूक! आपल्याला भूक लागली आहे हे जसं फक्त आपल्यालाच कळतं तसं आपल्याला काय करायला आवडेल हेही फक्त आपल्यालाच कळतं. लोक ठरवतात का आपल्याला किती भूक लागलीये ते? तसंच हे... इतकं सोपं! त्यामुळे एकदा ठरवाच की काय करायला आवडेल...?

) एकदा ठरलं की शोधा ते कसं करायचं.... कुठं करायचं...?

) आपल्याला जे आवडतं ते करण्याची पात्रता आपली आहे का? हे ठरवा. म्हणजे आपल्याला आवडतं म्हणून आपण सचिन तेंडूलकर होऊ शकतो का? एकदा विचार करा...

) तो विचार प्रॅक्टिकल असलेला बरा. अनेक लोकांना आवड आणि प्रॅक्टिकल गोष्टी याची सांगड नाही घालता येत.


) नुसतं वाटतं होऊ डॉक्टर... पण जीवशास्त्रच आवडत नाही, असं होतं का आपलं...?

) मित्र म्हणतात म्हणून काही करायचं. हे तर साफ चूक. मित्र काय म्हणायचं ते म्हणो. तुम्हाला वाटलं ना की लावायची बटाटेवड्याची गाडी तर लावा बिनधास्त...! पण ती एकदा लावली की लोक माझ्याकडे पाहतात. रस्त्यावर वडे तळतो म्हणून हसतात, असा फालतू विचार करायचा नाही.

) आईवडील ऐकतात आपलं. पण त्यांना नीट समजावलं तर.? आपण त्यांच्याशी भांडलो आणि 'तुम्हाला काहीच कळत नाही' असं म्हटलं तर का ते आपल्याला मदत करतील.

0) आई-वडिलांना कमी लेखू नका. तुम्हाला काय कळतं करिअरमधलं असं म्हणून त्यांना व्हिलन करू नका. त्यापेक्षा त्यांच्या आर्थिक क्षमतांचाही विचार करा.

११) जे काम तुम्हाला आवडेल तेच आपण करायचं. मग त्यात पैसे नाही मिळाले आणि इतर लोकांना त्यांच्या कामात खूप पैसे मिळाले तरी आपण स्वत:ला दोष देणार नाही, याची खात्री असेल तर स्वतच्या जबाबदारीवर निर्णय घ्या.

१२) घेतला निर्णय. आता पुरे खयाली पुलाव... लागा झडझडून कामाला.!
लोकमत - शुक्र, जानेवारी २०१२
Please Click on Following Link: http://born2win.in/future.aspx

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites