मित्रांनो
आपणास कळविण्यात अत्यंत आंनंद होतोय की १०
नोव्हेंबर २०१३
ला लक्ष्यवेध ची १७ वी बॅच यशस्वीपणे पार पडली व १७ वा लक्ष्यसिद्धी सोहळा ११
नोव्हेंबर २०१३ ला कर्नाटक संघ हॉल,
माटुंगा
(प.) येथे दणक्यात संपन्न झाला.
या
लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते, सुप्रसिद्ध
हेडहंटर श्री. गिरीश टिळक. ते रेझ्युमे मॅनेजमेंट कन्सलटंचे संचालक असून एच. आर.
म्हणजे ह्युमन रिसोअर्सेस या क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे.
लक्ष्यसिद्धी
सोहळ्यात सुरवातीला यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्हे
प्रदान करण्यात आली. काही प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत यावेळेस व्यक्त केले. या
प्रशिक्षणक्रमामुळे किती फायदा झाला ते सांगितले.
यावेळेस
बॉर्न टू विनच्या मंचावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बॉर्न टू
विनच्या 'ध्येयनिश्चिती
ते ध्येयपूर्ती' या
त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक व संस्थेच्या कार्यक्रमांना नेहमीच उपस्थित राहणारे
लेखक उदय कुलकर्णी यांच्या “टाकसाळ
निर्माण” पुस्तकाचे
प्रकाशन प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक अनिल गवस, ज्येष्ठ
साहित्यिक वसंत नरहर फेणे तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते जयंत पवार यांच्या
उपस्थितीत झोकात पार पडले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना उदय कुलकर्णी म्हणाले, बॉर्न
टू विनचे लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी हा जल्लोषाचा दिवस आहे, त्यात
पुस्तकाचे प्रकाशन करावे का हा माझ्यासमोर पहिला प्रश्न होता. पण एक तर अतुल राजोळी
यांनी त्यांच्या विशाल ह्रदयाचा परिचय देत लगेच हो म्हटले. दुसरे जल्लोषाचा दिवस
असला तरी अतुल एका मान्यवर तज्ज्ञांना बोलावून दिवस सार्थकी लागेल याची दक्षता
घेतात आणि या प्रकाशन कार्यक्रमातूनही तुम्हाला काही उपयुक्त नक्कीच मिळेल. पण
तुमचा थोडा वेळ घेत असल्याने तुमचे आणि प्रमुख पाहुणे गिरीश टिळक यांचे आधी आभार
मानतो. पुस्तकाविषयी जे बोलायचे आहे,
ते
मागे पडद्यावर आहेच. ही माझी स्वत:ची कथा आहे आणि केवळ इतका छोटा मजकूर वाचून ही
त्यांची कहाणी सांगणारे अनेकजण मला मिळाले. ही खडबडून जागे करणारी कहाणी आहे. तसेच
वसंत नरहर फेणे यांच्या साहित्याचा मी चाहता आहे व हे पुस्तक मी त्यांना
कृतज्ञतापूर्वक व आदरपूर्वक अर्पण करत आहे. यानंतर अनिल गवस व वसंत नरहर फेणे
यांचेही छोटे भाषण झाले. यानंतर अतुल राजोळींनी या सत्राचा समारोप केला.
दुसर्या
सत्रात प्रमुख पाहुणे श्री. गिरीश टिळक यांचे 'बिझनेस
नेटवर्किंग' या
विषयावर मार्गदर्शनपर भाषण झाले. निरिक्षण, ऐकणे
(ऑबझर्व्ह, लिसन)
हे नेटवर्किंगसाठी आवश्यक गुण आहेत. बहुश्रुत असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळातील
हळदी-कुंकू म्हणजे स्त्रियांसाठी नेटवर्किंगचाच प्रकार होता. पुढे जातानाही आपल्या
मुळांचे भान हवे असे अनेक मुद्दे टिळकांनी सांगितले. कोणत्याही व्यवसायाच्या
वृद्धीसाठी व यशासाठी नेट्वर्किंग हे अत्यंत महत्वाचेअसते. उपस्थितांना या विषयावर खूप गहन व उत्कृष्ठ मार्गदर्शन
सरांकडून मिळले.
साहित्य-सांस्कृतिक
क्षेत्रातील मान्यवरांमुळे हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. खुद्द या मान्यवरांसाठी
हा सोहळा अनोखा होता याची पावती म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक अनिल गवस याप्रसंगी
म्हणाले, या
कार्यक्रमात येऊन बॉर्न टू विन या संस्थेचा आणि एका नव्या क्षेत्राचा त्यांना परिचय
झाला ही आनंदाची बाब आहे.
अश्या प्रकारे हा सोहळा अत्यंत जोशात आणि जल्लोषात साजरा झाला. हा कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी संपूर्ण बॉर्न टू विन परिवार आपला मन:पूर्वक आभारी आहे.
धन्यवाद.
No comments:
Post a Comment