नमस्कार,
मित्रांनो, वर्ष २०१४ च्या आपण अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. वर्ष २०१४ मध्ये आपण नक्कीच आपल्या ध्येयांच्या दिशेने जबरदस्त प्रगती केली असेल आणि आता वर्ष २०१५ च्या स्वागतासाठी व २०१५ मध्ये नवनवीन ध्येय साध्य करण्यासाठी आपण आराखडा देखिल तयार करणार असाल. त्यासाठी आपल्याला खुप खुप शुभेच्छा!
मित्रांनो, लक्ष्यवेध ADVANCE हा व्यवसाय विकास प्रक्रियेवर आधारीत एक वर्षभराचा प्रशिक्षण कार्यक्रम बॉर्न टू विनद्वारे राबवण्यात येतो. खास लघुउद्योजकांसाठी निर्माण करण्यात आलेला हा प्रशिक्षणक्रम प्रशिक्षणार्थींना आपल्या व्यवसायात उत्तुंग कामगिरी करण्यासाठी प्रचंड फायदेशिर ठरतो. लक्ष्यवेध ADVANCE ची सहावी बॅच व्यवस्थितरित्या पार पडली आहे, आणि दिनांक १३ डिसेंबर रोजी लक्ष्यवेध ADVANCE च्या सहाव्या बॅचचा पदवीदान समारंभ म्हणजेच 'उद्योगस्फुर्ती सोहळा' आयोजित करण्यात आला आहे! या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे या कार्यक्रमात लक्ष्यवेध ADVANCE च्या सहाव्या बॅचच्या काही यशस्वी प्रशिक्षणार्थींच्या यशोगाथा आपल्याला पहायला मिळतील. लघुउद्योजक असलेल्या या प्रशिक्षणार्थींनी आपल्या व्यवसायामध्ये लक्ष्यवेध व लक्ष्यवेध ADVANCE च्या मदतीने कश्या प्रकारे अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले हा अनुभव प्रचंड प्रेरणा देणारा असणार आहे. या प्रशिक्षणार्थींपैकी एका प्रशिक्षणार्थीला बॉर्न टू विनमध्ये मानाचा समजला जाणारा 'Best Entrepreneur Award' दिला जाणार आहे.
कार्यक्रमाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक श्री. अशोक खाडे सर (Managing Director, DAS Offshore Engineering Pvt. Ltd.). अशोक खाडे सरांच्या प्रेरणादायी उपस्थितीत संपुर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. श्री. अशोक खाडे सरांच्या हस्ते लक्ष्यवेध ADVANCE च्या प्रशिक्षणार्थींचा पदवीदान समारंभ पार पडणार आहे.
श्री. अशो़क खाडे सरांविषयी थोडसं:
मित्रांनो श्री. अशो़क खाडे हे भारतातील उद्योग क्षेत्रातील एक असाधारण व्यक्ती आहेत. त्यांच्या बद्दल सांगायचे म्हणजे.. त्यांनी अक्षरशः शुन्यातुन कोट्यावधींचे विश्व उभारले. श्री. अशो़क खाडे यांचा अत्यंत गरिबी पासुन ते मुंबईतील 'दास ऑफशोअर इंजिनीअरिंग' या नावाजलेल्या फॅब्रिकेशन कंपनीचे नेतृत्त्व करण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर व प्रेरणादायी होता. आता त्यांच्या कंपनीमध्ये ५५० कोटीपेक्षा जास्त ऑर्डर आहेत व ४,५०० पेक्षा जास्त लोक त्यांच्या कंपनीमध्ये काम करत आहेत.
त्यांच्या कंपनीमार्फत बांद्रा, विक्रोळी, घाटकोपर, सायन अश्या बर्याच ठिकाणी स्कायवॉक बांधले गेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले अहे, तर अश्या व्यक्तींच ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे.
ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला इथे मराठी उद्योजकांच्या केस स्टडीस् प्रेझेंटेशन पहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातुन आपल्या व्यवसायाचे आदर्श स्वरुप कसे असेल व त्याची अंतर्गत रचना, त्यांची मॅनेजमेंट कशी असली पाहीजे ह्याबद्दल कळेल.
ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला इथे मराठी उद्योजकांच्या केस स्टडीस् प्रेझेंटेशन पहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातुन आपल्या व्यवसायाचे आदर्श स्वरुप कसे असेल व त्याची अंतर्गत रचना, त्यांची मॅनेजमेंट कशी असली पाहीजे ह्याबद्दल कळेल.
आपल्याला सर्वांना नम्र विनंती की कॄपया आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपल्याला आपल्या व्यवसायाचा विस्तार सुनियोजितपणे करण्यासाठी व उत्तुंग यश मिळवण्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच लाभदायक ठरेल.
धन्यवाद!
- टिम बॉर्न टू विन
'सहावा उद्योगस्फुर्ती सोहळा'
दिनांकः शनिवार १३ डिसेंबर २०१४
वेळः सकाळी ठिक १० वाजता
स्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९
No comments:
Post a Comment