2015 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

31 December 2015

२०१५ चे खुप धन्यवाद आणि सुस्वागतम २०१६!

नमस्कार मित्रांनो!
काही तासात आपण २०१६ मध्ये पदार्पण करत आहोत. आज मागे वळून पाहता २०१५ हे वर्ष संपुर्ण बॉर्न टू विन परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचे व यशस्वी ठरले. आपल्या सर्वांच सहकार्य व सदिच्छेमुळेच आमच्यासाठी हे वर्ष अविस्मरणीय होतं. या वर्षभरात बॉर्न टू विनचे मिशन, "लोकांना अर्थपूर्ण आणि समृध्द जीवन जगण्यास मदत करणे." हे जगण्यासाठी बॉर्न टू विनने नवनविन कार्यशाळा व प्रशिक्षणक्रम आयोजित केले.
२०१५ मध्ये बॉर्न टू विनने आपल्या अस्तित्वाची यशस्वी ७ वर्षे पूर्ण केली व आता ८वे वर्ष २०१६ जानेवारी मध्ये पूर्ण करणार.

या वर्षाची सुरुवात देखील धमाकेदार पद्धतीने झाली. दिनांक १० जानेवारी २०१५ रोजी कराड येथे शिवम प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रम ५,००० लोकांच्या उपस्थितीत प्रचंड प्रतिसादात पार पडला..!
शिवम प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रम

२० मे २०१५ सॅटर्डे क्लब डोंबिवली येथे अतुल राजोळी यांचे 'एकविसाव्या शतकातील उद्योजकीय मानसिकता' या विषयावर व्याख्यान झाले. उपस्थित उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
एकविसाव्या शतकातील उद्योजकीय मानसिकता

३० मे २०१५ विद्यार्थी उत्कर्ष मडंळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या CAREER FAIR 2015 मध्ये 'करियर निवडताना' या विषयावर विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
करियर निवडताना

बॉर्न टू विनने खास उद्योजकांसाठी २१st Century Intelligent Entrepreneur आणि Professional Selling Skills या एकदिवसीय कार्यशाळा अंधेरी येथे चाणक्य Institute मध्ये आयोजित केल्या. २३ जुन रोजी २१st Century Intelligent Entrepreneur या कार्यशाळेमध्ये उद्योजकांना कमीत कमी परिश्रमात जास्तीत जास्त यश कसे मिळवता येईल या बद्दल मार्गदर्शन मिळाले. 

२१st Century Intelligent Entrepreneur

८ क्टोबर रोजी Professional Selling Skills हि उद्योजकांना जबरदस्त प्रभावशाली विक्री कौशल्य व कृती योजनांवर आधारीत कार्यशाळा होती.
Professional Selling Skills

४ ऑगस्ट २०१५ चा The Success Blueprint कार्यक्रम एकदम दणदणीतरीत्या पार पडला...
The Success Blueprint

१५ ऑगस्ट स्वातंत्र दिवसाच्या निमित्ताने संगमनेर येथे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. १०००+ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता, अतिशय उत्साही आणि जबरदस्त असा हा स्वातंत्र्यदिन खर्‍या अर्थाने साजरा झाला.
संगमनेर येथी एक दिवसीय कार्यशाळा

१८ ऑगस्ट रोजी 'झेप २०२०' भाजपा उद्योग आघाडी, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला ख़ास कार्यक्रमात अतुल राजोळी प्रमुख वक्ते होते. कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

झेप २०२०, नाशिक

१३ सप्टेंबर रोजी विद्यार्थी व पालकांसाठी DESIGN YOUR DESTINY हा अतिशय नाजुक आणि महत्त्वाच्या विषयावर सेमिनार झाला. 
 DESIGN YOUR DESTINY

SPIN SELLING PLUS ही SELLING Skills वर आधारीत एक दिवसीय practical कार्यशाळा २९ ऑक्टोबर रोजी दणदणीतरीत्या पुर्ण झाली.
SPIN SELLING PLUS

२१ नोव्हेंबरला MAKE IN INDIA Conference मध्ये अतुल राजोळी यांनी उद्योजकांना BE FUTURE READY! या विषयावर मार्गदर्शन केले.
MAKE IN INDIA Conference

प्रथमच अतुल राजोळी यांची संगमेश्वर (रत्नागिरी) येथे २७ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळा झाली.
संगमेश्वर (रत्नागिरी) येथी एक दिवसीय कार्यशाळा

२९ नोव्हेंबरला Vibrant Wani 2015 मध्ये १००० पेक्षा अधिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या उद्योजकांना अतुल राजोळी उद्योजकीय मानसिकता जागृत करण्यासाठी यांनी मार्गदर्शन केले.
Vibrant Wani 2015

१९ डिसेंबर ला नाशिक येथे पुन्हा एकदा १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली हा अतिशय जबरदस्त अनुभव होता.
नाशिक येथी कार्यशाळा

या वर्षी लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाच्या २२वी, २३वी, २४वी व २५वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्या व आता २६वी बॅच ठाणे येथे उत्साहात सुरु आहे. प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव सोहळा... सर्व प्रशिक्षणार्थींचे धमाकेदार परफॉर्मन्स्
२२ वा लक्ष्यसिद्धी सोहळा

२३ वा लक्ष्यसिद्धी सोहळा

२४वा लक्ष्यसिद्धी सोहळा

 २५वा लक्ष्यसिद्धी सोहळा

लक्ष्यवेध ADVANCE या उद्योजकीय विकास १ वर्षीय प्रशिक्षणक्रमाच्या या वर्षी ७ वी व ८ वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. याच वर्षी लक्ष्यवेध ADVANCE च्या जुनमध्ये ९ व्या बॅचची सुरुवात उत्साहात सुरु झाली. 
सातवा  उद्योगस्फुर्ती सोहळा अगदी दणदणीतरित्या पार पडला. अ‍ॅग्नेलोराजेश अथायडे सरांचे जबरदस्त मार्गदर्शन! लक्ष्यवेध INTERMEDIATE व लक्ष्यवेध ADVANCE प्रशि़क्षणार्थींचे भन्नाट अनुभव व्यक्त केले.
 वा उद्योगस्फुर्ती सोहळा

लक्ष्यवेध ADVANCE चा आठवा उद्योगस्फुर्ती सोहळा धमाकेदार पध्दतीने साजरा झाला.
 वा उद्योगस्फुर्ती सोहळा

फ्यूचर पाठशाला जोश २०१५ 
जबरदस्त उत्साहवर्धक अनुभव..!!

एकूणच २०१५ वर्ष बॉर्न टू विन साठी अतिशय अभिमानाचे, अविस्मरणीय व आनंद देणारे ठरले. पूर्वीपेक्षा या वर्षी जबाबदाऱ्या ह्या अजून वाढल्या आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत. त्यांच प्रेम व पाठींबा हा आमच्यासोबत नेहमीच असतो आणि हेच आमचं मनोधैर्य नेहमीच वाढवत असते.
२०१५ या वर्षाने खूप काही दिले नव्या चांगल्या समजुती, नवी आशा, नवे बळ, नवीन स्वप्न व नवीन संधी. आता नवीन महत्वाकांक्षा घेऊन बॉर्न टू विन २०१६ चे स्वागत करत आहे.

२०१५ चे खूप धन्यवाद आणि सुस्वागतम २०१६!

16 November 2015

ध्येयपूर्तीचा ध्यास

“लोक सतत माझ्यामागे ऊभे राहिले. भांडवल कमी पडायचे तेव्हा पैसे मिळत गेले, जागेसाठी लोकांनी मदत केली. व्यायामाचा प्रसार हाच माझा ध्यास होता, माझा हेतू चांगला होता, मी स्वत: माझ्या स्पर्धकानांही मदत करतो, त्यातून मला आनंद मिळतो. मला जे मिळत गेले, ते मी इतरांना देतो, ते माझे कर्तव्य समजतो.” हे तळवलकर जिमचे संस्थापक मधुकर तळवलकर सर “बॉर्न टू विन” संस्थेचा लक्ष्यसिध्दी सोहळा साजरा झाला त्याप्रसंगी बोलत होते. २०१० मध्ये तळवलकर जिमने शेअरबाजारात आपले शेअर विकायला काढले, १०० कोटी रुपयांचा हा छोटा आयपीओ. पण भरणा झाला ४,००० कोटी रुपयांचा आणि दक्षिण-उत्तर भारतातूनही लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. लोकांचा हा विश्वास बघून मधुकर सरांचे मन इतके हेलावले, ते भावनाविवश झाले व एका खोलीत जाऊन त्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.


तळवलकर हा असा मोठा ब्रॅन्ड झाला, त्याची सुरवात झाली, १९६२ पासून. हा प्रवास उलगडत गेला बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांनी मधुकर सरांच्या घेतलेल्या मुलाखतीतून. सरांच्या वडिलांच्या व्यायाम शाळा होत्या. सरांनी जिम काढायचे ठरवले तेव्हा तळवलकर जिम या वेगळ्या नावाने त्या सुरू केल्या. त्याकाळीसुध्दा त्यांच्याकडे धर्मेंद्र, माला सिन्हा असे कलाकार सभासद होतेच, पण दारासिंग हे नावाजलेले कुस्तीवीरही त्यांचे सभासद होते. एक जिम सुरू केल्यावर वडिल सरांना म्हणाले, तुझ्या धाकट्या तीन भावंडांसाठी आणखी जिम सुरू कर. सर स्वत: टेक्सटाईल इंजिनिअर. त्यांनी खटाऊ मिलमध्ये काही काळ नोकरी केली. जिम व्यवसायात त्यांच्या ज्ञानाचा त्यांना लाभ मिळाला. विशेषत: जिमसाठी लागणार्‍या उपकरणांची निर्मीती करताना तर ते ज्ञान फारच कामात आले. आज तळवलकरांची अंगदला उपकरण निर्मीतीची ६००० फुटांची फॅक्टरी आहे.

काही वर्षांपूर्वी ते जिमसाठी कर्ज मागायला बॅंकेत गेले तेव्हा मॅनेजर म्हणाले, जिम ही इंडस्ट्री नाही किंवा तुम्ही शेतकरीही नाही आहात. तुम्हाला कर्ज मिळणार नाही. आज मात्र यालाच “फिटनेस इंडस्ट्री” म्हणतात व या उद्योगाचे तळवलकर हे प्रणेते- पायोनिअर. देशात अनेक ठिकाणी त्यांच्या जिम आहेत. त्यात अमृतसर इथे त्यांची जिम ही विशेष बाब वाटते. पंजाबी हे लोक धट्टेकट्टे- सुदृढ, तर त्यांच्यासमोर मराठी माणूस दुबळा असा समज गैर आहे, हे दाखवणारी ही बाब. एक मराठी माणूस पंजाबी लोकांना व्यायामचे धडे देतो ही कल्पनाच विशेष वाटते!


शेवटी सरांनी सुत्र सांगितले, कुटुंबावर प्रेम करा, व्यायाम करा व सतत देत राहा, बी अ गिव्हर. चांगुलपणा करा, तुम्हाला त्याचा लाभ मिळेल, असे चांगुलपणावरचा विश्वास सुदृढ करणारी ही मुलाखत. त्याचप्रमाणे मधुकर तळवलकर यांनी लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाच्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये जबरदस्त प्रेरणादायी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या त्या मुलाखतीचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
भाग १


भाग २


भाग 


भाग ४

18 October 2015

उद्योगक्रमणा सहा दशकांची

जगप्रसिध्द "विको" चे सर्वेसर्वा,कुशल उद्योजक,मँनेजमेंट गुरू, विचारवंत श्री.गजानन पेंढारकर ह्यांचे दुखद निधन.

मराठी माणसाला उद्योग करता येत नाही, हा समज साफ चुकीचा ठरवणारे, आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता मिळवून देणारे आणि संपूर्ण स्वदेशी औषधी उत्पादनं तयार करून 'विको'चा झेंडा सातासमुद्रापार फडकवणारे प्रसिद्ध उद्योगपती, 'विको' उद्योग समूहाचे अध्यक्ष गजानन पेंढारकर यांचं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. परळ इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गजानन पेंढारकर यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३४ चा. बुद्धिमत्ता आणि प्रयोगशीलता वारशानंच मिळालेली. त्याला त्यांच्या जिद्दीची जोड लाभल्यानं 'विको' नावाच्या रोपाचा बघता-बघता वटवृक्ष झाला. अहमदाबादमध्ये फार्मसीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, १९५७ मध्ये पेंढारकर वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले. संकुचित वृत्ती न ठेवता धाडस करायचं हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. त्याच दृष्टीनं ते कामालाही लागले. 


आयुर्वेदाची किमया पेंढारकरांना चांगलीच ठाऊक होती. ऋषिमुनींनी सांगितलेल्या या शास्त्राचाच आधार घेऊन त्यांनी विविध प्रयोग सुरू केले. सुरुवातीला, निरनिराळ्या प्रकारच्या २० दुर्मिळ जडीबुटी, वनस्पती आणि इतर औषधं वापरून संपूर्ण स्वदेशी आयुर्वेदिक टूथपेस्ट तयार करण्यात त्यांना यश आलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. अर्थात, आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता मिळवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. त्यासाठीही त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि अखेर यशही मिळवलं. 

सुरुवातीला, परळ येथे १२०० चौरस फुटाच्या जागेत 'विको'ची उत्पादने तयार होत असत. पण कामाचा व्याप हळूहळू वाढत गेला आणि पेंढारकांनी डोंबिवलीत ८० हजार चौरस फुट जागा घेऊन तेथे अत्याधुनिक कारखाना उभारला. आज नागपूर आणि गोव्यातही विकोची युनिट आहेत. आयुर्वेदाचं महत्त्व साऱ्यांनाच कळून चुकल्यानं 'विको'च्या सर्वच उत्पादनांना देश-विदेशातून मागणी आहे. आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेसह ४० देशांत 'विको' लोकप्रिय आहे. १९८० साली 'विको' ची वार्षिक उलाढाल फक्त ३ कोटींची होती. आज ती एक हजार कोटींच्या आसपास आहे. या उत्तुंग भरारीत गजानन पेंढारकर यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. 

उद्योगविश्वातील या अतुलनीय योगदानासाठी गजानन पेंढारकरांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. सगळी नीती-मूल्य जपत, ध्येयाने झपाटून काम केल्यास अशक्य काहीच नसतं, याचा आदर्श पेंढारकरांनी घालून दिला आहे. त्यांच्या निधनानं एक प्रयोगशील, अनुभवी आणि दूरदर्शी उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गजानन पेंढारकर यांनी लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाच्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये जबरदस्त प्रेरणादायी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या त्या व्याख्यानाचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

भाग 


भाग 



भाग 



भाग 


30 September 2015

उत्कृष्ट ग्राहक सेवा - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! सध्या जग झपाट्याने बदलत आहे. व्यवसाय जगामध्ये सुध्दा आज, प्रचंड वेगात सगळं काही बदलतयं, रोज नवनवे प्रॉडक्टस् व सर्विसेस बाजारात येत आहेत. ग्राहकसुध्दा नवीन प्रॉडक्टस्  विकत घेत आहेत. ग्राहकाला आज प्रत्येक प्रॉडक्ट कडून भरपूर अपेक्षा आहेत. अश्या या गतिशिल बाजारात तग धरुन जर रहायचं असेल तर आपल्या व्यवसायाचा प्रॉडक्ट हा उत्कृष्ट दर्जाचा असलाच पाहिजे. प्रॉडक्ट उत्कृष्ट दर्जाचं असणे हे कोणत्याही व्यवसायासाठी अनिवार्य झालं आहे. ग्राहक जेवढे पैसे देतो त्याच्या मोबदल्यात चांगल्या प्रतिच्या उत्पादनाची तो अपेक्षा ठेवतो. परंतु बाजारातील जवळपास सर्वच प्रॉडक्ट उत्कृष्ट असण्याची दाट शक्यता आहे. अश्या परिस्थितीमध्ये ग्राहक अश्याच व्यवसायाचे प्रॉडक्ट विकत घेतो जिथे त्याला दिलेल्या किंमतीच्या मोबदल्यामध्ये जास्तीत जास्त मुल्य मिळते. ग्राहकांना आज व्यवसायांकडून सेवासुध्दा गरजेची वाटू लागली आहे. उत्कृष्ट ग्राहक सेवेमुळे ग्राहकांच्या इच्छा व अपेक्षा पूर्ण होतात. तो व्यवसायाच्या प्रति एकनिष्ठ बनतो. एवढेच नव्हे तो इतरांना सुध्दा, आपल्या प्रॉडक्टची शिफारस करतो. बदलत्या व्यावसायिक परिस्थितीमुळे उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रचंड महत्त्वाची भुमिका बजावतो, माझं असं ठाम मत आहे या लेखामध्ये उत्कृष्ट ग्राहक सेवेची ७ महत्त्वाची तत्वे मी आपल्यासमोर मांडत आहे.

१) ग्राहकाच्या वाढत्या अपेक्षा समजुन घ्या : ग्राहकाच्या अपेक्षा कधी नव्हे इतक्या वाढत चालल्या आहेत व दिवसें दिवस त्या बदलत चालल्या आहेत. जे आपण त्यांना गेल्यावर्षी देत होतो ते बहुतेक गेल्या वर्षी पर्यंत चांगलं होतं. परंतु या वर्षी तेच ग्राहकांना साधारण दर्जाचं वाटतं. ग्राहकांची मते जाणुन घेण्यासाठी त्यांचे अभिप्राय घ्या, त्यांच्या मुलाखती घ्या, त्यांना समजुन घ्या, कोणत्या गोष्टी त्यांना जास्त महत्त्वाच्या वाटतात. आपल्या व्यवसायाकडून मिळणार्‍या कोणत्या गोष्टी त्यांना दर्जेदार वाटतात किंवा नाही वाटत हे समजुन घेतल्यानंतर आपण काही महत्त्वपुर्ण निर्णय घेऊ शकतो. ग्राहकांच्या अपेक्षा उत्कृष्ट सेवा देऊन पुर्ण केल्याने बाजारात आपल्या प्रतिस्पर्धांच्या तुलनेने आपल्या व्यवसायाचे वेगळे स्थान निर्माण व्हायला मदत होईल.
२) ग्राहक सेवेचा उच्च दर्जा साध्यं करण्याचं लक्ष्य ठेवा : ग्राहक सेवेच्या मुलभुत किंवा अपेक्षित दर्जा पलीकडे जा. ग्राहकाला इच्छीत सेवा द्यायच्या सतत प्रयत्नात रहा. अधून मधून ग्राहकाला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन त्यांना खुष करा. आपल्या इंडस्ट्रीला अनुसरुन ग्राहक सेवेचा दर्जा निश्चित करा, आणि मग त्याच्या पलीकडे जाण्याचे मार्ग शोधा. ग्राहकांना जास्त पर्याय द्या, जास्त लवचिक व्हा. जास्त वेगात सेवा पुरवा असं सगळं करुन निश्चितच ग्राहक आपल्याकडे आकर्षित होतील व टिकून राहतील. परंतु कालांतराने आपले प्रतिस्पर्धी सुध्दा तसं करु लागतील. त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा नेहमी एक पाऊल पुढे रहा.  

३) ग्राहकांच्या अवास्तव मागण्यांना परिणामकारकपणे हाताळा : प्रत्येक वेळी आपण ग्राहकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करु शकतो असं नाही. काहीवेळा आपल्याला त्यांच्या अपेक्षांना वास्तवाची जाणीव करुन द्यावी लागते. परंतु त्यासाठी बाजारातील आपली प्रतिमा उत्कृष्ट असणे गरजेचे आहे. आपण दिलेला शब्द पाळतो, अशी जर आपली प्रतीमा असेल तर ग्राहक आपल्याला साथ देतो. ग्राहकाचा विश्वास जिंकण्यासाठी आपण दिलेला शब्द सदैव पाळला पाहीजे. ग्राहकाच्या अपेक्षा हाताळण्याचा आणखी एक परिणामकारक मार्ग म्हणजे 'आश्वासने कमी पुर्तता जास्त' उदाहरणार्थ - आपल्या ग्राहकाची अपेक्षा आहे की त्याचे काम अत्यंत जलद व्हावे, आणि आपल्याला माहीत आहे की ते होण्यासाठी एक तास तरी जाईल. ग्राहकाला असे नका सांगु की ते काम एक तासात होईल. त्यांना भरोसा द्या की आपण त्यांच्यासाठी लवकरात लवकर काम पूर्ण कराल, परंतु ते पुर्ण होण्यासाठी दिड तास तरी लागेल! जेव्हा ग्राहकाचे काम एका तासात पुर्ण होईल तेव्हा तो खुप खुश होईल. त्याला मी म्हणतो 'आश्वासने कमी पुर्तता जास्त' !
४) अनवधानाने झालेल्या चूकीमुळे, ग्राहकाचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवा : कधी कधी काही अनपेक्षित घटना घडतात व ग्राहक दुखवला जातो. असं जेव्हा होतं, तेव्हा गोष्टी सुरळीत करण्यासाठी जे जे करता येईल ते करा. जो प्रॉबलेम झाला होता तो  दुर करा व ग्राहकाच्या प्रति प्रामाणिकपणे काळजी दर्शवा. त्यानंतर काही तरी विशेष करा जेणे करुन आपल्या ग्राहकाला त्यातुन काहीतरी चांगल मिळेल. : उदाहरणार्थ -छोटीशी भेटवस्तु, डिस्काऊंट पुढील ऑर्डर साठी, इत्यादी.

५) ग्राहकांच्या तक्रारींचा आदर व सन्मान करा : 'निंदकाचे घर असावे शेजारी' ही म्हण आपल्याला माहीतच असेल. तक्रारी करणारा ग्राहक आपला चांगला मित्र बनू शकतो. त्याच्या सदैव संपर्कात राहा. व्यवसायात ज्या महत्त्वाच्या सुधारणा होणं गरजेच आहे. त्या बद्दल जबरदस्त टीप्स या ग्राहकांकडून आपल्याला मिळू शकतात. आपल्या यंत्रणे मध्ये काही चुका असतील तर हा ग्राहक बिनधास्तपणे आपल्याला त्या बद्दल सांगतो. प्रॉडक्टच्या दर्जा बद्दल, आपले प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा कोणत्या बाबतीत चांगले आहेत ते सुध्दा आपल्याला कळू शकते.

६) वैयक्तिक जबाबदारी घ्या : बर्‍याच व्यवसायांमध्ये ग्राहकाला झालेल्या असुविधेबद्दल आरोप-प्रत्यारोप केले जातात. एका डीपार्टमेंटची माणसे दुसर्‍या डीपार्टमेंटवर आरोप करतात. असं करुन काही साध्य होत नाही. ग्राहक मात्र व्यवसायापासुन तुटतो. आपल्या व्यवसायामध्ये ग्राहकाला उत्कॄष्ट सेवा देण्यासाठी सगळेच वचनबध्द असले पाहीजेत. तसे वातावरण व्यवसायामध्ये तयार करा. जेणे करुन कर्मचारी ग्राहकांना खुष ठेवण्यासाठी पुढाकार घेतील, नवीन संकल्पना राबवतील, नवीन व चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी सल्ला देतील.
७) जगाकडे पहा आपल्या ग्राहकाच्या दॄष्टीकोनातून : बर्‍याच वेळा उद्योजक आपल्या दुनियेत व्यस्त असतो. त्याला याचं भान राहत नाही की आपला ग्राहक नेमकं काय व कसा अनुभव घेत असेल.  वेळ काढून ग्राहकच्या बाजुने अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. आपल्याच ऑफिस मध्ये ग्राहक बनुन फोन करा. आपल्याच व्यवसायाचे ग्राहक होऊन कसे वाटते ते पहा. किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे प्रॉडक्ट व सर्विसेचा  उपभोग घेऊन बघा. आपल्याला नक्कीच बरचं काही शिकायला मिळेल.
मित्रांनो, जगातील सर्व व्यवसाय, व संस्था लोकांची सेवा करायलाचं अस्तित्वात आल्या आहेत. जेव्हा व्यवसाय आपल्या ग्राहकांची योग्य पध्द्तीने व मनापासुन सेवा करतो तेव्हा ग्राहक तर खुष होतोच व व्यवसायाची सुद्धा प्रगती होते.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्क: 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

26 August 2015

ब्रँडींग - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! 'ब्रँड' हा शद्ब जेव्हा एखादा लघुउद्योजक ऐकतो, तेव्हा ही संकल्पना त्याच्या व्यवसायाला लागु पडत नाही असंच त्याला वाटतं. 'ब्रँड' हा राष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या व्यवसायांनाच महत्त्वपुर्ण ठरतो, अशी बर्‍याच लघुउद्योजकांची धारणा असते. बहुतांशपणे लघुउद्योजकांना ब्रँडींग बद्दल जास्त आकर्षण वाटत नाही. 'आम्हाला 'ब्रँड' वगैरे बनवण्याची गरज नाही!' अशी त्यांची समजुत असते. लघुउद्योजकांना असं वाटत असतं की 'ब्रँड' ची निर्मिती करणे हा फार खर्चिक प्रकार आहे आणि आपण ज्या पातळीवर सध्या कार्यरत आहोत, ती लक्षात घेता आपल्या 'बजेट' मध्ये हा प्रकार अजिबात बसणार नाही, त्यामुळे आपण ब्रँडच्या भानगडीत न पडलेलं बरं! 'ब्रँड' निर्माण करण्यासाठी महागड्या एजन्सीची सेवा घ्यावी लागेल अशी त्यांची समजूत असते किंवा अपयशाच्या भितीपोटी, सर्वसामान्य लघुउद्योजक 'ब्रँडींग' च्या वाटेला जात नाही.
मित्रांनो, व्यवसाय कोणताही असो आणि तो कितीही लहान किंवा मोठा असो, व्यवसायाचं दुरगामी यश बाजारपेठेत असलेल्या व्यवसायाच्या प्रतिमेवर ठरते. वर्षानुवर्षे काही उत्पादने बाजारपेठेत राज्य करत आहेत, कितीही स्पर्धा असली तरी या उत्पादनांचे स्थान आजही भक्कम आहे. दुपारच्या वेळी आपल्याला तहान लागली असताना, दुकानात किंवा रेस्टॉरंटमध्ये आपण 'एक बिस्लेरी द्या' असं म्हणतो! 'एक बाटली पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर द्या' असं म्हणत नाही. आपल्याला काहीतरी चिकटवण्यासाठी गम हवा असतो परंतु आपण दुकानदाराला 'फेविकॉल द्या' असं सांगतो. टुथपेस्टला आजही बरेच जण 'कोलगेट' म्हणतात. एखाद्या कागदाची फोटोकॉपी काढण्यासाठी आपण 'झेरॉक्स' हाच शब्द वापरतो. बिस्लेरी, फेविकॉल, कोलगेट, झेरॉक्स ही नावे काय आहेत? हे सगळे 'ब्रँड' आहेत! 
 
या उत्पादनांनी बाजारपेठेत त्यांच्या ग्राहकवर्गामध्ये अशी प्रतिमा निर्माण केली आहे की ग्राहकांचा या उत्पादनांवर प्रचंड भरोसा आहे. बाजारपेठेत कितीही प्रतिस्पर्धि असले तरी आपल्या ब्रँडच्या जोरावर आजही ही उत्पादने यशस्वीपणे टिकून आहेत. काय वाटतं आपल्याला, या कंपन्या आपल्या उत्पादनांचा ब्रँड निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वकपणे प्रयत्न करत असतात की आपोआपच त्यांचा ब्रँड बनतो? साहजिकच या कंपन्या आपल्या उत्पादनाचा ब्रँड निर्माण करण्याला प्रचंड महत्त्व घेतात. परंतु प्रश्नं असा पडतो की तेवेढेच महत्त्व लघुउद्योजकांनी सुध्दा आपल्या उत्पादनांचा ब्रँड बनवण्यासाठी दिले पाहीजे का? मित्रांनो, आधी म्हंटल्याप्रमाणे व्यवसायाचा व्याप कितीही मोठा किंवा लहान असो, दुरगामी प्रगतीसाठी व्यवसायाची बाजारपेठेत असलेली  प्रतिमा कारणीभुत ठरते. बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची उत्पादन अथवा सेवेची 'विश्वसनिय प्रतिमा' निर्माण करण्याच्या प्रक्रीयेला 'ब्रँडींग' असं म्हणतात. बाजारपेठेत व्यवसायाची, उत्पादन किंवा सेवेची 'वेगळी व विश्वसनिय ओळख' म्हणजेच त्या व्यवसायाचा 'ब्रँड' होय! या ब्रँड मुळे व्यवसायाला किंवा उत्पादन सेवेला अद्वितीय स्थान प्रात्प होतं. ब्रँड मुळे व्यवसायाला बरेच फायदे प्राप्त होतात. ब्रँड मुळे उत्पादन व सेवा सदैव ग्राहकाच्या लक्षात राहते. प्रतिस्पर्धींपेक्षा उत्पादन व सेवेच वेगळं असं स्थान निर्माण होतं. ब्रँडमुळे ग्राहकांचा उत्पादन व सेवेवर विश्वास बसतो. ग्राहक वर्ग पुन्हा पुन्हा उत्पादन व सेवा विकत घेण्यासाठी प्रेरीत होतो. ब्रँडमुळे उत्पादन व सेवा थेट ग्राहकाच्या भावनांशी जोडले जाते. व्यवसायात दुरगामी यश प्राप्त करण्यासाठी 'ब्रँड' निर्णायक भुमिका बजावतो.
मित्रांनो, ब्रँडचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'कोका-कोला'. आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोला पेय पिणं आरोग्यासाठी पोषक वगैरे नाही किंवा आपल्या रोजच्या जीवनाची गरज सुध्दा नाही. तरी सुध्दा आपण 'कोका-कोला' पितो! 'कोका-कोला' चा संपुर्ण व्यवसाय हा त्यांच्या ब्रँडींग आणि मार्केटींग कृतीयोजनांवर अवलंबुन आहे. ब्रँड शिवाय आज 'कोका-कोला' जगभरात यशस्वी उत्पादन होऊच शकले नसते. 'कोका-कोला' ने घरोघरी कुटुंबामध्ये आपले अप्रत्यक्षपणे स्थान निर्माण केले आहे. ही ब्रँडचीच जादु आहे. 
मित्रांनो या लेखा द्वारे मी आपल्या लघुउद्योगाचा ब्रँड तयार करण्यासाठी सात पायर्‍या सांगणार आहे. कोणत्याही लघुउद्योगासाठी ठरवलेल्या बाजारपेठेमध्ये वेगळा व विश्वसनिय ब्रँड तयार करण्यासाठी या पायर्‍या जबरदस्त फायदेशीर ठरु शकतात.

लघुउद्योगाचा ब्रँड निर्माण करणार्‍याच्या ७ पायर्‍या:
१) USP तयार करा : बाजारात आपल्या उत्पादनाची वेगळी व विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी सर्व प्रथम मुळतः उत्पादनाचा वेगळा गुणधर्म असणे गरजेचे आहे. उत्पादन किंवा सेवेतच जर काही वेगळेपण नसेल तर ब्रँड निर्माण करणे अशक्य. बाजारपेठेचा आढावा घेऊन, ग्राहकवर्गाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या उत्पादन व सेवेमध्ये जाणिवपूर्वकपणे तयार केलेला गुणधर्म म्हणजे USP. USP तयार करण्याच्या टिप्स् मी या सदरातील मागिल लेखात दिल्या होत्या. कृपया त्याचा अभ्यास करा.
२) आपल्या व्यवसायाची किंवा उत्पादन सेवेची बाजारपेठेत कशी प्रतिमा असावी? ते ठरवा : व्यवसायाच्या USP ला अनुसरुन तशी प्रतिमा ग्राहकाच्या मनात निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणुनच त्याबद्द्ल विचार मंथन करा की, आपल्या उत्पादनाबद्दल जेव्हा ग्राहक विचार करतो तेव्हा नेमक्या कोणत्या भावना त्याच्या मनात आल्या पाहीजेत. उदाहरणार्थ : 'सफोला' कुकींग ऑइल बद्दल जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपल्या मनात त्वरीत ह्रदयाची काळजी, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त अशी प्रतिमा तयार होते. 'सफोला' ला स्वतःची वेगळी व विश्वसनिय प्रतिमा निर्माण करण्यात नक्कीच यश आले आहे. 
३) कोणत्या माध्यमांद्वारे आपल्याला व्यवसायाची अपेक्षित प्रतिमा निर्माण करता येईल? ते ठरवा : व्यवसायाची प्रतिमा निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या प्रसार माध्यमांचा, जाहीरात माध्यमांचा, मार्केटींग साधनांचा किंवा संभाषण माध्यमांचा वापर आपण केला पाहीजे. जेणे करुन आपल्या उत्पादनाची अद्वितीयता ग्राहक वर्गा समोर व्यक्त करु शकतो. आपल्या 'ब्रँडींग बजेट' मध्ये शक्य असेल त्या माध्यमांना निवडा. उदाहरणार्थ. लोगो, टॅग लाइन, बिझनेस कार्ड, स्टेशनरी, ब्रोशर, वेबसाइट, सोशल मिडीया, भेटवस्तु, गणवेश, कार्यस्थळातील वातावरण, पॅकेजिंग, जाहीरात इ. अनेक साधनांचा उपयोग होऊ शकतो. 
४) ब्रँडींग साधनांची निर्मिती करा : ठरवलेल्या ब्रँडींग साधनांची योग्य प्रकारे निर्मिती करा. प्रोफेशनल व्यक्तींची मदत घ्या. चांगल्या अ‍ॅड एजन्सी ज्या लघुउद्योगांसाठी काम करतात, त्यांची योग्य प्रकारे निवड करा. शक्यतो एकाच एजन्सी बरोबर काम करा जेणे करुन ब्रँडींग मध्ये सातत्य राहील.
५) कायदेविषयक सुरक्षितता मिळवा : ब्रँडींग साधनांमुळे व्यवसाय किंवा उत्पादन-सेवेला एक अस्तित्व प्राप्त होते. त्या अस्तित्वाला आपण सुरक्षित ठेवले पाहीजे. ही एक प्रकारे व्यवसायाची महत्त्वपुर्ण संपत्ती असते. याला IP (Intellectual Property) असं म्हणतात. कॉपी राइट किंवा ट्रेडमार्कं करुन आपण आपल्या ब्रँड ची ओळख सुरक्षित करु शकतो.
६) ब्रँड कृतीयोजना तयार करा : आता येत्या काळात टप्प्या टप्प्याने आपण आपल्या ब्रँडचा बाजारपेठेत कश्या प्रकारे प्रचार कराल त्यासाठी लिखित स्वरुपात कृती योजना तयार करा. या कृतीयोजनेव्दारे आपण ठरवल्याप्रमाणे ग्राहकाच्या मनात विश्वसनीय प्रतिमा निर्माण होणे गरजेचे आहे.
७) ब्रँड कृती योजनेला अनुसरुन सातत्याने अंमलबजावणी करा : ठरवलेल्या कृती योजनेनुसार अंमलबजावणी झाली तरच ब्रँड निर्माण होइल. ब्रँड माध्यमांमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. अर्धवट अंमलबजावणी मुळे ब्रँडवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मित्रांनो, या लेखाव्दारे मी लघुउद्योगांसाठी ब्रँडींग बद्दल थोडक्यात माहीती दिली आहे. ब्रँड निर्माण करण्याच्या सुरुवातीच्या काळात ही माहीती नक्कीच लाभदायक ठरेल. मी आशा करतो की आपण आपल्या व्यवसायाचे बाजारपेठेत वेगळे व विश्वसनीय स्थान निर्माण करण्यासाठी पाऊलं उचलालं.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्क: 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites