मित्रांनो, प्रचंड स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपल्या व्यवसायाचा 'ब्रॅंड' निर्माण होणं गरजेचं आहे. ब्रॅंड म्हणजे प्रतिमा! आपल्या व्यवसायाबद्दल, किंवा प्रॉडक्ट व सर्विसबद्दल लोकांच्या मनात काय प्रतिमा आहे? जर ही प्रतिमा सकारात्मक असेल, ग्राहकांच्या गरजांना लक्षात घेऊन जाणिवपूर्वकपणे तयार केली असेल तर, आपल्या प्रॉडक्टच्या व सर्विसेसच्या प्रति ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. या विश्वासामुळे ग्राहक आपोआपच आपल्या प्रॉडक्ट व सर्विसच्या प्रति एकनिष्ठ बनतो.
आपल्या व्यवसायाचा ब्रॅंड असण्याचे ५ फायदे खालिल प्रमाणे आहेत:
१) विक्री करणे सोपे:
जर आपल्या प्रॉडक्टबद्दल बाजारपेठेत आधीपासून उच्च विश्वसनियता प्रस्थापित झाली असेल तर आपलं प्रॉडक्ट विकणं कठीण नसतं. कारण ग्राहकाला माहीत असतं की त्याला काय मिळणार आहे. त्याला पटवण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागत नाहीत.
२) जास्त प्रमाणात विक्री:
'ब्रॅंडेड' प्रॉडक्ट व सर्विसेस इतर प्रॉडक्ट सर्विसेसपेक्षा जास्त प्रमाणात विकले जातात. ब्रॅंडमुळे कंपनीच्या उत्पन्नावर सुध्दा सकारात्मक परिणाम होतो.
३) वेगात विक्री:
बऱ्याच प्रॉडक्टच्या विक्री प्रक्रीयेला फार वेळ लागतो. ग्राहक खरेदी बाबतचा निर्णय घेण्यासाठी वेळ लावतो. इतर प्रॉडक्टचा सुध्दा विचार करतो त्यामुळे विक्री प्रक्रियेत फार विलंब होतो. ब्रॅंडच्या विश्वसनियतेमुळे ही अडचण दुर होते.
४) आपल्या प्रॉडक्टची योग्य किंमत मिळते:
स्पर्धेमध्ये टिकून रहाण्यासाठी उद्योजक आपल्या प्रॉडक्टची किंमत कमी करतात. परंतु 'ब्रॅंड' ला नेहमी हवी ती किंमत प्राप्त होते. ब्रॅंडेड प्रॉडक्ट महाग जरी असले तरी ग्राहक जास्त किंमत देण्यास कोणतीही शंका घेतल्याशिवाय तयार होतो.
५) व्यवसायाचे मुल्यांकन वाढते:
'ब्रॅंड' हा कंपनीचा Intangible Asset असतो. कंपनीच्या Balance Sheet वर जरी त्याचं मुल्य दिसत नसलं तरी बाजारातील कंपनीच्या मुल्यांकनामधे 'ब्रॅंड' मुळे कितीतरी पट जास्त किंमत असते.
आपल्या व्यवसायाचा 'ब्रॅंड' बनवण्यासाठी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांची एक दिवसीय कार्यशाळा... 'A-Tool For BRANDING'.
दिनांक: २६ मार्च २०१६
वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळ: बॉर्न टू विन ट्रेनिंग हॉल, ४२-४३, काकड इंडस्ट्री, एस. कीर रोड, माटुंगा (प.)
अधिक माहीतीसाठी संपर्क साधा... 7666426654
स्थळ: बॉर्न टू विन ट्रेनिंग हॉल, ४२-४३, काकड इंडस्ट्री, एस. कीर रोड, माटुंगा (प.)
अधिक माहीतीसाठी संपर्क साधा... 7666426654