नमस्कार! 'ब्रॅंड' हा शब्द जेव्हा एखादा लघुउद्योजक ऐकतो, तेव्हा ती संकल्पना त्याच्या व्यवसायाला लागु पडत नाही असचं त्याला वाटतं. बहूतांशपणे लघुउद्योजकांना 'ब्रॅंडीग' बद्दल आकर्षण वाटत नाही. आम्हाला ब्रॅंड वगैरे बनवण्याची गरज नाही अशी त्यांची समजुत असते. लघुउद्योजकांच्या 'ब्रॅंड' बद्दलच्या काही गैरसमजुती त्यांना त्यांच्या व्यवसायाचा ब्रॅंड बनवण्यापासुन रोखुन ठेवतात, त्या पुढील प्रमाणे आहेत.
गैरसमजुत क्रमांक १: ब्रॅंड निर्मिती प्रक्रिया फार खर्चिक असते.
ब्रॅंड निर्माण करण्यासाठी भरपुर पैसा खर्च करावा लागतो असं मुळीच नाही. 'शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ' हे आपण लहान पणापासुन ऐकत आलो आहोत. तसेच 'ब्रॅंड'चे आहे. कोणत्या 'आयडीया' वापरुन आपण आपल्या ब्रॅंडचा प्रसार करता ते निर्णायक ठरते.
गैरसमजुत क्रमांक २ : लोगो, टॅग लाइन व वेबसाईट म्हणजे 'ब्रॅंड'.
लोगो आपल्या ब्रॅंडची 'ओळख' असते. आपल्या प्रॉडक्टची 'पोझिशन' टॅग लाइनमुळे निर्माण होते. वेबसाईटमुळे लोकांना आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण होते परंतु याचा अर्थ ब्रॅंडींग नव्हे. 'ब्रॅंड' निर्माण करण्यासाठी आपल्या प्रॉडक्ट बद्दल एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करावी लागते. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन, काही कॄतीयोजना आखाव्या लागतात.
गैरसमजुत क्रमांक ३ : फक्त मोठ्या कंपन्यांचाच ब्रॅंड बनु शकतो.
ब्रॅंड च्या बाबतीत मोठा किंवा छोटा विचार करणे मुळात अयोग्य आहे. ब्रॅंड निर्माण करणे हे व्यवसायाच्या दुरगामी व्यवसायिक ध्येयावर अवलंबून असते त्यामुळे व्यवसायाच्या बाजारपेठेच्या आकाराचा विचार करुन ब्रॅंड निर्मितीचा विचार केला पाहीजे. व्यवसाय क्षेत्र जेवढं पसरलेलं असेल तेवढ्या प्रमाणात व तेवढ्या भागात प्रॉडक्टच्या प्रतिमेचा प्रचार होणं गरजेचं असतं.
लघु उद्योजक आपल्या व्यवसाय क्षेत्राचा विचार करुन बाजारपेठेत आपल्या प्रॉडक्ट व सर्विसचा ब्रँड निर्माण करु शकतात.
आपल्या व्यवसायाचा 'ब्रॅंड' बनवण्यासाठी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांची एक दिवसीय कार्यशाळा... 'A-Tool For BRANDING'.
दिनांक: २६ मार्च २०१६
वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळ: बॉर्न टू विन ट्रेनिंग हॉल, ४२-४३, काकड इंडस्ट्री, एस. कीर रोड, माटुंगा (प.)
अधिक माहीतीसाठी संपर्क साधा... 7666426654
No comments:
Post a Comment