नमस्कार मित्रांनो,
काही तासांतच २०१६ या वर्षाची सांगता होईल आणि आपण २०१७ या नवीन वर्षामध्ये पदार्पण करू तर सर्वप्रथम तुम्हाला नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. २०१६ या वर्षाचा निरोप घेताना काही आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो ज्या BORN2WIN च्या परिवारासाठी अत्यंत महत्त्वाच्या व यशस्वी ठरल्या. आपल्या सर्वांच सहकार्य व सदिच्छेमुळेच आमच्यासाठी हे वर्ष अविस्मरणीय होतं त्यासाठी Team BORN2WIN आपली नेहमीच कृतज्ञशिल राहिल.
मित्रांनो BORN2WIN चे मिशन आहे 'लोकांना अर्थपूर्ण आणि समृध्द जीवन जगण्यास मदत करणे', हे जगण्यासाठी BORN2WIN ने वेगवेगळ्या कार्यशाळा व प्रशिक्षणक्रम या वर्षीही आयोजित केले होते.
जानेवारी २०१६ मध्ये BORN2WIN ने आपल्या कारकिर्दीची ८ वर्षे पूर्ण केली व आता ९ वे वर्ष २०१७ जानेवारी मध्ये पूर्ण करणार आहे.
जगातील व्हिजनरी व्यवसायांच्या अभ्यासावर आधारित व प्रभावी उद्योजकीय नेतृत्व गुणांच्या संशोधनावर आधारित अतुल राजोळी यांचा एक विचार परिवर्तित करणारा कार्यक्रम The Secrets of Visionary Business. भव्यदिव्य व्यवसायिक स्वप्नं आपल्या उराशी बाळगणार्या प्रत्येक उद्योजकांसाठी १६ जानेवारी आणि १६ जून २०१६ रोजी ठाणे येथे उद्योजकांच्या उस्त्फुर्त प्रतिसादात पार पडला.
The Secrets of Visionary Business १६ जानेवारी २०१६
The Secrets of Visionary Business १६ जून २०१६
३१ जानेवारी २०१६ रोजी BORN2WIN चा लोकप्रिय कार्यक्रम The Success Blue Print ठाणे येथे दणक्यात पार पडला.
The Success Blue Print
BORN2WIN ने खास उद्योजक व प्रोफेशनल्स यांच्यासाठी The Magic of Magnetic Marketing ही एक दिवसीय कार्यशाळा अंधेरी येथे चाणाक्य इंन्स्टिट्युट मध्ये २६ फेब्रुवारी आणि २४ सप्टेंबर रोजी आयोजित केली. या कार्यशाळेमध्ये आपल्या Product व Services ची माहिती आपल्या संभाव्य ग्राहकापर्यंत प्रभाविपणे मांडून बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची वेगळी छाप निर्माण करुन जास्तीत-जास्त ग्राहक आपल्याकडे कसे आर्कषित करायचे याबद्दल मार्गदर्शन मिळाले.
The Magic of Magnetic Marketing २६ फेब्रुवारी २०१६
The Magic of Magnetic Marketing २४ सप्टेंबर २०१६
नवोदित उद्योजकांसाठी स्वतःमधील उद्योजकाला जागे करा ही कार्यशाळा १० एप्रिल रोजी प्रभादेवी व २९ सप्टेंबर रोजी माटुंगा येथे नवोदित उद्योजकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली.
स्वतःमधील उद्योजकाला जागे करा १० एप्रिल २०१६
स्वतःमधील उद्योजकाला जागे करा २९ सप्टेंबर २०१६
प्रथमच Branding या विषयावर आधारित A-Tool For Branding ही एकदिवसीय कार्यशाळा ४ मे आणि २२ डिसेंबर २०१६ रोजी BORN2WIN च्या ऑफीस मध्ये आयोजित करण्यात आली होती, ह्या मध्ये Branding बाबतचे तंत्र, मंत्र व शास्त्र यांचा उलघडा झाला व उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा Brand बनविण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
A-Tool For Branding ४ मे २०१६
A-Tool For Branding २२ डिसेंबर २०१६
२३ जून रोजी Professional Selling Skills ही उद्योजकांना जबरदस्त प्रभावशाली विक्री कौशल्य व कृती योजनांवर आधारित कार्यशाळा होती.
Professional Selling Skills
SPIN SELLING PLUS ही SELLING Skills वर आधारीत एक दिवसीय practical कार्यशाळा २२ जुलै रोजी दणदणीतरीत्या पुर्ण झाली.
SPIN SELLING PLUS
१० ऑगस्ट २०१६ रोजी सुसज्ज व्हा यशस्वी व्हा ही एकदिवसीय कार्यशाळा तसेच ९ नोव्हेंबर रोजी विश्वास निर्मिती वेगवान प्रगती ही एक दिवसीय कार्यशाळा माटुंगा येथे मैसुर असोसिएशन हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती.
सुसज्ज व्हा यशस्वी व्हा!
विश्वास निर्मिती वेगवान प्रगती!
१५ ऑगस्ट स्वातंत्र दिवसाच्या निमित्ताने संगमनेर येथे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. १०००+ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता, अतिशय उत्साही आणि जबरदस्त असा हा स्वातंत्र्यदिन खर्या अर्थाने साजरा झाला.
संगमनेर येथील एक दिवसीय कार्यशाळा
या वर्षी लक्ष्यवेध जो स्वप्नांना वास्तवात बदलणारा एक परिणामकारक प्रशिक्षणक्रम आहे, त्याच्या २६वी (स्पेशल २६), २७वी (सत्ता सत्तावीसची), २८वी (Fantastic 28) व २९वी (Leap २९) बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्या व आता ३०वी बॅच उत्साहात सुरु आहे. झालेल्या बॅचचा पदवीदान समारंभ ज्या सोहळ्याची आजी-माजी प्रशिक्षणार्थी आतुरतेने वाट पाहत असतात, म्हणजेच लक्ष्यसिद्धी सोहळा देखील दिमाखात पार पडला. २६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा ५ मार्च रोजी रचना सांसद हॉल व २७वा लक्ष्यसिद्धी सोहळा २९ मे रोजी टेक्सटाईल हॉ
२६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा
२७वा लक्ष्यसिद्धी सोहळा
३१ ऑगस्ट रोजी २८ वा लक्ष्यसिध्दी सोहळा मैसुर असोसिएशन, माटुंगा (पूर्व) येथे झाला. 'BVG Group' चे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड यांनी 'एक असामान्य यशोगाथा' यामधून त्यांचा प्रेरणादायी उद्योजकीय प्रवास सर्वांन समोर मांडला.
२८ वा लक्ष्यसिध्दी सोहळा
१० डिसेंबर रोजी २९व्या लक्ष्यसिध्दी सोहळ्या मध्ये आर्थिक क्रांती, या विषयावर गौतम ठाकूर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचा विषय पैसा आणि त्याला अनुसरुन यावर्षी जे Demonetisation झाले आहे ते अगदी सोपे करुन त्यांनी सर्वांनसमोर मांडले.
२९ वा लक्ष्यसिध्दी सोहळा
या वर्षी ३१ जुलै रोजी आपली Graphology ची १०वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून बॉर्न टू विन ने आत्तापर्यंत जवळ जवळ २५० Graphologist घडवले आहेत. दहाव्या बॅचच्या प्रशिक्षणर्थ्यांची कामगिरी देखिल जबरदस्त होती.
दरवर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम मे २०१६ मध्ये विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात दणदणीतरित्या पार पडला. त्याचप्रमाणे फ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम फ्युचर पाठशाला जोश २०१६ दिनांक २९ मे २०१६ रोजी, मैसुर असोसिएशन, माटुंगा मध्ये अतिशय उत्साहवर्धक व भारावून टाकणार्या वातावरणात पार पडला. फ्युचर पाठशालाचे वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थींनी आपल्या प्रेरणादायी परफॉर्मन् सव्दारे हा कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांना मोहीत करुन टाकलं. कर्यक्रमातील ऊर्जा व तरुणाईचा जल्लोष खरोखरच जबरदस्त असा होता.
Graphology ची १०वी बॅच
दरवर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम मे २०१६ मध्ये विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात दणदणीतरित्या पार पडला. त्याचप्रमाणे फ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम फ्युचर पाठशाला जोश २०१६ दिनांक २९ मे २०१६ रोजी, मैसुर असोसिएशन, माटुंगा मध्ये अतिशय उत्साहवर्धक व भारावून टाकणार्या वातावरणात पार पडला. फ्युचर पाठशालाचे वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थींनी आपल्या प्रेरणादायी परफॉर्मन्
MBX म्हणजेच Marathi Business Xchange, ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वरळी येथे महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेला आगळा वेगळा कार्यक्रम. महाराष्ट्रीय उद्योजकांच्या उपक्रमांचे प्रदर्शन, विविध विषयांवर दिग्गजांची चर्चासत्रे, उद्योजकांसाठी महत्त्वाच्या विषयांवर तज्ञांच्या कार्यशाळा आणि व्यावसायिक नेटवर्किंग अश्या भन्नाट संकल्पनेवर आधारीत ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून उद्योजकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. MBX च्या पहिल्याच प्रयत्नाला चांगले यश मिळाले.
MBX : Marathi Business Xchange
वास्तुरविराज या भारतातील वास्तुशास्त्र क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या २५० वास्तु तज्ञांना "आपला वास्तु व्यवसाय यशस्वीपणे वाढावा" या विषयावर अतुल राजोळी २ऑक्टोबर रोजी ठाणे येथे व २३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे मार्गदर्शन केले.. सर्व वास्तु तज्ञांनी कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला..!!
आपला वास्तु व्यवसाय यशस्वीपणे वाढावा
मित्रांनो, वर्ष २०१६ कधी सुरु झालं कधी संपलं कळलंच नाही. या वर्षभरामध्ये टिम बॉर्न टू विनने उल्लेखनिय कामगिरी नक्कीच केली. २०१६ वर्षाचा निरोप घेताना २०१६ मध्ये जे काही साध्य केलं व शिकलो त्याचा सकारात्मक दृष्टीकोन गाठीशी बांधून बॉर्न टू विन वर्ष २०१७ साठी पुन्हा एकदा सज्ज आहे.
Thank You 2016... Welcome 2017...!