नमस्कार उद्योजक मित्रांनो! कोणताही यशस्वी उद्योजक नेमकं काय करतो? उद्योजकाची आपल्या व्यवसायामध्ये नेमकी भुमिका काय? माझ्या मते यशस्वी उद्योजक, आर्थिक जोखिम घेऊन व्यवसायाचे आदर्श व्यवसायात रुपांतर करतो व व्यवसायाचा विस्तार करतो. यशस्वी उद्योजकाचे लक्ष व्यवसायाचा विकास करण्यावर असते. कोणत्याही यशस्वी व्यवसायाच्या वाटचालीचा आलेख हा चढता असतो. व्यवसायाला सतत प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सातत्याने व्यवसाय वृध्दी करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी व्यवसायाने मागिल वर्षापेक्षा जास्त आर्थिक उलाढाल केली पाहीजे, व्यवसायाचे उत्पन्न मागिल वर्षापेक्षा वाढले पाहीजे. यशस्वी उद्योजकाकडे व्यवसायाचा विकास करण्याची मानसिकता असते. भविष्यात निरनिराळ्या मार्गांनी आपला व्यवसाय कसा वाढवता येईल? हा प्रश्न सतत तो आपल्या मनात स्वतःला विचारत असतो.
मित्रांनो, या लेखामध्ये मी आपल्याला व्यवसाय विकासाच्या ७ युक्त्या सांगणार आहे. या ७ युक्त्यांचा विचार करुन आपण, आपला सध्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी नक्कीच काहीना काही कृती करु शकता.
१) ग्राहकांची संख्या वाढवा:
व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात ग्राहकांची संख्या कमी असते. त्यानंतर ग्राहकांची संख्या वाढते. बर्याच वेळा ग्राहकांची संख्या word of mouth मुळे वाढते. बरेच उद्योजक जाणिवपूर्वकपणे ग्राहक वाढवण्यासाठी कृती योजना आखत नाहीत. आपल्या बाजारपेठेत उपलब्ध जास्तीत जास्त संभाव्य ग्राहकांपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहीजे. आपल्या व्यवसायाचं उत्पन्न पुर्णपणे आपल्या ग्राहकांच्या संख्येवर अवलंबून आहे. आपले ग्राहक जेवढे जास्त, तेवढा आपला व्यवसाय मोठा. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करा. त्यासाठी प्रभावी मार्केटींग तंत्रांचा वापर करा. जास्त ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे प्रॉडक्ट व सेवा देण्यासाठी व्यवसाया अंतर्गत प्रबळ यंत्रणा निर्माण करा.
२) उत्पादन व सेवेची किंमत वाढवा:
बाजारपेठेमध्ये जशी मागणी वाढू लागते तशी उत्पादन व सेवेची किंमत वाढवून सुध्दा व्यवसाय वृध्दी करता येते. परंतु हे तितके सोपे नाही. त्यासाठी 'ब्रँड' निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागते. आपल्या उत्पादन व सेवेच्या गुणवत्तेमध्ये सुध्दा सुधारणा करावी लागते. ग्राहक आपल्या उत्पादन व सेवेसाठी जास्त वेळ तेव्हाच देतो जेव्हा त्याला त्याचं मुल्यं योग्य वाटतं. आपल्या उत्पादन व सेवेची किंमत नेहमी योग्य असली पाहीजे.
३) उत्पादन व सेवेची संख्या वाढवा:
व्यवसायाची एका विशिष्ट पातळी पर्यंत प्रगती झाल्यानंतर व्यवसायाचे एकनिष्ठ ग्राहक निर्माण होतात. त्यापैकी मोठा ग्राहकवर्ग प्रस्थापित झाल्या नंतर याच ग्राहकाला आपल्या व्यवसायासंबंधित व इतर ज्या गरजा असतात त्यांना आधारीत उत्पादने व सेवा आपल्या व्यवसायामार्फत उपलब्ध करुन द्या. आपला सध्याचा समाधानी ग्राहक आपल्या कडून आणखी इतर गोष्टी विकत घेण्यासाठी तयार असतो. त्याला इतर उत्पादने व सेवा आपल्या व्यवसायाव्दारे विकत घेण्याची संधी द्या. त्यासाठी आपल्या सध्याच्या ग्राहकांच्या इतर गरजा ओळखा. गरजा ओळखल्यानंतर उत्पादने व सेवेंची निर्मिती करा. त्यासाठी आपण इतर व्यवसायांबरोबर सहयोगाने गरजा पुर्ण करु शकता.
४) भौगोलिक क्षेत्र वाढवा:
आपले उत्पादन व सेवेचे सध्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये बर्यापैकी जम बसवल्यानंतर, ज्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये संभाव्य ग्राहकांची संख्या मुबलकपणे आहे. त्या ठिकाणी आपले उत्पादन व सेवा कश्याप्रकारे विकता येईल यासाठी योजना आखा. आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपल्या व्यवसायाची मर्यादा कोणतेही भौगोलिक स्थान, सिमा ठरवू शकत नाही. ज्या ठिकाणी, संधी आहे तिथे आपण आपल्या व्यवसायाची वृध्दी करु शकता. मग ते ठिकाणी कोणतेही शहर असुदे, जिल्हा असुदे, राज्य असुदे किंवा देश असुदे. भौगोलिक क्षेत्र वाढवल्याने व्यवसायाचा व्याप वाढतो म्हणुनच प्रबळ व्यवस्थापन यंत्रणेची गरज भासते. प्रबळ व्यवस्थापन यंत्रणा नसेल तर व्यवसायाचा विस्तार होणे कठीण होऊन बसते.
५) उत्पादन व सेवा खरेदीची पुनरावृत्ती वाढवा:
जेवढा उत्पादन व सेवेचा वापर जास्त तेवढी विक्रीची संधी जास्त. ग्राहकाने उत्पादन व सेवेच्या खरेदीची पुनरावृत्ती होते. त्यामुळे साहजिकच व्यवसायात वाढ होते. ग्राहक आपल्याकडे पुन्हा पुन्हा येण्यासाठी उत्पादनांच्या वापरामध्ये कश्या प्रकारे वाढ करता येईल यावर विचारमंथन करा.
उदाहरणार्थ: कॅडबरी चॉकलेटने आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रसंगी कॅडबरी खाण्यास प्रवृत्त केलं, भारतीय सणांदरम्यान मिठाई ऐवजी कॅडबरी खाण्यास ग्राहकांना सांगितले, मग दर महिन्याच्या पहील्या दिवशी, मग कोणत्याही गोष्टीच्या शुभारंभाआधी कॅडबरीने आपल्याच ग्राहकांना खरेदीचि पुनरावृत्ती करायला लावून आपल्या व्यवसायाची वृध्दी केली.
६) उत्पादन व सेवा वितरणाची माध्यमे वाढवा:
एखाद्या रेस्टॉरंट ला आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर वितरणाची माध्यमे वाढवावीच लागतात. रेस्टॉरंट मध्ये येऊन खाण्या व्यतिरीक्त इतर माध्यमांव्दारे आपले उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवावी लागतात.
उदाहरणार्थ: टेक अवे सर्विस, फ्री होम डीलीव्हरी, कॅटरर्स सर्विस, फ्रँचायजी इ. आपले उत्पादन व सेवा निरनिराळ्या वितरणा माध्यमांतुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आजकाल इंटरनेटच्या युगात. इ-कॉमर्स वेबसाईटचा वापर करुन जगाच्या कानाकोपर्यात आपले उत्पादन आपण पोहोचवू शकता.
७) नविन ग्राहक वर्गाला उत्पादन व सेवा विक्री करा:
सध्या आपण विशिष्ठ ग्राहक वर्गापुरते उत्पादन व सेवा विक्री करत असाल तर पुर्णपणे वेगवेगळ्या ग्राहकवर्गाला कश्याप्रकारे विक्री करता येईल याबाबत योजना आखा. जर पुन्हा एकदा रेस्टॉरंटच उदाहरण द्यायचं झालं तर रेस्टॉरंटच्या जवळपास जर व्यावसायिक संकुल असेल तर तेथे काम करणार्या कर्मचार्यांसाठी टिफीन सर्विसेस ते सुरु करुन पुर्णपणे नविन ग्राहक वर्गाला आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करु शकतात. एखादा व्यवसाय रिटेल ग्राहकांना जर विक्री करत असेल तर तो बिझनेस टू बिझनेस विक्री करण्यासाठी विशेष पाऊलं उचलुनं आपला ग्राहक वर्ग वाढवू शकतो. बिझनेस टू बिझनेस व्यवसाय करणारा उद्योजक सरकारी कामे करण्यासाठी कृती करु शकतो याला 'सेगमेंटेशन' असं सुध्दा म्हाणतात. त्या व्दारे व्यवसाय एका नव्या ग्राहकवर्गाच्या 'सेगमेंट' मध्ये शिरतो.
मित्रांनो, मला ठाम विश्वास आहे की वरील ७ युक्त्यांमुळे आपल्या विचारांना चालना मिळाली असेल व 'व्यवसाय वृध्दी' करण्यासाठी आपण प्रेरीत झाला असाल. उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्याखेरीज खरे तर पर्यायच नाही.
भारत हा एक विकसित होणारा देश आहे त्यामुळे आपल्याला महागाईला सामोरं जावं लागतं, म्हणुनच आपल्या व्यवसायाच्या विकासाचा वेग किमान महागाई मात करेल इतका तरी असलाचं पाहिजे. तरचं आपण व्यवसायात तग धरून उभे राहू शकू.
'व्यवसायातील विकास' अनुभवण्यासाठी पाउल उचला.
7666426654 या क्रमांकावर संपर्क करा किंवा 'GROWTH' असे whatsapp करा. बॉर्न टु विनचे Growth Consultant आपल्याला संपर्क करतील. आजच मोफत One To One भेट द्या.
No comments:
Post a Comment