आई वडील म्हणून आपल्या मुलांवर कधीही कुठलीही गोष्ट थोपवू नका. तुमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण त्यांचा आदर करायला शिका. प्रेमात आणि आदर करण्यात फरक असतो. प्रेमात आपण कधीकधी जास्त भावनिक आणि हळवे होत आपल्याच मुलांना त्रासदायक ठरु शकतो; पण आदरात मात्र तसे होत नाही. आदर केल्यामुळे आपले मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे याची समज तुम्हाला येते. हे ही लक्षात असू द्या की प्रेमातूनच आदराची वाट जात असते ज्यातून तुम्ही मुलांशी निखळ मैत्री करु शकता.
हे करा.
१) तुमच्या मुलांच्या मित्र मैत्रीणींशी देखील दोस्ती करा. त्यांच्या सोबत खेळा. त्यांना काहीतरी मजेदार काम करायला सांगा. त्यांची कंपनी मनापासून एन्जॉय करा.
२) मुलांवर संस्कार करताना, त्याविषयी बोलत असतांना त्यांची भाषा वापरा. बोजड भाषा वापरु नका. तुम्ही ज्या मुल्यांविषयी त्यांच्याशी बोलणार आहात ते तुमच्या स्वतःच्या वागण्यात आहेत ना हे आधी पाहून घ्या.
४) आपली मुले काय विचार करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी ते जेंव्हा तुमच्याशी बोलत आहेत, मग ती साधी गोष्ट असली तरी ती मन लावून ऐका.
५) मुलाला किंवा मुलीला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ती समजून घ्या. त्यांची कुठलीच गोष्ट फालतू समजू नका. ती तुमच्या दृष्टीने कदचित फार महत्त्वाची नसेल पण त्यांच्यासाठी, त्यांच्या विचारांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची असू शकते.
७) मुलांना वेगवेगळे कलाप्रकार दाखवा. त्यातून त्यांना व्यक्त व्हायला शिकवा तुम्ही आणि तुमचे मूल मिळून एखादा कला प्रकार शिका.
No comments:
Post a Comment