वयाच्या विशीत, साधारणतः तरुणाई आपले शिक्षण पूर्ण करत असते , आणि बहुतांशी तरुण आपल्या भविष्याबाबाबत साशंक असतात. याला अपवाद म्हणजे लुधियाना स्थित आंतरराष्ट्रीय पातळीवर Ethical Hacker म्हणुन नावाजलेला त्रिश्नीत अरोरा. व्यवसायाची व computer क्षेत्राची कोणतीही कौंटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्रिश्नीत चा मध्यमवर्गीय तरुण ते यशस्वी उद्योजक हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्रिश्नीत चा जन्म ०२ नोव्हेंबर १९९३ मध्ये झाला. त्रिश्नीत चे वडील एक खाजगी कंपनीतील वरिष्ठ अकाउंट्स अधिकारी आहेत आणि आई गृहिणी आहे.
वयाच्या ११ व्या वर्षी त्याला computer ची तोंड ओळख झाली. कालांतराने त्याला computer hardware मध्ये आवड निर्माण झाली. या computer च्या आकर्षणामुळे त्रिश्नीत च्या शालेय अभ्यासावर परिणाम झाला व तो ८ व्या इयत्तेत नापास झाला त्यामुळे नंतर त्याला दहावीची परीक्षा बाहेरून दयावी लागली.
२०१२ मध्ये त्रिश्नीत ने TAC Security Solutions ची स्थापना केली. व्यवसायाने कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय स्वतःचा व्यवसाय स्थापन करणे हे एक अतिशय आव्हानात्मक काम होते. परंतु काही वेगळं करण्याची आणि आयटी सुरक्षेच्या वाढत्या समस्यांच्या संख्येने उत्स्फूर्तपणे त्रिश्नीत ला स्वतःचा व्यवसाय स्थापित करण्यास प्रेरित केले. त्रिश्नीत च्या मते कोणत्याही कार्यात उत्कटता सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे आणि मी काही वेगळं करण्याच्या उत्कटतेमुळे, आयटी सुरक्षा क्षेत्रात मी एक प्रमुख खेळाडू म्हणून स्वतःला सिध्द करू शकलो.
TAC Security Solutions ही एक सायबर सुरक्षा कंपनी जी नेटवर्कच्या अभेद्यता आणि डेटा चोरीविरुद्ध कंपन्यांसाठी संरक्षण पुरवते. सध्या कंपनीचा टर्नओव्हर कोट्यवधींच्या घरात आहे. त्यांचे काही ग्राहक रिलायन्स उद्योग, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, पंजाब पोलिस (भारत) आणि गुजरात पोलिस आहेत. त्यांनी सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पंजाब आणि गुजरात पोलिसांना मदत केली आहे.
त्रिश्नीत अरोरा ने सायबर सुरक्षा, नैतिक हॅकिंग आणि वेब संरक्षण याविषयी पुस्तके लिहिली आहेत.
• Hacking TALK with Trishneet Arora
• The Hacking Era
• Hacking With Smart Phones
त्रिश्नीत ला त्याच्या कार्याबद्दल विविध पुरसकरांनी गौरवण्यात आले आहे.
२०१३ मध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
२०१४ मध्ये, पंजाबचे मुख्यमंत्री, प्रकाशसिंग बादल यांनी राज्य पुरस्कार देऊन गौरविले. तसेच पंजाब पोलिस अकादमीचा आयटी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले.
२०१५ मध्ये पंजाबी आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
२०१७- मॅन'स मॅगझीन तर्फे न्यूज मेकर अवॉर्ड
त्रिश्नीत च्या मते तुमच्या पॅशनपुढे शिक्षण महत्त्वाचे नाही.
अपयशाची पुढील पायरी यश आहे. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. पॅशनवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्लाही त्रिश्नीत ने दिला आहे.
- सौजन्य : दिव्यमराठी