धाडसी उद्योजक बनण्यासाठी जॅक मा यांचा कानमंत्र
उद्योजकाने दिलखुलास असावे- जॅक मा.
तुमच्यातली उत्सुकता नेहमी जागरूक ठेवा. जगाकडे एका बालकाच्या दृष्टीने बघा. सल्ला घ्या. सल्ला, मदत मागताना आपला स्वाभिमान आड येऊ देऊ नका.
ज्यांना नोकरीतून बाहेर पडून व्यवसाय सुरु करायचा आहे किंवा उद्योजक बनायचे आहे ते तसे धाडस करू शकत नाहीत. कारण, त्यांना नोकरीत उगीचच वाटत असते की ते फार सुरक्षित आहेत. त्यांच्या मते नोकरीत त्यांना सर्व सोयीसुविधा असतात. पण, जर तुम्हाला उद्योजक व्हायचे असेल तर या सोयीस्कर जागेतून तुम्हाला बाहेर पडावेच लागेल आणि स्वतःसाठी अशी जागा धुंडाळावी लागेल.

एक उद्योजक म्हणून माझ्या दृष्टीने अपयश म्हणजे केवळ पराभव स्वीकारणे, कच खाणे, पुढे जाण्यापासून स्वतःला रोखणे. लोक काय सल्ला देतात, ते बघा. कुणीही तुम्हाला सांगणार नाही, तू पराभूत झालेला आहेस. दिलखुलासपणे, मोकळेपणाने ते एक आणि पुढचे पाऊल टाका. मी माझ्या वर्तुळातल्या लोकांचे सल्ले, सूचना आपल्या जगण्यात सामाविष्ट करत गेलो आणि आतून आधीपेक्षाही जास्त मजबूत झालो. तुमच्यातली उत्सुकता नेहमी जागरूक ठेवा. जगाकडे एका बालकाच्या दृष्टीने बघा. सल्ला घ्या.
कोणता सल्ला ऐकावा, कोणता ऐकू नये हे अत्यंत लक्ष देऊन ठरवा. वापरलेला सल्ला उपयोगात आला की नाही, हे बघा. आधी दिशा ठरवा, मग धोरणे. धोरणे ही तपासून घ्या. मगच ते लागू करा आणि मगच अंमलबजावणी करा. नवनव्या लोकांना भेटत राहा. काम करताना ते आरामदायक कसे होईल, ते बघा. धोरणे आणि अंमलबजावणीवर तुमचे संपूर्ण नियंत्रण हवे म्हणून क्षमतेबरहुकूम काम करा. हे सगळे तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणूनही पुढे आणते. तुमच्या भोवतालच्या एकूणच वातावरणावर सकारात्मक प्रभाव पडतो.
No comments:
Post a Comment