LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

12 March 2013

जागवा आपल्यातील नेतृत्व

जागवा आपल्यातील नेतृत्व
सी. ई. पोतनीस, सकाळ, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
मानवानं अनेक शोध लावले. होय, शोधच म्हणता येईल; नवशोध म्हणता येणार नाही. कारण निसर्ग म्हणजेच विपुलता व उपलब्धता. निसर्गात सर्वच आहे. मानवानं केवळ आहे त्या वस्तूंची जोडणी करून, मांडणी बदलून नवीन वस्तू शोधून काढल्या. हेच नेमकं आपल्याबाबतही लागू आहे. आपणही गुण-कौशल्यांची खाण आहोत. आपल्यातही विपुलता व उपलब्धता आहे. आपल्यात असलेले गुण आपल्याला शोधून काढायचे आहेत. त्या गुणांची जोडणी, मांडणी करून नवीन कसब, कौशल्य निर्माण करायचं आहे.

नेतृत्व ही नैसर्गिक देणगी आहे, की आत्मसात करता येणारं कौशल्य, याविषयी बहुतेकांचं दुमत आहे. तरीही साधारणपणे नेतृत्व ही नैसर्गिक देणगी आहे, असेच अनेकांचं मत असतं. खरं तर नेतृत्व आणि व्यवस्थापन हे गुण प्रत्येक व्यक्तीत उपजतच असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हे गुण म्हणण्यापेक्षा नैसर्गिक गरज म्हणणंच रास्त ठरेल. या भौतिक जगात जगण्याकरता व पुढं जाण्याकरता काही मूलभूत साधनांची, गुणांची, कौशल्यांची गरज असते. ही सर्व साधनं परमेश्‍वरानं आपल्याला उपलब्ध करून दिलेली असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हेही असंच मूलभूत साधन आपणा सर्वांकडं असतंच. आपल्यात नेतृत्वाचे व व्यवस्थापनाचे गुण आहेत, ही जाणीव अन्‌ विश्‍वास आपल्याला नसतो. त्यामुळंच नेतृत्व हे काही मोजक्‍या जणांसाठीच आहे, ही सर्वसाधारण धारणा असते; तसेच नेतृत्व अन्‌ व्यवस्थापन ही केवळ व्यवसाय/ सामाजिक क्षेत्रात अधिकारपदावर असलेल्या लोकांचीच गरज आहे, असाही समज आहे. या धारणेमुळं आपल्यातल्या नेतृत्वाविषयीच्या अन्‌ व्यवस्थापनाविषयीच्या गुणांकडं लक्षही दिलं जात नाही.

मानवानं अनेक शोध लावले. शोधच (Discovery) म्हणता येईल; नवशोध (Invention) म्हणता येणार नाही. कारण निसर्ग म्हणजेच विपुलता व उपलब्धता. निसर्गात सर्वच आहे. मानवानं केवळ आहे त्या वस्तूंची जोडणी करून, मांडणी बदलून नवीन वस्तू शोधून काढल्या. हेच नेमकं आपल्याबाबतही लागू आहे. आपणही गुण-कौशल्यांची खाण आहोत. आपल्यातही विपुलता व उपलब्धता आहे. आपल्यात असलेले गुण आपल्याला शोधून काढायचे आहेत. त्या गुणांची जोडणी, मांडणी करून नवीन कसब, कौशल्य निर्माण करायचं आहे. नेतृत्व, व्यवस्थापनाचं कसब हे अशातलंच एक आहे. आपण प्रत्येक जण ते वापरतही असतो. हे अर्थात नकळत, अजाणतेपणानं, क्वचित व अपघातानं वापरलं जातं. तसंच ते बहुधा सुप्तावस्थेत असतं.

व्यवसाय, नोकरी, सामाजिक क्षेत्रांत जेव्हा कामाचा व्याप मोठा व हाताखाली काम करणारे सहकारी असतात, फक्त तेव्हाच नेतृत्व आणि व्यवस्थापन आवश्‍यक असतं, अशीच बहुतेकांची समजूत असते. अशा वेळी नेतृत्वाची खरी कसोटी लागते, याबाबत शंकाच नाही; परंतु हे सर्व काही नसतानाही नेतृत्व आणि व्यवस्थापनाची गरज असतेच, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण स्वतःपुरतंच मर्यादित काम करत असतो, तेव्हाही या गुणांचा वापर होत असतो वा होणं अपेक्षित आहे. नेतृत्व काही केवळ हाताखाली किंवा समवेत सहकारी असतानाच होतं, असं नाही. स्वतःचं स्वतःकरता नेतृत्व आणि व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. याची खरी सुरवात तर वैयक्तिक पातळीवरच होत असते; तसेच स्वतःकरताचं व्यवस्थापनही गरजेचं आहे. प्रथम नेतृत्व अन्‌ व्यवस्थापनातला फरक समजून घेऊ या. नेतृत्व म्हणजे ध्येय ठरवणं, दूरदृष्टी असणं, दिशा देणं, प्रोत्साहित करणं, विश्‍वास संपादन करणं व उंचावणं, इत्यादी. व्यवस्थापन म्हणजे ठरवलेल्या ध्येयाकडं आखलेल्या दिशेनं कूच करणं. यात योजना, वेळेचं नियोजन, कामाची आखणी, असलेल्या साधनांचा परिणामकारक वापर करणं इत्यादी गोष्टी येतात. विचार केल्यास लक्षात येईल, की हे सर्व स्वतःलाही लागू आहे. चांगल्या नेतृत्वाशिवाय आणि व्यवस्थापनाशिवाय चांगलं आयुष्य जगणं अशक्‍यच आहे. त्यामुळंच विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक अशा सर्वांनाच आपल्यातलं नेतृत्व शोधणं आवश्‍यक आहे. आपल्या आयुष्याला ध्येय हवं, दिशा हवी, स्वतःला प्रोत्साहित ठेवता येणं गरजेचं आहे. त्याशिवाय योजना व वेळेचं नियोजन, इत्यादीही साधता आलं पाहिजे, हेच तर स्वतःचं नेतृत्व व व्यवस्थापन.

आपण प्रत्येकजण हे गुण वापरत असतोच. त्यांचा आवाका कमी-जास्त असतो. त्यात सातत्य नसतं. बर्‍याचदा त्यांचा वापर नकळतच होतो. संकटात, अतिमहत्त्वाच्या प्रसंगी, अचानक जबाबदारी पडल्यावर हे सुप्त गुण जागृत झाल्याचं आढळतं, अशी अनेक यशस्वी उदाहरणं आपल्या पाहण्यात असतील. असंच एक उदाहरण म्हणजे मदर तेरेसा यांचं. कॅथॉलिक शाळेत शिकवणारी ही संन्यासिनी. मुख्याध्यापिका होऊन शाळेचं नेतृत्व आपल्याला करता येईल, याचा विश्‍वासही नसलेली ही संन्यासिनी; परंतु गरिबातल्या गरिबांच्या दारिद्य्रानं आणि दुःखानं ती हेलावली. त्यातूनच नेतृत्व जागृत झालं. प्रेमाच्या झर्‍यानं आणि नेतृत्वाच्या आधारानं तिनं उभारलेली संस्था जगभरात सर्वत्र सेवा पोचवत आहे.

आपण प्रत्येक जण काही ना काही तरी निर्णय घेत असतो, निवड करत असतो, एक दिशा ठरवत असतो, त्या मार्गानं चालत असतो. समस्या एवढीच आहे, की हे सगळं आपण अजाणतेपणाच्या अवस्थेतून करत असतो. नेतृत्वासारख्या अन्‌ व्यवस्थापनासारख्या गुणांना आपण आकार दिलेला नसतो. जाणीवपूर्वक त्या गुणांना जोपासलेलं नसतं. त्यामुळं अपघातानंच व क्वचित या गुणांची चुणूकही आपल्याला जाणवते. सराव नसलेला खेळ खेळताना अचानक आपल्याकडून एखादी सुंदर खेळी होते! ती चुकून, म्हणजेच अपघातानं, घडलेली असते. आपल्यातली ही खेळी वारंवार व आपल्याला हवी तेव्हा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या जाणीवपूर्वक व सततच्या प्रयत्नांतूनच हे कौशल्य, कसब निर्माण होतं व कायमस्वरूपी साथ देतं. त्यानंतर अपघातानंच नव्हे, तर ठरवून हवा तो परिणाम घडवून आणता येतो; तसंच नेतृत्व अन्‌ व्यवस्थापन हे जाणिवेच्या पातळीवरच घडवणं आवश्‍यक असतं.

व्यावसायिक, सामाजिक आदी क्षेत्रांतल्या नेतृत्वाची व्याप्ती जास्त असते. त्यात इतरांना दिशा देणं, प्रोत्साहित ठेवणं आदींची जबाबदारीही आपल्यावर असते. या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी तशी आवड तर हवीच; पण त्यासाठी मोठी तयारीही हवी. वैयक्तिक नेतृत्व व व्यवस्थापनावर पकड असल्याशिवाय इतरांचं नेतृत्व करणं व इतरांचं व्यवस्थापन सांभाळणं अशक्‍यच. दुर्दैवानं अनेक जण अशा नेतृत्वात तयारीविना पडलेले असतात. नोकरीमधल्या काही वर्षांचा अनुभव काहींना ओघानं त्यात नेतो. मागच्या काही वर्षांतलं यश हे नेतृत्वातही यश देईल, हा अत्यंत चुकीचा समज. यात यश मिळवण्यासाठी बरीच तयारी लागते. खरं तर आपल्यातलं नेतृत्व आधी विकसित होऊन नंतरच तसं पद मिळावं. लोक पदाच्या मागं असतात; पण नेतृत्व व व्यवस्थापन विकसित करण्यावर त्यांचं लक्ष नसतं. त्यामुळंच या पदांवर अनेकांची केविलवाणी अवस्था होते. हाताखाली सहकारी असतात; परंतु नेतृत्वाचा अभाव असतो. असं नेतृत्व संस्थेचं; तसंच सहकार्‍यांचंही नुकसान करतं.

व्यावसायिक, सामाजिक इत्यादी क्षेत्रांत नेतृत्व करायचं की नाही, हा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा प्रश्‍न. प्रत्येकानं या दिशेला वळलं पाहिजे असंही नाही; परंतु अशा नेतृत्वाची जर महत्त्वाकांक्षा असेल, तर सर्वप्रथम स्वतःसंदर्भात काम करणं गरजेचं आहे. वैयक्तिक पातळीवर नेतृत्वावर आणि व्यवस्थापनावर पकड असलीच पाहिजे. स्वतःला दिशा नसेल तर दुसर्‍यांना काय दिशा देणार? स्वतःला ध्येय नसेल तर इतरांच्या ध्येयपूर्तीला काय मदत करणार? स्वतःचं नियोजन करता येत नसेल, तर इतरांना व्यवस्थापन काय शिकवणार? स्वतःला प्रोत्साहित ठेवता येत नसेल तर इतरांना काय प्रोत्साहन देणार? अशा नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा नसली तरी केवळ आपल्यासाठीही हे गुण विकसित करणं गरजेचं आहे. स्वतःचं स्वतःवरचं नेतृत्व व व्यवस्थापन आपल्या जीवनाला हेतू देतं. सर्वांगीण विकास घडवतं. यातूनच आपलं जीवन खुलतं-फुलतं.

नेतृत्व विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. निर्णय घेण्यानंच निर्णयशक्ती वाढते. प्रत्येक निर्णयाच्या परिणामातून जाणीवपूर्वक शिकता येतं. त्यातूनच योग्य निर्णय घेण्याची तयारी होते. ध्येयनिश्‍चिती, स्वतःवरचा विश्‍वास, वेळेचं नियोजन यावर काम करावं. प्राधान्य कशाला द्यावं हे जाणीवपूर्वक ठरवणं गरजेचं आहे. सातत्यानं या गोष्टींचा जाणीवपूर्वक सराव केल्यास नेतृत्व व व्यवस्थापन विकसित झाल्याखेरीज राहणार नाही. इतरांबरोबरच्या नेतृत्वामध्ये प्रामाणिकपणा व विश्‍वासार्हता याला सर्वांत अधिक महत्त्व आहे, हे जाणावं. स्वतःपेक्षा दुसर्‍यांचं हित महत्त्वाचं, हा नेतृत्वातला महत्त्वाचा गुण. याच्याशिवाय आपण खरं नेतृत्व देऊ शकणार नाही, हे ध्यानी ठेवावं. जबाबदारी घेणं हादेखील नेतृत्वातील एक महत्त्वाचा गुण. आपल्या आयुष्याची जबाबदारी ही केवळ आपलीच. आपल्यातलं नेतृत्व जागवा, जीवनाला दिशा द्या. जीवन घडवा.

26 February 2013

प्रगतीच्या मार्गावरील न संपणारा प्रवास

लक्ष्यवेध हा बॉर्न२विन संस्थेचा अत्यंत महत्वाचा प्रशिक्षण कार्यक्रम. तो पूर्ण केलेल्या आपल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, ट्रॉफीज प्रदान करण्यासाठी संस्था लक्ष्यसिध्दी सोहळा आयोजित करते. याप्रसंगी उद्योगक्षेत्रातील मान्यवर व्यक्तीस बोलावून, त्यांच्या मुलाखतीतून नव-उद्योजकांना प्रेरित करते, शिवाय त्यातून त्या उद्योगक्षेत्राची खूप माहितीही मिळते.

७ फ्रेबुवारी १३ला झालेल्या १४ व्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात ह्यावेळेस प्रमुख पाहुणे होते टुरिझम क्षेत्रातील महर्षी, केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील. प्रथम त्यांच्या हस्ते लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या. नंतर बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी केसरी पाटील यांची मुलाखत घेतली. केसरीभाऊंचे वय ७८ आणि त्यांनी अक्षरश: शुन्यातून सुरवात करून इतके उत्तुंग यश मिळवले. आपल्याला वाटेल ते स्वत:च्या जुन्या आठवणीत फक्त रमून जातील आणि त्यांचे विचार असतील, मी सगळे जग पाहिलेले आहे (शब्दश:, कारण अगदी अंटार्क्टीकालाही ते जाऊन आलेले आहेत, तेही वयाच्या पंचाहत्तरीत!) आणि ७८ पावसाळे पाहिलेले आहेत, मी अधिकारवाणीने सांगतो ते तेवढे ऐका. खरोखर त्यांचा तितका अधिकार नक्कीच आहे. पण त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले, त्यांचे तत्व आहे, ते कधीही मी इतके पावसाळे पाहिले आहेत असे म्हणत नाहीत. ते म्हणतात, असं म्हणणं म्हणजे नवीन गोष्टी शिकणे बंद करणे. माणूस आयुष्यभराचा विद्यार्थी असतो, त्याने आपल्या नातवंडांकडूनही शिकायला हवे. केसरीभाऊंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कडक शिस्त. काही गोष्टींबाबत ते अतिशय काटेकोर आहेत. ते दहा वर्षे बोर्डी येथील विद्याभवन शाळेत शिक्षक होते, त्याचा हा परिणाम किंवा आणखी मागे जायचे तर विद्यार्थीदशेत झालेले राष्ट्रसेवा दलाचे संस्कार. मथाणे या आडवळणाच्या खेडेगावात त्यांचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांत नेतृत्वगुण होते. अनेकवेळा वडिलांना प्रवास करावा लागे, त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकांच्या पुस्तिका घरी असत. या पुस्तिका नंतर आपल्या आयुष्याच्या इतक्या अविभाज्य भाग बनणार आहेत याची केसरीभाऊंना मात्र कल्पनाही नसावी! लहानपणाच्या संस्कारांबाबत वाचनप्रियता, शिस्त, कष्ट या ठळक आठवणार्‍या गोष्टी. तसेच वाचस्पती प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाचाही प्रभाव त्यांच्यावर झाला. भूगोल व इतिहास हे केसरीभाऊंचे मित्र झाले ते केसरी टूर्स सुरू करण्याच्या आधीपासूनच. आणि हा भूगोल व इतिहासही केवळ आपल्या देशाचा नाही तर संपूर्ण जगाचा. हे दोन्ही त्यांना अजूनही मुखोदगत आहेत. पण आपण केसरी टूर्सचा इतिहास बघू! 


केसरीभाऊंचे मोठे बंधू राजाभाऊ पाटील यांनी राजाराणी ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली होती. आधी केवळ सुट्टीत केसरीभाऊं त्यांना मदत करत, सहलींबरोबर जात. ६७ नंतर मात्र केसरीभाऊं नोकरी सोडली आणि ते पूर्णवेळासाठी राजाराणी ट्रॅव्हल्सचे काम करू लागले. त्यावेळेस नोकरी सोडणे हे आव्हान होते, पण त्यांनी ते स्वीकारले. राजाभाऊंबरोबर त्यांनी वीस वर्षे काम केले. सहल संचालक म्हणून काम करताना जबाबदारी घ्या, सबबी सांगू नका आणि पर्यटक काय सांगत आहे ते केवळ कानाने ऐकू नका, तर त्याचे मनन करा, असे ते सांगतात. राजाराणी ट्रॅव्हल्सच्या काश्मीरच्या सहली प्रसिध्द होत्या. केसरीभाऊ हमखास या सहलींना जात. प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याबरोबरच पर्यटकांना आपल्या जोशपूर्ण शैलीत काश्मीरचा इतिहास सांगत. त्याबाबत ते पर्यटकांमध्ये मशहूर होते. शिवाय ते पर्यटकांना सांभाळून घेत, त्यांच्याबरोबर भाऊंचे सूर जुळत. भाऊ म्हणतात, मराठी माणूस मुखदुर्बळ. त्याला बोलके करावे लागते. सहल म्हणजे मोठा ग्रुप असतो. प्रत्येकजण धीटपणे चारचौघात बोलू शकेल असे नाही. अशी माणसे मग मागे राहिली तर ती इतरांइतकी सहल एंजॉय करू शकणार नाहीत. केसरीभाऊ अशा लोकांबरोबर आपुलकीने वागत, त्यांचा संकोच दूर करत. हे पर्यटकही मग तितक्याच उत्साहाने सहलीत रममाण होत.  


अपरिहार्यपणे त्यांचे बंधूबरोबर मतभेद झाले. विचार करून त्यांनी बाहेर पडून स्वत:ची कंपनी सुरू करण्याचे ठरवले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी असा निर्णय घेणे धाडसाचे होते. पैशाचे पाठबळ नव्हते, पण लोकांचा भक्कम पाठिंबा होता. विचार सुधारकी होते, पुढे जाण्याची प्रवृत्ती होती. टूरिझम हा सेवाक्षेत्रातील व्यवसाय. १९८४ साली आर्थिक सुधारणांचे वारे वाहणे अजून सुरू झालेले नव्हते. या क्षेत्रासाठी बॅंका कर्ज देत नसत. केसरीभाऊंना आपल्या पत्नीचे – सुनिताबाईंचे – दागिने गहाण टाकून भांडवल उभे करावे लागले. आज मात्र बॅंकाच कर्ज घ्या म्हणून धोशा पुरवतात ती गोष्ट वेगळी! १९८४ ते १९९७ या काळात केसरीभाऊ आणि त्यांचे कुटुंबिय खूप राबले, जीव तोडून मेहनत केली. त्यावेळेस रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण वगैरे सुविधा नव्हत्या. चर्चगेट स्टेशनवर जाऊन ते झोपत, म्हणजे सकाळी खिडकी उघडल्याबरोबर नंबर लावता येईल. वर्क लाईक अ कूली अॅन्ड लीव्ह लाईक अ प्रीन्स हा त्यांचा खाक्या. शैलेश व हिमांशू ही मुले व वीणा व झेलम ह्या मुली. त्याचबरोबर सुना व जावई या तरूण पिढीच्या साथीने मग केसरी टूर्सचा रथ भरधाव निघाला. त्याने मागे वळून पाहिलेच नाही. सतत यशाचे नवे नवे टप्पे पार करत हा या क्षेत्रातील एक अत्यंत नावाजलेला ब्रॅन्ड झाला. एक सहल नेली, बस्स, पुन्हा दुसरी सहल न्यायची, तेव्हाच काही विचार करायचा असा तोकडा विचार केसरीभाऊं आणि त्यांच्या कुटुंबियांनी कधीच केला नाही. नावीन्यपूर्ण कल्पना आणल्या व त्या यशस्वीपणे राबवल्या. माय फेअर लेडी ही टूर बघा. अनेक स्त्रियांना परदेशात सहलीला जायचे असते, पैसे असतात, पण बरोबर येण्यास कुटुंबातील कोणी व्यक्ती नसते. अशा स्त्रियांसाठी ही टूर किती चांगली. फक्त स्त्रियाच या सहलीत असतात. माय फेअर लेडी ही म्हणूनच एकट्या जावे लागणार्‍या स्त्रियांसाठी सहलीची सोय करणारी संकल्पना राहात नाही तर त्यांना मोकळीक देणारी, त्यांना आत्मविश्वास देणारी, स्वत:साठी वेळ काढायला शिकवणारी सहल बनते. आपल्या गौरी शिंदेंचा इंग्लिशविंग्लिश चित्रपट २०१२ मध्ये आला, त्यातही स्त्रियांनी संसारात राहूनही सन्मानाने जगावे, स्वत:साठी वेळ काढावा, अशी संकल्पना आहे. फरक इतकाच माय फेअर लेडी टूर सुरू होऊन दहा वर्षे झाली! माय फेअर लेडीत अपवाद म्हणून एक पुरूष पर्यटक असतो. तोही बघा कसा नेमका निवडलेला आहे. या टूरवर स्त्रियांच्या बरोबर असतात, होम मिनिस्टरमुळे घरोघरी पोचलेले सर्व स्त्रियांचे लाडके भावजी अर्थात आदेश बांदेकर

याशिवाय हनिमून कपल्स, विद्यार्थ्यांसाठी नासाच्या टूर्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सहली, धार्मिक स्थळांच्या सहली अशा विविध प्रकारच्या त्यांच्या सहली आहेत. त्या सर्वच लोकप्रिय आहेत. फक्त मराठी लोकच केसरीचे पर्यटक नसतात तर सर्व भाषिक असतात. सर्वांमध्ये ते लोकप्रिय आहेत. कॉर्पोरेट टूर्स हा त्यांचा विभागही जोरात कार्यरत आहे. पर्यटक देवो भव हा मंत्र केसरीभाऊंनी आपल्या टीमला दिलेला आहे. माझे मायबाप पर्यटक हो असा ते उल्लेख करतात. ग्राहकसेवा याला ते खूप महत्व देतात. तसेच आपल्या कर्मचार्‍यांना ते आपल्या उद्योगातील भागीदार मानतात, त्यांना सहकारी म्हणतात. कंपनीत आज १००० कर्मचारी असून ५०० टूर मॅनेजर्स आहेत.

स्पर्धेबाबत ते म्हणतात, स्पर्धा हवीच, त्याला तोंड देता आले पाहिजे. तथापि स्पर्धा ही सकारात्मक विचारसरणीची बैठक असलेली हवी. स्पर्धेमुळे विचलीत होऊ नये व आपल्या ध्येयावरचे लक्ष ढळू देऊ नये. तसेच व्यवसायायबाबत विस्तार करण्याचे धोरण हवे, पुढे जात राहणे हे ध्येय आहे असे ते म्हणतात.

केसरीभाऊंना सामाजिक भान आहे. एक मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला, मराठी म्हणून आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान हवा, पण इंग्लीश भाषेवरही प्रभुत्व अगदी हवेच कारण ती आता ग्लोबल भाषा झाली आहे. तसेच बिल गेट्सच्या एका वचनाची त्यांनी आठवण करून दिली, तुम्ही गरीब म्हणून जन्मला तर तो तुमचा दोष नाही, पण गरीब म्हणूनच मराल तर तो तुमचा दोष आहे. अर्थात माणसाने सतत प्रयत्न करत राहून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे, हे त्यांचे सांगणे आहे. केसरी पाटील यांची ही मुलाखत ऐकताना श्रोतृवर्ग उत्साहात दाद देत होता. ते जे बोलत होते मनापासून.

याच कार्यक्रमात अतुल राजोळींनी लिहिलेल्या माझा मोटीव्हेटर मित्र या पुस्तकावर आधारित एका पर्मनंट कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. या कॅलेंडरमध्ये रोज एक सुविचार वाचायला मिळेल.


बॉर्न२विनने ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती हे त्रैमासिक सुरू केले असून त्याच्या पहिल्या अंकांचे प्रकाशन केसरीभाऊंच्या हस्ते करण्यात आले. हा अंक अतिशय देखणा झाल्याचे मत अनेकांनी बघताक्षणीच जाहीर केले!
 

बीग आयडीयाचे जान्हवी राऊळ व मंगेश राऊळ यांनी केसरी टूर्सचा संदर्भ देत, जगभरातील महत्वाची स्थळे दाखवणारा एक भव्य व देखणा बॅकड्रॉप बनवला होता, त्याचे सर्वांनी कौतूक केलेच, केसरीभाऊंनी स्वत: त्यांना मंचावर बोलावून त्यांना दाद दिली.
 

15 February 2013

ग्रेट आयडियाज : द्रष्टा एन. आर. नारायण मूर्ती

ग्रेट आयडियाज : द्रष्टा एन. आर. नारायण मूर्ती
अनघा दिघे, लोकसत्ता, सोमवार, २८ जानेवारी २०१३

'आनंददायी घडामोडींनी भरगच्च, पारितोषिकांचा आणि हर्षोल्हासित असा हा एकंदरीत २५ वर्षांचा प्रवास होता..' सुविख्यात इन्फोसिस टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मूर्ती यांनी सेवानिवृत्तीच्या भाषणाच्या वेळी काढलेले हे उद्गार आहेत. इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांतील जगविख्यात भारतीय कंपनीचे नागवर रामराव (एन. आर) नारायण मूर्ती हे सहसंस्थापक. ध्येयवादाच्या परिपूर्णतेच्या त्यांच्या या उद्गारांमागे असीम आंतरिक तृप्ती झळकते.
१९८१ मध्ये सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीची सुरुवात त्यांनी भारतामध्ये केली. आपापल्या सुविद्य पत्नीकडून १० हजार रुपये उसने घेऊन सात व्यावसायिकांनी एकत्रितपणे सुरू केलेली ही नवी कंपनी होती. व्यावसायिक जगतामध्ये इन्फोसिसने अनेक नवे पायंडे रोवले, अनेक रेकॉर्डस् केले. कॉर्पोरेट प्रशासन आणि पारदर्शकता यांच्या निकषांवर इन्फोसिस कंपनी योग्य कॉर्पोरेट व्यवहाराची आणि स्वच्छ कारभाराचे एक उदाहरण बनले आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधी हेरणे हे त्यांचे पहिले श्रेय. कसलेल्या जव्हे
र्‍याप्रमाणे नेमकी माणसे हेरणे हे दुसरे श्रेय. त्यापेक्षाही अर्थपूर्ण, सयुक्तिकता म्हणजे, ही बांधलेली मोट टिकवणे. सर्वाना एकत्रित बांधून ठेवणे.. सर्व संस्थापक हे मध्यमवर्गीय पाश्र्वभूमीतून आलेले होते. केवळ आपली बुद्धिमत्ता आणि परिश्रम यांच्या बळावर त्यांनी इन्फोसिसचे स्वप्न साकार केले. क्षितिजापल्याड जाणार्‍या भारतीय बिझनेसच्या आलेखाचे हे विद्यमान शतकातील अनुकरणीय मॉडेल ठरले आहे.
जाणून घेऊ या, या बिझनेस गुरूचे तसेच जीवन-गुरूचे मौलिक विचार - 
'इन्फोसिसच्या सुरुवातीच्या काळात साधी फोन लाइन मिळवणे किंवा पहिला संगणक मिळवणे हादेखील एक अवघड, प्रदीर्घ असा प्रवास झाला असताना.. सुरुवातीपासून आम्हाला हे फार स्पष्ट होते की, इन्फोसिसचे कार्य हे भारतातर्फे या क्षेत्रामध्ये मौलिक योगदान करण्याचे आहे. १९९० च्या दरम्यान आमची स्थिती डळमळीत झाली होती. तेव्हा इतर देशांमधून आमची कंपनी विकत घेण्याच्या ऑफर्स येत होत्या. आणि आम्ही सहसंस्थापक चर्चा करीत होतो. चार-पाच तासांच्या प्रदीर्घ च
र्चेनंतर एक प्रकारचा विषाद आणि नराश्य यांनी मन भरून गेले. तत्क्षणी निर्णय घेऊन मी माझ्या सहकार्‍यांना सांगितले की, 'काळजी करू नका, मीच ही कंपनी विकत घेतो. मला हे ठाऊक आहे की, या देशात हे सगळं अवघड आहे परंतु पुढे जाऊन आपल्याला नक्कीच प्रकाश सापडेल.' काही मिनिटांतच सर्व जण मला म्हणाले, ' आम्ही तुमच्या बरोबर आहोत. यानंतर कधीही आपण ही कंपनी विकण्याचा, थकण्याचा, प्रयत्न सोडण्याचा किंवा तत्सम दुसरा कुठलाही विचार करायचाच नाही.. आपली घोडदौड पुन्हा एकवार नव्याने सुरू करूया..'
'.. अशक्य वाटते तेच शक्य करणे म्हणजेच नेतृत्व होय. प्रतीत होणा
र्‍या वास्तवाच्या चित्राचे पुनर्आकलन ही लायक नेतृत्वाची खुबी असते. खराब रस्ते, प्रदूषण, वाईट ट्रॅफिक इत्यादी गोष्टी या भारताचे वास्तव असतीलही.. आपण जसे घडवतो, तसे वास्तव घडते. बदल हा आपल्या हातात असतो. तुम्ही लोकांना केवळ आत्मविश्वास दिलात तर ते अचाट गोष्टी साध्य करू शकतात. 
तत्पर मनोभूमिका असली की, सुसंधीदेखील पुरेपूर माप पदरात टाकते. आमच्या टिकाव धरण्याच्या ठाम निश्चयानंतर लगेचच उदारीकरणाचा ठराव आला आणि त्याचा पुरेपूर फायदा इन्फोसिसला झाला. 
वैयक्तिक सोयी-सुविधांसाठी कॉर्पोरेट संसाधनांचा वापर कधीही न करणे, प्रत्येक व्यावसायिकाचा उचित आदर ठेवणे इत्यादी कठोर कॉर्पोरेट प्रशासकीय तत्त्वांच्या आधारे, अत्यंत व्यावसायिक दृष्टी ठेवून जगातील इतर कुठल्याही कॉर्पोरेटसारखी, आम्ही ही कंपनी चालवली.
मी बुद्धीने भांडवलशहा आणि हृदयाने साम्यवादी आहे. बिझनेस व्यवस्थापनामध्ये आदर कमावणे हे नफा वाढवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. परिश्रमांच्या राजयोगावर मी कायमच जास्त भर देईन. मी कायमच सांगत आलो की, शंका असेल त्या वेळी नेहमीच ती व्यक्त करा. विचारक्षमता आणि मनोभूमिका किंवा धारणा (mind and mindset) यांच्यातील फरक हा प्रगतीचे मानांकन निर्देशित करीत असतो.
ग्रामीण लोकांची प्रगती साध्य करून त्यांना चांगले जीवनमान, योग्य वेतन, आरोग्य, आहार आणि शिक्षण मिळवून देण्यासाठी आपल्याला कमी स्तरावरील तंत्रज्ञानापासून उत्पादनाची सुरुवात करून नंतर चीनसारखेच मोठय़ा प्रमाणावर हायटेक (उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून) उत्पादन करावे लागेल, असे मला वाटते. सहृदयता बाळगून भांडवलशाही तत्त्वांचे उपयोजन करणारा मी एक व्यापारी आहे.
आर्थिक उलाढाली करताना, आहे ती स्थिती धरून ठेवण्यावर मी विश्वास ठेवत असलो तरी सामाजिक बाबतीत मोकळ्या मनोवृत्तीचा मी स्वीकार करतो. एवढे असूनही साम्यवादाच्या, समाजवादाच्या गुंगीत राहणे मला मान्य नाही. लोकांसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून भांडवलशाही जर उपलब्ध करून द्यायची असेल तर दारिद्रय़ात पिचत पडलेल्यांबद्दल कमालीची सहृदयता-करुणा बाळगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा नाही की, लायकी नसलेल्यांना नोकर्‍या द्या किंवा कमी नफा काढा परंतु, जिथे, जेव्हा आणि जसे शक्य आहे, तसे करुणामय आर्थिक -सामाजिक वर्तन ठेवणे हे गरजेचे आहे. पशांचे खरे सामर्थ्य हे देऊ करण्यातले सामर्थ्य असते. 
कामे करताना कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संतुलन साधणे आवश्यक आहे. यासाठी एक मार्गदर्शक कार्यसूत्री मी देतो- 
* सकाळी उठा. चांगली न्याहारी घ्या आणि कामाला जा.
* आठ ते नऊ तास चलाखीने, हुशारीने, परंतु जीव तोडून मेहनत करा. 
* घरी जा.
* कॉमिक्स वाचा. मजेशीर चित्रपट पाहा. चिखलात-मातीत काम करा किंवा मुलांशी खेळा.
* पुन्हा योग्य आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. 
मी याला पुन
निर्माण असे म्हणतो. वरीलपकी १, ३, ४ आणि ५ या पायर्‍यांच्या काटेकोर पालनामुळे पायरी क्रमांक २ ही सार्थरीत्या साध्य होते. नियमित तास कामे करणे आणि दररोज पुननिर्माण करणे या सोप्या संकल्पना आहेत. आपल्यातील काही जणांना त्या फार कठीण वाटतील कारण, त्यासाठी व्यक्तिगत बदल करण्याची त्यांना गरज आहे. या पर्यायांची निवड करण्याचे सामथ्र्य आपल्यापाशी असल्यामुळे हे करणे शक्य आहे. आपल्या अनुपस्थितीत बरेच काही 'घडणारे' हातातून निसटण्याची भीती कर्मचाऱ्यांना असते. तुम्ही झोपी गेलेले असताना काही ना काही घडेलच, परंतु, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि घडलेल्याच्या तालात पुन्हा कसरत करण्याची कृती अनुसरावी लागते. त्यासाठी लागणारी पुरेशी ऊर्जा ही जागे झाल्यानंतर तुमच्यापाशी असते.  
कंपनीची शाश्वत मालमत्ता ही रोज संध्याकाळी कंपनीच्या दरवाजातून बाहेर पडते. ती सर्वच्या सर्व संपत्ती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी परत येत आहे ना, याची आपण पुरेशी खातरजमा केली पाहिजे.
परमेश्वरावर आमची प्रगाढ श्रद्धा आहे. इतरांनी मात्र कामकाजाचे सर्व तपशील (टेबलवर) नीटपणे सादर करावेत. हे कायम ध्यानात असू द्या की, अत्यंत स्वच्छ, पारदर्शी सत्-असत्विवेक ही जगातील अत्यंत मऊशार उशी आहे. कामगिरी ही ओळख मिळवून देते. ओळख आदर मिळवून देते. आदर आणखी जास्त बळकटी तसेच सामथ्र्य देतो, सामथ्र्यवान कारकिर्दीच्या प्रत्येक क्षणामध्ये माणुसकीची चाड आणि दैवी अस्तित्वाचे भान हे संस्थेला नावलौकिक, प्रतिष्ठा मिळवून देते. 
सरतेशेवटी सर्व काही वैयक्तिक मूल्ये आणि नीतिमत्तेपाशी येऊन ठेपते. दीर्घ कालखंडाचा विचार करता, उत्तम कार्य आणि कार्यवाही करणाऱ्यांची फौज निर्माण करण्यासाठी आपण कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी सजग राहिले पाहिजे. आजच्या तरुण पिढीने पशाला प्राधान्य देऊन सामथ्र्यवान वाटून घेण्यापेक्षा सौजन्य, प्रामाणिकपणा आणि आदर ही अक्षय संपत्ती जवळ बाळगली पाहिजे.'नारायण मूर्ती यांच्या व्यवसायविषयक अभिनव दृष्टीचा आजच्या तरुण पिढीने कित्ता गिरवला पाहिजे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites