LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

05 October 2012

गुरुकिल्ली सशक्त मनाची!


गुरुकिल्ली सशक्त मनाची!
 डॉ.अद्वैत पाध्ये   | (01/02/12) (Divya Marathi)
मनाचा शोध घेताना आपण पाहिले की, मन हे आपल्या मेंदूतच असते त्यातीलच काही भाग मन म्हणून कार्य करत असतो. हे कार्य जीवरासायनिक संप्रेरकांद्वारे चालत असते. मनाचे मुख्य कार्य म्हणजे विचार. भावना वर्तनाचे नियंत्रण. उत्तम इत्यादी. म्हणून पुढच्या काही मानसशास्त्रज्ञांनी याच गोष्टीवर अधिक संशोधन केले आणि त्यातूनच वैचारिक सिद्धांताचा जन्म झाला. म्हणजे आपल्याला जो काही त्रास होतो त्याला कारण आपली विचार करण्याची पद्धत असते असाविचारप्रधानसिद्धांत मानसशास्त्रज्ञांनी मांडला.

ॅरन बेक या मानसशास्त्रज्ञाने असे सांगितले की, आपल्याला जेव्हा नैराश्य येते तेव्हा आपण स्वत:बद्दल, स्वत:च्या भविष्याबद्दल आजूबाजूच्या वातावरणाबद्दल नकारात्मक विचार करू लागतो, परिणामी आपले नैराश्य वाढते. परंतु, या संदर्भात सर्वात मोठे कार्य अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने केले आहे. स्वत:च्या आयुष्यात लहानपणापासून आलेले विविध अनुभव, त्यांच्याशी त्याने केलेला सामना यावरून या सिद्धांताचा जन्म झाला. त्यावरूनच पुढे सद्सद्विवेकवर्तन उपचार पद्धतीचा (Rational Motive Behaviour Therapy) जन्म झाला.

हा सिद्धांत म्हणजे एक समीकरण आहे.
+ =
यात  म्हणजे Antecedent Event घडलेली घटना
म्हणजे Belief System किंवा विचारसरणी किंवा घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन.
म्हणजे Consequences किंवा परिणाम म्हणजे चिंता, नैराश्य, राग, क्रोध वगैरे विरूप भावना.
एलिसने असा सिद्धांत मांडला की, आपल्यावर जो काही परिणाम होतो तो झाला की आपल्याला किंवा इतरांना वाटते की तो घडलेल्या घटनेचा परिणाम आहे; परंतु एलिसच्या सिद्धांताप्रमाणे आपण बघत/भोगत असलेला परिणाम हा त्या घटनेचा प्रत्यक्ष परिणाम नसतो, तर त्या घटनेकडे बघण्याची आपली विचारसरणी ठरवते की त्या घटनेचा आपल्यावर कोणता परिणाम होणार.

उदा. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला आणि त्याच्या मनात नैराश्य आले, आत्महत्येचे विचार येऊ लागले. या उदाहरणात परीक्षेतील अपयश ही घटना किंवा आहे, तर नैराश्य हा किंवा परिणाम आहे. मग त्याचा काय असेल? कारण परीक्षेत नापास अनेक विद्यार्थी होतात; परंतु सर्वच काही निराश होत नाहीत. म्हणजेच त्यांची विचारसरणी वेगळी निराशा आलेल्याची वेगळी हे तर नक्की!

म्हणजे हा विद्यार्थी असा विचार करत होता की, मला कधीच परीक्षेत अपयश येताच कामा नये. आल्यास त्यासारखी महाभयंकर गोष्ट नाही. त्यामुळेच अपयश आल्यावर त्या महाभयंकर गोष्टीचा सामना करण्याऐवजी निराश होऊन आत्महत्येचे पलायनवादी विचार/अविवेक निर्माण झाले. त्यातूनच हा परिणाम दिसला.


थोडक्यात त्याच्या अविवेकी (irrational) विचारांमुळे त्याच्या मनाचा दृष्टिकोन (नापास होण्याच्या घटनेकडे बघण्याचा) अविवेकी राहिला, त्यामुळे त्याच्या मनात निराशेच्या विरूप भावना निर्माण होणे हा परिणाम दिसला. मग विवेक विचार कोणता असायला पाहिजे? मी परीक्षेत यश मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. प्रयत्न करणे माझ्या हातात आहे. ते मी व्यवस्थित करीन; परंतु काही कारणामुळे यश पुढे-मागे कमी-जास्त होऊ शकते. हा झाला विवेकी विचार. असा विचार करणारा विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्यावर दु:खी जरूर होईल; पण पाच-सहा दिवसांनी नक्की स्वत:ला सावरेल पुढचा विचार करू लागेल! म्हणजेच त्याच्या मनात नकारात्मक पण अनुरूप भावना निर्माण होईल जी त्याची प्रगती रोखणार नाही हे नक्कीअनेक सेशन्समधून वर्तनोपचाराच्या साहाय्याने (Behavior Modification) ते साध्य होऊ शकते. या सर्व गोष्टी संबंधित व्यक्तीचे (Client) सहकार्य असल्याशिवाय शक्य नाही. कारण हा सर्व प्रवास दोन्ही चाके एकत्र फिरल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.सध्याच्या ताणतणावपूर्ण जीवनात जास्तीत जास्त आनंदी, आरोग्यपूर्ण राहण्यासाठी, मनाची चांगली मशागत करणारी ही गुरुकिल्ली आहे. समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटलेच आहे.
धकाधकीचा मामला। कैसा घडे अशक्ताला।
नाना युक्ती शक्ताला। म्हणोनि सिकवाव्या।।

24 September 2012

ध्येयनिश्चिती

गौरी खेर, सोमवार, १० सप्टेंबर २०१२ (Loksatta)
एखादी व्यक्ती किंवा कंपनी यांनी ठरवलेला त्यांच्या कामातील वा योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचे ध्येय किंवा उद्दिष्ट होय! विकासाच्या दृष्टिकोनातून कंपनीने किंवा व्यक्तीने साध्य केलेला त्यांच्या कामातील तो परमोच्च बिंदू असतो. विशिष्ट कालमर्यादा ठरवून घेऊन अनेक व्यक्ती ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करत करतात. 
ध्येयाचे महत्त्व
ध्येय हे एक प्रकारचं उद्दिष्ट असतं. ज्याच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही एका विशिष्ट दिशेने प्रयत्न करत असता. असं ध्येय तुमच्यापुढे नसेल, तर स्वत:चा विकास करून घेताना तुमची पुढे जाण्याची दिशाच भरकटत जाऊ शकते. या साऱ्यात तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाया जातं. काम फक्त चांगलं करून चालत नाही, तर ते ढोबळमानानं, अंदाजानं करत राहण्यापेक्षा एका ठरलेल्या पद्धतीनंच करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या कामातून, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय मिळवायचं आहे आणि ते तुम्हाला का हवं आहे, याचं स्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यापुढे तुम्ही ठेवायला हवं. तुमचं ध्येय तुमच्यात एक सखोल असा विश्वास निर्माण करतं, की तुम्ही तुमचं काम नेटानं करत राहिलात तर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू शकतात.

योजना तसेच आराखडय़ाचे महत्त्व:
एखादे ध्येय तुम्ही एकदा मनाशी ठरवलेत की, तिथपर्यंत पोचण्यासाठी त्याचा व्यवस्थित आराखडा तयार करणे फारसे कठीण नसते. त्याकरिता एखाद्या कागदावर खालील बाबी लिहून काढणे उत्तम ठरेल.
* तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तयारी करण्याच्या दृष्टीने कशी योजना आखणार आहात?
* तुम्ही काय केले आहे आणि सध्या तुम्ही काय करत आहात? 
* ध्येयाच्या दिशेने वाटचाल विविध टप्प्यांवर तुमच्या मनातील योजना नेमक्या काय आहेत?
हे विविध मुद्दे लिहून काढलेत की, तुमचे ध्येय आणि त्यासाठीच्या तुमच्या योजना, यांचा पक्का विचार तुमच्या मनात पक्का आहे, असे समजायला हरकत नाही.  
तुम्ही जे ध्येय ठरवले असेल, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याच्या दृष्टीने जी योजना तुम्ही आखणार आहात 
त्याचा तपशील टप्प्याटप्प्याने तयार करा. अनेक वेळा तुमच्या ध्येयपूर्णता होत नाही याचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की, नेमके काय करण्याची गरज आहे, तेच समजून घेतले जात नाही. तुमच्या कामाची योजना आखा आणि ती योजना अमलात आणा. या बाबतीत अतिशयोक्तीही व्हायला नको. एकाच वेळी बरीचशी ध्येये ठरवू नका. एकाच वेळी अनेक ध्येयांमध्ये तुम्ही स्वत:ला झोकून दिलेत, तर अशी परिस्थिती निर्माण होईल (उद्भवेल) की, तुम्ही कोणत्याच ध्येयावर पुरेसे लक्ष केंद्रित करू शकणार नाही (कोणत्याच ध्येयाला तुम्ही पुरेसा वेळ देऊ शकणार नाही.).

ध्येययोजना आखण्याचे वेळापत्रक
ध्येय, विशेषत: व्यक्तिगत विकास आणि करिअरच्या संदर्भातील ध्येयांना ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने नेहमीच एकाहून अधिक बाजू असतात. ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने ती आवाक्यातली तर हवीतच, पण ती आव्हानात्मक, विशिष्ट प्रकारची, भक्कम अशी असावीत. ती लिहून काढायला हवीत आणि कमीत कमी कालमर्यादेत जास्तीत जास्त यश मिळवून देणारी हवीत. 

ध्येयनिश्चिती करणे का आवश्यक ठरते?
*    वेळेचे अधिक उत्तमरीत्या व्यवस्थापन करता येते.
*    जबाबदारी निश्चित होते.  
*    सांघिकरीत्या केल्या जाणाऱ्या प्रत्येकाची भूमिका स्पष्ट होते.
*    कामातील तुमची भूमिका आणि सहभाग वरिष्ठ समजून घेऊन त्या कामाचे विश्लेषण करू शकतात.


ध्येयनिश्चित करण्याचे लाभ

*    साध्य करावयाच्या कामगिरीसाठी सुरुवातीलाच योजना आखणे सोपं जाते.
*    आपली कामगिरी कशी होते आहे, ते समजते.
*    विकास वा प्रगती साधण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यांच्याविषयी माहिती मिळवता येते.

ध्येय असे असावे-
* आपल्यासमोरील ध्येय हे पुरेसे स्पष्ट असावे. त्याचे उद्दिष्टय़, साध्य करण्याचे मार्ग याबाबतही स्पष्टता असावी. तसे नसेल तर गोंधळ उडण्याची शक्यता अधिक असते.

* साध्य करता येण्याजोगे असावे - ध्येय निश्चित करताना अतिरंजकतेला थारा नसावा. बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर वास्तवात येऊ शकेल असे अर्थपूर्ण आणि आव्हानात्मक ध्येय बाळगावे.


08 September 2012

भविष्यावर अवलंबून राहू नका, तुम्हीच तुमचे भविष्य निवडा! - दिपक घैसास


‘भविष्यावर अवलंबून राहू नका, तुम्हीच तुमचे भविष्य निवडा! आजच्या तरूणाईने निव्वळ सुशिक्षित न होता ई-शिक्षित पण व्हावे कारण काळाची ती गरज आहे’, असे प्रतिपादन प्रसिध्द उद्योजक दिपक घैसास यांनी केले. वीर सावरकर सभागृह, दादर येथे बॉर्न टू विनच्या बाराव्या ‘लक्ष्यसिद्धी सोहळा : वेध भविष्याचा’ या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका मंगलताई शहा आणि बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी आणि अमेय आमरे आदी मान्यवर उपस्थित होते.


भविष्याचा वेध घेत दिपक घैसास यांनी यावेळी आईनस्टाईनच्या सूत्राचा आधार घेत यशस्वी होण्याचे नवीन सूत्र मांडले ते म्हणजे G = MC2. G = Growth (वाढ), MC2 म्हणजेच Ability to manage the change (बदल घडविण्याची क्षमता) असेल तर वाढ निश्चितच होते. बदल हा नेहमी सकारात्मक असावा. कोणत्याही उद्योग-धंद्यात परिस्थितीचे आकलन होणे गरजेचे असते. याकरिता कमी बोलून जास्त ऐकण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. कोणतेही सॉफ्टवेअर तयार करताना निव्वळ इंजिनिअर असून फायद्याचे नसते तर त्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती असणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. माहिती मिळेल तेवढी जमवत रहा, परंतू ती कधी वापरायची हे माहित असणे देखील तेवढेच आवश्यक आहे. भविष्यामध्ये पारंपारिक उद्योग-धंद्यापेक्षा माहिती तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान, व्हर्चुअल बॅंकिंग, इंटरनेट टिव्ही, ऍनिमेशन यावर आधारीत उद्योगधंदयांची प्रगती जास्त असेल शिवाय सांघिक प्रयत्नांच्या आधारावर हे लवकर साध्य होईल अशी भविष्यवाणी त्यांनी केली.

भविष्याचा वेध घेऊनच आपण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडून जैविक तंत्रज्ञानाकडे वळलो आणि जेनकोव्हल स्ट्रॅटजिक सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या  स्कंधकोशिका (Stem Cell) संवर्धन करणाऱ्या कंपनीची स्थापना केली.  बॉर्न टू विन नवीन उद्योजकांना घडविते हे नक्कीच कौतुकास्पद आहे, त्याबद्दल अतुल राजोळी यांचे अभिनंदन. भविष्यात संपूर्ण जगभरात बॉर्न टू विनचा झालेला शाखाविस्तार पाहायला आपणांस आवडेल, असे गौरवोद्गार दिपक घैसास यांनी काढले.


 या सोहळ्यादरम्यान पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका मंगलताई शहा यांचा त्यांच्या समाजकार्याकरिता बॉर्न टू विनतर्फे सत्कार करण्यात आला. मंगलताई शहा या पालवीच्या माध्यमातून ५२ एचआयव्ही बाधित लहानग्यांचा सांभाळ करतात. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की ‘नितीमत्ता, नैतिकता, सचोटी नसल्याने समाजात वाईट प्रवृत्ती बोकाळल्या आहेत. नियतीचे भोग वाट्यास आलेल्या या मुलांना आपल्या मायेची गरज आहे. येथे रामाचे मंदीर बांधण्याची लोकांना इच्छा आहे परंतू खरा राम कोठे आहे’, असा खडा सवाल मंगलताईंनी यावेळी केला. पंढरपूरास कधी गेलो तर पांडूरंगाचे दर्शन घेण्याअगोदर मी पालवीचे दर्शन घेईन, असे भावोत्कट उद्गार दिपक घैसास यांनी काढले. बॉर्न टू विनतर्फे संकलित केलेले सव्वादोन लाख रुपये ‘पालवी’करीता मंगलताई शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच पालवी संस्थेतील एका मुलाचे पालकत्व बॉर्न टू विनने यावेळी घेतले.


 ‘उद्योग-धंदा करताना अडचणी, परिस्थिती, आर्थिक मंदी, बाजारपेठेतील अनिश्चितता अशी शंभर कारणे आम्हाला उद्योजक सांगतात. मात्र प्रशिक्षणानंतर त्यांच्याकडे यावर दोनशे उत्तरे तयार असतात. मराठी तरूणांना मराठी उद्योगविश्वातील दिग्गजांचे अनुभव त्यांच्या तोंडून ऐकता यावे, त्यांचे मार्गदर्शन लाभावे याकरिता प्रत्येक लक्ष्यसिद्धी सोहळ्यास उद्योगविश्वातील असामान्य व्यक्तिमत्त्वांना निमंत्रित केले जाते. आतापर्यंत निर्माण ग्रुपचे अजित मराठे, राजेंद्र सावंत, कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार, राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, एल ऍण्ड टीचे वाय.एम देवस्थळी, दास ऑफशोअरचे अशोक खाडे आदी मान्यवरांनी लक्ष्यसिद्धी सोहळ्यास वलयांकित केले’, असे बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांनी सांगितले.

या लक्ष्यसिद्धी सोहळ्यादरम्यान बॉर्न टू विनच्या यशस्वी प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षकांना दिपक घैसास यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
 

25 August 2012

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती!

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती!
स्वतःची उच्च विश्वसनियता निर्माण करा...
विचार व वागणुक परिवर्तित करणारी बॉर्न टू विन प्रस्तुत चार तासांची मार्गदर्शक कार्यशाळा.
विश्वास हा आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांचा आधारस्तंभ असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी स्नेहसंबंधांमध्ये, संघामध्ये, कुटुंबामध्ये, संस्थेमध्ये, राष्ट्रामध्ये व जगामध्ये विश्वास खुप महत्त्वाची भुमिका बजावतो. जर विश्वास नसेल तर शक्तीशाली राजकीय सरकार पडू शकते, यशस्वी व्यवसाय उध्वस्त होऊ शकतो, अर्थव्यवस्था कोलमडू शकते, प्रभावी नेतृत्व संपुष्टात येऊ शकते, उत्तम मैत्रीचा अंत होऊ शकतो, स्नेहसंबंधांमध्ये तफावत निर्माण होऊ शकते.

उच्च विश्वास प्रस्थापित केल्याने उत्तुंग यशप्राप्ती होऊ शकते. कोणत्याही क्षेत्रात व आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत वेगवान प्रगती होऊ शकते. परंतु विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रीयेला बर्‍याच अंशी दुर्लक्षित केले जाते व जेवढे महत्त्व दिले पाहिजे, तेवढे दिले जात नाही. विश्वास दिवसातले २४ तास, आठवड्यातील ७ दिवस व वर्षातील १२ महिने आपल्याला प्रभावीत करत असतो. आपल्या विचारांचा, आयुष्याचा, स्नेहसंबंधांचा, संभाषणाचा व प्रत्येक वागणुकीचा दर्जा विश्वासावर अवलंबुन असतो.

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती! या चार तासांच्या कार्यशाळेमध्ये बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी आपल्या प्रभावी शैलीद्वारे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात स्नेहसंबंधांमध्ये उच्च विश्वास कसे निर्माण करु शकाल याबाबत मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेच्या मदतीने आपण आपली उच्च विश्वसनीयता निर्माण करु शकाल व आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांच्या सहाय्याने यशस्वी होण्याच्या दिशेने वेगवान प्रगती कराल.
विश्वास निर्मिती वेगवान प्रगती! या कार्यशाळेमध्ये खालील गोष्टींचा खुलासा होईल?
  • स्वतःची विश्वसनियता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या?
  • वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी कसे वागावे?
  • परस्पर व्यवहार कौशल्यात सुधारणा कशी करावी?
  • आपल्या वागणुकीत कोणते सकारात्मक बदल करावे व ते करण्यासाठी मार्गदर्शन
  • स्नेहसंबंधामधील अडचणी कल्पकतेने सोडवण्यासाठी आवश्यक दृष्टीकोन
  • व्यावसायिक स्नेहसंबंध कसे सुधारावे व जोपासावे?
हि कार्यशाळा कोणासाठी?
  • सामाजिक अथवा व्यावसायिक संस्थांचे कर्मचारी
  • मॅनेजर, लिडर व एक्सेक्युटिव्ह
  • स्वयंरोजगारकर्ते व प्रोफेशनल्स
  • उद्योजक
  • गृहिणी
दिनांकः बुधवार, ५ सप्टेंबर २०१२
वेळः सायंकाळी ६:०० ते १०:००
स्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, महापौर निवासच्या बाजुला, शिवाजी पार्क, दादर ( प.), मुंबई- ४०००२८.
गुंतवणुकः रुपये १०००/- (बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी रुपये ८००/- फक्त!)
प्रवेशिका मिळवण्यासाठी संपर्कः 022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689

06 August 2012

बारावा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'वेध भविष्याचा'

नमस्कार मित्रांनो!
मला सांगयला अत्यंत आनंद होत आहे की, THE SUCCESS BLUEPRINT सेमिनार दिनांक ४ जुलै रोजी प्रचंड उत्साहात, जल्लोषात आणि यशस्वीपणे पार पडला.
सध्या लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची बारावी बॅच आपल्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. आणि आता सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थ्यांना व बाराव्या बॅचच्या लक्ष्यवेधींना वेध लागले आहेत ते म्हणजे बाराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे...! लक्ष्यसिध्दी सोहळा म्हणजे लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाच्या पदवीदान समारंभात व लक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा स्नेहमेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व त्यांचे मार्गदर्शन.
बाराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक असणार आहेत, GENCOVAL Group चे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक / सल्लागार श्री. दिपक घैसास. 
'वेध भविष्याचा' या त्यांच्या आगळ्या वेगळ्या व्याख्यानात ते आपल्याला सांगणार आहेत की आपल्या समोर उगविणारा भविष्यकाळ नक्की असेल तरी कसा? कोण कोणत्या संध्या घेऊन हा काळ आपल्या समोर येत आहे आणि त्या  संध्यांचा फायदा करुन घेण्यासाठी आपण कसे सुसज्ज राहु शकतो? कोणती Industry या काळात वर्चस्व गाजविणार आहे...
तर मग भविष्याचा वेध लावणार्‍या या उत्साहपुर्वक व्याख्यान ऐकण्यास तुम्हीपण सुसज्ज व्हा.

श्री. दिपक घैसास यांच्याबद्दल थोडेसे:-
 

  • GENCOVAL STRATEGIC SERVICE PVT. LTD. या संस्थेचे अध्यक्ष.
  • I-FLEX INDIA या संस्थेचे उपाध्यक्ष.
  • Software Industry मध्ये २५ वर्षाचा दाणगा अनुभव.
  • Nasscom Executive Council चे कार्यकारी सदस्य.
  • महाराष्ट्र्र आर्थिक विकास महामंडळाचे या सस्थेचे उपाध्यक्ष.
  • CII, IMC च्या IT Committee चे सदस्य.
  • Indian Institute of Bankers, त्याच बरोबर Reserve Bank of India च्या Internet Banking Committee चे सदस्य.
  • Shoppers Stop, USV Ltd., Camlin Ltd. अश्या विविध संस्थांच्या बोर्ड पॅनल वर ते आहेत.
  • ते पहिले भारतीय आहेत ज्यांना २००१ मध्ये सर्वात प्रतिष्ठेचा असा CFO Asia पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
  • ५० महाराष्ट्रीय प्रभावी व्यक्ती मध्ये त्यांना महाराष्ट्र टाईम्स द्वारे सन्मानित करण्यात आले आहे.
  • Rediff.com  तर्फे ५० यशस्वी महाराष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत सन्मानित करण्यात आले आहे.
'वेध भविष्याचा' घेणारे हे व्याख्यान ऐकण्यासाठी व अनुभवण्यासाठी आपण आवर्जुन उपस्थित रहाल यात काही शंकाच नाही... आपल्या मित्रपरिवाराला देखिल या संधीचा लाभ घेण्यासाठी नक्की आमंत्रित करा!
तर मित्रांनो भेटूया ०९ ऑगस्ट २०१२ रोजी....
  
बारावा लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषय: 'वेध भविष्याचा'
दिनांक: ०९ ऑगस्ट २०१२
स्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites