मित्रांनो, लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची सातवी बॅच सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे व बॉर्न टू विनच्या टीमला व लक्ष्यवेधच्या सर्व आजी माजी प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजेच लक्ष्यवेधींना... वेध लागले आहेत, ते सातव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे!
हो मित्रांनो... लक्ष्यसिध्दी सोहळा जिकडे सर्व लक्ष्यवेधचे प्रशिक्षणार्थी एकत्र येतात, एक मेकांना भेटतात, लक्ष्यवेधचे स्पिरीट पुन्हा एकदा अनुभवतात, लक्ष्यवेधच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान लक्ष्यवेधच्या गुणवान प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करतात व महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे मौल्यवान विचार आपल्या बरोबर घेऊन जातात.
लक्ष्यसिध्दी सोहळा
आपणा सर्वांना कळवण्यास अतिशय आनंद होत आहे कि येत्या २१ मे रोजी, माटुंगा (पश्चिम) येथिल कर्नाटक संघ हॉल येथे, संध्याकाळी ६:३० ते ९:३० दरम्यान, सातवा लक्ष्यसिध्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आपण या कर्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती व तितकाच आग्रह! आपली उपस्थिती बॉर्न टू विनसाठी व लक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी अतिशय मोलाची आहे.
यंदाचा लक्ष्यसिध्दी सोहळा देखिल नेहमी प्रमाणे आपल्या उदंड प्रतिसादात पार पडेल यात काही शंका नाही.
सातव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डॉ. उदय निरगुडकर. डॉ. उदय निरगुडकर आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत 'बॉर्न टू विन' या विषयावरिल त्यांच्या व्याख्यानाद्वारे!
डॉ. उदय निरगुडकर यांच्याबद्दल थोडेसे :-
- पुणे विद्यापिठातून एम. बी ए. आणि त्यानंतर त्याच विद्यापिठातून व्यवस्थापन क्षेत्रातील डॉक्टरेट.
- मराठी तरुणांनी कॉल सेंटरमध्ये प्रवेश करावा याकरिता शेकडो मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामिण भागात केले.
- गेली २० वर्ष माहिती तंत्रज्ञानशिक्षण आणि पायाभूत सोयीसुविधा या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत.
- ग्रामीण क्षेत्रामध्ये ५०० हुन अधिक संगणक केंद्राची स्थापन करण्यात पुढाकार.
- सुमारे ४० पेक्षा अधिक देशांचा प्रवास व तेथे उद्योग यशस्वी करण्याचा अनुभव.
- जागतीकिकरणातील बदलत्या भारताचे अंतरंग हा अभ्यासाचा विषय.
- अनेक शिक्षणसंस्था व सामाजिक उपक्रमांशी अत्यंत जवळचा संबंध.
- चिंतनशील लेखक, उत्तम वक्ता, व्यवस्थापनतज्ञ, माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वाची बारकाईने जाण, नाटक साहित्य अशा चौफेर अंगानी फुलेल व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. उदय निरगुडकर.
- त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. उदय निरगुडकर त्यांच्या 'बॉर्न टू विन' या मार्गदर्शनपर व्याख्यानाद्वारे, आपणास आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात विजयी होण्यासाठी काही महत्त्वाच्या विषयांबद्दल बोलणार आहेत. त्यामध्ये नेत्तृत्व गुण विकसित करणे, उत्कृष्टतेच्या मार्गावर प्रवास करणे, कार्यक्षम संघ बांधणी करणे यांचा सामावेश असेल.
डॉ. उदय निरगुडकर यांच्या सारख्या अष्टपैलु व्यक्तीचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी व अनुभवण्यासाठी आपण आवर्जुन उपस्थित रहाल यात काही शंका नाहीच, परंतु आपल्या मित्रपरिवाराला देखिल नक्कीच या संधीचा लाभ घेण्यासाठी नक्कीच आमंत्रित करा!
तर, मित्रांनो भेटुया २१ मे रोजी...
लक्ष्यसिध्दी सोहळा
विषयः बॉर्न टू विन
दिनांकः २१ मे २०११
स्थळः कर्नाटक संघ हॉल, ऑफ टी. एच. कररीया मार्ग, माटुंगा (प.)
वेळः संध्याकाळी ठिक ६:३० वाजता
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/८, ७६६६४२६६५४,९६१९४६५६८९
No comments:
Post a Comment