नववा लक्ष्यसिध्दी सोहळा: "उद्योग निर्माण" ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

23 November 2011

नववा लक्ष्यसिध्दी सोहळा: "उद्योग निर्माण"

नमस्कार!
मित्रांनो २०११ हे वर्ष कधी सुरु झाले आणि आता कधी संपत आले, हे कळलेच नाही... नाही का? २०११ हे वर्ष बॉर्न टू विनसाठी अतिशय समाधान कारक होते असे नक्कीच मला म्हंटले पाहीजे. २०११ मध्ये BORN2WIN ने NLP (Neuro Lingustic Programming) हा उपक्रम मराठीत सुरु केला व एकूण चार प्रशिक्षणक्रम राबविले. त्या द्वारे एकूण ८७ NLP Practitioners BORN2WIN ने तयार केले. त्याच प्रमाणे फ्युचर पाठशालाच्या एकूण ६ शाखांद्वारे फ्युचर पाठशाला उन्हाळी सुट्टी दरम्यान माटूंगा, चेंबुर, वाशी, खारघर, बोरीवली व बोईसर येथे राबवण्यात आला. Graphology (हस्ताक्षराद्वारे मनोविश्लेषण) चे मराठीतुन एकूण २ प्रशिक्षणक्रम आपण राबवले, व तिसरी बॅच २७ नोव्हेंबर रोजी सुरु होत आहे. BORN2WIN चा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम LAKSHYAVEDH ADVANCE हा एक वर्षाचा उद्योजकता विकास कार्यक्रम देखिल २०११ मध्ये सुरु झाला व दोन प्रशिक्षणक्रम सध्या दणदणीत रित्या सुरु आहेत. बॉर्न टू विनचा परिवार दिवसेंदिवस वाढत आहे व बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांचा यामध्ये खुप मोठे योगदान आहे. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाला तर महाराष्ट्रीय मंडळींनी अक्षरशः डोक्यावर उचलुन घेतले आहे व त्याची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढत आहे.

लक्षवेधच्या नवव्या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी तर Record Breaking आहे. ही बॅच खरच खुप छान झाली व प्रशिक्षणार्थ्यांची मस्त गट्टी जमली आहे. आता सगळे आजी माजी प्रशिक्षणार्थी वाट पाहत आहेत ती म्हणजे नवव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याची...
मित्रांनो आगामी लक्ष्यसिध्दी सोहळा पार पडणार आहे २५ नोव्हेंबर २०११ रोजी, वीर सावरकर सभागृह, प्रभादेवी येथे संध्याकाळी ६:३० वाजता.

मित्रांनो, नेहमी प्रमाणे लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक! यावेळचे प्रमुख पाहूणे म्हणजे एक व्यक्ति नसुन दोन व्यक्ति असणार आहेत. हो मित्रांनो, निर्माण रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स लि. या कंपनीचे संस्थापक श्री. अजीत मराठे व श्री. राजेंद्र सावंत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत 'उद्योग निर्माण' या त्यांच्या लाइव मुलाखती द्वारे. त्यांची मुलाखत घेणार आहेत, बॉर्न टू विन चे संचालक अतुल राजोळी. ह्या मुलाखती द्वारे निर्माण या संस्थेची शुन्यातुन झालेली सुरुवात व विस्तार याबाबत सविस्तर उलगडा होणार आहे. आपणास जिवनात जर यशस्वी व्हायचे असेल व यशाची सुत्रे जाणुन घ्यायची असतील तर खुद्द यशस्वी व्यक्तींकडून हे जाणुन घेणे नेहमीच उत्तम! 


निर्माण बद्दल थोडेसे:
'To be among the top 5 builder developers in India and among the top 25 in the world while being the leader in the affordable housing segment by creating better lifestyles and better environments through state of the art township at affordable rates.'


हे ब्रीद वाक्य घेउन आज निर्माणची वाटचाल सुरु आहे. १९९५ साली अजित मराठे आणि राजेंद्र सावंत या दोन युवकांनी भागीदारीत सुरु केलेल्या ह्या फर्मचे रुपांतर आता रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स लि. अशा पब्लिक लिमिटेड कंपनीत झाले आहे. येत्या २ ते ३ वर्षात या कंपनीचा पब्लिक इश्श्यु बाजारात येणार आहे आणि आज फक्त एक कंपनी न रहाता अनेक कंपन्यांचा हा निर्माण ग्रुप तयार झाला आहे.

निर्माण रिअल्टर्स अ‍ॅंड डेव्हेलपर्स लिमिटेड कंपनीच्या अंतर्गत मुख्यतः बिल्डर डेव्हलपर म्हणून विविध ठिकाणी जागा विकत घेऊन त्या जागेवर विविध प्रकारचे प्रकल्प मुख्यतः निवासी प्रकल्प उभारण्याचे काम केले जाते. असे आज जवळजवळ ४० प्रकल्प विविध स्तरावर आणि विविध ठिकाणी सुरु आहेत. कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, महालक्ष्मी, पार्ले, गोवंडी, नेरळ, रत्नागिरी, गणपतीपुळे, मांणगाव (गोरेगांव), गोवेले इ. सर्व ठिकाणी प्रकल्पांचे काम सुरु आहे.

बिल्डरच्या हाताखाली बिल्डर ही संकल्पना निर्माणने अतिशय उत्तमरित्या राबविली आहे. अधिकाधिक मराठी लोकांनी बांधकाम व्यवसायात यावे या दृष्टीकोनातून विविध स्तरावरील प्रशिक्षण वर्ग निर्माण ट्रेनिंग अ‍ॅकेडमी तर्फे राबविले जाते. प्रत्येक बुकींग मागे रु. ५०००/- हे निर्माण चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात जमा होतात. या ट्रस्ट तर्फे मांणगाव येथील १०० विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च ट्रस्ट करते. मुंबईतील काही अनाथश्रयातील विद्यार्थी देखिल या योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे. कोकणातल्या विविध ठिकाणच्या उद्योगधंद्यांना पुरक असे मनुष्यबळ विकसित करुन कोकणातील तरुणांना त्याच्या स्वतःच्या पायावर उभे करावे असे उद्दिष्ट ठेऊन निर्माण तर्फे माणगाव - जिल्हा रायगड येथिल I. T. I. केंद्र शासनाच्या सहाय्याने चालिवले जाते.त्यात परंपरागत कोर्सेस सोबत काही नविन अभ्यासक्रम चालू करण्याचा मानस निर्माणने ठेवला आहे त्यामध्ये पर्यट्न, संगणक, इंग्रजी संभषण, कृषी विषयक अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

असा हा स्फुर्तीदायक कार्यक्रम अजिबात चुकवू नका...!

नववा लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषय: उद्योग निर्माण
दिनांक: २५ नोव्हेंबर २०११
स्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर(प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९



No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites