उद्योगस्फुर्ती सोहळा
नमस्कार!
मित्रांनो संपुर्ण बॉर्न टू
विनच्या परिवारास आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि आपली लक्ष्यवेध ADVANCE ची ४ थी बॅच नुकतीच यशस्वीरीत्या
पूर्ण झाली आहे.
लक्ष्यवेध
प्रशिक्षणक्रमादरम्यान आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात सकारात्मक परिवर्तन
अनुभवल्यानंतर व निश्चित केलेल्या दुरगामी ध्येयाच्या दिशेने वाटचाल
आक्रमक पध्दतीने कायम ठेवण्यासाठी उद्योजकाचा एक नवीन प्रवास सुरु होतो आणि तो म्हणजे आपल्या व्यवसायावर काम
करण्याचा व त्यांचं पुढच पाउल असतं लक्ष्यवेध
ADVANCE!
कोणत्याही
उद्योजकाला त्याचा उद्योग हा व्यवसाय विकास प्रक्रीयेद्वारे व काही परिणामकारक
उद्योजकीय कृतीयोजनांद्वारे उत्कृष्ट व आदर्श व्यवसायात रुपांतरीत करण्यास मदत
करणे व त्याला खर्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त करुन देणे, हा लक्ष्यवेध ADVANCE या
प्रशिक्षणक्रमाचा उद्देश होय.
आम्हाला सांगायला
अतिशय आनंद होत आहे की लक्ष्यवेध ADVANCE च्या ४ थ्या बॅचच्या यशोगाथा गेल्या ३ बॅच प्रमाणे खरोखरच थक्क करणार्या
आहेत. फक्त दिड वर्षांच्या कालावधी दरम्यान या प्रशिक्षणार्थ्यांच्या व्यवसायात
झालेला अमुलाग्र बदल अगदी थक्क करणारा आहे.
४ थ्या बॅचचा
पदवीदान समारंभ होत आहे १९ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी ६ वाजता, बी. एन. वैद्य
सभागृह, दादर (पू.) येथे.
या संधीचा लाभ
प्रत्येक लघु-उद्योजकाने घेतलाच पाहिजे. १९ डिसेंबर रोजी आपण, या
प्रशिक्षणार्थ्यांच्या धमाकेदार कामगिरीबद्दल त्यांच्याच कडून ऐकू शकाल. तिथे आपण
या जबरदस्त Case-Studies पाहणार आहोत व त्यांच्या दणदणीत कामगिरीबद्दल जाणून घेणार
आहोत.
या कार्यक्रमाचे
आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक, 'मराठी व्यावसायिक
उद्योग व्यापारी मित्रमंडळाचे' श्री अनंत भालेकर सर व
'निर्माण ग्रुप' चे चेअरमन श्री.
राजेंद्र सावंत सर. आपल्याला त्यांचं जबरदस्त मार्गदर्शन देखील लाभणार आहे.
कोणत्याही
उद्योजकाला अतिशय प्रेरणादायी व स्फुर्ती देणारा हा कार्यक्रम अगदी MUST ATTEND आहे!
तर भेटूया १९
डिसेंबर रोजी ६ वाजता बी. एन. वैद्य सभागृह येथे.
उद्योगस्फुर्ती सोहळा
दिनांक: गुरुवार १९ डिसेंबर २०१३
वेळः सायंकाळी
ठिक ६:०० वाजता
स्थळः प्रा. बी.
एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, एल. एन. रोड, दादर (पू.)
प्रवेश विनामुल्य
प्रवेश विनामुल्य
संपर्कः 022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689.
No comments:
Post a Comment